Friday, 24 June 2016


तू लढ आम्ही आहोतच... विनीत वर्तक

तू लढ आम्ही आहोतच
तू जीवाची पर्वा करू नकोस आम्ही आहोतच
सियाचीनच ग्लेशियर असो वा कन्याकुमारीच रामेश्वर...
मुंबईचा अरबी समुद्र असो वा विशाखापट्टणम चा उपसागर


तू लढ आम्ही आहोतच.

आम्ही आहोतच फक्त फायद्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बोलण्यासाठी
आम्ही आहोतच फक्त स्वातंत्र्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बघण्यासाठी

तू लढ आम्ही आहोतच.....

मतांसाठी आम्ही काही करू
शत्रूला मित्र म्हणून जवळ करू
फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन हे तर आमचे ब्रीदवाक्य

तू लढ आम्ही आहोतच

मरताना काळजी करू नकोस
आरक्षणाची लढाई आम्ही करतोच आहोत
किती मोठे झालो तरी खुजे बनण्याची आमची स्पर्धा चालूच आहे.

तू लढ आम्ही आहोतच

जय हिंद म्हणायला आम्ही आहोतच
भगवा फडकवायला आम्ही आहोतच
शहीद म्हणायला आम्ही आहोतच

तू लढ आम्ही आहोतच

आम्हाला आरक्षण हवे फी माफी हवी
बोलण्याच स्वातंत्र हव संविधानाचे हक्क हवे
पण शत्रूची गोळी मग ते आपले का असोनात
मात्र तूच घ्यायचीस

मेलेल्या आम्हाला काय जागवणार
संवेदना गेलेल्या मुर्दाडानां काय जाणवणार
आम्ही मात्र असेच राहणार
कारण ..............................

तू मात्र लढ आम्ही आहोतच..

1 comment: