Saturday 11 April 2020

पूर्णब्रह्म... विनीत वर्तक ©

पूर्णब्रह्म... विनीत वर्तक ©
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते नाम घेता फुकाचे 
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म 
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...

हा श्लोक म्हणून मधल्या सुट्टीत आईने दिलेला खाऊचा डब्बा उघडला जायचाआजही अनेक घरात हा श्लोक जेवणाच्या आधी म्हंटला जातोविदेशी संस्कृतीच्या आक्रमणात हे श्लोक म्हणणं जसं गावठी ठरू लागलं तसं आपलं मराठमोळं जेवण ही गावठी ह्या स्वरूपात नवीन पिढीने उचलेलं आहेरशियन सॅलडइटालियन पिझा आणि अमेरीकन फेंच फ्राईज च्या जमान्यात कोणी आज पुरणपोळी केली तर त्याच्याकडे आज हे कायअसं म्हणून बघितलं जातेभारतीय जेवणाची आठवण सर्वात जास्ती तेव्हा होते जेव्हा आपण आपला देशप्रांत सोडून एका दुसऱ्या देशात रहात असतोतेव्हा पिझाबर्गरफ्राईज ह्या अतिशय आवडणाऱ्या गोष्टी अक्षरशः डोक्यात जातातएकवेळ उपाशी राहू पण ते नको अशी वेळ जेव्हा येते तेव्हा त्या घरच्या साध्या वरण भाताची चव पण अमृता सारखी वाटायला लागते.

कोणी किती ही म्हणो पण घरचं जेवण ते घरचं असतेजयंती कठाळे अश्याच एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्यामोठं कुटुंब असणाऱ्या त्यांच्या घरात नेहमीच लोकांचा राबता होतात्यामुळे घराच्या स्वयंपाकघरात स्त्रियांची उठबस ही नेहमीची ठरलेली असायचीअगदी लहानपणापासून जेवणाचं बाळकडू त्या आपल्या आजी कडून शिकल्याघराला घरपण देणारी माणसं असतात तशी जेवणाला चव यायला पण हाताला चव शिकावी लागतेहा मंत्र त्यांनी  लहानपणी आत्मसात केलापुढे शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑस्ट्रेलियात गेल्यावर घरच्या जेवणाची चव कुठेतरी त्या शोधत होत्याबाहेरचं खाण त्यांना कुठेतरी अस्वस्थ करत होतंआपली ही अवस्था त्यांनी आपल्या मैत्रिणींना सांगितली आणि जवळपास सगळ्यांच्या व्यथा ह्या एकच होत्याघरचं जेवण कितीही आवडत असलं तरी ते बनवणार कोण?

ह्याला उपाय म्हणून हे शिवधनुष्य त्यांनी स्वतः उचललंजयंती कठाळे ह्यांनी ऑस्ट्रेलियात मोदक बनवून आपल्या मैत्रिणींना दिलेतशी जाहिरात ही त्यांनी ऑर्कुट वर त्याकाळी टाकली होतीगणपतीच्या आवडत्या मोदकापासून सुरु झालेला हा प्रवास भारतात आल्यावर ही त्यांनी सुरु ठेवलाबंगळुरू इकडे इन्फोसिस मध्ये काम करत असताना सणांच्या दिवशी आपले मराठमोळे पदार्थ त्यांनी लोकांची ऑर्डर घेऊन त्यांना द्यायला सुरवात केलीसगळ्याच वेळी पैसे कमावणं हे उद्दिष्ट नसतेआपण जिथून आलो त्या मराठमोळ्या जेवणाची चव ही पोहे आणि वडा पाव पुरती मर्यादित नाहीहा विचार त्यांना त्या नवीन ठिकाणी रुजवायचा होताआधी आवड म्हणून सुरु झालेला प्रवास आता मोठा होतं होताजवळपास  वर्ष महाराष्टातील खाण्याचापदार्थांचा आणि लोकांच्या आवडी निवडीचा अभ्यास करून त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणी कडून मदत घेऊन एका गॅरेज मध्ये त्यांनी मराठमोळ्या खाण्याची एक खानावळ सुरु केली.

महिला उद्योजकांना पुढे येण्यासाठी बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचा फायदा घेतं त्यांनी आपलं पहिलं हॉटेल 'पूर्णब्रह्मह्या नावाने HSR Layout बंगळुरू इकडे सुरु केलंआवड म्हणून जेवण बनवणं ते मराठी खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्याव्यवसायाची सुरवात निराशेत झालीहे हॉटेल उभं करण्यासाठी त्यांनी आपले किमती दागिने विकले होतेबँकेचं कर्ज घेतलं होतंशिवाय काम करणाऱ्या लोकांचे पगार द्यावे लागत होतेकुठेतरी सगळच हातातून निसटते आहे की कायअशी वेळ आली होतीअश्यावेळी आपल्याला साथ लागते ती आपल्या जोडीदाराचीआपल्या कुटुंबाचीअश्या कठीण परीस्थितीत त्यांचा जोडीदारत्यांचा मुलगा आणि कुटुंबीय कणखरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

'जीवन में समस्याएं तो हर दिन नयी खड़ी हैंजीत जाते हैं वो जिनकी सोच बड़ी हैं'...

जयंती कठाळे सचोटीने आपलं काम करत राहिल्याग्राहक राजा असतोएकदा राजा ला चव आवडली की ती प्रजेला आवडायला वेळ लागत नाहीत्याप्रमाणे पूर्णब्रह्म हे नाव बंगळुरू मध्ये प्रसिद्ध झालंहॉटेल सुरु करतानाच काही गोष्टी त्यांनी वेगळ्या केल्या होत्याहॉटेल मधील जवळपास ७०स्टाफ हा महिला होत्याहॉटेल मध्ये बसण्याची व्यवस्था ही जमीनीवर खाली बसून जेवण्याची केलीताटात अन्न ठेवणाऱ्या ग्राहकाला बिलावर अधिभार लावला जातो तर अन्न पूर्ण संपवणाऱ्या ग्राहकाला बिलात सूट दिली जातेह्या आणि अश्या अनेक आउट ऑफ  बॉक्स गोष्टी त्यांनी आपल्या हॉटेल मध्ये सुरु केल्या.

"मैं अकेला ही चला था..मगर लोग आते गए और कारवां बनता गया"....

पूर्णब्रह्म च्या नावाची पताका आता बंगलोर सोडून मुंबईपुणेअमरावती ते लंडनअमेरीका आणि ऑस्ट्रेलिया  इथपर्यंत जाऊन पोहचली आहेएक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते एक उद्योजिका हा प्रवास जयंती कठाळे ह्यांच्यासाठी सोप्पा नव्हताच वेळप्रसंगी आपल्या मुलाकडे होणार दुर्लक्षकुटुंबासाठी कमी दिलेला वेळ ह्या सगळ्या पडद्यामागच्या गोष्टी त्यांनाच माहितत्यांच्या मते आता तर प्रवास सुरु झालेला आहेपूर्णब्रह्म ची जवळपास ५००० आउटलेट भारतात उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहेमॅकडोनाल्ड आणि पिझ्झा हट च्या दाराशी जंक फूड खाण्यासाठी रांगा लावणाऱ्या भारतीयांना घरच्या चवीचं 'पूर्णब्रह्मअसणारं मराठी पद्धतीच्या जेवणाकडे त्यांना वळवायच आहेत्यांचा हा प्रवास सगळ्याच स्त्रियांना आदर्शवत तर आहेच पण एक स्री ठरवल्यावर अटकेपार पण झेंडे रोवू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहेत्यांच्या ह्या प्रवासाला माझा कुर्निसात आणि पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा....

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment