Sunday 19 April 2020

आयुष्य जगायचं असतं... विनीत वर्तक ©

आयुष्य जगायचं असतं... विनीत वर्तक ©

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया

हे गाणं ज्याने पडद्यावर साकारलं त्या देव आनंद ने सिमी गरेवाल च्या एका कार्यक्रमात आपल्या ८० वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगताना खूप मस्त म्हंटल आहे.

'आज जरी मृत्यू समोर आला तरी त्याला मी स्वीकारेनएक दिवस सगळ्यांना जायचं आहेजेव्हा जायचच आहे तेव्हा घाबरायचं कशाला?. तुम्ही ३० वर्षाचे असा वा ५० वर्षाचे किंवा ८० वर्षाचेतुम्ही समाजाला काय परत देता ह्यावर तुमची व्हॅल्यू अवलंबून आहेतुम्ही दुःखात थांबू नकात्याच ओझं घेऊन आयुष्य जगू नकाती ओझी मागे ठेवा आणि आयुष्य जगा.'

जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया......

आज पूर्ण विश्व अश्या एका अस्थिरतेच्या टोकावर उभं आहे की जिकडे पुढे काय होईलह्या भितीने सगळ्यांना ग्रासलं आहेआजचा दिवस गेला पण उद्या कायह्याच उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही आहेजगाच्या आर्थिक स्थितीचं अनुमान करणाऱ्या संस्था असो वा ग्रहांवरून भविष्य सांगणारे ज्योतिषी आज सगळेच निरुत्तर आहेतज्या वेगाने आपण धावत होतो त्या वेगाला आज असा काही ब्रेक लागला आहे की पुन्हा पुढचा प्रवास करू शकू का नाही ही खात्री आज कोणीच देऊ शकत नाहीपण ह्या काळातच निसर्गाने आपल्याला पुन्हा एकदा मागे वळून बघण्याची संधी दिली आहे असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाहीआज धावता धावता आपण खूप काही गोष्टी मागे ठेवून आलो आहोतआज त्याच गोष्टी पुन्हा एकदा आठवणींच्या कप्यातून आयुष्यात आणण्याची ही संधी सगळ्यांना निसर्गाने दिली आहेत्या संधीला आपण कसं घ्यायचं हे मात्र आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचं आहे.

बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया....

आज दोन वेळचं अन्न मिळते आहेपण उद्या कोणी बघितला आहेनोकरीधंदाव्यवसायशेती सगळ्यावर अनिश्चितीचं सावट आहेपण हा प्रश्न फक्त आपल्या एकट्याचा नाही आहेआज पूर्ण जग त्याच मार्गाने जातं आहेज्या मार्गावर आपला प्रवास सुरु आहेप्रत्येकाची तिव्रता नक्कीच वेगळी असू शकेलप्रत्येकाची अडचण नक्कीच वेगळी असू शकेल पण आज कोणीच त्यातून सावरलेलं नाही हे सत्य आहेपण ह्या सगळ्यात एक अशी ही जमेची बाजू आहे की आपण आपल्याच माणसांना भेटलो आहोतआज त्यांनाच कुठेतरी समजून घेतो आहोतआज आपल्याच मुलांसोबत वेळ घालवतो आहोतआजूबाजूला बघितलं तर अनेकांना हे पण नशिबी नाही जे दुसऱ्या शहरातदुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात अडकलेले आहेतघरघुती भांडण वाढली की प्रेम ह्याची बॅलन्स शीट मांडली तर प्रेमाची बाजू वरचढ आहे ह्याबद्दल दुमत नसेल.

ग़म और खुशी में फ़र्क  महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया.....

लॉकडाऊन कधी संपेल हे कोणालाच सांगता येणार नाहीअजूनही ह्या विषाणूला थोपवण्यासाठी औषध सापडलेलं नाहीहा विषाणू सतत आपले रंग बदलतो आहेचीन चा कोरोना वेगळा आणि भारताचा कोरोना वेगळा अशी स्थिती आहेत्यामुळे लॉकडाऊन हे फक्त त्याचा संक्रमण वेग कमी करण्यासाठी आहेजोवर त्याच्यावर औषध अथवा त्याला रोखण्याची लस येतं नाही तोवर ही लढाई आपल्याला लढायची आहेस्वतःचा त्रासरागकिंवा चिडचिड करून जे सत्य आहे ते बदलणारं नाहीहा काळ पण आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि तो जगण्याची ताकद आपल्याला आपल्यातच निर्माण करायची आहेती कशीकधीकोणत्या मार्गानेहे ज्याचं त्याने ठरवायचं आहेकारण थांबला तो संपलाआयुष्य थांबवायचं नाही तर जगायचं आहेतेव्हा,

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया...

ह्यात धुँएं में  म्हणजे विडीसिगरेट हे अभिप्रेत नाही तर आपल्या चिंताकाळजी बाजूला ठेऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच आनंदाने सामोर जाही वेळ पण जाईलजेव्हा एक नवीन सकाळ होईल तेव्हा आपण सगळेच त्याचा आनंद घेण्यासाठी तयार असूतोवर घरी रहासुरक्षित रहाआपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घ्याआयुष्य जगायला शिका..

चिअर्स.....   


सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment