Tuesday 14 April 2020

स्वच्छता दूत डॉक्टर सुहास मापुस्कर... विनीत वर्तक ©

स्वच्छता दूत डॉक्टर सुहास मापुस्कर... विनीत वर्तक ©

इंद्रायणी काठी,
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची.....

ह्याच इंद्रायणी काठावर वसलेलं एक गाव म्हणजेच देहूज्ञानेश्वर माउलींच्या स्पर्शाने पुलकित झालेल्या देहू गावाची ५० वर्षापूर्वी अवस्था खूप वाईट होतीस्थानीय पातळीवर सरकारी डॉक्टर नसलेल्या ह्या गावात कोणताही डॉक्टर यायला घाबरत असेइकडे असलेल्या सरकारी हॉस्पिटल ची अवस्था तर भूत बंगला म्हणून गावात प्रसिद्ध होतीअश्या गावात ५० वर्षापूर्वी एका स्वच्छतेच्या दूताने प्रवेश केला आणि ह्या गावाचं स्वरूपच पालटून टाकलंसरकारी हॉस्पिटल ला टॉयलेट ची व्यवस्था नसलेलं गावं ते सामाजिक जाणिवेतून आपल्याच विष्ठेतून उर्जा निर्मिती करणारं गाव असा देहू चा कायापालट करणारे स्वच्छतेचे दूत होते डॉक्टर सुहास विठ्ठल मापुस्कर.

डॉक्टर ची पदवी हातात मिळाल्यावर एक तरुण डॉक्टर देहू गावात आलाहॉस्पिटल ची अवस्था इतकी भीषण होती की पहिल्याच दिवशी त्यांना हॉस्पिटलच्या व्हरांड्यात रात्र काढावी लागलीसकाळी उठून लक्षात आलं की गावात कुठेच टॉयलेट करायची व्यवस्था नाहीपूर्ण गाव बाजूच्या जंगलात संडास करण्यासाठी जात होतास्वछ्तेच व्रत घेऊन गावात आलेल्या त्या तरुण डॉक्टरने त्याच दिवशी प्रण केला की पुन्हा उघड्यावर शौचास / संडासला जाणार नाहीदुसऱ्याच दिवशी औषधांच्या खोक्यांच्या पुठ्याने एका संडासाची निर्मिती त्याने केलीहाच तो क्षण होता जेव्हा ह्या तरुण डॉक्टर ने म्हणजेच डॉक्टर मापुस्कर ह्यांनी पूर्ण गावाची सवय बदलण्याचा निश्चय केला.

डॉक्टर मापुस्करानां लवकरच लक्षात आलं की ज्या छोट्या मोठ्या आजारासाठी त्यांना बोलावलं जायचं त्या सगळ्याच मूळ हे गावात स्वच्छतेच्या प्रती असलेली अनास्था हे होतंफक्त गोळ्या देऊन आजार वरवर बरं करण्यापेक्षा आजाराच्या मुळावरच घाव घालायला हवावरचेवर होणाऱ्या डायरीया सारख्या आजारांना कायमचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी स्वछ्तेच्या प्रती जनजागृती सुरु केलीवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या ग्रामीण भागातील शौचालय बांधण्याच्या तत्वावर त्यांनी काही शौचालयांची निर्मिती केलीपण भारताच्या हवामानाला प्रामुख्याने पावसाळ्यात ती तग धरू शकली नाहीततेव्हा त्यांना कळून चुकलं की भारतासाठी आपल्याला भारताच्या वातावरणाशी जुळणाऱ्या शौचालयांची निर्मिती करायला हवी.

स्वच्छतेचं महत्व संपूर्ण गावात पोहचवून तळागाळातील लोकांना एकत्र करून एक चळवळ त्यांनी उभारलीह्यासाठी त्यांनी गावातील मातीच्या नमुन्यात किडे असल्याचं सप्रमाणात गावकऱ्यांसमोर सिद्ध केलंगावाच्या मातीत हे किडे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे उघड्यावर शौचाला जाणंगावात जर आजारांची साथ थांबवायची असेल तर गावातील प्रत्येकाने स्वछतेचा विडा उचलायला हवा हे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात उतरवलंनुसतं शौचालय निर्मिती  करता मानवी विष्ठेचा वापर कसा काय ऊर्जेच्या निर्मितीसाठी करता येईल असा क्रांतिकारी विचार त्यांनी सगळ्यांजवळ मांडलापेशाने डॉक्टर असलेले मापुस्कर हे काही अभियंते अथवा तंत्रज्ञ नव्हतेपण शौचालयाच्या निर्मितीत त्यांनी बरेच प्रयोग केलेशौचालय कसं कमीत कमी पैश्यात उभारता येईल ह्याशिवाय ते निसर्गाला पूरक कसं ठरेल ह्याचा अभ्यास करताना त्यांना अप्पासाहेब पटवर्धन ह्यांनी निर्माण केलेलं बायोगॅस शौचालयाचं मॉडेल आवडलं.

देहू गावात बायोगॅस शौचालयाचा प्रसार त्यांनी केलाह्या प्रकारच्या शौचालयात मानवी विष्ठेच्या विघटनातून निर्माण झालेला मिथेन गॅस हा अन्न शिजवण्यासाठी वापरला जातोह्या गॅस च्या वापरामुळे एल.पी.जीच्या वापरावर मर्यादा आल्याने गावकऱ्यांच्या पैश्यात खूप बचत झाली१९८० च्या दशकात देहू गावातील पूर्ण घरात शौचालय डॉक्टर मापुस्कर ह्यांच्या प्रयत्नाने बांधले गेलेह्याच बायोगॅस च्या प्रयत्नातून DOSIWAM (Decentralised on-site integrated waste management) चा पाया घातला गेलादेहू च्या ह्या प्रकल्पाप्रमाणे देशातील २५ पेक्षा अधिक गावात हे मॉडेल राबवलं गेलंआज ३० पेक्षा जास्ती वर्ष हे बायोगॅस  प्रकल्प कोणत्याही अडचणी शिवाय आजही सुरु आहेत.

ज्यावेळेस स्वच्छता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग नव्हती त्यावेळेस परंपरांना वैद्यकीय दृष्टीने मोडून आपल्यासोबत संपूर्ण देहू गावाचा कायापालट करणाऱ्या डॉक्टर सुहास मापुस्कर ह्यांचा गौरव भारत सरकारने २००६ साली निर्मल गाव योजने अंतर्गत पुरस्कार देऊन केलाअश्या कायापालट करणाऱ्या डॉक्टरांनी आपलं संपूर्ण आयुष्य देहू मधेच घालवलं२०१७ साली भारत सरकारने त्यांच्या मृत्यूपश्चात 'पद्मश्रीसन्मानाने त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केलाआज डॉक्टरांची पुढली पिढी त्यांच स्वच्छतेचं कार्य पुढे नेते आहेआज स्वच्छता मोहीम संपूर्ण भारताचा भाग झाली आहेपण ह्या मोहिमेचा श्रीगणेशा डॉक्टर सुहास मापुस्करांनी जवळपास ५० वर्षापूर्वी केला होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाहीदेहू गावाचे स्वच्छतेचे दूत डॉक्टर सुहास मापुस्कर ह्यांच्या स्मृतीस वंदन आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम.

फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment