Friday 24 June 2016



    चेंज च ट्रान्सफोर्मेशन... विनीत वर्तक
    मला चेंज हवा आहे किंवा करायचा आहे अस आपण नेहमी म्हणत असतो. एखादी वाईट सवय सोडण असो किंवा एखादी चांगली सवय जोडण असो. आपल्याला काहीतरी चेंज करायचं असते. चेंज चा अर्थ बघितला तर जवळपास ९९.९९% तो काही कालावधी साठी असतो. म्हणजे काय तर उद्यापासून मी सिगरेट सोडणार. परवापासून नित्यनियमाने व्यायाम करणार अश्या चेंज च्या आणाभाक्या आपण प्रत्येक नवीन वर्षी घेतच असतो.
    अर्थात पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या महिन्यात त्याची दांडी गुल होते हे वास्तव आपण क...धी लक्षात घेत नाही. असे अनेक चेंज आपल्याला हवे असतात किंवा ते करण्याची आपली इच्छा असते अनेक चेंज साठी मेहनत हि घेतो पण अल्पावधीत येरे माझ्या मागल्या अशी गत आपली होतेच.
    ट्रान्सफोर्मेशन मात्र त्रिकालाबाधित असते. काळाच्या कसोटीवर टिकून राहणार. जस दूधाच दही होते पण दह्याच परत दुध होऊ शकत नाही. किंवा दगडातून शिल्प तयार होते पण त्या शिल्पातून पुन्हा दगड तयार होऊ शकत नाही. अळी च फुलपाखरात रुपांतर होते पण फुलपाखराच पुन्हा अळी मध्ये नाही म्हणजे ह्या गोष्टी एकदा एक स्तिथीतून दुसर्या स्तीथीकडे ट्रान्सफोर्म झाल्या कि पुन्हा पहिली स्थिती येण अश्यक्य.
    आपल्या आयुष्यात हि काही ट्रान्सफोर्मेशन असतात. आधी मी असा होतो पण तो माझा भूतकाळ होता आता मी तो मागे सोडला आहे. आताचा मी आणि आधीचा ह्यात पूर्णतः ट्रान्सफोर्मेशन आहे. अश्या अनेक व्यक्ती आपल्या आजू बाजूला आपण बघतोच. वाल्याचा वाल्मिकी , सिद्दार्थाचा गौतम बुद्ध , मोहनदास गांधी चे महात्मा गांधी, ते कशाला अगदी आपल्या आजू बाजूला एका वेळेस दारूच्या गुत्यात गुंतून पडलेले पण आता दारू विरोधी जनजागृती करणारे हि दिसतात.  
    चेंज करताना चेंज करणारा आणि ज्याच्यामुळे चेंज करायची इच्छा होते त्या दोघांची इंटेनसिटी तितकी नसते त्यामुळे चेंज हा थोड्या कालावधी साठी होतो. पण जेव्हा ट्रान्सफोर्मेशन होते तेव्हा मात्र ते आतून कुठून तरी आलेल असते. त्याची तीव्रता हि कोणावर अवलंबून नसते तर ते स्वताला हव असते म्हणून होते. जेव्हा ट्रान्सफोर्मेशन होते तेव्हाच अमुलाग्र बदल होतात. नाहीतर बदलांची मालिका एखाद्या ऋतू सारखी काही कालावधी टिकते आणि पुन्हा तेच सुरु राहते.
    चेंज च ट्रान्सफोर्मेशन म्हणूनच शिकायला हव. चेंज हा कोणासाठी म्हणून नको तर स्वतासाठी आणि आतून आलेला, भिनलेला असला कि त्याच ट्रान्सफोर्मेशन होते. ते निरंतर चिरकाळ टिकणार असते.




No comments:

Post a Comment