Sunday 22 January 2017

हिरोंचा हिरो.... विनीत वर्तक
तो आला, त्याला पाहिलं, त्याने जिंकल, त्याने घडवला इतिहास त्याने बदलवला वर्तमान त्याने कोरल आपल नाव भविष्यात. असा हिरोंचा हिरो म्हणजे “द रजनिकांत”. भारताच्या चित्रपट सुष्टीत अनेक हिरो आले गेले. काही सुपर स्टार झाले. काही मल्टी स्टार झाले तर काही स्टार ऑफ मिलेनियम झाले. पण देवपण मिळाल ते एकालाच. तो काही कमालीचा देखणा नाही. न त्याचा आवाज काही भरभक्कम नाही. न त्याची शरीरयष्टी सिक्स प्याक आहे. पण तो आहे स्टाईल चा बादशाह.
एक मराठा असलेला शिवाजीराव गायकवाड बंगलोर ला परिवहन सेवेत नोकरी करताना रजनीकांत कसा बनला ह्यावर एक चित्रपट निघू शकेल असा त्याचा प्रवास आहे. एक सामान्य माणूस ते सुपरस्टार रजनीकांत ह्यावर सी. बी. एस. सी बोर्डाच्या पुस्तकात एक धडा आहे. दक्षिण भारतातील सगळ्यात मोठा अभिनेता ते आशियातील सगळ्यात जास्ती मानधन घेणारा ज्याकी च्यान नंतर चा अभिनेता ( शिवाजी ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी तब्बल ८.२ मिलियन अमेरिकन डॉलर मानधन मिळाल होत.) हा त्याचा प्रवास थक्क तर करणारा आहेच. पण त्याची लार्जर द्यान लाईफ इमेज ठासवणारा आहे.
कोणतेही पाठबळ नसताना, एक सामान्य रंग, रूप , आवाज असताना आपल्या सवांद फेकायच्या स्टाईल ने आणि गुरूत्वाकर्षणाचे नियम मोडीत काढत न्यूटन ला तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या त्याच्या स्टाईल ने प्रेक्षकांना वेड लावल. आधी वेडेचाळे किंवा अतिशीयोक्ती वाटणारी त्याची हीच स्टाईल त्याला इतक्या वर घेऊन गेली कि प्रेक्षक चित्रपट नंतर बघतात. पण आधी ह्या वेळेस कोणती नवी स्टाईल किंवा सवांद तो घेऊन येणार आहे ह्याची वाट बघतात.
त्याच्या चित्रपटाच्या रिलीज च्या दिवशी सामुहिक रजे साठी अर्ज येतात. ऑफिस ओस पडतील अशी स्तिथी दक्षिण भारतात असते. चित्रपट बारीवर तिकिटे सोनाच्या पेक्षा वरचढ भावाने विकली जातात. ज्याच्या एन्ट्री ला फक्त शिट्या वाजत राहतात. लोक ५००-१००० च्या नोटा उडवून आपला आनंद व्यक्त करतात बर हे दक्षिण भारतातील चित्र नाही तर अगदी मुंबईत हि स्थिती आहे. ज्याच्या चित्रपटाचा सकाळचा ६ चा शो पण हाऊसफुल चा बोर्ड लावतो आणि रात्री १:३० चा शो पण हाऊसफुल चा बोर्ड लावतो. मला वाटते अस स्टारडम जगातल्या कोणत्याच अभिनेत्याला मिळाल नसेल.
रजनीकांत भारतात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. ह्याच एक छोट उदाहरण म्हणजे त्याचा एक तमिळ चित्रपट “मुथू – ओडोरू महाराजा” हा जापनीज भाषेत जेव्हा जपान मध्ये दाखवला गेला. तेव्हा ह्या चित्रपटाने जपान मध्ये त्या काळी तब्बल १.६ मिलियन अमेरिकन डॉलर कमावले. जापनीज लोक रजनीकांत ची इतकी फ्यान झाली कि खुद्द त्या वेळेचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी आपल्या जपान दौऱ्यातील भाषणात रजनीकांत आणि त्याच्या चित्रपटाचा उल्लेख दोन देशातील संबंधानवर बोलताना केला. ह्या चित्रपटाची दखल खुद्द न्यूजवीक ह्या मासिकाने घेताना लिहील होत. Rajinikanth had "supplanted Leonardo DiCaprio as Japan's trendiest heartthrob" वयाच्या पन्नाशीत एका विशीतील अभिनेत्याला मागे टाकण त्याची दखल जागतिक मासिकाने घेण हे फक्त रजनीकांत करू शकतो.
२०१४ मद्धे रजनीकांत ने ट्विटर च अकाऊंट उघडताच तब्बल २१०,००० पेक्षा फॉलोअर २४ तासांच्या आत झाले. हा वेग भारतातील कोणालाही लाभलेल्या फॉलोअर पेक्षा सुपर फास्ट तर जगातील सुपर फास्ट अश्या पहिल्या १० फॉलोअर मध्ये आहे. प्रसिद्धीच इतक वलय असून हि राजीनिकांत एक नवरा, बाप, सासरा ह्या सगळ्या भूमिकेत आदर्शपणे वावरत आहे. उंच आकाशात उडून सुद्धा एक पाय जमिनीवर ठेवण्याच कसब हे राजीनिकांत लाच जमू शकते. वयाच्या ६६ वर्षी सुद्धा लोक त्याच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघतात. जी स्टाईल रजनीकांत जगला ती आजही तो त्याच पद्धतीने दाखवतो. आजही ह्या हिरोच्या हिरो च्या चित्रपटाचा सकाळी ६ चा शो हाऊसफुल होतो. लोक त्याच शिट्या आणि आवाजात त्याच स्वागत करतात. आजही रजनीकांत न्यूटन ला त्याच्या मारामारीच्या स्कील ने तोंडात बोट घालायला लावतो. शिवाजी असो व कबाली प्रेक्षकांसाठी तो हिरोंचा हिरो रजनीकांत असतो.

No comments:

Post a Comment