Wednesday, 22 April 2020

बेनू... विनीत वर्तक ©

बेनू... विनीत वर्तक ©

बेनू हे नाव ऐकताचं आपण बुचकळ्यात पडूबेनू असं विचित्र नाव पृथ्वीवरील कोणाचं नाही तर ते आहे पृथ्वीपासून साधारण १३० मिलियन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका लघुग्रहाचहा लघुग्रह सध्या चर्चेत आला आहे तो नासाच्या एका मोहिमेमुळेबेनू  खरं नाव आहे १०१९५५ बेनूहा लघुग्रह अपोलो ग्रुप मधील असून ह्याचा व्यास ४९२ मीटर (+/- १० मीटरइतका आहेम्हणजेच साधारण एम्पायर स्टेट बिल्डींग च्या उंचीचाह्या बेनूला मानवाने ११ सप्टेंबर १९९९ ला शोधलंबेनू खरं तर पी.एच..आहेम्हणजे पोटेंशीयली हझार्डस ऑब्जेक्टह्याचा अर्थ होतो की ज्या पासून पृथ्वीला धोका आहेह्या ऑब्जेक्ट ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता साधारण ( २१७५ ते २१९९ च्या दरम्यान ) आहे किंवा पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहेह्यांच्या ठरलेल्या रस्त्यातील बदल पृथ्वीशी थेट भेट घडवून ही आणू शकतीलही भेट पृथ्वीवरील सगळ्या सजीवांचा अथवा प्राणिमात्रांचा अंशतः नष्ट करण्यास सक्षम असेल. ( ह्याच्या टक्करी मधून निर्माण होणारी शक्ती साधारण ७६,००० पट हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्ब पेक्षा जास्ती असेल. )

हा बेनू चर्चेत आला आहे तो नासा च्या ओसायरीसरेक्स ह्या मोहिमेमुळे सप्टेंबर २०१६ साली नासाने ह्या बेनू वर ओसायरीसरेक्स ह्या नावाच यान पाठवलं आहेओसायरीसरेक्स चा अर्थ आहे (Origins, Spectral Interpretation, Resource Identification, Security, Regolith Explorer)  सप्टेंबर २०१६ साली उडालेल्या यान आता बेनू च्या जवळ जाऊन पोहचलेलं आहेह्याचा मुख्य उद्देश आहे बेनू वरील काही दगडमातीचे नमुने पुन्हा पृथ्वीवर घेऊन परतणार आहेओसायरीसरेक्स वर थ्री डी मॅपिंगथर्मल स्पेक्ट्रोमीटर आहेह्यावर Touch-And-Go Sample Acquisition Mechanism (TAGSAM) नावाच उपकरण म्हणजेच एक रोबोटिक आर्म आहेह्या आर्म मध्ये नायट्रोजन गॅस चा वापर करून ह्या बेनू वरील दगड मातीचा धुराळा उडवला जाणार आहेह्याच धुराळ्यात उडालेली दगडमाती एका पेटीत बंद करून ती पृथ्वीवर अभ्यासासाठी आणली जाणार आहेह्यावर तीन वेळा असा धुराळा उडवता येईल इतका नायट्रोजन गॅस उपलब्ध आहेह्यातून साधारण साखरेच्या ३० पॅकेट इतकी धूळ माती पृथ्वीवर आणली जाणार आहेइथल्या मातीचे नमुने घेऊन हे यान २०२१ ला पुन्हा आपला परतीचा प्रवास पृथ्वीच्या दिशेने सुरु करणार असून दोन वर्ष प्रवास केल्यावर २४ सप्टेंबर २०२३ साली उतेह वाळवंटात उतरणार आहेह्या यानाने आणलेली माती वैज्ञानिक अभ्यासासाठी संशोधकांना जॉन्सन स्पेस सेंटरह्युस्टनटेक्सासअमेरीका इकडे उपलब्ध होणार आहे.

