Monday, 27 April 2020

काय करू?... विनीत वर्तक ©

काय करू?... विनीत वर्तक ©

घड्याळाच्या काट्यावर प्रत्येक सेकंदाच गणित मांडणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकाला अचानक मिळालेल्या जवळपास महिन्यांच्या ब्रेक मुळे आता काय करूअसा प्रश्न निर्माण झाला आहेआधी मज्जा वाटणारा हा काळ जवळपास प्रत्येकाला कुठेतरी नकोसा झाला आहेप्रत्येकाच्या मनात सलत असलेला काय करूहा प्रश्न आता मानसिक रोगात रूपांतर व्हायला सुरवात झालेली आहेएकेकाळी तणावडेडलाईनबॉस चं प्रेशरप्रेझेंटेशन ते आजचा गल्ला कितीआणि आजचा दिवस सुटला असं म्हणत एकएक दिवस काढणारे आपण सगळेच ह्या अचानक लागलेल्या ब्रेकमुळे एका वेगळ्याच तणावाखालून जात आहोत.

जसजशी आपली प्रगती होतं गेलीतसतसं आपण अजून अजून स्वतःला जुंपवत गेलोजास्ती पैसाजास्त समृद्धीजास्त समाधान ते सगळचं जास्त मिळवण्याच्या नादात आपण उर फुटेस्तोवर धावत सुटलोह्या धावण्याच्या शर्यतीत आपण धडपडलोवेळ प्रसंगी लागलं सुद्धाकाहींना आपण मागे टाकलं तर काहींनी आपल्याला पण आपण धावणं सोडलं नव्हतंकधीतरी एक दिवस माझा असेल ह्याच आशेवर एका नवीन समृद्ध भविष्यासाठी बस पळत राहिलोत्याची इतकी सवय आपल्याला झाली की सुट्टीचा एक दिवस पण आपल्याला गमावणं काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटायलं लागलंसुट्टीचा तो काळ ही आपण जिकंलेल्या समाधानाचं कौतुक म्हणून कधी लोकांना दाखवण्यासाठी तर कधी आपल्या कुटुंबाला दिलेल्या कमी वेळेची कसर भरून काढण्यासाठी तर कधी स्वतःच समाधान शोधण्यासाठी वेगळ्या देशात अथवा आपल्याच देशात पिकनिक आणि रिसॉर्ट ला जाऊन दारू पिऊन किंवा धमाल करण्यात आपलं सुख मानायला लागलोपण ह्या सगळ्यात आपल्या आवडीनिवडी आणि छंद ह्या शर्यतीत लुप्त झाल्या.

जगाच्या धावण्याच्या शर्यतीत इतका मोठा अडथळा येईल असा विचार  आपण कधी केला होता  जगातील कोणत्या तत्ववेत्याने केला होतादोन जागतिक महायुद्ध झाली तरी जगात शर्यत कधीच थांबली नव्हतीत्यामुळे अशी काही अडचण उभी राहील ज्याच्यामुळे पूर्ण जगाला इच्छा नसताना ही शर्यत थांबायला लागेल ह्या परिस्थितीसाठी कोणीच तयार नव्हतंअचानक ब्रेक लागलासुरवातीचा काळ जे झालं ते छान वाटलं कदाचित दोनचार दिवसपण जेव्हा ह्याचा परीणाम आपल्या सुखाच्या कल्पनेवरपण झाला आहे हे लक्षात जसंजस यायला लागलं तसतसं ह्या अडथळ्यामुळे आपण काय गमावलं ह्याचा अंदाज यायला सुरवात झालीदिवस वाढत होते पण कधी हे चक्र संपेल ह्याची शाश्वती येतं नव्हतीदारू  मिळाल्यावर दारुड्या ची जी अवस्था होते ती आपली हळूहळू का होईना व्हायला सुरवात झालीआधी काहीतरी कमी असल्याची भावना मग कधी संपणार हेह्याचे विचारमग अस्वस्थता आणि चिडचिडत्याच प्रतिबिंब आपल्या नात्यात आणि सोशल मिडियावर उघडपणे दिसायला लागलंकारण आपण आपल्याच वेळेचं काय करायचं ह्याच नियोजन कायविचारच कधी केला नव्हता.

आपल्या आवडी निवडीआपले छंदआपल्या मुड बदलणाऱ्या गोष्टी आपण कधी जोपासल्या नव्हताकित्येक वर्षात आपण आपल्याच गोष्टींचा शोध घ्यायला विसरून गेलो होतोसतत विविध माणसात वावरणारे आपण एकटेपणाला आणि एकाच ठिकाणी रहायला विसरून गेलो होतोपक्ष्याप्रमाणे आकाशात विहाराची स्वप्न बघणारे आपण हे विसरून गेलो की उडणारा तो पक्षी पण सतत उडत नसतोत्याच्या उडण्यावर पण मर्यादा असतातबराच काळ तो पक्षी आपलं घरटं बनवण्यात तर अन्न शोधण्यात त्याचा काळ व्यतीत करतोपण मानवाला अजून एक भूक असते ती मानसिक सुखाचीजी आजवर तो ह्या शर्यतीत विसरून गेला होता किंबहुना त्याची भूक त्या शर्यतीत भागत होतीपण अचानक शर्यत थांबल्यावर त्या भुकेला कसं भागवायचं ह्याचा नकळत तणाव यायला लागलाकारण ती भुक शमवणाऱ्या गोष्टी आपण जोपासल्याच नव्हत्याआता एका दिवसात त्या निर्माण करता येतील अशी ही परिस्थिती नाही.

चित्रकला आवडते म्हणून एकाच दिवशी चित्र काढायला सुरवात केली तर त्यात समाधान  मिळते असं नसतेत्याला पण सराव लागतोजेव्हा सराव करू तेव्हा गोडी निर्माण होते आणि एकदा गोडी निर्माण झाली की ती जोपासायची असतेहेच सगळ्याच आवडीत आणि समाधानात लागू आहेअचानक एके दिवशी उठून तुम्ही लिहायला लागला तर कदाचित एखादा लेख लिहाल ही पण पुढल्या लेखाला आता काय लिहूहा प्रश्न समोर आला की आपल्या आवडीचा आपल्याला त्रास होईलकारण असं सगळं एकदम इन्स्टंट होतं नसतेप्रत्येक गोष्टी मग त्या आपल्या आवडीनिवडीछंद का नसोत प्रत्येकाला जोपासावं लागतेत्यातल सार जाणवायला कधी कधी वर्ष जावं लागतेपाण्यात उडी मारली की पोहायला शिकता येते पण जर पोहण्याची मज्जा घ्यायची असते तर त्या पाण्यात अनेकवेळा उड्या मारायच्या असतातहेच सूत्र आपल्या समाधानाला आणि आपल्या छंदाला लागू आहे.

ह्या शर्यतीत आपण आपले छंद कधी जोपासले नाहीतवेळ येईल तेव्हा बघू असं करत आणि आपल्याला आवडते मग कायअसा विचार करत त्याला अडगळीत टाकत राहिलोअचानक जेव्हा आठवण झाली तेव्हा हे छंद आपण बाहेर काढले पण त्यातही काही हाताशी लागतं नाही बघून आपल्यासमोर तोच प्रश्न उभा राहिला काय करूह्या काय करूला जर बाजूला काढायचं असेल तर आपले छंद जोपासायला लागा कदाचित हीच मोठी शिकवण ह्या अडथळ्याने दिली आहेकारण आपण ते जोपासले की धावणाच्या शर्यतीत ही ते आपल्याला ऊर्जा देतं राहतातएक वेळ अशी येते की तुम्ही शर्यतीत भाग घ्या अथवा घेऊ नका पण ते नेहमीच तुम्हाला तो मानसिक आनंद आणि सुख देतातअसं होतं तेव्हा काय करूअसा प्रश्न उभा रहात नाही.    
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment