Wednesday, 15 April 2020

तिचं आकाशचं वेगळं... विनीत वर्तक ©

तिचं आकाशचं वेगळं... विनीत वर्तक  ©

आज परछांई से पूछ ही लिया,
क्यों चलती हो....... मेरे साथ!
उसने भी हंसके कहा,
और कौन हे...... तेरे साथ!!

आयुष्याच्या प्रवासात अशी अनेक वळण येतात की जिकडे  संपणारा एक प्रवास सुरु होतोजिकडे आवडो अथवा  आवडो आपल्याला मार्गक्रमण करत रहावं लागतेअश्याच एखाद्या वळणावर एकटीने प्रवास करणं म्हणजे आपल्या मानसिक आणि शारीरीक क्षमतांची एक परीक्षा असतेपुरुषासाठी असं एकला चालो रे त्या मानाने सोप्पा प्रवास असतोनक्कीच एकटेपणाची भावना त्या निमित्ताने निर्माण होणारी पोकळी मग ती शारीरीक असेल वा भावनिक ती नक्कीच खूप मोठी असते पण तरीसुद्धा समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन मात्र फारसा बदलत नाहीस्री च्या बाबतीत हा सगळ्यात मोठा बदल असतोआपलच कुटुंबआपलीच माणसं आणि ज्या समाजाचा आपण भाग आहोत तो समाज ज्या पद्धतीने तिच्याकडे बघतो त्याच ओझं खूप मोठं असते.

आयुष्यात जोडीदार किंवा साथीदार नसलेल्या स्रीकडे समाज नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून बघतोतिला आधार द्यायला येणारे अनेक खांदे अनेकदा फक्त शारीरीक आधाराची गरज भागवायला येतात हे कटू सत्य घेऊन तिला प्रत्येक नात्याकडे बघावं लागतेमग तो मित्र असोऑफिस मधील कलीग असो वा शेजारी असोभावनिक आधार देणारे खांदे पण फक्त सिमारेषेच्या पलीकडून मी तुझ्यासोबत आहे असं सांगत असतातअर्थात त्यात कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे परीस्थितीवर अवलंबून असते हे नाकारता येणार नाही.

आयुष्यात अचानक आलेल्या वादळाने आपल्या जोडीदाराचा सुटलेला हात अथवा आयुष्याच्या संसाररुपी गाड्याच रूतलेलं चाक काढताना अनेकदा काही कठोर निर्णय घ्यावे लागतातहे निर्णय घेणं तितकं सोप्प नसते पण त्यापेक्षा कठीण असतो त्या गाड्याशिवाय सुरु होणारा प्रवासप्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची एक लढाईही लढाई घरात असो वा बाहेरघरच्यांच्या सोबत असो वा बाहेरच्यांच्या सोबत पण सगळीकडे तिलाच सेनापती बनून सगळ्यात पुढे रहावं लागतेतिकडे ही धडपडल्यावरपडल्यावरलागल्यावर तिचं तिलाच उभं राहायचं असते आणि पुन्हा एकदा सुरवात करायची असतेह्या सगळ्या लढाईत मदत करायला येणारे अनेक हात असतातकाही खरोखर मदतीसाठी येणारे तर काही तिचा फायदा घ्यायला येणारेह्यात नक्की कोणाचा हात पकडायचा ह्यावर पुढल्या लढाईच भवितव्य ठरलेलं असतेकारण यशस्वी झाली तरी श्रेय त्या हाताचं आणि अपयश आलं तर ते त्या लढणाऱ्या स्री  हे समाजाने आधीच ठरवून टाकलेलं असते.

सकाळी घड्याळाच्या काट्यावर घर ते नोकरी / व्यवसाय सांभाळून पुन्हा एकदा घराकडे येणाऱ्या तिला एक कप चहा करून देणारं कोणी नसते ना कोणी असते ज्याच्यासोबत ती आपला चहा शेअर करू शकेलतिच्या घरात येणाऱ्या प्रत्येक पुरुषावर घरच्यांचीसमाजाची अशी काही नजर असते की तिच्या व्यक्तिमत्वाला लेबल देण्याचं कंत्राट त्यांनाच मिळालेलं आहेएकटी स्री मग ती एकटी असो वा एकटी आई असो वा एकटी सारथ्य करणारी असो तिला प्रत्येक क्षणाला सिद्ध करत रहावं लागतेकोणी म्हणेल की सिद्ध करण्याची गरज नसते पण ज्याचं जळते त्यालाच कळतेआपल्या पासून सुरु होणारा आपल्या समाजाचा दृष्टिकोन इतकाही प्रगल्भ नाही ज्याचे आपण दाखले देतो.

अश्या वेगळ्या आकाशाला आपलं स्वप्न बनवून ते जगणाऱ्या स्त्रीया वेगळ्याचकधीतरी आपण स्वतःला तिकडे ठेवून की समोर असणाऱ्या अडचणींचा पाढा बघून आपण मागे फिरूअश्या कठीण प्रवासात सुद्धा आपलं अस्तित्व दाखवत त्या वेगळ्या आकाशात इंद्रधून साकारणाऱ्या त्या अनामिक स्त्रियांना आजची पोस्ट समर्पित.


सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment