Friday 24 June 2016


तू लढ आम्ही आहोतच... विनीत वर्तक

तू लढ आम्ही आहोतच
तू जीवाची पर्वा करू नकोस आम्ही आहोतच
सियाचीनच ग्लेशियर असो वा कन्याकुमारीच रामेश्वर...
मुंबईचा अरबी समुद्र असो वा विशाखापट्टणम चा उपसागर


तू लढ आम्ही आहोतच.

आम्ही आहोतच फक्त फायद्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बोलण्यासाठी
आम्ही आहोतच फक्त स्वातंत्र्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बघण्यासाठी

तू लढ आम्ही आहोतच.....

मतांसाठी आम्ही काही करू
शत्रूला मित्र म्हणून जवळ करू
फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन हे तर आमचे ब्रीदवाक्य

तू लढ आम्ही आहोतच

मरताना काळजी करू नकोस
आरक्षणाची लढाई आम्ही करतोच आहोत
किती मोठे झालो तरी खुजे बनण्याची आमची स्पर्धा चालूच आहे.

तू लढ आम्ही आहोतच

जय हिंद म्हणायला आम्ही आहोतच
भगवा फडकवायला आम्ही आहोतच
शहीद म्हणायला आम्ही आहोतच

तू लढ आम्ही आहोतच

आम्हाला आरक्षण हवे फी माफी हवी
बोलण्याच स्वातंत्र हव संविधानाचे हक्क हवे
पण शत्रूची गोळी मग ते आपले का असोनात
मात्र तूच घ्यायचीस

मेलेल्या आम्हाला काय जागवणार
संवेदना गेलेल्या मुर्दाडानां काय जाणवणार
आम्ही मात्र असेच राहणार
कारण ..............................

तू मात्र लढ आम्ही आहोतच..

धर्मांध... विनीत वर्तक

कालच पाकिस्तान मध्ये बॉमस्फोट झाले. अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. काल इस्टर च्या निमित्ताने अनेक ख्रिश्चन धर्मियांना निशाणा करता येईल अस समजून मुलांच्या बागेत हा स्फोट करण्यात आला. ५३ लोकांचा निष्पाप बळी १०० हून अधिक जण जखमी करून कोणत्या धर्माचा विजय झाला हा तो धर्म आणि त्याला मानणारे लोकच जाणो. पाकीस्तानांत झाला म्हणून अनेक भारतीयांना आनंद हि झाला असेल. बर झाल त्यांना आता कळेल. पण कोणाला आणि काय कळेल? त्या निष्पाप जिवांनी काय केल होत? राजकारणाच्या, ...देशाच्या, सीमेच्या भांडणात त्या लोकांचा काय दोष? तुमच्या आमच्या सारखेच सर्व सामान्य पण हा विचार आम्ही कधीच बाजूला ठेवला आहे.

स्वताच्या पलीकडे, माझ्या अस्तित्वा पलीकडे अजून काही आहे समजण्याची दृष्टीच आपण गमावून बसलो आहे आहे नाही का? देश तर दूरच राहिला. सुरवात आपल्या घरापासून करू. बायको, बहिण, भाऊ, काका, मामा अश्या अनेक नात्यात आपल्यापलीकडे आपला विचार जातच नाही. कधी कधी असेल हि बरोबर. पण दुसर्याला खड्डा खोदताना आपण हि त्यात बुडत जातो हे कळून सुद्धा असुरी आनंदासाठी आसुसलेले आपण दुःखाच्या खाईत स्वताला लोटताना त्याच आनंदाचा विचार करत स्वताला झोकून देतो. त्याच वाईट झाल न! त्याला शिक्षा मिळाली न! त्याला चांगला धडा शिकवला गेला न! ते त्याची चांगली जिरली. पण ह्या सगळ्यात मला काय मिळाल?, क्षणिक मानसिक समाधान कि जिंकल्याचा आनंद कि स्व ला मोठ केल्याच समाधान.

हीच छोटी पण स्वताच्या घरापासून झालेली सुरवात मग जात, धर्म, देश अस उग्र रूप धारण करते. शेवटी आपण एका क्षणाला त्या पासून स्वताला वेगळ करतो. जाऊ दे न माझ काही वाईट झाल नाही न जोवर मला त्या ज्वाळा लागत नाही तोवर मी नामानिराळा. मेले ते गेले. काल कोहली किती छान खेळला न तो विचार केला कि मला अलिप्त व्हायला वेळ लागत नाही. पाकिस्तानात झाला न मग जाऊन दे भारतात नाही न, भारतात झाला न मुंबईत नाही न मग जाऊन दे, ठाण्यात झाला न मग बोरिवलीत नाही न मग जाऊन दे, नंतर तो प्रवास ठाणे पश्चिम ते पूर्व अस करत तो प्रवास आपल्या दाराशी नाही न येत तोवर आपण अलिप्त राहतो.

संवेदनांची होळी आपण कधीच करून मोकळे झालो आहोत. कारण धर्माची झापड आपल्या डोळ्यावर इतकी घट्ट बसत चालली आहेत कि आपल्याला प्रकाशात पण अंधाराची सवय लागली आहे. मी काय करू शकतो? ह्याची अनेक उत्तर आहेत. आपल्या परीने शोधली कि सापडतील हि. जातीची , धर्माची , देशाची जोखड निदान स्वतापासून सुरवात करून आपल्या घरापर्यंत थांबवू शकलो तरी खूप काही होईल. जेव्हा जात, धर्म, देश ह्या पलीकडे माणूस म्हणून आपण आधी स्वतला प्रश्न विचारू तेव्हा देशापासून सुरु होऊन दिशे पर्यंत संपणाऱ्या प्रवासाचा उलट प्रवास सुरु होईल. कदाचित तेव्हा मग “ कोणता झेंडा घेऊ हाती”? हा प्रश्न विठ्ठलाला विचारायची गरज भासणार नाही.

कालच्या स्फोटात धर्म, जात, देश न बघता निष्पाप जीव बळी गेले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना आपल्या फसलेल्या धर्माची जाणीव लवकरच झाली असेल अशी अपेक्षा. कारण दुसऱ्या धर्मासाठी खोदलेल्या खड्यात त्याचं धर्म बुडाला आहे हे आपसूक समोर आलच आहे. आज तिकडे आहे उद्या आपल्याकडे असेल तेव्हा थांबवायचं आपल्या हातात नसेल तरी घडवायचं आपण आपल्यापुरती थांबवूया.

नाविक.... विनीत वर्तक
‘‘Navic’’ (Navigation with Indian Constellation)

गेल्या आठवड्यात इस्रो ने आपला शेवटचा आय आर एन एस एस ह्या मालिकेतील शेवटचा उपग्रह प्रक्षेपित केला. पंतप्रधान मोदी नी ह्याच प्रणाली च नाविक अस नामकरण केल. खरे तर हि प्रणाली आधीच चालू झाली होती पण अपेक्षित सुसूत्रता येण्यासाठी हा सातवा उपग्रह गरजेचा होता. अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन युनियन नंतर अशी जी पी एस प्रणाली असणारा भारत हा जगातील ५ देश ठरला आहे. कारगिल युद्धात अमेरिकेने मदत देण्यास नकार दिल्यावर आपण आपले रस्ते शोधले पाहिजेत हा विचार पुढे आला. गेल्या आठवड्यात आपण तो पूर्णत्वाला नेला. मोदी नि ह्या इस्रो च्या यशानंतर ट्विट केलेल वाक्य खूप काही अधोरेखित करून जाते “आता आपण आपला मार्ग ठरवू जो कि आपण आपल्या तंत्रज्ञाने विकसित केला आहे”. भारतीय खलाशी आणि कोळी बांधव जसे समुद्राच्या क्षितिजावर नवीन मार्ग शोधून काढतात. अनेक माहित नसलेल्या रस्त्यावरून परिक्रमा करतात त्याच प्रमाणे भारत आता स्व बळावर हे करू शकतो म्हणूनच नाविक हे नाव खूप समर्पक वाटते.

१४२० कोटी रुपयांची हि मालिका जगातील सर्वात स्वस्त जी पी एस प्रणाली आहे. भारतासोबत भारताच्या आजूबाजूच्या जवळपास १५०० किमी च्या टप्प्यातील प्रत्येक गोष्टीचा मागोवा आपल्याला आता घेता येणार आहे. आख्खा आशिया खंड ते अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत ह्याची रेंज आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांना हि ह्याचा फायदा घेता येणार आहे. तसेच ह्यात दोन भाग असल्याने एक भाग हा सामरिक गोष्टींसाठी राखून ठेवण्यात आला आहे. ज्याचा उपयोग युद्ध, नैसर्गिक आपत्ती, टेहळणी ह्या सर्वासाठी करता येणार आहे. १९८० पर्यंत उपग्रह पाठवण्यासाठी धडपडणाऱ्या इस्रो ची २०१६ पर्यंत स्वताच जी पी एस बनवण्याची वाटचाल भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची आहे.
१९६९ सुरु झालेल्या इस्रो ने खूप मोठा टप्पा गाठला आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया विथ जुगाड ह्या तीनही शब्दांना जागत इस्रो ने जगात फ्रुगल इंजिनियरिंग ची सुरवात केली आहे. इस्रो चे स्पेस प्रोग्राम जगातील सर्वात स्वस्त पण त्याच वेळेस सगळ्यात भरवश्याचे मानले जातात. मग ते मार्स मिशन असो वा नाविक. सर्वात कमी खर्चात, कमी वेळेत आपल्या भरवश्याच्या रॉकेट प्रणालीने इस्रो ने जगात आपला दबदबा केला आहे. ३५ मिशन एका पठोपाठ एक यशस्वी करणारी पी एस एल व्ही रॉकेट प्रणाली कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॉकेट पेक्षा उच्च तोडीची आहे. सध्या इस्रो कडे उपग्रह पाठवण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे. जवळपास जगातील सर्व देश आपले उपग्रह इस्रो तर्फे पाठवू इच्छित आहेत. म्हणूनच गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील काही संस्थांनी ह्या बाबत अमेरिकन प्रशासनाकडे तक्रार केली होती. इस्रो च्या बजेट मध्ये आम्ही उपग्रह पाठवू शकत नाही. इस्रो स्वस्तात हे करत असल्याने आता अमेरिकन संशोधक, प्रयोगशाळा आणि संस्था इस्रो कडे वळत आहेत. ह्यामुळे अमेरिकन उपग्रह बनवणार्या संस्था तोट्यात जाऊ शकतात.

येत्या काळात इस्रो चे प्रोग्राम बघितले तर थक्क व्हायला होईल. आदित्य हा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोग्राम आहे, चांद्रयान २ वर काम चालू आहे, जी एस एल व्ही माख ३ हा ४ टन वजन वाहून नेणारा उपग्रह अभ्यासात आहे. (व्हीनस) शुक्र ग्रहावर जाण्यासाठी प्रणाली विकसित करत आहे, निसार The Nasa-Isro Synthetic Aperture Radar (NISAR) ह्या प्रणाली वर काम सुरु आहे. तसेच री एन्ट्री करणारे स्पेस शटल व माणसाना घेऊन जाऊन शकणारी प्रणाली ह्या वर सुद्धा काम चालू आहे. त्याच्या जोडीला अनेक स्वदेशी बनावटीचे उपग्रह जे वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडतील त्याचं निर्माण तसेच प्रक्षेपण व ह्या सगळ्यावर मात म्हणून अनेक विदेशी उपग्रह जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत रॉकेट मिळण्यासाठी. हा अश्या अनेक पातळीवर काम करून आणि एक सरकारी उपक्रम असून सुद्धा भारताची पताका इस्रो ने नुसतीच तळपत नाही ठेवली आहे तर त्याचा आता दबदबा स्थापन केला आहे.

नाविक हा एक पाडाव आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते ह्याचं अभिनंदन कराव तेवढ थोडच आहे. ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणत सगळे पुन्हा एकदा आपल्या कामात गुंतले आहेत. अजून एका नवीन न शोधलेल्या रहस्याचा शोध घेत नाविक बनून.

ब्रिक्स एक उगवता सूर्य.... विनीत वर्तक

ब्रिक्स नाव आहे नवीन सूर्याच जो जागतिक क्षितिजावर उगवला आहे. अमेरिकेची जागतिक अर्थव्यवस्थेतील दादागिरी मोडून काढण्यासाठी भारत, चीन, रशिया, ब्राझील, साउथ आफ्रिका ह्यांनी एक ग्रुप स्थापन केला तो म्हणजेच ब्रिक्स (BRICS).

जगाच्या लोकसंखे पेकी तब्बल ४२% लोकांच प्रतिनिधित्व ब्रिक्स करतो आहे. १६ ट्रीलीयन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त जी डी पी आणि तब्बल ४ ट्रीलीयन पेक्षा जास्ती फॉरेन रिझर्व्ह असणार्या देशांची हा ग्रुप आहे. २००९ साली पहिल्या मि...टिंग पासून सुरु झालेल्या ह्या प्रवासाने खूप मजल मारली आहे.

अर्थाशास्त्रांच्या मते येत्या काळात अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणायची ताकद ब्रिक्स मध्ये आहे. जगातील प्रमुख नाणेनिधी संस्था तसेच आय एम एफ वर असलेली अमेरिकेची मक्तेदारी सर्वश्रुत आहे. ह्याला एक समांतर अशी ब्यांक म्हणून ब्रिक्स ने न्यू डेवलपमेंट ब्यांक स्थापन केली आहे. सुरवातीला ५० बिलियन क्यापिटल असलेली हि ब्यांक आय एम एफ ला पर्याय मानली जात आहे.

शांघाई इकडे आपल मुख्य ऑफिस असलेल्या ह्या ब्यांक च्या अध्यक्षपदी भारताचे के व्ही कामत आहेत. आत्ताच ब्रिक्स ने रीनेवेबल एनर्जी साठी भारताला तब्बल २५० मिलियन डॉलर दिले आहेत. येत्या काही काळात ब्रिक्स जगातील सर्वात शक्तिशाली ब्यांक होईल अस भाकीत अनेक अर्थतज्ञानी वर्तावल आहे.

हे सगळ लिहण्याच कारण इतकच ह्या ब्रिक्स च वार्षिक संमेलन यंदा गोव्यात होत आहे. १५ -१६ ऑक्टोबर २०१६ रोजी ह्याची ८ वि वार्षिक सभा होत आहे. क्षितिजावरचा उगवता सूर्य तेजाने तळपणार आहेच. ब्रिक्स ला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ताशी सुरवात आहे. येत्या काळात ब्रिक्स जगाच्या नकाशावर सगळ्यात ताकदवर देशाची सगळ्यात ताकदवर ब्यांक असेल ह्यात शंका नाही

सैराट ... विनीत वर्तक

सध्या झिंग झिंग झिंगाट चा धुमाकूळ चालू आहे. नागीण डान्स ची आठवण करून देत पुन्हा एकदा अजय अतुल च्या गाण्यांनी महाराष्ट्राला ठेका धरायला लावला आहे. हे गाण आहे सैराट चित्रपटातील. झी मराठी च्या पुरस्कारापासूनच सैराट चित्रपटाभोवती वलय निर्माण झाल होत. नागराज पोपटराव मंजुळे सारखा दिग्दर्शक, झी स्टुडीओ चा ब्यानर सोबतीला अजय- अतुल च संगीत आणि दोन फ्रेश चेहरे ह्यामुळे सैराट बद्दल उत्सुकता होतीच. सैराट बघण्याची १७ कारणांपासून ते चित्रपटाच्या प्रोमोज मुळे काहीतरी... वेगळ आणि चांगल मराठी चित्रपटात घडते आहे ह्याची जाणीव होत होती.

पण अनेक विरुद्ध प्रतिक्रिया बघून आश्चर्य वाटते आहे. संस्कार, बालवयात वाईट संस्कार, संस्कृती ह्या सर्वांचा अनेकांना झालेला साक्षात्कार बघून कीव वाटली. अव्यक्त प्रेम, किशोरवयीन वयात हवीहवीशी वाटणारी प्रेमाची अनुभूती सगळ्यांनीच अनुभवली आहे. जे लोक गरळ ओकत आहेत त्यांनी स्वतः सुद्धा हा अनुभव घेतलाच असेल. कधीतरी बस च्या थांब्यावर, रेल्वेच्या प्ल्याटफोर्म वर तर कधी क्यानटीन च्या बाकावर तर कधी शाळा कॉलेज मध्ये तो कटाक्ष सगळ्यांना हवाहवासा वाटायचा आणि आजही वाटतोच. ह्या प्रेमासाठी कित्येकांनी किती खास्त्या खाल्ल्या हे प्रत्येकालाच ठाऊक. सगळ्याच प्रेम कथा यशस्वी होत नाही तसा प्रत्येकाचा शेवट वाईट होतो अस हि नाही न? आजही त्या क्षणाची आठवण झाली तर प्रत्येकाच मन आनंदी होतच. भले शेवट हवा तसा नसेल किंवा त्यात अनेक बोचरे अनुभव हि असतील पण ते क्षण स्पेशल असतात ह्यात वाद नसेल.

संस्कार, आदर्श समाज ह्या व्याख्या चित्रपटावरून ठरवायचा काळ कधीच मागे पडला अशी ओरड करणारी लोक आज त्याच चित्रपटाचा आधार घेऊन संस्कारांची बोंब करत आहेत. मुलांची मानसिकता घडवायला टीवी च माध्यम आज न च्या बरोबर आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हात्स अप च्या जाळात अडकलेली पिढी टीवी पासून खरे तर दूर गेली आहे. चित्रपट तर त्याही पलीकडे आहे. त्यातून मराठी चित्रपट संस्कार ठरवणार असेल तर उद्या नैवैद्य काढायला हवा तो ह्याच साठी कि मराठी बोलत नाही, जगत नाही म्हणून तरुण पिढी वर कितीतरी रोष टाकून झाले. त्याच पिढीवरच्या संस्काराची परिभाषा एक मराठी चित्रपट ठरवतो ह्यावरून हे बोंब किती तकलादू आहे ते सिद्ध होते.

मराठी माणूसच मराठी माणसाला खाली खेचतो खेकड्या सारख ते खरेच आहे. एक चांगली कलाकृती समोर आलेली असताना तिचा आस्वाद घ्यायचा सोडून आपण संस्कारांच्या गाळात डुंबण्यात आणि चिखलफेक करण्यात धन्यता मानतो आहोत. मला रिंकू राजगुरूच उदाहरण द्यावस वाटते. तिच्या मते तिने केलेल्या बुलेट स्वारी मुळे अकलूज सारख्या ठिकाणी मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन किंबहुना मुलींच्या आत्मविश्वासात बदल झाला आहे (रिंकू राजगुरू ला ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे). बुलेट सारखी बाईक पुरुषी रांगड समाजच प्रतिनिधित्व करत असताना एका मुलीने ती चालवावी हा मला वाटते तृप्ती देसाई नि १०० मंदिरात शिरून सुद्धा स्त्रियांच्या मानसिकेत आणि एकूणच समाजाच्या मानसिकतेत जो बदल होणार नाही तो झाला आहे.
चित्रपट सगळाच चांगला असेल असे नक्कीच नाही, सगळे मुद्दे पटतील असेहि नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा त्यातून पूर्ण होतील असेही नाही पण नुसतच काहीही बघून मनोरंजन करण्यापेक्षा अव्यक्त प्रेम, किशोरवयीन प्रेम, त्यातील प्रवास, समाजाची मानसिकता, जातीपातीच राजकारण ह्या वर परखड भाष्य करणारा सैराट मला तरी चित्रपटगृहात जाऊन बघावासा वाटतो

हरवलेली सुट्टी... विनीत वर्तक

मे महिना उजाडला कि कधी न्हवे ते लवकर उठायची घाई असायची. एरवी शाळेत जाण्यासाठी उठायला कंटाळा यायचा पण मे महिना आला रे आला कि दिवस कधी उजाडतो अस व्हायचं. सकाळी सकाळी उठून जवळच्या एका शाळेच्या प्रांगणात क्रिकेट खेळण्यासाठी असलेली ती लगबग. लवकर गेल हि हव ते मैदान मिळायचं. ८ नंतर इतकी मुल तिकडे खेळायची कि कोणाचा कोण क्षेत्ररक्षक आणि कोण कोणाला बोलिंग करतो आहे हे ओळखून नक्की आपल्याच चेंडू मागे धावायचं हे मोठ कठीण काम व्हायचं. उन्हाचा चटका, घाम येण्याआ...धी आपली हौस भागवायची हा तो कटाक्ष. ११ रुपये सिल लावून म्याच खेळायची मग जिंकल्यावर ५० रुपयाची पार्टी करायची. फाफडा आणि जिलेबीच्या सोबत सकाळचे १० ते ११ कधी वाजून जायचे ते कळायचे नाही.

आंघोळ करून परत क्रिकेट किंवा बैठकीचा फड. दुपारच सत्र मात्र चित्रपट किंवा बैठे खेळ खेळण्यात जायचं. संध्याकाळी मात्र डबा आईस पाईस, लगोरी ते लंगडी आणि ब्याटमिंटन पासून क्रिकेट सगळच असायचं. रात्री ८ वाजले तरी अंधुक प्रकाशात खेळ सुरूच राहायचे. आईच बोलावण किंवा बाबांचा ओरडा खात घरात शिरायचं हा शिरस्ता ठरलेला असायचा. त्यात मग बाजार, पोहणे, पतंग ते अगदी एक टप्पी आउट पर्यंत अनेक पर्याय असायचे. असा प्रचंड उत्साह भरलेली सुट्टी लवकर का संपते असच नेहमी वाटत राहायचं. त्यात भर म्हणून मामाकडची ट्रीप बोनस असायचीच. पण कधीच हि सुट्टी लवकर संपावी अस अजिबात वाटल नाही.

आज सुट्टी असते काय? हेच मुळी मुलांना माहित नाही. रिकामी मैदान जी काही थोडी फार उरली आहेत ती. ओस पडलेल्या विहरी, बिल्डींग च्या न फुटलेल्या काचा ते पिवळ्या फुलांनी भरलेले ते रस्ते जी आम्ही वेचून बाजार बाजार खेळायचो ते सर्वच शांत झाल आहे. गेल्याच आठवड्यात त्या शाळेच्या मैदानावरून गेलो. सकाळीच कोणीही नव्हते. एकेकाळी मुलांची इतकी गर्दी असणार आणि आवाजाने, चेंडूंच्या षटकाराने ओसंडून वाहणार ते मैदान भयाण वाटत होत. कुठेतरी माझ बालपण शोधात होतो. त्या सकाळच्या फापड्या जिलेबीच्या सुगंधाला आज कोणीच गिऱ्हाईक नव्हत. उनो, सापशिडी, व्यापार, चोर-पोलीस, पत्ते खेळायची चौकडी आज खेळाडूच हरवून बसली आहे अस न राहून वाटत होत.

समर क्याम्प, चार भिंतीच्या आत व्यायाम, घाम न येता एसी क्लब हाउस ला जायची हौस आज सुट्टीच्या मुळावर उठली आहे. मैदाने आहेत कुठे पेक्षा आज खेळणारे आहेत कुठे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सर्वच सुखकर करण्याच्या नादामुळे आपण मुलाचं बालपण हिरावून घेतल आहे. फुटलेले अंगठे, घामाने भिजलेल अंग, उन्हात काळी पडलेली त्वचा हेच तर खर बालपण. आपण सर्व खड्डे बुजवले आणि राजमार्ग दिला खूप लवकर मोठ होण्याचा. पण त्या नादात मे महिन्याची सुट्टी मात्र आपण हरवून बसलो आहोत

इन्क्रेडिबल इंडिया - (अंगकोर वाट).... विनीत वर्तक

देऊळाचे द्वारी बघितल्यानंतर अंगकोर मंदिराने मनाचा ताबा घेतल्यागत झाल होत. विकिपीडिया आणि तत्सम लिंक वरून जी माहिती मिळाली ते वाचून तर सर्दच झालो. इतका मोठा अविष्कार तो हि भारतीय संस्कृतीच प्रतिनिधित्व करणारा इतका कसा काय दुर्लीक्षित राहू शकतो. इतकी मोठी प्रतिभा ह्या मंदिरात आहे कि वाचाव तेवढ अजूनच स्तिमित होत जातो. इतक प्रचंड असा सांस्कृतिक वारसा आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे पण भारतीय त्या बद्दल अगदी अनभिज्ञ आहेत हे बघून क्लेश हि होतोच.

सहज विचार केला आणि एका चित्रकाराला आपण मंदिर चित्रित करायला सांगितल. त्याने ते केल ज्यात आपली संस्कृती दिसेल. आता आपण एका स्थापत्य शास्त्राला बोलावून त्याची खरोखरची मापे करून त्याचा प्लान तयार केला. आता एका गणिती ला बोलावून त्याच काळाच्या, सूर्याच्या, अंतराच्या मापाने प्रूफिंग केल. आता एका अभियंत्याला बोलावून त्याला हे बनवायला सांगितलं. आता कारागिरांना बोलावून जे चित्रकाराने दाखवलं आहे ते जिवंत करायला सांगितल. हे सगळ झाल्यावर कामगारांना हे बांधायला सांगितल. हे करताना अभियांत्रिकीच्या जवळपास सगळ्याच शाखेच्या विद्वान लोकांनी एकत्र येऊन कला, संस्कृती, त्या मंदिराचा आत्मा ह्याला धक्का न पोचवता त्याच निर्माण करायचं. बर नुसत बांधून नाही तर काळाच्या कसोटीवर म्हणजे उन, पाउस, वारा ह्या सोबत वादळ, भूकंप, स्तुनामी अश्या नैसर्गिक आपत्ती चा विचार करून जागा शोधायची. त्या जागे मध्ये तोच खडक, बांधकामाच साहित्य ह्याचा साठा निर्माण करायचा. मंदिर चोहोबाजूने पाण्याने वेढलेल आहे. तेव्हा माती भुसभुशीत होऊन मंदिराच्या वजनाने ते न धसता काळाच्या कसोटीवर उभ राहील हे बघायचं. हे सर्व पेलताना त्याची भव्यता राहिली पाहिजे. (फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेले मंदिरआहे. याच्या बाह्यभिंतींचा परीघ चार किलोमीटर आहे.)

इतकच नाही तर काळाच्या परिमाणावर वर पण हे मंदिर अगदी खरे उतरते. मग तो सूर्योदय असो किंवा वर्षातील कोणता दिवस चालू आहे हे अचूक रित्या ओळखण्याची शिल्पा द्वारे केलेली मांडणी असो. किती प्लानिंग आणि र्रीसोर्सेस ह्या साठी लागले असतील. बर त्या काळी कॉम्प्यूटर नसताना सगळी गोळा बेरीज डोक्यात करून मग समोरच्याला ते सांगणे किती अवघड असेल. म्हणजे बघा आपल्या डोक्यात असलेली एक साधी घराची कल्पना सांगण्यासाठी आज किती पर्याय आहेत. फोटो, थ्री डी मोडेल, थ्री डी व्यू ह्या सगळ्याचा उपयोग करू तेव्हा आपण कुठे जाऊन आपल्याला काय हवे आहे हे इंटिरियर डिझायनर ला कळते. तर तेव्हाच्या लोकांनी हे कस केल असेल. राजा च्या मनात असलेली प्रतिकृती तशीच्या तशी उतरवणे आणि हे दिव्य पेलणे म्हणजे प्रचंड अशी कलासाधना आहे. आपल्याला अवगत असेलल्या शास्त्राची ती पूजा आहे त्या शिवाय हे शक्यच नाही.

एक अभियंता असून माझ मन सुन्न झाल. हि भव्यता आज १००० पेक्षा जास्त वर्ष टिकून आहे. हे सगळ उभ केल अवघ्या ३५ वर्षात... आज सगळी टेक्नोलोजी उभी केली तरी ह्या भव्यतेची कलाकृती उभारायला कमीत कमी ६०- ७० वर्षाचा कालावधी लागेल. हे सगळ आम्हा भारतीयांना अजून माहित नाही. अंगकोर ला ४० लाख लोक दरवर्षी भेट देतात. त्यात १० हजार सुद्धा भारतीय नाहीत. हि गोष्टच कुठेतरी प्रचंड लागते. ज्या जगाला आम्ही शून्य दिल. ज्याच जग नाव काढते पण आम्ही मात्र त्याची वाट लावण्यात धन्यता मानतो. ज्यावर एक अमेरिकन बाई २५ वर्ष अभ्यास करून पुस्तक लिहिते पण आपण भारतीय कुठेच नाहीत. एक साधी डोक्युमेंट्री पण ह्यावर नाही हेच बरच काही सांगून जाते. कोहिनूर हिर्या साठी धडपडणाऱ्या आणि भारतीय अस्मितेचा ठेवा म्हणून त्या हिर्याची भिक मागण्यापेक्षा कलेचे, संस्कृतीचे, गणिताचे, विद्वत्तेचे विद्यापीठ असणारे अंगकोर वाट भारताची प्रतिभा जास्ती उजळवते ह्यात शंका नाही. हा वारसा आपण हरवून बसलो आहोत तो मिळवण्यासाठी पुन्हा एकदा अभ्यासाची गरज आहे. जगातील सात आश्चर्यात ताजमहाल सामील व्हावा म्हणून आम्ही वोट करतो पण त्या ताजमहाल पेक्षा १००००% पट प्रतिभा गेले १०० दशके दाखवून ठेवणाऱ्या अंगकोर बद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत हि सगळ्या भारताची शोकांतिका आहे.

काही नाही करता आल तरी ब्यांग्कोक, सिंगापूर, मलेशिया अशी साउथ इस्ट एशिया टूर करून धन्य पावणाऱ्या भारतीयांनी त्याच्याच बाजूला असलेल्या कंबोडिया ला भेट देऊन अंगकोर वाट सोबत तिथल्या मंदिरांबद्दल जाणून घेतल तर खर्या अर्थाने ती सहल इन्क्रेडिबल इंडिया विथ पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ऑफ साउथ इस्ट एशिया अशी होईल

इमशोनल फर्स्ट एड.. विनीत वर्तक

फर्स्ट एड च शिक्षण आपण शाळेपासून घेतच येतो. शाळा, कोलेज ते अगदी व्यावसाईक आयुष्यात ते अनिर्वार्य आहेच. त्याच महत्व हि तितकच. अगदी वेळीच मिळालेली मदत एखाद्याच आयुष्य बदलू शकते. लहान मुलांना सुद्धा अगदी त्याची जाणीव असते. म्हणजे अगदी थोडस खरचटल तरी ब्यांड डेड ते बर्नोल आणि डेटोल पर्यंतची नाव शेंबड्या मुलांना पण ठाऊक असतात. ते कुठे ठेवल आहे इथवर ती माहिती अगदी तोंडपाठ असते.

पण शरीराच्या फर्स्ट एड साठी इतके जागरूक असणारे आपण मनाच्या फर्स्ट एड साठ...ी काय करतो? मुळात फिजिकल फर्स्ट एड ठाऊक आहे पण हे इमोशनल फर्स्ट एड काय प्रकार आहे ह्याचा आपण कधी विचार तरी केला आहे का? मानसिक धक्का हा शारीरिक व्याधी आणि आजारापेक्षा अधिक धोकादायक असतो शिवाय त्याचे दूरगामी परिणाम हि खूप क्लेशदायक असतात. हे विज्ञानाने सिद्ध करून सुद्धा आपण इमोशनल फर्स्ट एड बद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत.

खरचटल्या पासून ते अगदी फ्र्याक्चर पर्यंत फर्स्ट एड काय आणि कस करायच ह्याच शिक्षण दिल जाते. पण मनाच्या हिंदोळ्यावर होणार्या अपघातासाठी काहीच नसते. इमोशनली आपण जास्ती धडपडतो राग, रुसवा, फसवल जाणे, अपमान ते कमी लेखण ह्या सगळ्याचा भडीमार रोज इकडून, तिकडून होत असतो. त्यामुळे निर्माण होणारा स्ट्रेस, निगेटीविटी , कमीपणाची भावना, आपला सेल्फ एस्टीम, इगो ह्याला कस म्यानेज करायचं ह्याबद्ल काहीच माहिती नसते. त्याला क्युअर करण्यासाठी फर्स्ट एड काय करतो आपण तर उत्तर काहीच नाही असच येईल.

शारीरिक व्याधींच्या मानाने मानसिक व्याधी सतत आपल्यावर परिणाम करत असतात. पण त्याकडे आपण बघत सुद्धा नाही. त्याचे परिणाम दिसल्यावर मग आपण मलमपट्टी करतो जी बर्याच वेळा तात्पुरती असते. वेळ निघून गेल्यावर केलेले उपाय योग्य तो परिणाम दाखवत नाहीच. इमोशनल फर्स्ट एड म्हणजे नक्की काय? ह्याच उत्तर खरे तर सोप्प आहे पण साधन आणि परिणाम खूप वेगळे आहेत.

आपल्याला असे कधी प्रसंग आले कि जिकडे तुम्हाला अपमान, त्रास, मानसिक डीस्टरबर्न्स जाणवला अश्या वेळी स्ट्रेस , नैराश्य, निगेटीव विचार ह्यांच्या खोल गर्तात न जाण्यासाठी आपण कसे स्वताला सावरू शकतो ह्याची एक यादी. जी आपल्याजवळ अगदी फर्स्ट एड बॉक्स प्रमाणे तत्काळ मिळेल. मग ते काही असेल एखाद गाण, एखाद्या जवळ मन मोकळ करणे, एखाद पुस्तक, चित्र, पिक्चर, किंवा आवडता टाईमपास किंवा अगदी काहीही जे आपल्याला ह्या नकारात्मक विचार आणि चक्रात जाण्यापासून रोखेल. कारण जर आपण हि लिंक त्याच वेळी ब्रेक केली तर आपण जास्ती चांगल्या रीतीने स्वतला सावरू शकू. प्रोफेशनली आणि पर्सनली पण. काही वेगळ करण्याची हि गरज नाही. फक्त स्वस्थ असताना आपल्याला नक्की काय, कोण, कसे सावरू शकते ते समजून घ्यायचं.

इमोशनल फर्स्ट एड आजची सगळ्यात मोठी गरज आहे. तेव्हा बनवूया एक इमोशनल फर्स्ट एड बॉक्स कदाचित तुमच्या पेटीत मी असेन आणि माझ्या पेटीत तुम्ही.अशी हि पेटी आपल्या बर्नोल, डेटोल सारखी जवळ ठेवूयात. काय माहित त्याची कधी गरज लागेल..

आनंदाचे डोही आनंद तरंग... विनीत वर्तक

आनंद काय? अस कोणी आपल्याला विचारल तर आपली उत्तर किती वेगळी असतात. आजचा दिवस आनंदात जावा असे वाटते का? हा प्रश्न स्वताला विचारला विचारला तर अगदी काही विचार न करता आपण होच बोलू. कोणाला वाईट दिवस जावासा वाटेल? पण मग उद्याच काय? परवाच काय? सोमवार , मंगळवार आणि पुढल्या आठवडयाच काय ते पुढल्या वर्षाच काय? सगळच आनंदात जाव अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनोमनी असेलच. पण खरच अस शक्य आहे का? तर ह्याची दोन्ही उत्तरे आहेत. एक तर हो आणि नाही पण.

आनंदाची व्याख्या जर का बाहेरील घटनांवर, लोकांवर, प्रतिक्रियेवर किंवा बाह्य स्वरूपावर असेल तर प्रत्येक दिवशी आपण ते कंट्रोल करू शकू का? आजच ठीक आहे पण उद्या लोक माझ्याशी कसे वागतील? किंवा माझा सहकारी मला हव तस वागेल? उद्या घडणाऱ्या सगळ्या घटना मला आनंद देणाऱ्या असतील ह्याबद्दल मी पूर्णतः शाश्वत आहे का? माझी आनंदाची व्याख्या जर त्यावर आधारलेली असेल तर नक्कीच ह्याच उत्तर नाही असेच येईल. त्यामुळे दुःख, नैराश्य हे आपल्या आसपास सतत असणार आहे आज न उद्या ते आपल स्वरूप घेऊन समोर येणारच.

हाच आनंद जर आतून आलेला असेल तर म्हणजे माझ्या आनंदी राहण्याचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असेल तर कदाचित मी ह्याच उत्तर शाश्वत देऊ शकेन. हो मी आनंदी असेन आज, उद्या , परवा आणि वर्षांनी सुद्धा. पण हे आनंदी राहण आजच्या युगात शक्य आहे का? तर उत्तर होच अस आहे. आपल्या मनाला सुखाच्या आणि आनंदाच्या सामाजिक आणि शिकवलेल्या बंधनातून मुक्त करता आल तर नक्कीच. मेडीटेशन हेच तर सांगते मेडीटेशन आणि साधना मग ती कोणत्याही प्रकारची जी तुम्हाला आंतर मनाशी जोडते ती आपल्या आनंद आणि दुःखाच्या संकल्पना मोडीत काढून एक अती उच्च कोटीच समाधान देते. जे समाधान असते आतून आलेल आणि म्हणून ते निरंतर आणि काळाच्या पलीकडे असते.

अनेक रस्ते आपल्याला तिकडे नेतात योग, ओशो, मेडीटेशन, झेन विचारसरणी, बुद्दीझम ते कदाम्पा ट्रेडीशन जिकडे तुम्ही आनंद समजून घेतात. त्याच रिमोट कंट्रोल स्वताजवळ ठेवायला शिकतात. म्हणूनच कदाचित आज सेकंदावर धावणाऱ्या जगाला काळाच्या पलीकडे असणार्या ह्या रस्त्यांची गरज आहे कारण आनंदाचे डोही आनंद तरंग...

Meditation is just a courage to be silent and alone. Slowly slowly, you start feeling a new quality to yourself, a new aliveness, a new beauty, a new intelligence-which is not borrowed from anybody, which is growing within you. It has roots in your existence.
~ Osho

आर एल व्ही- टी डी - पहिल पाउल - विनीत वर्तक

गेल्याच आठवड्यात इस्रो ने आपल्या रीयुझेबल लोंच वहिकल - टेकोनोलोजी डेमोंसट्रेटर (आर एल व्ही- टी डी) च यशस्वीरित्या प्रक्षेपण केल. एका बुस्टर च्या टोकाला एखाद्या एस यु व्ही गाडी च्या आकाराच्या ह्या यानाला ७० किमी उंचीवर अवकाशात सोडून पुन्हा जमिनीवर आखून दिलेल्या ठिकाणी उतरवण्यात इस्रो ला यश मिळाल. हे उड्डाण एक टेक्निकल डेमोंसट्रेशन असल तरी भविष्यातल्या मानवी उड्डाणाच पाहिलं पाउल इस्रो ने टाकल.
हे यश खूप अर्थानी महत्वाच आहे. कारण अवकाशातून एखादी वस्तू पुन्हा जमिनीवर येताना वातावरणाच्या घर्षणाचा सामना त्याला करावा लागतो. निर्माण होणार तापमान हे जवळपास ५००० - ७००० डिग्री सेल्सियस च्या आसपास असत. अश्या वेळेस आतील यंत्रणेच तापमान ५० डिग्री सेल्सियस च्या पुढे न जाऊ देता यानाला नियंत्रित करणे अतिशय जिकरीच असते. हे तापमान सहन करू शकेल अस यान तयार करण. ते नियंत्रित करणारी यंत्रणा निर्माण करण. तसेच यानाला वातावरणात एखाद्या विमाना प्रमाणे ग्लाइड करण हि खूप किचकट पण मानवी सफारी साठी महत्वाची यंत्रणा निर्माण करण्यात इस्रो ला यश मिळाल हि नक्कीच इस्रो आणि भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

एक परिपूर्ण स्पेस शटल किंवा रीयुझेबल लोंच वहिकल बनवायला अजून पुढली १५ वर्ष लागतील पण स्वबळावर अशी यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीने इस्रो ने पाहिलं पाउल टाकल आहे. जिकडे नाही म्हंटल जात तिकडेच ते मिळवल्याचा आनंद जास्ती असतो नाही का? स्पेस शटल हि संकल्पना नासा ने २०११ सालीच बंद केली. कारण त्यात येणारा खर्च, त्यातील धोके आणि एकूणच च्यालेंजर आणि कोलंबिया स्पेस शटल ला झालेले अपघात. मग भारत पुन्हा एकदा त्या पद्धतीच स्पेस शटल का बनवत आहे? एका बीबीसी च्या पत्रकाराने पल्लव भार्गवा न हाच प्रश्न केला तेव्हा त्यांनी दिलेल उत्तर खूप काही सांगून जाते. नासा काही काळ्या दगडावरची रेष नाही. त्यांना जमल नाही म्हणून कोणी करू शकत नाही अस नाही. आमच्या वैज्ञानिक आणि अभियंताना अस वाटते कि स्पेस शटल हे भविष्य आहे. म्हणून आम्ही ते करणार.

स्पेस एक्स सारख्या कंपन्यांनी वर्टीकल ल्यांडीग यशस्वी केल असताना स्पेस शटल तरीसुद्धा त्यामानाने कमी खर्चिक आणी सेफ आहे. ते ह्यासाठी कि कोणतही यान, विमान हे हवेत स्थिर करण खूप कमी वेगात अतिशय जिकरीच आहे. वर्टीकल ल्यांडीग साठी ते खूप महत्वाच आहे. स्पेस शटल च्या बाबतीत ते विमानाप्रमाणे ग्लाइड करून धावपट्टीवर हळुवार उतरवता येऊ शकते. म्हणून येणाऱ्या काळात जर इस्रो ह्यात यशस्वी झाली तर इतक्या स्वस्तात अशी यंत्रणा असणारी एकमेव स्पेस एजन्सी असेल. ( आर एल व्ही- टी डी ची किंमत हि फ्यानटासटिक फोर चित्रपटाला बनवण्यासाठी आलेल्या खर्चाच्या फक्त १०% आहे. )

नासा आणि इस्रो ह्यांची तुलना होऊ शकत नाही. नासा ने स्पेस शटल प्रोग्राम विकसित केला तो मानवाला अंतराळात पाठण्यासाठी तर इस्रो हा कार्यक्रम विकसित करते आहे उड्डाणाचा खर्च कमी करण्यासाठी. मानवाला अंतराळात पाठवणे हा एक हेतू असला तरी मुख्य लक्ष्य हे उपग्रह उड्डाण खर्च कमी करणे आहे. इस्रो चे सगळे प्रोग्राम हे सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात काय बदल करू शकतो हे विजन घेऊनआहेत. (ISRO Vision and Mission Statements. Harness space technology for national development, while pursuing space science research and planetary exploration.)

अमेरिकेतअसताना अटलांटीस स्पेस शटल अतिशय जवळून बघण्याचा योग आला.त्याच्या डेल्टा विंग वरच्या टी पी एस फरश्या बघताना कल्पना चावला ची आठवण झाली. अश्य्याच विंग वरच्या फरश्या निखळल्याने पहिल्या भारतीय स्त्री अंतराळवीरांगनेला आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. आज आर एल व्ही- टी डी च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची आठवण झाली. त्याच स्पेस शटल प्रमाणे असणाऱ्या आर एल व्ही ला पुढे कलामयान ह्या नावाने संबोधल जाईल अशी चर्चा आहे. इस्रो जर स्पेस शटल प्रोग्राम यशस्वी करू शकली तर डॉक्टर अब्दुल कलाम च्या स्वप्नांचे पंख प्रत्यक्षात येतीलच पण भारतीय स्त्री ची पताका अंतराळात रोवणाऱ्या कल्पना चावला ला दिलेली खरी आदरांजली असेल. इस्रो ला पुढील खडतर वाटचालीसाठी खूप शुभेच्या. 

IQ च EQ... विनीत वर्तक

स्पर्धेच्या ह्या युगात झाडून सगळे पालक आपआपल्या पाल्याच्या नंबर, ग्रेड साठी सतत चिंतामग्न असतात. आपण अनाहृतपणे आपल्या पाल्याला न संपणार्या शर्यतीत ढकलत असतो. ज्या शर्यतीच्या नंबर, ग्रेड चा खरे तर आपल्या आयुष्यात काहीच अर्थ नसतो. कोण कितवीत पहिला आला कि दुसरा हे आपल्याला आठवते का? त्या नंबर चा आपल्या आयुष्यात किती संबंध आहे? मी १५ वर्षापूर्वी ३ रा नंबर काढला ह्याचा आत्ता आपण करीत असलेल्या कामाशी तसा काहीच संबंध नसतो. अर्थात मिळवलेले मार्क आणि ग्रेड एक आत्मिक समाधान नक्कीच देतात पण जेव्हा ते स्वताहून मिळवण्याची उर्मी असेल तेव्हाच.

जवळपास ९५% अधिक वेळा पालक आपल्या स्वप्नांचे पंख मुलांच्या आयुष्याला लावून त्यातून उडण्याचा आनंद घेतात. मला नाही जमल मग माझा मुलगा, मुलगी ते स्वप्न पूर्ण करेल किंवा केल हि असली वाक्य आपण अनेक पालकांच्या तोंडून ऐकतो. ते ऐकू येण्यासाठी मोजलेली किंमत किती जबरी असते. ह्याची अनेक पालकांना जाणीव सुद्धा नसते. आपल्या मुलाने, मुलीने अनेक यशस्वी शिखर गाठावी असे कोणत्या पालकांना वाटणार नाही. पण ते करताना आपण त्याचं बालपण, अस्तित्व, तर नष्ट करत नाहीत न ह्याचा सुजाण पालकांनी विचार करायला हवा.

IQ ( intelligence quotient) म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी (An intelligence quotient (IQ) is a total score derived from one of several standardized tests designed to assess human intelligence. ) आपण आपल्या पाल्याची नेहमीच करत असतो. किंबहुना त्यावरून हुशारीचे ठाकतोळे मांडले जातात. पण इथेच खरी मेख आहे. सगळी खूप उच्च IQ ( intelligence quotient) असणारी मुल आयुष्यात यशस्वी असतात का? तर ह्याच उत्तर नाही अस आहे. बुद्धिमत्ता आयुष्य सुखी, समृद्ध आणि समाधानी असण्याविषयी कोणतेच ठोकताळे मांडू शकत नाही. तरीपण आपण ह्याविषयी प्रचंड आग्रही असतो. किंबहुना त्यावरून मुलांची गणना हुशार आणि ढ अशी होते. ह्यात एक वेगळी बाजू आहे. जी तर अनेक पालकांना माहित नाही किंवा माहित असून त्याचा आपल्या पाल्यांच्या आयुष्यात किती महत्वाचा रोल आहे ह्याबद्दल ते अनभिज्ञ आहेत.

Emotional intelligence (EI) or emotional quotient (EQ) is the capacity of individuals to recognize their own, and other people's emotions, to discriminate between different feelings and label them appropriately, and to use emotional information to guide thinking and behavior. इ क़्यु हि काळाची गरज आहे. जास्ती इ क्यू असणारे सगळेच आयुष्यात समाधानी, सुखी आणि समृद्ध असतात. कारण सुख, समाधान, आनंदी हे मेंदूत नाही तर मनाची कवाडे आहेत. जी मुल किंवा व्यक्तींमध्ये हे जास्ती असते. ते हटकून वेगळ्या आपल्याला गर्दीत दिसतात.

यशस्वी माणसांच्या मागे आणि त्यांच्या यशात अनेक लोक प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. पण अयशस्वी व्यक्ती, मुल ह्यांच्या सोबत ते एकटेच असतात. तेव्हा त्यांचा IQ ( intelligence quotient) ठरवत नाही कि ह्याच्या पुढे त्याचं पाउल काय असेल तर Emotional quotient (EQ) ठरवतो कि ह्यातून पुढे कोणत वळण ती व्यक्ती घेईल. मग ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडी असेल किंवा आत्महत्येच्या वाटेच वळण असेल.

एक पालक म्हणून मुलांना योग्य रस्ते दाखवायला हवेतच ते आपल कर्तव्य आहेत. पण कोणता रस्ता त्याने किंवा त्याने स्वीकारावा आणि त्या रस्त्यावरच कोणत वळण त्याने किंवा त्याने घ्यावं हे मात्र त्यांना ठरवायचं स्वातंत्र्य द्यावं. तसेच ते योग्य पद्धतीने निवडण्यासाठी IQ ( intelligence quotient) हवाच पण त्यातील खाचखळगे आणि एक वळण स्वतः निर्माण करण्यासाठी त्या Emotional quotient (EQ) ची जोड हवीच. IQ च EQ जर माहित असेल तर यश आणि अपयश कोणत्याहि वळणावरच असू देत त्याची सोबत करणार कोणी तरी नेहमीच आपल्या सोबत असेल.
    It's not what you say but How you say It... विनीत वर्तक
    अर्ध्या पाण्याने भरलेल्या आणि अर्ध्या रिकाम्या असणार्या ग्लास ची परीक्षा तर सगळ्यांना माहितच आहे. आपल्या प्रतिसादावरून आपल्या विचारांची बैठक कळते असा साधा प्रयोग. मानसशास्त्राच्या अजून एका प्रयोगात लोकांना दोन ऑप्शन दिले. ऑप्शन अ मध्ये आहे ९९% चरबी रहित खाद्य आणि ऑप्शन बी मध्ये आहे १% चरबी असणार खाद्य आणि लोकांना विचारल कि ह्यातल हेल्दी फूड कोणत? जवळपास ९९% लोकांनी ऑप्शन अ अस उत्तर दिल. खरे तर दोन्ही खाद्य ऑप्शन मध्ये स...मान चरबी आहे पण जस सांगितल गेल तसा प्रतिसाद बदलला.
    अनेकदा जाहिरातीच्या युगात हाच फंडा वापरला जातो. एखाद्या गाडीचे इंजिन आणि मायलेज चांगले नाही पण तिचे टायर आणि इंटिरियर मात्र वर्ल्ड क्लास आहे. अश्या वेळी जाहिरात, होल्डिंग, सेल्स इंजिनियर कडून फक्त टायर आणि इंटिरियर वर लक्ष वेधल जात. मानसशास्त्राच्या भाषेत फ्रेमिंग केल जाते. ग्राहकाला अश्या तर्हेने फ्रेमिंग करतात कि टायर आणि इंटिरियर चांगले म्हणजे गाडी चांगली व इंजिन आणि मायलेज हे ऑप्शनल असते.
    आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा सांगताना, बोलताना ऐकताना गोष्टी आपल्या पर्यंत अश्या फ्रेमिंग करूनच येतात न. एखाद्या बद्दल असणारी चीड, अडी एकद्याबद्दल असलेली ओढ त्याचा किंवा तिचा असलेला प्रभाव हे सगळ न ठरवता फ्रेमिंग होत असते. फ्रेमिंग मुळे एखाद्याची चांगली किंवा वाईट इमेज लगेच आपल्या समोर उभी राहते. आपल्या बोलण्यातून समोरच्या पर्यंत पोचते. अर्थात बर्याचदा आपल्याला त्याची पुसटशी कल्पना सुद्धा नसते. पण त्यामुळे आपण लेबल लावण्याची घाई करू नये.
    समोरच्याने सांगितलेली गोष्ट, व्यक्ती बोलण हे सगळ आणि आपण समोरच्या सांगितलेल्या गोष्टी , व्यक्ती हे सगळ खूप आणि खूप डिपेंड असते It's not what you say but How you say It ह्या वर. अगदी जवळच्या व्यक्ती , मित्र , मैत्रीण , अगदी प्रत्येक नात्यात हे नकळत होऊ शकते. ते बरोबर असेल तर नक्कीच आपला उत्कर्ष होईल पण तेच चुकीचे असेल तर ?? ह्यापुढे बोलताना , ऐकताना फ्रेमिंग लक्षात ठेवून विचार आणि उच्चार केले तर चुकीच्या गोष्टी पुढे जाण्यापासून आणि चुकीच्या गोष्टी स्वतः पर्यंत येण्यापासून स्वताला वाचवू शकू.



    फ्लोरिडा च्या निमित्ताने.... विनीत वर्तक
    फ्लोरिडा ह्या अमेरिकेतील राज्यात झालेल्या अमानुष हत्याकांडाने पुन्हा एकदा आपल्या नातेसंबंधातील एक दुर्लीक्षित मुद्दा समोर आणला आहे. आयसीस जरी ह्या हत्याकांडाची जबाबदारी घेत असली तरी त्या मागच कारण वेगळच आहे. समलेंगिक संबंध हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. ह्यावर अनेक मत प्रवाह आहेत आणि ते त्यांच्या दृष्टीने बरोबर हि आहेत. पण कोणाच्या जिव घेऊन आपले मुद्दे आणि मत पुढे जात नसतात हे सत्य आयसीस सारख्या दशहतवादी संघटनांना कधी कळणार? कळले... तरी त्याचा वापर स्वताच्या स्वार्थासाठी करून घेणे ते थांबवतील अस दिसत तरी नाही.
    समलेंगिक संबंध हा विषय किचकट आहे. काही व्यक्तीन मध्ये असणार्या ह्या भावना आता उघडपणे पुढे येत आहेत आणि त्याला समर्थन हि मिळत आहे. अर्थात चांगले वाईट ह्या वादात मला जायचे नाही. समलैंगिकता हि विरळ अशी भावना आहे त्यात काही वाईट नाही अस माझ स्वताच मत आहे. अर्थात आता त्याच जे बाजारीकरण, अंधानुकरण होत आहे त्याला मात्र माझा तीव्र आक्षेप आहे. निसर्ग नियमानुसार आपल्या भावना स्पेशली फिजिकल पूर्ण केल्यावर काहीतरी चेंज म्हणून समलैंगिकतेकडे वळण्याची जी प्रथा चालू आहे ती मुळ स्त्री पुरुष नात्याला कुठेतरी मुळासकट उचकट्वून काढते आहे.
    समलैंगिकता हि विकृती नसली तरी चेंज म्हणून ती स्वीकारणे हि विकृती आहे. जसे योनी मधून शारीरिक भावना उपभोगल्या नंतर चेंज म्हणून पार्श्वभागाचा वापर करणे जितकी विकृती तितकीच समलैंगिकता आहे. चेंज , क्रेझ आणि यो म्हणून नवीन पिढी ह्या कडे झपाट्याने वळत आहे. अर्थात लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता ह्या बद्दल असलेली निष्क्रियता त्याला जास्ती कारणीभूत आहे. आज किती स्त्रिया आणि पुरुष स्वताच्या शरीराबद्दल जागरूक आहेत? आपल्या जनेनद्रीयांच्या बद्दल किती जणांना माहिती असते? असली तरी तिच्या कडे समाज, संस्कार ह्याचा पगडा इतका असतो कि ते काहीतरी घाण आहे इथवर आपली उडी जाते.
    सेक्स हा मुळात शरीरात नसून त्याच केंद्र मन असते हे हि समजायला आपल्याला वयाची चाळीशी आणि पन्नाशी गाठावी लागत असेल तर विसाव्या किंवा तत्पूर्वी निर्माण होणार्या लैंगिक भावनांचं २०-२५ वर्षात काय होत असेल ह्याचा विचार न केलेला बरा. समलैंगिकता, सेक्स आणि एकूणच लैंगिक शिक्षण मग ते कोणत्याही स्वरुपात असो पुढल्या पिढीला त्यांच्या भावना उद्दीपित होतानाच देण हि काळाची गरज आहे. कारण लपलेलं असल कि आपण शोधायचा प्रयत्न करतो आणि समोर असल कि त्याच काही आकर्षण रहात नाही हा नियम तिथेही लागू आहे.
    गे क्लब , लेस्बियन क्लब आणि एकूणच समलैंगिक व्यक्ती ह्याचा प्रसार अमेरिकेत असला तरी भारताच्या किंबहुना आपल्या प्रत्येकाच्या दरवाज्यावर ह्या गोष्टी समोर येऊन उभ्या आहेत. त्याला समाज, संस्कार आणि देवाच्या झापड्यात न बसवता अभ्यासाच्या साच्यात बसून नवीन पिढीला विचार करायला शिकवलं तर देवाच्या नावाने अनेक निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या फ्लोरिडा सारख्या अनेक घटना टाळू शकू.



    कर्मसंचित... विनीत वर्तक
    ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळतेच आपण असे नेहमीच म्हणतो. पण असे घडते का? तर उत्तर हो आणि नाही असे आहे. प्रत्येक वेळी त्याच योग्य म्हणजे चांगल - वाईट फळ मिळेलच अस नाही. किंवा मिळाल तरी आपल्या दृष्टीकोनातून ते तस असेलच अस नाही न. बर्याचदा आपला ८०%- ९०% वेळ ह्याच विचारात जातो नाही का?
    त्याने किंवा तिने माझ अस केल किंवा मला दुखावलं, त्रास दिला, लुबाडल, फसवल किंवा अजून काही मग त्याला किंवा तिला कर्माच फळ मिळणार कधी आणि ते जस मला हव आहे तस असेल त...ेव्हा मला शांती मिळेल किंवा विचारांची नाळ तेव्हा तुटेल असच काहीस नाही का? ते जोवर मिळत नाही तोवर आपण अस्वस्थ राहतो.
    त्याच्या किंवा तिच्या कर्माची अपेक्षा आपण नकळत करत रहातो. आपल्या उरलेल्या गोष्टींसोबत ह्या विचारांची माळ पण आपण बरोबर घेऊन जातो. वास्तविक चांगल्या कृत्याची किंवा वाईट कृत्याची फळे देणारे किंवा अपेक्षा करणारे आपण कोण? ते फळ कसे असावे, त्याची तीव्रता कशी असावी किती वेळा ते मिळाव ह्या सर्व गोष्टी आपल्या हातात नसताना आपण तरीपण हे सगळे विचार सोबत घेऊन चालत राहतो.
    होते काय कि जो करतो किंवा करते त्याला काही पडलेली नसते. पडलेली असती तर समोरून क्षमेची याचना, माफी किंवा दया ह्या गोष्टी आपसूक आल्या असत्या निदान वाईट गोष्टींच्या बाबतीत तरी. पण त्याला काही पडलेली नसते मग ह्या कर्मांच्या फळांचा विचार हवाच कशाला. न मागता क्षमा करण्याची हतोटी आपल्या ह्या विचारांच्या साखळ्या तोडून टाकते.
    तो किंवा ती अस वागली मग तिच्या वागण्याची फळे तिला, त्याला मिळतील तेव्हा मिळतील किंवा नाही मिळणार. पण आपण न मागता केलेली क्षमा निदान आपल्या सोबत त्या विचाराना तर येऊ देत नाही. अर्थात केलेल्या चुकांची शिक्षा हि जरूर असावी पण ती शिक्षा करण्याचा अधिकार आपल्याला आहे का ह्याचा हि विचार व्हायला हवा. तो जर नसेल तर मग ते पकडून ठेवण्याचा अट्टाहास हि नकोच कि.
    सगळ सरळ नसते आणि सोप्पे हि. म्हणून न मागता क्षमा करण्याची हतोटी स्वताला मानसिक सुख देते आणि दुसर्यांच्या कार्मसंचीता पासून मुक्तता तरी नक्कीच.


    प्रिय .....,
    तो येणार त्याची चाहूल लागलीच होती. कधीपासून वाट बघत होतो. सगळ्यांचे भविष्य सांगून झाले कि तो येणार, येणार पण कधी? हे मात्र गुलदस्त्यात होते. तो येताना वाजत गाजत येतो पण ह्या वेळेस हा सगळा फौजफाटा कुठे गायबच होता. पांढरी वस्त्रे आणि त्याला धुसरशी काळी बोर्डर हीच काय ती त्याची येण्याची लक्षणे. समुद्र हि शांतच त्याला कधी उधाण येत त्याची वाट बघत होतो.
    काल मात्र रंग बदलले. समुद्राला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वार्याने हि जोराने विहारून त्याच्या आगमनाची वर्दी दिल...ी. पांढरी वस्त्रे आता काळ्या रंगाने झाकली गेली. आसमंत काळोखी झाला पण अजून तो बरसत नव्हता. कदाचित मुहूर्ताची वाट बघत असेल. त्यालाही योग्य मुहूर्त लागत असेलच कि. तसा काल मुहूर्त होता चांगला निदान पुरुषांच्या दृष्टीने वटपोर्णिमा आणि फादर्स डे ह्याहून अधिक काय हवे?
    पण तो वाट बघत होता कोणाची काय ठाऊक. पण कालच्या त्याच्या जोशाने मन मे लड्डू तो फुटे हि. एकतर समुद्राचा रौद्रपणा आता जाणवायला लागला होता. कामाच्या वेळेस एक हात हेल्मेट सांभाळायला जात होता. कारण वार्याला हि काल उधाण होतच. त्याच्या जोरावर जे काही अधे मध्ये येईल त्या सर्वाना घेऊन त्याचा विहार मुक्तपणे चालू होता. फक्त एकच माशी शिंकली ती म्हणजे आज त्याचा बडेजाव कुठे नव्हता. तो आवाज, तो अंधाराला चिरत जाणारा प्रकाश आणि त्या काळोख्या पाण्यावर उत्स्फुर्तपणे उडी घेणाऱ्या प्रकाशाचा आवेश कुठे जाणवत नव्हता.
    मनात एकच शंका फक्त दाखवायला तर नाही न आला. कारण आता तो हवा होता त्याच दिसण पुरेस नव्हत. आता त्याने आसमंत ओला करायला हवा होता. आता त्याने पूर्णपणे कोसळायला हव होत. पण तो गप्पपणे बघत होता. त्याचा आवेश कुठेतरी पूर्ण गायब होता कदाचित मनातल्या मनात मंद हसत असावा. काहीही असो पण तू कोसळावस अस मनापासून वाटते आहे रे अस त्याला सांगावस मला मनापासून वाटत होत. असही वाटत होत कि तो ऐकेल.
    आज मात्र त्याने एकल. आसमंत ओला झाला. समुद्राला आनंदाच उधाण आल. त्याच्या स्पर्शाने गुदगुदल्या झाल्या पण कुठे तरी तो जोश मात्र हरवलेला वाटला. त्याच ते वाजत गाजत येण मिस करतो आहे. पण तरी कुठेतरी समाधान आहे तो कोसळला ह्याचा. असाच रहा रे बाबा तू अजून खूप खूप कोसळ त्याची गरज आहे सर्वांनाच. त्या आकाशाला , त्या समुद्राला , त्या जमिनीला आणि त्या प्राण्यांना.
    तुझाच एक निस्सीम चाहता ,
    विनीत


विसात एक .. विनीत वर्तक

कालपासून उत्सुकता ताणली गेली होतीच. तब्बल एक - दोन नाही तर २० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो ने कंबर कसली होती. २००८ ला तब्बल १० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून इस्रो ने एक जागतिक विक्रम केला होता. त्या नंतर नासा, रशियन स्पेस एजन्सी नि तो मोडला पण तरीही अश्या प्रकारे एकाच रॉकेट मधून वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रहाना त्यांच्या योग्य त्या कक्षेत स्थापन करणे खरोखर रॉकेट सायन्स म्हणजेच अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे.

एकाच रॉकेट च्या सहायाने वेगवेगळ्या वजनाच्या, आकाराच्या, वेगवेगळ्या उपयोगाच्या भारतीय नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळ्या राष्ट्रांच्या उपग्रहाना त्यांना हव्या असलेल्या कक्षेत स्थापन करणे हे आपल्या रॉकेट डिझाइन च खूप मोठ यश आहे. आपल्या घरातील वस्तू आपण आपल्याला हव्या तश्या किंवा घराला पूरक होतील अश्या डिजाइन करू शकतो. पण दुसर्यांच्या वस्तू आपल्या घरात सामावून घेऊन त्यांना समोरच्याला हव्या त्या ठिकाणी ठेवण जितक कठीण तितकच जगाच्या दोन टोकांवर निर्माण झालेल्या उपग्रहाना एकाच रॉकेट वरून प्रक्षेपित करण.

२० उपग्रहान पेकी १ भारताचा २ भारतातील युनवरसिटी चे त्यातील एक पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चा स्वयंम तर सत्याबामा स्याट हा सत्याबामा युनवरसिटी चेन्नई चा होता. तब्बल १७ उपग्रह अमेरिका, क्यानडा, जर्मनी, इंडोनेशिया चे होते. १७ उपग्रह कमर्शियल मार्केट मध्ये इस्रो चा वाढत चाललेला दबदबा दाखवून देतात. आत्तापर्यंत १००% यश मिळवणाऱ्या इस्रो ची किमत जगातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अनेक प्रायवेट उपग्रह पाठवणार्या संस्था जश्या एरियन, स्पेस एक्स वगरे ह्यांना प्रचंड अशी स्पर्धा निर्माण होत आहे. एकाच वेळी अनेक उपग्रह पाठवल्याने त्यामागचा खर्च प्रचंड कमी करण्यात इस्रो ला यश आल आहे.

अनेक उपग्रह पाठवताना अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. ह्यातील एक म्हणजे एकाच वेळी सगळ्या उपग्रहांच प्रक्षेपण होऊ नये तसच त्यांची एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून प्रक्षेपित करताना अंतर ठेवावे लागते. तसेच वेगवेगळ्या कक्षेत जाण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावर अग्निबाण प्रज्वलित होणे गरजेचे असते. समजा ४ उपग्रह ५०० किमी च्या कक्षेत स्थापन केले तर पुढचे ५ कदाचित ५४२ किमी च्या कक्षेत असू शकतात अश्या वेळी अग्निबाण पुन्हा प्रज्वलित होऊन रॉकेट च्या सहायाने उरलेल्या ५ उपग्रह ५४२ किमी च्या कक्षेत नेणे क्रमप्राप्त असते. अग्निबाणाला पुन्हा प्रज्वलित करून पुन्हा बंद करणे हि प्रक्रिया अतिशय जोखमीची असते. कारण हि उंची गाठायला ३-४ सेकंदाच प्रज्वलन फक्त गरजेचे असते. ते हि योग्य वेळेत म्हणजे गाडीच इंजिन नेमक्या वेळी फक्त ४ सेकंद चालू करायचं म्हंटल तर किती कठीण असेल ते हि चावी आपल्या हातात असताना तर मग काहीच कंट्रोल नसताना जमिनीवरून अवकाशात हे इंजिन सुरु करण किती क्लिष्ठ असेल ह्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

जर उपग्रहांची मांडणी बघितली तर ती वर्तुळाकार स्वरूपात असते. म्हणजे हे २० उपग्रह वर - खाली गोलाकार पद्धतीने ठेवलेले असतात. ह्याचा अर्थ प्रत्येक उपग्रहाला कक्षेत सोडण्यासाठी रॉकेटला स्वताला ओरीयंट करावे लागते. म्हणजे जो उपग्रह सोडणार तो त्या दिशेने वळवावा लागतो. कक्षेची उंची आणि उपग्रहाची दिशा ह्याचा योग्य तो समन्वय साधल्या नंतरच त्याच प्रक्षेपण केल जात. अवघ्या २६ मिनिटात उड्डाण ते सगळ्या उपग्रहांची त्यांच्या कक्षेत मांडणी केली गेली. ह्यावरून किती प्रचंड गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर हे यश मिळते.

म्हणूनच विसात एक हे यश इस्रो , भारत आणि अवकाश संशोधनाच्या प्रचंड मोठा टप्पा आहे. येत्या काळात पी. एस. एल. व्ही च्या मदतीने एकाच वेळी अतिशय जास्त तफावत असणार्या कक्षेत उपग्रहांची मांडणी करण्याचा इस्रो च संशोधन चालू आहे. त्याच वेळी १००% यशासह पी. एस. एल. व्ही ने भारताची पताका अवकाशात खूप उंचीवर फडकत ठेवली आहे.


    चेंज च ट्रान्सफोर्मेशन... विनीत वर्तक
    मला चेंज हवा आहे किंवा करायचा आहे अस आपण नेहमी म्हणत असतो. एखादी वाईट सवय सोडण असो किंवा एखादी चांगली सवय जोडण असो. आपल्याला काहीतरी चेंज करायचं असते. चेंज चा अर्थ बघितला तर जवळपास ९९.९९% तो काही कालावधी साठी असतो. म्हणजे काय तर उद्यापासून मी सिगरेट सोडणार. परवापासून नित्यनियमाने व्यायाम करणार अश्या चेंज च्या आणाभाक्या आपण प्रत्येक नवीन वर्षी घेतच असतो.
    अर्थात पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या महिन्यात त्याची दांडी गुल होते हे वास्तव आपण क...धी लक्षात घेत नाही. असे अनेक चेंज आपल्याला हवे असतात किंवा ते करण्याची आपली इच्छा असते अनेक चेंज साठी मेहनत हि घेतो पण अल्पावधीत येरे माझ्या मागल्या अशी गत आपली होतेच.
    ट्रान्सफोर्मेशन मात्र त्रिकालाबाधित असते. काळाच्या कसोटीवर टिकून राहणार. जस दूधाच दही होते पण दह्याच परत दुध होऊ शकत नाही. किंवा दगडातून शिल्प तयार होते पण त्या शिल्पातून पुन्हा दगड तयार होऊ शकत नाही. अळी च फुलपाखरात रुपांतर होते पण फुलपाखराच पुन्हा अळी मध्ये नाही म्हणजे ह्या गोष्टी एकदा एक स्तिथीतून दुसर्या स्तीथीकडे ट्रान्सफोर्म झाल्या कि पुन्हा पहिली स्थिती येण अश्यक्य.
    आपल्या आयुष्यात हि काही ट्रान्सफोर्मेशन असतात. आधी मी असा होतो पण तो माझा भूतकाळ होता आता मी तो मागे सोडला आहे. आताचा मी आणि आधीचा ह्यात पूर्णतः ट्रान्सफोर्मेशन आहे. अश्या अनेक व्यक्ती आपल्या आजू बाजूला आपण बघतोच. वाल्याचा वाल्मिकी , सिद्दार्थाचा गौतम बुद्ध , मोहनदास गांधी चे महात्मा गांधी, ते कशाला अगदी आपल्या आजू बाजूला एका वेळेस दारूच्या गुत्यात गुंतून पडलेले पण आता दारू विरोधी जनजागृती करणारे हि दिसतात.  
    चेंज करताना चेंज करणारा आणि ज्याच्यामुळे चेंज करायची इच्छा होते त्या दोघांची इंटेनसिटी तितकी नसते त्यामुळे चेंज हा थोड्या कालावधी साठी होतो. पण जेव्हा ट्रान्सफोर्मेशन होते तेव्हा मात्र ते आतून कुठून तरी आलेल असते. त्याची तीव्रता हि कोणावर अवलंबून नसते तर ते स्वताला हव असते म्हणून होते. जेव्हा ट्रान्सफोर्मेशन होते तेव्हाच अमुलाग्र बदल होतात. नाहीतर बदलांची मालिका एखाद्या ऋतू सारखी काही कालावधी टिकते आणि पुन्हा तेच सुरु राहते.
    चेंज च ट्रान्सफोर्मेशन म्हणूनच शिकायला हव. चेंज हा कोणासाठी म्हणून नको तर स्वतासाठी आणि आतून आलेला, भिनलेला असला कि त्याच ट्रान्सफोर्मेशन होते. ते निरंतर चिरकाळ टिकणार असते.