Sunday 22 January 2017

लाय टू मी... विनीत वर्तक
गेले अनेक दिवस “लाय टू मी” नावाची अमेरिकन सिरीज बघतो आहे. अमेरिकन सिरीज नेहमीच एक वेगळाच विषय घेऊन समोर येतात. त्याच्या पठडीतील हि चुकवू नये अशी सिरीज आहे. जगातील नावाजलेले सायकोलोजीस्ट पॉल एकमन ह्यांच्या ह्युमन एक्स्प्रेशन च्या अभ्यासावर हि सिरीज बसली आहे. अप्लाइड सायकोलॉजी , मायक्रोएक्स्प्रेशन , फेशियल कोडींग सिस्टीम, बॉडी ल्यांग्वेज ह्या सगळ्याचा अभ्यास करून गुन्ह्याची उकल करण्यावर हि संपूर्ण सिरीज प्रकाशझोत टाकते.
ह्यातील प्रत्येक एका विषयात एक स्वतंत्र पी. एच. डी. होऊ शकेल. ह्यामुळेच माणसाला समजणे किती अवघड आहे हे सिद्ध होते. खरे तर एक्स्प्रेशन हे मानवाला इतर प्राण्यांपेक्षा लाभलेलं वरदान आहे. म्हणून तर प्रेमाच्या इतक्या वेगवेगळ्या लेवल वर आपण अनुभूती घेऊ शकतो. न बोलता सुद्धा भावनांची अनेक आंदोलन जगाच्या कोणत्याही कोपर्यात पोचवू शकतो. अजूनही आपण ह्या शक्ती बद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत. ह्याचा वापर आपण करू शकलो तर अनेक गोष्टीच आकलन आपल्याला खूप आधी तर होईलच पण एकमेकांना न बोलता, सांगता समजून घेण्यासाठी पण ते वरदान ठरेल.
“लाय टू मी” एक क्राईम इनवेस्टीगेशन सिरीज आहे. ज्यात एका डॉक्टर चा उपयोग गुन्हेगाराच्या ह्याच एक्स्प्रेशन चा अभ्यास करण्यासाठी केली जाते. आपल्या अभ्यासातून हा डॉक्टर पोलीस, गुप्तहेर यंत्रणा ह्यांना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत करतो. सिरीज जरी आभासी असली तरी त्यात अंतर्भूत केलेला अभ्यास मात्र वास्तववादी आहे. आपले मत मांडताना कोणत्या गोष्टीवरून हे मत झाल हे सांगायला डॉक्टर विसरत नाही. तसेच ते बळकट करण्यासाठी आधी घडून गेलेल्या काही गोष्टींचा आधार हि घेतो. म्हणजे खोट समोर आल्यावर माणसाच्या चेहऱ्यावरची ठेवण मग त्यात सगळ आल. डोळे, भुवया, ओठ, तोंड, कान, कपाळ त्या सोबत हाताच्या हालचाली उभ राहण्याची पद्धत ते आवाजातील बदल.
इतका प्रचंड मोठा हा अभ्यास आहे कि प्रत्येक नवीन एपिसोड आपल्याला वेगळ काही शिकवून जातो. अनेक वेळा हे ठोकताळे बरोबर येतील अस नाही. पण हे गणित नाही दोन अधिक दोन चार नेहमीच होतील असे नाही. कारण प्रत्येक वेळेला परिस्तिथीचे अनेक कंगोरे त्याला चिकटलेले असतात. त्यामुळे मांडलेला ठाकतोळा नेहमीच अपेक्षित उत्तर असेल अस नाही. पण हे सगळ असताना माणसाना अनेक वेगळ्या पद्धतीने ओळखायला, समजून घ्यायला मात्र आपण नक्की शिकतो.
मायक्रोएक्स्प्रेशन म्हणजे अनेकदा कळत नकळत आपल्या चेहऱ्यात छोटे छोटे बदल अगदी पटकन होतात. जस भुवई वर जाण. हे घडलेल्या घटनांवर अवलंबून असते. हे आणि असे अनेक असंख्य बदलांचा अभ्यास आपल्याला अनेक गोष्टी न सांगता पण सांगू शकतो. काही एक्स्प्रेशन असे असतात कि ते सगळ्यात आढळून येतात. म्हणजे खोट बोलताना. मग असे एक्स्प्रेशन चा अभ्यास करून काही न सांगितलेल्या गोष्टी मनातून काढता येतात. ह्याचा अभ्यास म्हणजेच फेशिअल कोडींग सिस्टीम, शेवटचा पण अतिशय महत्वाचा भाग म्हणजे बॉडी ल्यांग्वेज. ह्या बद्दल खुपदा लिहील गेल आहे. कारण ह्यावरून पूर्ण व्यक्तिमत्वाच रिफ्लेक्शन समोरच्या व्यक्तीवर पडत असते. हि त्रिसूत्री म्हणजे माणसाला ओळखण्याचा डी. एन. ए. आहे.
डॉक्टर पॉल एकमन ह्यांनी अश्या १०,००० पेक्षा जास्ती फेशियल एक्स्प्रेशन चा अभ्यास करून अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. "the best human lie detector in the world" अशी बिरुदावली मिळवणारे डॉक्टर आणि त्यांच्या अभ्यासावर बसलेली लाय टू मी हि सिरीज बघावी अशीच आहे.

No comments:

Post a Comment