Thursday 30 April 2020

एका एलिसा ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका एलिसा ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एलिसा ग्रॅनॅटो हे नावं भारतीयांना माहीत असण्याची शक्यता नाहीराजकारणात कोणी काय बोललं ते कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या आणि कोणत्या पार्टीत कोणत्या अभिनेत्रीने कोणता ड्रेस आणि कोणती लिपस्टिक लावली होती ह्याची नोंद ठेवणाऱ्या लोकांनकडून आणि ते दाखवणाऱ्या माध्यमांकडून हे नावं सगळ्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता कमीच आहेएलिसा ग्रॅनॅटो ऑक्सफोर्ड विद्यापिठात मॉल्युक्युलर मायक्रोबायॉलॉजिस्ट आहेएखाद्या जिवाणूमुळे माणसाला कसे रोग होताततो जिवाणू कश्या पद्धतीने तो रोग आपल्या शरीरात पसरवतो ह्यावर मूलभूत संशोधन ती करत आहेअश्या एखाद्या संशोधकाचा आणि भारताचा काय संबंध असा प्रश्न भारतीयांच्या मनात येणं स्वाभाविक आहेतर ह्या एलिसा ने आपल्या ३२ वर्षी असं एक पाऊल उचललेलं आहे ज्याचे दूरगामी परीणाम भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईवर होणार आहेतत्यामुळे प्रत्येक भारतीयांसाठी एलिसा  युद्ध खूप महत्वाचं ठरणार आहे.

२३ एप्रिल २०२० ला आपल्या ३२ व्या वाढदिवशी एलिसा ने युरोपा मधील पहिली महिला होती की जिने ऑक्सफोर्ड विद्यापिठाने तयार केलेल्या “ChAdOx1 nCoV-19” ह्या लसीची चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून ती लस स्वतः टोचून घेतली आहेतर ह्या लसीचे प्राथमिक परीणाम खूप आशावादी आहेत प्राण्यांवर केलेल्या चाचणीत ही लस टोचल्यानंतर २८ दिवस कोरोना च्या संपर्कात आल्यानंतर ही त्यांना कोरोना ची लागण झालेली नाहीही लस नक्की काय करते तर संशोधकांनी कोरोना च्या बाह्य भागावर असलेल्या स्पाईक च्या प्रोटीनला एका निरुपद्रवी विषाणू सोबत मिसळवलं गेलंहे मिश्रण मग एलिसा ग्रॅनॅटो आणि अजून एका स्वयंसेवकाच्या शरीरात सोडण्यात आलंआता हे मिश्रण त्यांच्या शरीरातील पेशीत शिरून कोरोना व्हायरस  स्पाईक प्रोटीन बनवायला सुरवात करेलज्याला आपण लागण झाली असं म्हणतो तसं ह्याच उत्पादन शरीरात चालू झालं की शरीर अश्या व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी आपल्या इम्यून सिस्टीम म्हणजे (रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अँटीबॉडी आणि टी पेशी ज्या अश्या प्रोटीन आणि त्यातील व्हायरस ला मारून टाकतात त्यांच उत्पादन सुरु करेलजसं आधी सांगितलं तसं हा व्हायरस निरुपद्रवी असल्याने त्याचा शरीराला त्रास होणार नाही पण शरीर अश्या पद्धतीचं स्पाईक प्रोटीन शरीरात घुसल्यावर काय करायचं ह्याची तयारी आणि त्याला शरीरातून हद्दपार करण्यासाठी पूर्णतः सज्ज होईलपुढे समजा कोरोना व्हायरस शरीरात घुसला तर तो हेच प्रोटीन घेऊन आपल्या शरीरात प्रवेश करणार आणि शरीरातील इम्यून सिस्टीम ला कळल्यावर आपलं शरीर आधीच तयार असलेल्या अँटीबॉडी आणि टी पेशी घेऊन त्याच्यावर हल्ला करून त्या प्रोटीन सोबत कोरोना चा खात्मा स्वतःच करेल.

