Saturday 18 April 2020

एका न्यायाधिशाची गोष्ट... विनीत वर्तक ©



एका न्यायाधिशाची गोष्ट... विनीत वर्तक ©
२३ ऑगस्ट २००७ साली जपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे भारताच्या दौऱ्यावर होतेभारतात येण्यापूर्वी एका भारतीय न्यायाधिशांच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीभारतीयांविषयी ओळख नसणाऱ्या भारतीय लोकांना जपान चा पंतप्रधान वेळ काढून एका विस्मरणात गेलेल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वेळ काढतो हे बुचकळ्यात टाकणारं होतंजपान च्या पंतप्रधानांनी सरळ कोलकत्ता गाठताना त्या न्यायाधिशांच्या मुलाची म्हणजेच प्रसांता पाल ह्यांची भेट घेतलीह्या भेटीत प्रसांता पाल ह्यांनी आपल्या वडीलांचे  जुने फोटो जपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे ह्यांना दिलेते बघून शिनझो ऍबे  काहीकाळ स्तब्ध झाले कारण ह्यातील दोन फोटोत प्रसांता पाल ह्यांच्या वडिलांसोबत शिनझो ऍबे ह्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे होतेगोष्ट इकडे संपत नाही तर सुरु होतेत्या फोटोत नोबुसुके किशी सोबत होते भारतीय वकील डॉक्टर राधाबिनोद पाल.

१२ नोव्हेंबर १९४८ चा तो दिवस होतादुसरं महायुद्ध संपल्यावर जिंकलेल्या राष्ट्रांनी जपान सरकार आणि तिथल्या नेत्यांविरुद्ध दुसऱ्या महायुद्धासाठी विरुद्ध आंतराष्ट्रीय खटला सुरु होता. International Military Tribunal for the Far East (IMTFE) ह्या माफर्त मित्र राष्ट्रांनी ११ आंतरराष्ट्रीय न्यायाधिशांची नेमणूक केली होतीह्यातील १० वकील जवळपास मित्र राष्ट्रातील होतेज्यात अमेरीकारशियाचीनऑस्ट्रेलियाकॅनडान्यूझिलंड वगरे देशांचा समावेश होताह्यातील एक न्यायधीश तरी आशिया खंडातील अश्या राष्ट्राचा असावा ज्याचं ह्यात काही हित नसेलकारण त्या शिवाय हा खटला निष्पक्ष पद्धतीने चालवला गेला हे जगासमोर मांडता आलं नसतंत्यासाठी आशिया खंडातील एकमेव असं राष्ट्र म्हणजेच भारतभारतातून डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना ह्या खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून निवडण्यात आलं.

डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांचा जन्म खरे तर पूर्व पाकीस्तान म्हणजेच ईस्ट बंगाल मध्ये १८८६ साली झालाअतिशय गरीब परीस्थितीत जन्माला आलेल्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना शिक्षणापासून ही वंचित रहावं लागलं होतंपण आपल्या हुशारीने त्यांनी शाळेत तर प्रवेश मिळवला आणि वकिली क्षेत्रात डॉक्टरकी ची पदवी मिळवलीटोकियो मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेलीतो काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा होतानुकताच कुठे भारत जगाच्या नकाशावर आपलं अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करत होताअश्या गरीबमागासलेल्या देशातून नावासाठी नेमलेल्या वकीलाला प्रगत राष्ट्रांनी वेगळ्या साध्या हॉटेल मध्ये जागा दिलीपण डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांनी नुसतं कागदी घोडं बनून राहणं नाकारलंजेव्हा ११ पैकी १० न्यायाधिशांनी जपान च्या ५५ लोकांना ज्यात खुद्द तत्कालीन पंतप्रधान टोजो पण समाविष्ट होते त्यांना दोषी ठरवलं तेव्हा एकच आवाज त्या टोकियो च्या कोर्टात गरजलातो आवाज म्हणजेच डॉक्टर राधाबिनोद पाल.