आपल्या विश्वात आपल्याला ज्ञात असलेल्या ,८०,००० लघुग्रहांन मधून बेनूच कातर ह्यामागे काही कारणे आहेतबेनूची कक्षा पृथ्वीच्या जवळ आहेती पृथ्वीच्या कक्षेला छेदून पण जातेत्यामुळे प्रत्येक  वर्षांनी बेनू पृथ्वीच्या जवळ येतोअसे छोटे ग्रह त्यांच्या लहान आकारामुळे खूप वेगात स्वतःभोवती फिरत असतातबेनू आकाराने मोठा असल्याने स्वतःभोवती फिरायला वेळ घेतोत्याची एक प्रदक्षिणा साधारण . तासात पूर्ण होतेह्यामुळे ओसायरीसरेक्स ह्या यानाला त्याच्या कक्षेशी जुळवून घेता येणार आहेबेनू २१३५ साली पृथ्वीपासून अगदी चंद्रापेक्षा कमी अंतरावर असणार आहेह्या शिवाय २१७५ आणि २१९५ साली अजून जास्ती जवळून त्याचा प्रवास अपेक्षित आहेत्या शिवाय हा लघुग्रह अतिशय जुना आहेज्याकाळी आपली सौरमाला अतित्वात आलीबेनू हा एखाद्या रेड जायंट ताऱ्याचा अथवा सुपरनोव्हा चा अंश असावा ह्यावर असलेल मटेरियल जवळपास . बिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेलं आहेजे की आपल्या सौरमालेच वय आहेबेनू च्या दगड माती च्या अभ्यासातून जर त्यात सजीवांची निर्मिती करणाऱ्या गोष्टींच अस्तित्व सापडलं तर ह्याचा अर्थ पूर्ण विश्वात अनेक ठिकाणी सजीवांची उत्पत्ती शक्य असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहेह्यावरील मटेरियल हे कार्बन संयुगानी युक्त आहेह्यावर ऑरगॅनिक मॉलिक्यूलप्लॅटेनियम धातू किंवा पाण्याचे अंश असण्याची पण शक्यता आहेबेनू च्या अभ्यासामुळे त्याची कक्षा अजून अचूकतेने आपल्याला ठरवता येणार आहेतसेच बेनू सारखा लघुग्रह आपल्या सौरमालेत कसा अडकलाह्या प्रश्नांची उत्तर मिळण्यास मदत होणार आहेनासाची ही मोहीम जवळपास ९८३ मिलियन अमेरिकन डॉलर ची आहे.

बेनू ला  किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा करणाऱ्या ओसायरीसरेक्स ने आपल्या २५ ऑगस्ट २०२० च्या कवायतीची रंगीत तालीम केलीगेल्या आठवड्यात नासा ने कमांड दिल्यावर ओसायरीसरेक्स आपली कक्षा सोडून बेनू च्या जमीनीकडे झेपावलंबेनू च्या जमीनीपासून जवळपास १२५ मीटर उंचीवर बेनू ने त्याला आखून दिलेल्या कमांडवर काम करताना स्वतःला पुढच्या कवायतीसाठी तयार केलंत्या नंतर एक मिनिटांनी बेनू च्या जमिनीपासून फक्त ७५ मीटर अंतरावर असताना त्याच्या (Touch-And-Go Sample Acquisition Mechanism (TAGSAM) आर्म ने बाहेर निघून सॅम्पल घेण्याची रंगीत तालीम केलीपुन्हा तो आर्म त्याच्या जागी परत गेलाह्यानंतर ओसायरीसरेक्स पुन्हा एकदा आपल्या  किलोमीटर च्या कक्षेत स्थानापन्न झालं.

मला ओसायरीसरेक्स ही नासाची मोहीम खूपच संस्मरणीय वाटत आहेएकतर इतक्या लहान आकाराच्या लघुग्रहावर आपलं यान कक्षेत स्थापन करण त्या नंतर त्याचा वर्षभर अभ्यास करून त्यावर एका प्रोब ला टचडाऊन करून त्या वरच्या दगडमातीच्या नमुन्यांना एका ठिकाणी बंदिस्त करून पुन्हा ते सगळं पृथ्वीवर अचूकतेने पाठवून ते व्यवस्थित उतरवणंहा सगळं विचार नुसता करून नाही तर हे सगळं प्रत्यक्षात आणणं हे खूप उच्च तंत्रज्ञानाच प्रतिक आहे२०२३ मध्ये ओसायरीसरेक्स चा भाग बेनू च्या पृष्ठभागावरील दगड मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरेल तेव्हा आपण विश्वाला . बिलियन वर्ष मागे जाऊन बघू शकणार आहोतही उपलब्धी एकूणच पूर्ण विश्वाच्या अभ्यासातील एक मैलाचा दगड ठरणार ह्यात शंका नाहीतूर्तास नासा च्या सर्वच अभियंते आणि वैज्ञानिक ज्यांनी हे स्वप्न बघितलं आणि सध्या निम्म पूर्ण केलं आहे त्यासाठी त्यांच्या कर्तुत्वाला माझा सलामविश्वाच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तर देण्यात बेनू एक महत्वाची निर्णायक भूमिका बजावणार आहे ह्यात शंका नाही.

फोटो स्रोत :- नासा , गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment