Sunday 22 January 2017

टेक्नो स्ट्रेस... विनीत वर्तक ( १६ सप्टेंबर २०१६ )
( महात्रीया रा ह्यांच्या टेक्नो स्ट्रेस ह्या संकल्पनेवर हा लेख आधारित आहे)
गेल्या ५०-६० वर्षात जगातील जवळपास ९०% संशोधन हे झाल. त्यायोगे आपल्या आयुष्यात टेक्नोलोजी ने अगदी हळुवार प्रवेश केला. बघता बघता आपल्या आयुष्याच प्रत्येक अंग त्याने व्यापल इतक कि त्याच्या शिवाय हि आयुष्य असू शकते हे ही आपण विसरून गेलो. टेक्नोलोजी मध्ये इतक गुंतल्यामुळे निर्माण होणारा स्ट्रेस आयुष्यात खूप काही बदल घडवण्यास कारणीभूत ठरतो आहे ह्याची आपल्याला जाणीव हि नाही आहे.
टेक्नो स्ट्रेस म्हणजे काय? तर घरातील ल्यापटोप किंवा कॉम्प्यूटर चालू केल्यावर तो चालू होई पर्यंत तुम्हाला रेस्टलेस वाटते का? कोणाला फोन केल्यावर फोन उचलेसतोवर वाजणाऱ्या रिंग टोन किंवा गाण्याने किंवा फोन होल्ड वर असताना तुमची चिडचिड होते का? फेसबुक वर पोस्ट किंवा कमेंट केल्यावर लोकांनी त्यावर रिप्लाय अथवा लाईक करेपर्यंत तुमची घालमेल होते का? लिफ्ट च बटन दाबल्यावर ती येई पर्यंत तुम्ही येरझाऱ्या मारत वाट बघता का? लाल दिव्यावर थांबले असताना उगीच गियर बदलवून गाडी एकस्ल्रेरेट करून सिग्नल हिरवा होईल अशी अपेक्षा करता का? ट्राफिक मध्ये गाडी चालवताना तुमची चिडचिड होते का? एखादी आवडती मालिका बघत असताना स्याटेलाईट चा सिग्नल काही वेळ येत नसताना तुमची घालमेल होते का? एखादा दिवस मोबाईल घरी विसरल्यावर किंवा बंद झाल्यावर तुम्हाला तुमच आयुष्य संपल्यासारख वाटते का? तुमच्या इमेल – मेसेज ला लगेच अपेक्षित उत्तर नाही आल्यावर तुम्हाला निगेटिव वाटते का? इग्नोर केल्यासारख वाटते का?
ह्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे जरी हो असतील तर तुम्ही टेक्नो स्ट्रेस चे बळी आहात. वास्तविक टेक्नोलोजी च्या प्रवेशामुळे आयुष्य सुखकर व्हायला हवे होते पण अस होताना दिसत नाही. ह्याला अनेक कारणे आहेत. मोबाईल, कॉम्प्युटर चा अति वापर आपल्या खऱ्याखुऱ्या संवेदना संपवत आहे. स्क्रीन वर झळकणार लोल किंवा स्मायली आपल्याला खऱ्या हास्या पेक्षा जास्ती आनंद देऊ लागले आहेत. संवादांची गोडी आता घरतल्या व्यक्ती सुद्धा व्हात्स अप वर च्याटिंग करून पूर्ण करत आहेत. तर वाढदिवस, सण हे सुद्धा एकत्र यायचं माध्यम न रहाता फक्त स्क्रीन च्या शुभेच्यानपूर्ती त्यांची गोडी उरली आहे. फेसबुक , व्हात्स अप नक्कीच संवादांची उत्कृष्ठ माध्यम आहेत. देशोदेशीच्या सीमा मोडून त्यांनी सगळ्यांना जवळ आणल आहे ह्यात शंका नाही. पण ह्याचा अर्थ त्याचवेळी आपण आपली प्रायवसी सगळ्यांशी शेअर करावी असा होत नाही. प्रेम, सेक्स, एखादा चांगला चित्रपट, नाटक बघताना किंवा घरात कुटुंबीयांसोबत असताना किंवा बाहेर एकत्र जेवताना आपण आपली प्रायवसी जपू शकतोच न? त्याची वाच्यता सगळ्यांसोबत घाईघाईने शेअर न करण्याची खुमखुमी आपण थांबवू शकतोच.
रस्त्यावर गाडी चालवताना कोणत्या स्पर्धेसाठी आपण जात असतो. मागची एखादी गाडी पुढे गेली म्हणून तुमच कुठल ऑलम्पिक मेडल हुकणार आहे? सिग्नल ला सगळ्यात आधी निघाल्याने पुढचा सिग्नल लागणार नाही अस आहे का? जो पुढे जातो आहे तो पुढल्या सिग्नल ला आपल्याला भेटणार आहे हे माहित असताना त्याचा स्ट्रेस आपण का घ्यावा? मालिकेतील प्रत्येक पुढच्या भागासाठी इतके झुरणारे आपण घरातील व्यक्तीं कशासाठी झुरत आहेत ह्याचा विचार कधी करणार आहोत? घरात सवांद चालू असताना बंद ठेवावा न टीवी. आज झालेला भाग परत दाखवतातच. पण आज सगळ्यांसोबत घालवलेली संध्याकाळ पुन्हा येईल ह्याची शाश्वती तुम्ही देऊ शकाल का? महत्वाच काय हे ज्याच त्याने ठरवायचं.
ह्या सगळ्यात मोठी शोकांतिका हि नाही की कॉम्प्युटर माणसाची काम करायला लागला आहे तर माणूस कॉम्प्युटर सारखा विचार करायला लागला आहे हिच आपली खरी शोकांतिका आहे. तेव्हा अश्या टेक्नो स्ट्रेस पासून स्वताला लांब करण्यासाठी हसा. अगदी मनापासून. पुढल्या वेळो लोल लिह्ण्याआधी मनमुराद मोठ्या आवाजात हसा. शुभेच्या देताना एकमेकांशी बोला- भेटा, संवाद करताना एकमेकांसमोर बसून बोला, पुढल्या वेळी प्रेम, सेक्स किंवा आवडत्या गोष्टी करताना फोन बंद ठेवा. तेवढ्या वेळात कुठेही तिसर महायुद्ध होत नाही. पुढल्या वेळेस ड्राईव एन्जोय करा. ट्राफिक चा वेळ तुम्हाला मिळालेला अमूल्य वेळ आहे अस समजून आवडत गाण ऐका. लिफ्ट येईस्तोवर शांतपणे त्याची वाट बघा. ट्राफिक सिग्नल तुमच्या गियर बदलण्याने बदलत नाहीत न ट्राफिक तुमच ब्लडप्रेशर वाढल्याने कमी होत.
टेक्नोलोजी चा वापर करायला शिका टेक्नोलोजी ला तुमचा वापर करून देऊ नका. आपल्याला कॉम्प्यूटर सारखी आकडेमोड लगेच आली नाही तरी चालेल. बुद्धिबळातील चालींचा त्याच्या इतक्या विचार नाही केल्या तरी चालतील पण आपली विचार करण्याची क्षमता कॉम्प्यूटर सारखी करू नका. टेक्नोलोजी स्ट्रेस क्रियेटर म्हणून नाही तर स्ट्रेस डीस्ट्रोयर म्हणून वापरली तर टेक्नो स्ट्रेस आपल्या आयुष्यातून कायमचा हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
( लेख शेअर करताना मूळ लेखकाचा योग्य तो मान राखला जाईल ह्याची काळजी घ्यावी )

No comments:

Post a Comment