Friday 24 June 2016


हरवलेली सुट्टी... विनीत वर्तक

मे महिना उजाडला कि कधी न्हवे ते लवकर उठायची घाई असायची. एरवी शाळेत जाण्यासाठी उठायला कंटाळा यायचा पण मे महिना आला रे आला कि दिवस कधी उजाडतो अस व्हायचं. सकाळी सकाळी उठून जवळच्या एका शाळेच्या प्रांगणात क्रिकेट खेळण्यासाठी असलेली ती लगबग. लवकर गेल हि हव ते मैदान मिळायचं. ८ नंतर इतकी मुल तिकडे खेळायची कि कोणाचा कोण क्षेत्ररक्षक आणि कोण कोणाला बोलिंग करतो आहे हे ओळखून नक्की आपल्याच चेंडू मागे धावायचं हे मोठ कठीण काम व्हायचं. उन्हाचा चटका, घाम येण्याआ...धी आपली हौस भागवायची हा तो कटाक्ष. ११ रुपये सिल लावून म्याच खेळायची मग जिंकल्यावर ५० रुपयाची पार्टी करायची. फाफडा आणि जिलेबीच्या सोबत सकाळचे १० ते ११ कधी वाजून जायचे ते कळायचे नाही.

आंघोळ करून परत क्रिकेट किंवा बैठकीचा फड. दुपारच सत्र मात्र चित्रपट किंवा बैठे खेळ खेळण्यात जायचं. संध्याकाळी मात्र डबा आईस पाईस, लगोरी ते लंगडी आणि ब्याटमिंटन पासून क्रिकेट सगळच असायचं. रात्री ८ वाजले तरी अंधुक प्रकाशात खेळ सुरूच राहायचे. आईच बोलावण किंवा बाबांचा ओरडा खात घरात शिरायचं हा शिरस्ता ठरलेला असायचा. त्यात मग बाजार, पोहणे, पतंग ते अगदी एक टप्पी आउट पर्यंत अनेक पर्याय असायचे. असा प्रचंड उत्साह भरलेली सुट्टी लवकर का संपते असच नेहमी वाटत राहायचं. त्यात भर म्हणून मामाकडची ट्रीप बोनस असायचीच. पण कधीच हि सुट्टी लवकर संपावी अस अजिबात वाटल नाही.

आज सुट्टी असते काय? हेच मुळी मुलांना माहित नाही. रिकामी मैदान जी काही थोडी फार उरली आहेत ती. ओस पडलेल्या विहरी, बिल्डींग च्या न फुटलेल्या काचा ते पिवळ्या फुलांनी भरलेले ते रस्ते जी आम्ही वेचून बाजार बाजार खेळायचो ते सर्वच शांत झाल आहे. गेल्याच आठवड्यात त्या शाळेच्या मैदानावरून गेलो. सकाळीच कोणीही नव्हते. एकेकाळी मुलांची इतकी गर्दी असणार आणि आवाजाने, चेंडूंच्या षटकाराने ओसंडून वाहणार ते मैदान भयाण वाटत होत. कुठेतरी माझ बालपण शोधात होतो. त्या सकाळच्या फापड्या जिलेबीच्या सुगंधाला आज कोणीच गिऱ्हाईक नव्हत. उनो, सापशिडी, व्यापार, चोर-पोलीस, पत्ते खेळायची चौकडी आज खेळाडूच हरवून बसली आहे अस न राहून वाटत होत.

समर क्याम्प, चार भिंतीच्या आत व्यायाम, घाम न येता एसी क्लब हाउस ला जायची हौस आज सुट्टीच्या मुळावर उठली आहे. मैदाने आहेत कुठे पेक्षा आज खेळणारे आहेत कुठे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सर्वच सुखकर करण्याच्या नादामुळे आपण मुलाचं बालपण हिरावून घेतल आहे. फुटलेले अंगठे, घामाने भिजलेल अंग, उन्हात काळी पडलेली त्वचा हेच तर खर बालपण. आपण सर्व खड्डे बुजवले आणि राजमार्ग दिला खूप लवकर मोठ होण्याचा. पण त्या नादात मे महिन्याची सुट्टी मात्र आपण हरवून बसलो आहोत

No comments:

Post a Comment