वाचायला हे अगदी सोप्प वाटलं तरी ह्या सगळ्या प्रक्रिया मेडीकल सायन्स च्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या आहेतप्रत्येक शरीर हे अश्या मिश्रणाला कश्या पद्धतीने प्रतिसाद देते ह्यावर ह्या लसीच यशअपयश अवलंबून आहेजितक्या जास्ती लोकांना ही लस टोचली जाईल तितक्या खात्रीपुर्वक आपण सांगू शकू की आपली उपाययोजना व्हायरस ला थांबवण्यात काम करते आहेइकडे एक लक्षात ठेवायला हवं की वर सांगितलं तसं प्रत्येक शरीर बनवेल असं नाहीकदाचित त्या व्हायरसमुळे अजून काही धोका उद्धभवेल अथवा शरीर वेगळ्या प्रकारे ह्याला उत्तर देईल हे बघणं अतिशय महत्वाचं आहेह्या सगळ्या टेस्ट मध्ये जिवाला धोका ही होऊ शकतोत्यामुळेच क्लिनिकल ट्रायल अनेक लोकात यशस्वी होतं नाही तोवर कोरोना व्हायरस ची लस यायला वेळ लागणार आहेह्या सगळ्या प्रक्रियेला आणि लसीच्या कार्यक्षमतेचा समजून घेण्यासाठी  महिने ते  वर्षाचा कालावधी गरजेचा आहेपण ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या ह्या लसीचे प्राण्यांवर दिसलेले परीणाम खूप आशावादी आहेत.

ह्या सगळ्याचा आणि एलिसा चा भारताशी काय संबंध तर भारतातील नव्हे जगातील सगळ्यात जास्ती लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ने ह्या लसी चे ६० मिलियन ( करोडडोस बनवण्याची घोषणा नुकतीच केली आहेह्या लसीची किंमत जवळपास १००० भारतीय रुपये किंवा १४-१५ अमेरीकन $ असणार आहेसप्टेंबर पर्यंत एलिसा ग्रॅनॅटो आणि इतर स्वयंसेवकांच्या शरीराने ह्या लसी ला कितपत आपलसं केलं तसेच कोरोना च्या सानिध्यात आल्यावर त्यांच्या शरीरात घडलेले बदल जर आशादायक असतील तर ह्या लसीचे उत्पादन करणारा भारत जगातील सगळ्यात मोठा देश असेलहे जर यशस्वी झालं तर साधारण ४०० मिलियन लसी पुढल्या वर्षी बनवण्याचा सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा मानस आहेकोरोना च्या लढाईत यश अपयश हे ह्या क्लिनिकल ट्रायल मध्ये काय निकाल लागतात त्यावर अवलंबून आहेआशा करूयात की एलिसा ग्रॅनॅटो ह्या सगळ्यातून सुखरूप बाहेर येईल आणि जगाच्या आणि भारताच्या कोरोनाच्या लढाईत एक निर्णायक भुमिका बजावेलतिच्या ह्या धाडसी निर्णयासाठी आणि तिला माझा सॅल्यूटउद्या जर ही लस प्रत्येक भारतीयाच्या शरीरावर टोचली जाईल तेव्हा प्रत्येक भारतीयाने एलिसा ग्रॅनॅटो चं कर्तृत्व नक्कीच लक्षात ठेवायला हवं

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Wednesday 29 April 2020

चेतन चिता... विनीत वर्तक ©

चेतन चिता... विनीत वर्तक ©

चेतन चिता हे नाव ऐकून आपल्यापैकी अनेकांना क्रांतिवीर चित्रपट आठवला असेल. ( ह्या चित्रपटात खलनायकाचं नाव चतुरसिंग चिता असं होतंकारण आपल्या माहितीचे दरवाजे फक्त क्रिकेटचित्रपट किंवा रोज २४ तास दूरचित्रवाणीवर झळकणाऱ्या ब्रेकिंग न्यूज वर मर्यादित आहेतत्या ब्रेकिंग न्यूज खऱ्याच ब्रेकिंग असतात काहा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहेइतिहासाच्या पानात खरं तर सोनेरी अक्षर पण कमी पडतील असं हे नावं भारतीयांना लक्षात अथवा माहिती असण्याची सुतराम शक्यता नाहीपण इतिहास लिहणाऱ्या लोकांना त्याचं काही नसते कारण त्यांच्यासाठी देश हा सर्वप्रथम असतो

"हर करम अपना करेंगे  वतन तेरे लिए,
दिल दिया है जां भी देंगे  वतन तेरे लिए."......

१४ फेब्रुवारी २०१७ चा तो दिवस होतापूर्ण देशात प्रेमाचा दिवस साजरा होतं होतापण हातात बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करणाऱ्या लोकांसाठी तर प्रत्येक दिवसचं देश प्रेमाचा असतोप्रेमाच्या दिवशी सुद्धा डोळ्यात तेल घालून सी.आर.पी.एफ.(The Central Reserve Police Force) ची  ४५ वी बटालियन बंडीपूरा इकडे एक शोधमोहीम करत होतीह्या मोहिमेचं नेतृत्व करत होते कमांडिंग ऑफिसर चेतन कुमार चिताह्या भागात लपून बसलेल्या लष्कर  तोय्यबा च्या अतिरेक्याला आपण पकडले जाणार असल्याचं लक्षात आलंत्याने शोध घेणाऱ्या त्या पोलीस सुरक्षा रक्षकांवर अंधाधुंद गोळीबार सुरु केलाकाय होते आहे कळायच्या आत गोळ्यांचा वर्षाव सगळीकडे सुरु झालाह्या अंधाधुंद गोळीबारात  सुरक्षाकर्मीना आपला जीव गमवावा लागला तर  जवान जखमी झालेएका नागरीकाला ही ह्या गोळ्यांनी आपलं लक्ष केलंअश्या बिकट परीस्थीतीत लिडर लीड फ्रॉम  फ्रंट हे सार्थ करताना चेतन चिता ह्यांनी मागचा पुढचा विचार  करता त्या अतिरेक्याच्या दिशेने उडी घेतली.

चित्रपटात खलनायक समोरून गोळ्या चालवताना हिरो त्याच्याकडे धावत जाताना आपल्याकडील बंदुकीने जश्या गोळ्या मारतो असं प्रत्यक्षात घडत होतंगोळ्यांच्या वर्षावात चेतन चिता ह्यांनी तब्बल १२ राउंड अतिरेक्याच्या दिशेने फायर केलेत्याच्यावर चाल करून जात असताना त्यांच्या डोकंपोटहातडोळे अश्या सर्व भागात तब्बल  गोळ्या घुसलेल्या होत्या गोळ्या अंगावर झेलून सुद्धा त्यांची बंदूक अतिरेक्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होतीत्याला शांत केल्यावर चेतन चिता जमिनीवर कोसळलेत्यांना त्वरीत श्रीनगरला हॉस्पिटल ला नेण्यात आलंत्यांच्या शरीराचा एक्स रे काढल्यावर शरीरात सगळीकडे गोळ्यांच गोळ्या दिसत होत्यात्यांच्या कवटी मध्ये पण गोळी घुसलेली होतीपण अश्या परीस्थीतीत ही तो श्वास चालू होता फक्त आणि फक्त देशासाठी.... 

श्रीनगर मधून त्यांना दिल्ली मधल्या एम्स मध्ये आणलं गेलंत्याच्या शरीरात नक्की कुठून गोळ्या काढायला सुरवात करावी असा प्रश्न डॉक्टरांपुढे होता कारण गोळ्या लागलेली सर्व ठिकाण शरीराचा महत्वाचा भाग होतीएकेक गोळी डॉक्टरांनी काढायला सुरवात केली पण त्यांना चेतन चिता जिवंत राहतील का ह्याची काहीच कल्पना नव्हतीपण चेतन चिता ह्या सगळ्याला पुरून उरलेतब्बल  महिने कोमात राहिल्यावर मृत्यूला परत पाठवत ह्या बहादूर सैनिकाने पुन्हा एकदा डोळे उघडले ते देशभक्ती साठीचतोंडातून शब्द काढण्याची ताकद आल्यावर एक डोळा गमावल्यावर सुद्धा त्यांच्या तोंडावर हास्य होतपुन्हा एकदा देश रक्षणासाठी आपल्या कामावर परतण्याची त्यांना उत्सुकता लागली आहेजेव्हा मिनिस्टर ऑफ स्टेट होम आणि भारतीय आर्मी चे चीफ ह्यांनी भेट दिली असता त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या अतूट देशप्रेमाची साक्ष देतात.

I feel I have contributed something to the nation,"

ह्या घटनेतून ते वाचले नाहीत तर अवघ्या एका वर्षात त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या रक्षणासाठी आपल्या ऑफीस मध्ये रीपोर्ट केलंशरीरात  गोळ्या घुसून जिवंत राहीलेल्या चेतन चिता ह्यांच शरीर जरी अतिरेक्यांच्या गोळ्यांनी पोखरलं असलं तरी त्यांचं मनोधैर्य आणि देशभक्ती ला त्या काहीच करू शकल्या नाहीत.

"My physiotherapy is going on. And, I am fighting fit. If my force and my country want me to go to field area and do operations. There will be no hesitation."

आपल्या युनिफॉर्म ला बघून ते हसत सांगतात,

"This is my second skin."

हे कुठून येत असेलत्यांच्याविषयी वाचताना आणि आता लिहताना पण डोळ्यात पाणी येते कि आजच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या गर्दीत असे ही काही लोकं  आहेतज्यांच्यासाठी स्वार्थीपणाच्या कक्षाच वेगळ्या असतात.

ऑफीस जॉब दिल्यावर त्यांनी पुन्हा एकदा फिल्ड वर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहेसी.आर.पी.एफच्या COBRA टीम मध्ये त्यांना जायचं आहेही टीम सी.आर.पी.एफच्या सगळ्यात घातक युनिटपैकी एक आहे. (COBRA is a specialised unit of the Central Reserve Police Force of India proficient in guerrilla tactics and jungle warfare.) पुन्हा एकदा भारताच्या शांततेतऐक्यात बाधा आणणाऱ्या अतिरेकी आणि नक्षलांचा त्यांना बिमोड करायचा आहेत्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या किर्ती चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

सर तुम्ही एका वेगळ्या उंचीवर आहातअंगावर गोळ्या झेलून सुद्धा पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षितेसाठी पुन्हा एकदा आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तुमची वृत्ती शब्दांपलीकडची आहेआम्ही भारतीय करंटे आहोत कारण अश्या लोकांच्या कर्तृत्वाची जाणीव  आम्हाला कधी होते ना आम्ही असं काही वाचण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा ह्या मातीसाठीदेशासाठीतिरंग्यासाठी आपलं सर्वस्व देणारे शूरवीर सैनिक आपलं काम शांतपणे करत असताततुमच्या पराक्रमाला ह्या भारतीयाचा  कडक सॅल्यूट आणि जाता जाता ह्या ओळी तुमच्यासाठी....

तेरी गलियों में चलाकर नफ़रतों की गोलियां
लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां
लुट रहे है आप वो अपने घरों को लूट कर
खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां
हम जिऐंगे और मरेंगे  वतन तेरे लिए  

दिल दिया है जां भी देंगे  वतन तेरे लिए......... 

जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.