Sunday 22 January 2017

डसाल्ट च भारतीय राफेल... विनीत वर्तक ( १५ सप्टेंबर २०१६ )
अनेक अडचणीच्या शेजार्यांनी वेढलेल्या भारताला नेहमीच त्याच्या जमीन, सागरी, आकाश अश्या तिन्ही स्तरावर सुरक्षेसाठी आणि युद्धासाठी तत्पर असावे लागते. त्याच्यामुळे आपल्या सामरिक शक्तीत सतत बदल आणि अत्याधुनिकता भारताला करावी लागते. भारताची हवाई ताकद हि जगातील काही अग्रगण्य ताकदवर देशात गणली जाते. वृद्ध झालेल्या आणी अनेक अपघातांच कारण बनणाऱ्या मिग विमानांना सेवानिवृत्त करताना त्यांची जागा घेणारी पण त्याच वेळी नवीन युगाच नेतृत्व करण्यात सक्षम असणाऱ्या विमानांचा ताफा आपल्याकडे असावा ह्या साठी भारताने एम.आर.सी.ए ह्या नावाने एक स्पर्धा केली. तब्बल १२८ विकत घेण्याच्या ह्या स्पर्धेत जगातील अनेक अत्याधुनिक विमान बनवणाऱ्या कंपन्यांनी आपली तगडी विमान उतरवली. मिग- ३५ , ग्रीपेन, युरोफायटर टायफून, एफ-१६, सुपर होर्नेट, डसाल्ट राफेल.
अतिशय किचकट अश्या इंजिनिअरींग आणी बाकीच्या कसोटीवर ज्या भारताच्या गरजा होत्या अश्यावर डसाल्ट ने आपली मोहोर उमटवली. एल.सी.एम आणी सुखोई ३० अश्या दोन टोकाच्या भूमिकेच्या मध्ये एक भूमिका दोन्ही टोकांवर निभावणार अत्याधुनिक विमान भारताला हव होत. ती गरज पूर्ण करण्याची क्षमता राफेल मद्धे आहे. राफेल हे अत्याधुनिक ५ व्या पिढीतील हवाई हल्यासाठी सक्षम अस विमान समजल जाते. दोन इंजिन असणार राफेल एअर सुप्रीमसी ते ग्राउंड सपोर्ट अश्या विविध भूमिका अतिशय चोखपणे निभावू शकते. माख १.८ वेगाने म्हणजे १९१२ किमी/ तास ह्या वेगाने जवळपास ३७०० किमी पेक्षा जास्ती प्रवास करण्याची क्षमता असलेल हे विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्र नी सज्ज आहे. न्युक्लीयर मिसाईल नेण्याची ह्याची क्षमता ह्याला अजून घातक बनवते.
अश्या अत्याधुनिक विमान सिलेक्ट झाल्यावर फ्रेंच सरकार आणि डसाल्ट नी अचानक ह्याची किमंत वाढवली तसेच भारतात निर्माण होणाऱ्या विमानांची जोखीम उचलण्याची तयारी न दर्शवल्याने भारताने ह्यावर आक्षेप घेतला. हि १२८ विमानांची खरेदीच रद्द केली. पण भारतीय एअर फोर्स आणी भारताच्या सामरिक शक्ती ला तसेच शत्रूवर वचक ठेवणाऱ्या ह्या अत्याधुनिक विमानांची गरज भारताला प्रचंड आहे. ह्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी स्वताच वजन वापरून त्यांच्या फ्रांस दौऱ्यात फ्रांस सरकारबरोबर डायरेक्ट करार करून ३६ विमान हि फ्लाय अवे स्तिथीत विकत घेण्याची घोषणा केली. तरीपण किमंत तसेच भारतात मेक इन इंडिया च्या मार्फत विमान बनवण्याच्या वाटाघाटी सुरु झाल्यावर दोन्ही कडून अतिशय गुप्तता ह्यात बाळगली गेली.
१० बिलियन युरो अशी अवाढव्य किमंत असणारा हा सौदा अनेक वाटाघाटी नंतर ७.८९ बिलियन युरो पर्यंत खाली आणण्यात भारताला यश आल. तसेच ह्यापेकी तब्बल ३ बिलियन युरो पेक्षा जास्ती किमतीचे भाग किंवा त्यांची निर्मिती भारतात केली जाईल हे फ्रांस कडून मनवण्यात भारताला यश आल आहे. नक्कीच ह्यामागे अनेक महिन्यांची निगोसियेशन आहेतच पण त्यासोबत हे राफेल आपल्यासाठी किती महत्वाच आहे हे अधोरेखित होते आहे. राफेल च्या उपयुक्ततेवर एअर फोर्स च्या पायलट पासून टेक्निकल एक्स्पर्ट नी आपल्या पसंतीची मोहोर लावली होती. त्यामुळे इतकी प्रचंड किमंत मोजून राफेल भारताच्या हवाई दलात दाखल होत आहे.
ह्यातील अजून एक आनंदाची बातमी म्हणजे हि राफेल मेटोर्स ह्या जगातील सर्वात अत्याधुनिक एअर टू एअर मिसाईल सोबत येत आहेत. हे मिसाईल १०० किमी पेक्षा जास्ती लांब असलेल्या कोणत्याही विमान अथवा क्षेपणास्त्रचा अचूक वेध घेण्यात सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र माख ४ ( ध्वनीपेक्षा ४ पट ) रयामजेट वेगाने शत्रूचा नाश करते. ह्याच्या तुलनेच क्षेपणास्त्र आजमितीला फक्त अमेरिकेकडे आहे. चीन, पाकिस्तान ह्याचा आसपास पण पोचत नाहीत. तुलना करायची झाली तर एक राफेल ज्यावर मेटोर्स लावलेलं आहे ते तब्बल ३ सुखोई ३० किंवा ३ एफ १६ किंवा ३ जे ११ ह्यांना सुद्धा भारी पडू शकते. म्हणजे युद्धात राफेल विथ मेटोर्स म्हणजे शत्रूच्या हवाई क्षमतेचा कणा आपण मोडलाच.
अश्या अतिशय सक्षम, अत्याधुनिक आणि त्याच वेळी जगात भारतीय हवाई दलाचा दरारा वाढवणार डसाल्ट च भारतीय राफेल डील अंतिम टप्यात आहे. हे पूर्ण झाल्यावर २०१९ पासून भारताच्या हवाई दलाच्या क्षमतेत कैक पटीन ची वाढ होईल. एकीकडे पाकिस्तानला एफ १६ नाकारताना लावलेली राजकीय खेळी जिंकल्यामुळे व डसाल्ट च्या भारतीय राफेल येण्याने भारताच्या शक्तीत प्रचंड वाढ होणार आहे.

No comments:

Post a Comment