आनंदाचे डोही आनंद तरंग... विनीत वर्तक
आनंद काय? अस कोणी आपल्याला विचारल तर आपली उत्तर किती वेगळी असतात. आजचा दिवस आनंदात जावा असे वाटते का? हा प्रश्न स्वताला विचारला विचारला तर अगदी काही विचार न करता आपण होच बोलू. कोणाला वाईट दिवस जावासा वाटेल? पण मग उद्याच काय? परवाच काय? सोमवार , मंगळवार आणि पुढल्या आठवडयाच काय ते पुढल्या वर्षाच काय? सगळच आनंदात जाव अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनोमनी असेलच. पण खरच अस शक्य आहे का? तर ह्याची दोन्ही उत्तरे आहेत. एक तर हो आणि नाही पण.
आनंदाची व्याख्या जर का बाहेरील घटनांवर, लोकांवर, प्रतिक्रियेवर किंवा बाह्य स्वरूपावर असेल तर प्रत्येक दिवशी आपण ते कंट्रोल करू शकू का? आजच ठीक आहे पण उद्या लोक माझ्याशी कसे वागतील? किंवा माझा सहकारी मला हव तस वागेल? उद्या घडणाऱ्या सगळ्या घटना मला आनंद देणाऱ्या असतील ह्याबद्दल मी पूर्णतः शाश्वत आहे का? माझी आनंदाची व्याख्या जर त्यावर आधारलेली असेल तर नक्कीच ह्याच उत्तर नाही असेच येईल. त्यामुळे दुःख, नैराश्य हे आपल्या आसपास सतत असणार आहे आज न उद्या ते आपल स्वरूप घेऊन समोर येणारच.
हाच आनंद जर आतून आलेला असेल तर म्हणजे माझ्या आनंदी राहण्याचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असेल तर कदाचित मी ह्याच उत्तर शाश्वत देऊ शकेन. हो मी आनंदी असेन आज, उद्या , परवा आणि वर्षांनी सुद्धा. पण हे आनंदी राहण आजच्या युगात शक्य आहे का? तर उत्तर होच अस आहे. आपल्या मनाला सुखाच्या आणि आनंदाच्या सामाजिक आणि शिकवलेल्या बंधनातून मुक्त करता आल तर नक्कीच. मेडीटेशन हेच तर सांगते मेडीटेशन आणि साधना मग ती कोणत्याही प्रकारची जी तुम्हाला आंतर मनाशी जोडते ती आपल्या आनंद आणि दुःखाच्या संकल्पना मोडीत काढून एक अती उच्च कोटीच समाधान देते. जे समाधान असते आतून आलेल आणि म्हणून ते निरंतर आणि काळाच्या पलीकडे असते.
अनेक रस्ते आपल्याला तिकडे नेतात योग, ओशो, मेडीटेशन, झेन विचारसरणी, बुद्दीझम ते कदाम्पा ट्रेडीशन जिकडे तुम्ही आनंद समजून घेतात. त्याच रिमोट कंट्रोल स्वताजवळ ठेवायला शिकतात. म्हणूनच कदाचित आज सेकंदावर धावणाऱ्या जगाला काळाच्या पलीकडे असणार्या ह्या रस्त्यांची गरज आहे कारण आनंदाचे डोही आनंद तरंग...
Meditation is just a courage to be silent and alone. Slowly slowly, you start feeling a new quality to yourself, a new aliveness, a new beauty, a new intelligence-which is not borrowed from anybody, which is growing within you. It has roots in your existence.
~ Osho
No comments:
Post a Comment