Sunday, 22 January 2017

लान्स नावाचा आर्मस्ट्रॉंग... विनीत वर्तक
सायकल शी माझी जवळीक झाली तर त्याच मुख्य कारण म्हणजे लान्स च वाचलेलं पुस्तक. “It’s not about the bike“ त्याचा थक्क करणारा प्रवास बघून सायकल चालवयाच्या प्याशन शी माझी दोस्ती झाली ती आजतागायत. एक अतिशय यशस्वी प्रोफेशनल सायकलस्वार अशी ओळख झालेल्या लान्स ला १९९६ साली जीवघेण्या “ metastatic testicular cancer” आजाराने वेढल. परंतु ह्या सर्वांवर मात करत त्याने १९९९ ते २००५ अशी तब्बल ७ वर्ष सगळ्यात मानाची अशी टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. अर्थात २०१२ मद्धे डोपिंग स्क्यानडल मद्धे अडकल्यावर त्याची हि सगळी पदक परत घेतली गेली हा भाग आहेच.
त्याच पुस्तक म्हणजे त्या काळातल सगळ्यात इन्स्पिरेशन देणार पुस्तक होत. एक साधा,सामान्य घरातील मुलगा ते प्रथितयश सायकलस्वार. त्याचा क्यान्सर शी लढा व मग त्यातून परत स्वताला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडी घेत स्वताला सिद्ध करण्याचा प्रवास. कोणालाही भुरळ पाडेल आणि इन्स्पिरेशन देईल असाच होता. त्याची काळी बाजू मात्र तितकीच चिरफाड करणारी होती. हे लक्षात यायला काही काळ जावा लागला.
त्याच्या कबुली नंतर हि लान्स माझ्या मनातून उतरला नाही. अर्थात त्याची पदके काढून घेतली, त्याच्या वर आयुष्याची बंदी घातली गेली. सर्वांच्या नजरेतून तो उतरला. पण तरीसुद्धा त्याचा प्रवास कोणालाही इन्स्पायर करेल असाच आहे. यशाची धुंदी सतत सगळ्यात पुढे राहण्याची नशा नकळत अश्या मार्गाने त्याला घेऊन गेली कि जिकडे त्याने सगळ्यांना फसवल. त्याच कुटुंब, त्याचे स्पोन्सर, त्याचे टीममेट्स, त्याचे चाहते आणि स्वताला पण.
लान्स चा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. एकतर त्याची जिद्द, खडतर मेहनत. आयुष्यात असाध्य ते साध्य करण्याची इच्छा, त्या इच्छेला दिलेलं मूर्त स्वरूप. अचानक आलेल्या संकटात सुद्धा खचून न जाता पुन्हा एकदा उभ राहण्याची जिद्द आणी त्याचा प्रवास सगळ स्फूर्ती देणार आहे. त्याच सोबत आलेल्या यशाला पचवणं किती अवघड असते ह्याची जाणीव सुद्धा लान्स ला ओळखताना होते. यशाची धुंदी, सतत सगळ्यांच्या पुढे आणि नंबर गेम्स ची रेस माणसाला नकळत कशी रसातळाला घेऊन जाते. हे पण लान्स च्या आयुष्यावर नजर टाकली कि कळते.
उत्तेजक द्रव्य नक्कीच नंबर एक आणि नंबर दोन मध्ये फरक करू शकतात ह्याबद्दल दुमत नाही. पण त्या लेवेल वर क्यान्सर सारख्या रोगातून बर होऊन सिद्ध करणे लान्स जाणे. मला भावतो त्याचा प्रवास स्वताला त्या उंचीवर घेऊन जाण्याचा. नंबर दोन ला कोण विचारात पण नाही. नंबर १ ची जादू कशी आयुष्याची राख रांगोळी करते ह्यासाठी लान्स सारख दुसर उदाहरण नसेल. क्षेत्र कोणतही असो तुम्ही नंबर मध्ये अडकलतात कि लान्स व्हायला वेळ नाही लागणार. पण स्वताला घडवण्याचा, तिथवर पोचण्याचा प्रवास अनुभावलात तर भले तुम्ही पहिले नसाल पण आयुष्याला पुरून जगले असाल. मग तो प्रवास “It’s not about the bike” नाही तर “It’s all about life” असा असेल. मला नेहमीच आयुष्याची दोन टोक दाखवणार व्यक्तिमत्व म्हणून सतत इन्स्पिरेशन देणाऱ्या लान्स नावाच्या आर्मस्ट्रॉंग ला हि पोस्ट समर्पित..

No comments:

Post a Comment