Tuesday 31 March 2020

पेडोंगी... विनीत वर्तक ©

पेडोंगी... विनीत वर्तक ©

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडूपेडोंगी हे नाव एका खेचराच आहेखरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंथ ही नसेलचपण ही खेचर कोणी साधीसुधी खेचर नाही तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलं आहेभारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरसध्य स्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचर काम करत आहेतभारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहेसमुद्रसपाटीपासून १७,००० फुटा पर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीची रक्षा करतोभारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतच वाहन आजही जाऊ शकत नाहीजिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते तिकडे दारुगोळारसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतोह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरअतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचर काम करू शकतातअतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात ह्या पलीकडे खेचर अतिशय प्रामाणिक असतातत्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

'पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झालीत्या काळात आधुनिक संपर्क प्रणाली आणि प्रगत अशी वाहन नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होतीबॉम्ब च्या स्फोटातगोळ्यांच्या वर्षावातनिसर्गाच्या क्रोपाला  जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमानइतबारे पार पाडलं१९७१ साल उजाडलंभारतपाकीस्तान युद्ध सुरु झालंभारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगी ला पाकीस्तानी सैन्यांनी पकडलं आणि आपल्या पोस्टवर तिला बंदी बनवून तिच्यावर पाकीस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलंकोण सांगते प्राण्यांना भावना नसतातभारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकीस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटलीआपल्या जिवाची पर्वा  करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटर  अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटावर पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं ते ही शत्रूच्या प्रदेशात काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. ) भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय पोस्ट वर आपली हजेरी नोंदवली.

तिच्या प्रामाणिक आणि आपल्या देशासाठी असलेल्या प्रेमाला बघून भारताच्या त्या पोस्ट वरील बटालयीन कमांडर ने आपल्या वर असणाऱ्या ऑफिसरना पेडोंगी च्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली१९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या  853 AT Company ASC मध्ये काम करत होती२९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती पण त्या वयात ही आपल्या पाठीवर सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होतीह्या युनिट चे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांना पेडोंगी च्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलंतिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूतताईत म्हणून केलीह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रिटींग कार्ड वर ही पेडोंगी ला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलंह्याच युनिट सोबत तिची नियुक्ती बरेलीउत्तर प्रदेश इकडे नंतर झालीइथल्या खूप मोठ्या परीसरात पेडोंगी ने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगी ला खास एका कार्यक्रमासाठी दिल्ली ला नेण्यात आलंतिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगी ला तिच्या पराक्रमासाठीदेश सेवेसाठी कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलंत्याच वेळेस तिला तिचं नावं 'पेडोंगीहे देण्यात आलंउत्तर सिक्कीम मध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमी च्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलंभारतीय सेनेत अतुलनीय शौर्यसेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आलाह्या नंतरचा काळ पेडोंगी ने बरेली इकडेच व्यतीत केला१९९७ ला पेडोंगी च्या सेवेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेताना जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर असं तिचं नाव सुवर्ण अक्षरांनी कायमच नोंदवलं गेलं२५ मार्च १९९८ ला पेडोंगी ने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचाराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात तो तुम्हाला रस्ता दाखवेलपण पेडोंगी चा पराक्रम अभूतपूर्व असा होताआपला शत्रू कोणमित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटावर भारतीय सरहद्दीची रक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलंही पण एक प्रकारची देशभक्तीच आहेकोणी म्हणेल की पेडोंगी ला रस्ता माहीत होता म्हणून परत आलीपण मग एकटी तीच कातिच्यासोबत इतर पकडलेली खेचर आली नाहीत पण ती जिवावर उदार होऊन आलीपेडोंगी ला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला पण आपलं जिवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहेतिचा भिमपराक्रमदेशभक्ती आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहेदेशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगी ला माझा कडक सॅल्यूट आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 29 March 2020

A Promise is a Promise… विनीत वर्तक ©

A Promise is a Promise… विनीत वर्तक ©

२१ जानेवारी २००७ ला दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा नॅनो  अनावरण करताना भावनिक होऊन रतन टाटा म्हणाले होते,
“A Promise is a Promise”

पावसाळ्यात स्कुटर वरून आपल्या कुटुंबाला नेताना एका माणसाला बघून रतन टाटा मनातून अस्वस्थ झालेप्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतातील आज अशी अनेक कुटुंब आहेत जी सुरक्षितरित्या प्रवास करू शकत नाहीतरतन टाटा ह्यांनी मनातून ठरवलं की आपण अश्या लोकांसाठी काय करू शकतोत्यांनी ठरवलं की आपण अशी कार बनवायची की जी भारतातील मध्यमवर्ग खरेदी करू शकेल लाखात कार देण्याचं आपलं वचन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं ते फक्त आणि फक्त भारतीयांसाठीटाटा नॅनो ने टाटा ला कधीच फायदा दिला नाही  ( २०१९ मध्ये टाटा नॅनो ची एकही कार ऑर्डर नसल्यामुळे तयार केली गेली नाही. ) उलट टाटा ग्रुप ला ह्या प्रकल्पामुळे खूप नुकसान उचलावं लागलं पण रतन टाटा ह्यांनी आपला दिलेला शब्द पाळला.

