Wednesday, 4 March 2020

कोरोना (कोवीड १९)... विनीत वर्तक ©

कोरोना (कोवीड १९)... विनीत वर्तक ©

सध्या कोरोना हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. कोरोना व्हायरस ज्याला कोवीड १९ असं ही म्हणतात त्याने पूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं आहे. कोरोना वर सध्यातरी कोणती लस उपलब्ध नसली तरी ती विकसित करण्याचे आणि ह्याचा प्रसार थांबवण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. भारतात ही ह्या व्हायरस ची लागण झालेल्या काही व्यक्ती आढळल्या असल्याने सगळीकडे भितीच वातावरण आहे. फेसबुक आणि इतर सोशल मिडिया वरून अनेक प्रकारच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. ह्या आजाराविषयी थोडी माहिती म्हणून लिहावीशी वाटली. हा आजार गंभीर आणि पसरणारा असला तरी काही गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो.

२००९ मध्ये आलेल्या स्वाईन फ्लू ची लागण जवळपास ६०.८ मिलियन लोकांना झाली होती. २०१४ मध्ये इबोला मुळे ११,००० पेक्षा जास्ती लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. इबोला ची लागण झाल्यावर मृत्युमुखी पडण्याची शक्यता जवळपास २५% इतकी होती. आता सध्या उद्रेक झालेला कोरोना कुठवर आहे ते बघू. साधारण पूर्ण जगात ९४,००० लोकांना ह्याची लागण झाली आहे. ८२ देशात हा रोग आत्तापर्यंत पसरलेला आहे. ३२०० लोकं ह्यामुळे दगावली आहेत. ह्यातली ३००० पेक्षा जास्ती एकट्या चीन मधून आहेत. लागण झालेल्या ९४,००० लोकांमधली जवळपास ५१,००० लोकं ही बरी झाली आहेत. ( जवळपास ५४% अधिक ) उरलेल्या लोकांमध्ये ३३,००० पेक्षा जास्ती माईल्ड लेव्हल वर आहेत. (म्हणजे गंभीर स्वरूप नाही) साधारण ७००० लोक अशी आहेत जी गंभीर अवस्थेत आहेत. ( ह्या ७००० मधील ६४०० लोक चीन मधील आहेत जिकडे ह्याचा उद्रेक झाला आहे. )

कोरोना मध्ये दगावलेल्या सर्व व्यक्तींमध्ये ०-९ वर्षामधील पूर्ण जगात कोणीच नाही. एकूण दगावलेल्या व्यक्तींमध्ये वयाच्या ५० वर्षाच्या आतल्या व्यक्तींची टक्केवारी अवघी ०.४% इतकी आहे. ८० वर्षापेक्षा अधिक असलेल्या लोकांमध्ये हेच प्रमाण २२% इतकं आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये निरोगी लोकांच प्रमाण हे ०.९% इतकच आहे. ज्यांना आधी कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज आहेत त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्ती आहे. धूम्रपान करणाऱ्या लोकांना कोरोना ची लागण होण्याचा धोका हा जास्ती आहे. कोरोना ची लागण पुरुषांमध्ये होण्याचं प्रमाण स्री पेक्षा जास्ती आहे कारण स्री ची इम्युनिटी सिस्टीम ही पुरुषापेक्षा चांगली असल्याने स्री ला लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. 

वरील आकड्यावरून हे सहज लक्षात येते की कोरोना अतिशय वेगाने पसरत असला आणि गंभीर असला तरी सुदृढ शरीर असणाऱ्या लोकांना त्याची लागण होण्याची शक्यता कमी आहे. लागण झाल्यावर वेळेवर उपचार केल्यास त्यातून पूर्ण बरी होण्याची शक्यता ही जास्ती आहे. पण तरीही आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.

१) आपले हात नियमित साबणाने धुवत जा. बाजारात उपलब्ध असलेल्या अल्कोहोल बेस सॅनिटायझर चा वापर करा.

२)  कोणीही शिंक अथवा खोकत असेल तर त्याच्या/ तिच्या पासून साधारण १ मीटर (३ फूट ) लांब रहा.

३) आपल्या हाताने नाक, तोंड, डोळे ह्यांचा स्पर्श टाळा. स्पर्श करायचा असल्यास हात धुवून अथवा सॅनिटायझर ने स्वच्छ करून मग स्पर्श करा. ( हात सतत
     स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे हाताकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. )

४) सर्दी, खोकला, ताप असल्यास लगेच डॉक्टरी उपचार घ्या. त्या काळात घरीच आराम करा. गर्दीची ठिकाणे अथवा इतरांसोबत आपलं मिसळणं काही
    दिवस बंद करा.

५) फेस मास्क वापरताना काळजी घ्या. एकच मास्क अनेकवेळा वापरू नका. मास्क घालताना हात स्वच्छ धुवून घ्या. तसेच काढल्या नंतर पुन्हा हात स्वच्छ
    धुवा तसेच वापरलेल्या मास्क ला योग्य तर्हेने नष्ट अथवा कचऱ्यात टाका. 

कोरोना (कोवीड १९) हे जागतिक संकट आहे. तुम्ही, आम्ही मिळून त्याचा सामना करायचा आहे. तेव्हा काळजी घ्या आणि न घाबरता त्याचा मुकाबला करा. मी कोणी डॉक्टर अथवा मेडिकल तज्ञ नाही. ह्या सर्व सूचना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने सामान्य लोकांसाठी जाहीर केलेल्या आहेत.

खोटे आणि भंपक असणारे नको ते युनोस्को आणि डब्लू.एच.ओ. चे फॉरवर्ड १० लोकांना करण्यापेक्षा आजाराची माहिती आणि त्याचे धोके तसेच घ्यायची काळजी लोकांपर्यंत नेणं आज जास्ती गरजेचं आहे. काळजी घ्या  सुरक्षित रहा.

माहिती स्रोत :-  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

फोटो स्रोत :- गुगल
 
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



3 comments:

  1. Perfect Analysis Vinit and very well scripted.

    This reminded me story from our NCERT book “Read for pleasure “ .(extra reading for English subject. )

    In this story “cholera “and “malaria” diseases were depicted as skeleton talking to each other at the entrance of the town. The scene mentioned below is discussion over who took more lives.

    Malaria says to Cholera ,”I took 2000 lives “.
    Cholera says to Malaria smiling “ohh you just took 2000 lives , I took 4000 , double of you. “
    Malaria was surprised hearing this and asks “ how did you manage to to take so many lives since I am equally powerful “. Cholera Says ,” just panic attack/fear amongst people got me more (laughing hysterically ).”

    ReplyDelete
  2. उपयुक्त माहिती

    ReplyDelete