Sunday 22 January 2017

सोन्याची लुट... विनीत वर्तक
दसऱ्याच्या निमित्ताने आज सगळीकडे सोन्याची लुट चालू असेल. शुभ मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी झुंबड करताना ह्या पिवळ्या धातू ची इच्छा कित्येक शतकानंतर पण तितकीच कायम आहे. राजे आले आणी गेले. राज्य झाली आणी काळाच्या ओघात नष्ट झाली. पण माणसाला विशेष करून भारतीयांना लागणारी सोन्याची भूक आज ही तितकीच आहे.
पिवळा रंग किंवा गोल्डन रंगाने चमकणारा हा धातू खरे तर इलेक्ट्रोन च्या कक्षा बदलताना होणाऱ्या बदलांचा परिणाम आहे. आपल्या कक्षा बदलताना इलेक्ट्रोन प्रकाशातील एखादा रंग शोषून घेताना बाकीचे रंग परावर्तीत करतात. ह्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक धातू एका विशिष्ठ रंगाने बनलेला असतो. सोनाच्या बाकीच्या गुणधर्मांमुळे त्याच चकाकण माणसाला आज कित्येक वर्ष आकर्षित करत आलेल आहे.
भारतात इसविसनपूर्व १८०० वर्षापूर्वी धातूंच्या अभ्यासाला सुरवात झाली होती. त्यानंतर भारत इंग्रज येईस तोवर मेटोलर्जी मध्ये जगात अग्रगण्य होता. सोन्याच महत्व भारतीयांना खूप आधी माहित होत. त्यामुळेच ह्या धातूने अढळ अस स्थान भारतीयांच्या मनात मिळवलं किंबहुना शरीरावर. सोनाच्या ह्या पिवळ्या रंगात अनेक पिढ्या नाहून निघाल्या. ह्या धातूच्या गुणधर्माचा अभ्यास करून त्यांनी कलाकुसरीचे उत्कृष्ठ असे नमुने घडवले त्याची मोजदाद आजही शक्य झाली नाही.
भारतात सोन्याचा धूर निघायला दोन प्रमुख कारणे होती. एकतर हा धातू सहजासहजी सापडणारा नव्हता. त्याचवेळी अभूषणात ह्याचा वापर केल्या गेल्याने ह्याच महत्व सगळ्यात वाढल. तसेच ज्या सहजतेने ह्या धातूवर कलाकुसर शक्य होत होती त्याच्या सौंदर्याने भारतातील अनेक पिढ्यांना वेड लावल. ते आकर्षण आजही तितकच कायम आहे. साडेतीन मुहुर्तांवर सोनाच्या खरेदीसाठी उडणारी झुंबड आजसुद्धा तितकीच कायम आहे.
भारतातील सोन्याची किमत आजमितीला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्ती आहे. अर्थात हि किंमत खूप ढोभळ मानाने आहे. कारण सोन घरात असण हे भारतीयात लक्ष्मी घरात असण्याच लक्षण मानल जाते. म्हणून किती सोन असू शकेल हे सांगण खूपच अवघड आहे. एकट्या पद्मनाभन देवळात जवळपास २२ बिलियन अमेरिकन डॉलर चे सोन्याचे आभूषण असल्याच मानल जाते. भारताच्या देवळात तब्बल ४ हजार टन पेक्षा जास्त सोन आज अस्तित्वात आहे. तर भातीयांकडे जवळपास २०,००० टना पेक्षा जास्त सोन घराघरात आहे.
इतक असून सुद्धा भारतीयांची सोन्याची भूक किंचित सुद्धा कमी झालेली नाही. अडचणीच्या वेळी पैसा देणारा भरवशाच्या धातू आज इतक्या शतकानंतर सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या घराघरात तर शरीरावर अगदी आनंदाने विराजमान आहे. एके काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता ते अगदी खर आहे. आजही तो धूर कमी झालेला नाही. फक्त धुराचे नियम बदलले आहेत त्यामुळे तो दिसत नाही. आज दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोन्याची लुट होईल. त्या निमित्ताने पुन्हा एकदा सोन्याचा धूर भारतात निघून दे ह्या आशेने सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेछ्या.

No comments:

Post a Comment