ब्रिटीश लोकांच्या व्हॅटसन हॉटेल मध्ये गोरे नसल्यामुळे जमशेदजी टाटांना प्रवेश नाकारण्यात आलाएक भारतीय म्हणून अपमानित झालेल्या जमशेदजी टाटानी ज्या मुंबईतून ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य उभं केलं त्याच मुंबईच्या प्रवेश द्वारा समोरच ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून ताज महाल पॅलेस उभारलेह्या हॉटेल  मूळ डिझाईन एका मराठी माणसाने केल होत त्यांचं नाव होतं 'रावसाहेब सीताराम खांडेराव वैद्य त्यांच्या सोबत डीएनमिर्झा'. १९०० साली वैद्य यांच्या अचानक मृत्युनंतर हे काम डब्लूचेंबर्स ला देण्यात आलअसं म्हणतात कि ज्या व्हॅटसन हॉटेल मध्ये जमशेदजी टाटांना प्रवेश नाकारला होता त्याच हॉटेल च्या स्थापत्यकाराला हे काम देण्यात आलं तो म्हणजे हाच ग्रुप डब्लूचेंबर्सटाटांनी आपल्या अपमानाचा बदला ब्रिटिशांपेक्षा सुंदर हॉटेल उभारून घेतला  त्यांना त्यांची औकात दाखवलीआज टाटा ग्रुप ची १०० पेक्षा जास्ती हॉटेल भारतात तर १७ हॉटेल परदेशात आहेतटाटा हॉटेल ग्रुप हा सर्वोत्कृष्ठ हॉटेल आणि त्यांच्या देण्यात येणाऱ्या सेवेसाठी जगभर नावाजलेला आहे२६/११ च्या अतिरेकी हल्यात ह्या हॉटेल ची नासाडी झाल्यावर रतन टाटा ह्यांनी पुन्हा एकदा त्याला आपलं गतवैभव प्राप्त करून दिलं.

१९९८ मध्ये रतन टाटा नी भारतात 'इंडिकाकार आणलीपण ही कार लोकांच्या पसंतीस उतरली नाहीकार क्षेत्रातून टाटा नी मागे फिरावं हा सल्ला अनेकांनी रतन टाटांना दिलाहा सल्ला ऐकून रतन टाटा अमेरीकेतील डेट्रॉईट इकडे आपली कंपनी विकण्यासाठी अमेरीकेच्या फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होतेह्या मिटिंग मध्ये फोर्ड चे अध्यक्ष बिल फोर्ड ह्यांनी रतन टाटांचा अपमान केलाबिल फोर्ड म्हणाले होते,

"तुम्हाला ह्या कार बिझनेस मधलं कळत नसताना कशाला ह्यात उतरतातही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर आम्ही तुमच्यावर उपकार करू". 

बिल फोर्ड ह्यांचे शब्द रतन टाटांना खुप लागलेरतन टाटांनी आपली कंपनी  विकता लहान गाड्यांच्या उत्पादनात खुप मोठी मजल मारलीबरोबर दहा वर्षानंतर काळाचे फासे उलटे पडले२००८ साली आता फोर्ड कंपनी आर्थिक गटांगळ्या खात होतीटाटा ग्रुप ने त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड खरेदी करण्यात उत्सुकता दाखवलीफोर्ड कंपनीला पैश्याची प्रचंड गरज होतीआता तेच बिल फोर्ड अमेरीकेतून मुंबईत 'बॉम्बे हाऊसह्या टाटा ग्रुप च्या मुख्यालयात आपली कंपनी विकण्यासाठी दाखल झालेटाटा ग्रुप ने जगात अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठा असणारे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड तब्बल . बिलियन अमेरीकन डॉलर ( ९३०० कोटी रुपयेदेऊन खरेदी केलेत्या वेळेस बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते,

"आज जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले."

एकेकाळी ब्रिटिशांनी आपला चहा जगभर नेलाचहाची ओढ पूर्ण जगाला लावणाऱ्या ह्या चहाच्या निर्मितीची सूत्र ब्रिटिशांकडे होतीटेटली हा ब्रँड युरोप ,कॅनडा  प्रथम क्रमांकाचा तर अमेरीकेत दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड होताभारताला एकेकाळी हिणवणाऱ्या ब्रिटिशांच्या हातातून टाटा ग्रुप ने तब्बल २७१ मिलियन पौंड मोजत २००० साली ह्या ग्रुप ची मालकी आपल्याकडे घेतलीआज टाटा ग्लोबल बेव्हरेजेस जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे२००७ मध्ये टाटा स्टील ही जगात स्टील चं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ५६ व्या स्थानावर होतीआपल्यापेक्षा  पट मोठ्या असणाऱ्या डच कंपनी 'कोरसला टाटा ग्रुप ने . मिलियन डॉलर ला खरेदी केलंसंपुर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटांनी केलीभारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहेत्यातील १७हिस्सा टाटांचा आहेज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टीसीएसची स्थापना टाटांनी केलीआज जगातील पहिल्या  आयटीकंपन्यांमध्ये तिची गणना होते. लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट कॅपिटल असणारी टीसीएसभारतातील अग्रणी आय.टीकंपनी आहे.

TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केलेल्या आहेतज्यांचा आजचा भारत घडवण्यात खुप मोठं  योगदान आहे३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कॅन्सर वर उपचार घेतातह्यातील तब्बल ७०रुग्णांवर फुकट उपचार केले जातातटाटा कंपन्यांची जवळपास ६६मालकीहक्क हा वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहेटाटांना होणाऱ्या वार्षिक  बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो.

What advances a nation or a community is not so much to prop up its weakest and most helpless members, but to lift up the best and the most gifted, so as to make them of the greatest service to the country."
- Jamsetji Tata

आज भारत कोरोना शी लढा देताना चाचपडत असताना रतन टाटा आणि टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतीयांसाठी भक्कमपणे उभा राहिला आहेमदत पैश्याची असो वा वैद्यकीय सेवेचीतंत्रज्ञानाची असो वा रोजगाराचीटाटा नेहमीच आपल्या शब्दाला जागले आहेत.

A Promise is a Promise.........

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.