टोकियो खटल्या मध्ये जपान च्या नेत्यांवर तीन प्रकारच्या केसेस लावण्यात आल्या होत्याकेस  मध्ये असणाऱ्या गुन्हेगारांना युद्धाला सुरवात करण्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं  ह्यात कमीत कमी शिक्षेची तरतूद ही देहदंडाची होतीकेस बी आणि केस सी मधील गुन्हेगारांना युद्धातील गुन्हे आणि माणुसकीच्या विरुद्ध कार्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतंह्या खटल्याचा निकाल काय लागणार ते सर्वांनीच गृहीत धरलं होतंपण त्यांच्या ह्या मानसिकतेला छेद दिला तो डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांनीआपल्या १२३५ पानांच्या युक्तिवादात त्यांनी निक्षून सांगितलं की जर जपानी लोक गुन्हेगार असतील तर हे युद्ध जपानवर लादण्यासाठी अमेरीका सुद्धा तितकीच जबाबदार आहेजर जपान च्या लोकांना निर्दोष व्यक्तींच्या खुनासाठी जबाबदार धरण्यात आलं असेल तर जपान युद्धबंदी करत असताना सुद्धा  लाख लोकांचे प्राण घेणाऱ्या अणुबॉम्ब स्फोटासाठी अमेरीकन राज्यकर्त्यांना दोषी ठरवलं जायला हवंत्यांच्या ह्या युक्तीवादाला इतर न्यायाधिशांना डावलता आलं नाहीत्यामुळे केस  मधील अनेक जपानी लोकांना केस बी आणि केस सी मध्ये टाकण्यात आलंआपल्या सखोल अभ्यासाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी जपान ची बाजू निरपेक्षपणे उचलून धरली.

जेव्हा पूर्ण जग जपान ला दोषी मानत होतं तेव्हा एका भारतीय वकीलाने पूर्ण जगापुढे जपान ची बाजू घेताना भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवलाजपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे ह्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे ही ह्या खटल्यात गुन्हेगार ठरवले गेले होतेनेहमीप्रमाणे आपल्याच लोकांची कदर  करणारे भारतीय काळाच्या ओघात त्यांना विसरून गेलेपण जपान त्यांना विसरला नाही१९६६ साली जपानचे राजे हिरोहितो ह्यांनी जपान च्या नागरी पुरस्कार ' Order of the Sacred Treasure' ने त्यांचा गौरव केला गेला१९६७ ला त्यांच्या मृत्यूनंतर टोकियो मध्ये त्यांचं स्मारक उभारलं गेलंजवळपास ६० वर्षानंतर ही जपानचे पंतप्रधान आठवण ठेवून आपल्या आजोबांना,जपानी लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचवणाऱ्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना विसरले नाहीत२००७ साली खास वेळ काढून त्यांनी त्यांचे पुत्र प्रसांता पाल ह्यांची भेट घेतली आणि जपानच्या जनतेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांचे पुन्हा एकदा आभार मानले.

एक भारतीय न्यायाधीश जगातील १० न्यायाधिशांच्या युक्तीवादाला पुरून उरतोआपल्या युक्तीवादाने पूर्ण खटल्याचं चित्र पालटतो आणि एक देश त्यांच्या युक्तीवादाला जगापुढे आजही अभिमानाने मांडतोत्यांच्या स्मृतीला वंदन करतोपण ज्या देशातून ते आले त्या देशातील लोकांनाच त्यांच्या कार्याची माहिती नसतेआमच्या देशात दुसऱ्या देशाने सांगितल्यावर आपल्याच माणसांची जाणीव होतेअश्या देशातील लोकांन कडून डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांच कर्तृत्व माहिती असण्याची शक्यता नाहीएका भारतीय न्यायधिशाने आपल्या अभ्यासातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जी कामगिरी केली आहे त्याला शब्दात मांडता येणं अशक्य आहेअश्या महान न्यायधिशांच्या स्मृतीस त्रिवार वंदन आणि डॉक्टर राधाबिनोद पाल तुम्ही नेहमीच भारत आणि जपान ह्या दोन्ही देशातील संबंधान मधील एक दुवा रहालपुन्हा एकदा तुमच्या स्मृतीला माझं वंदन आणि साष्टांग नमस्कार.

जय हिंद!!!...

फोटो स्रोत :- गुगल      

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. विनीतजी मला तुमची पोस्ट खूप आवडली कारण मी स्वतः गेले २५ वर्षे माझ्या निव्रत्ती वेतन मधील त्रुटी वर तात्विक मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकार आणि मी जिथून सेवानिवृत्त झालो ते खाते सीमा सुरक्षा बल यांच्या विरुद्ध एकटा लढाई देत आहे. मला खात्री आहे की मी विजय मिळवीन. मी माझ्या केसबद्दल पुस्तक लिहिले आहे. " The Judgement & The Justice" मी पण ब्लॉग लिहितो. पत्ता आहे - www.swamimhane.bogsopt.com

    ReplyDelete