A Promise is a Promise… विनीत वर्तक ©
२१ जानेवारी २००७ ला दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा नॅनो च अनावरण करताना भावनिक होऊन रतन टाटा म्हणाले होते,
“A Promise is a Promise”
पावसाळ्यात स्कुटर वरून आपल्या कुटुंबाला नेताना एका माणसाला बघून रतन टाटा मनातून अस्वस्थ झाले. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतातील आज अशी अनेक कुटुंब आहेत जी सुरक्षितरित्या प्रवास करू शकत नाहीत. रतन टाटा ह्यांनी मनातून ठरवलं की आपण अश्या लोकांसाठी काय करू शकतो? त्यांनी ठरवलं की आपण अशी कार बनवायची की जी भारतातील मध्यमवर्ग खरेदी करू शकेल. १ लाखात कार देण्याचं आपलं वचन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं ते फक्त आणि फक्त भारतीयांसाठी. टाटा नॅनो ने टाटा ला कधीच फायदा दिला नाही ( २०१९ मध्ये टाटा नॅनो ची एकही कार ऑर्डर नसल्यामुळे तयार केली गेली नाही. ) उलट टाटा ग्रुप ला ह्या प्रकल्पामुळे खूप नुकसान उचलावं लागलं पण रतन टाटा ह्यांनी आपला दिलेला शब्द पाळला.
ब्रिटीश लोकांच्या व्हॅटसन हॉटेल मध्ये गोरे नसल्यामुळे जमशेदजी टाटांना प्रवेश नाकारण्यात आला. एक भारतीय म्हणून अपमानित झालेल्या जमशेदजी टाटानी ज्या मुंबईतून ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य उभं केलं त्याच मुंबईच्या प्रवेश द्वारा समोरच ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून ताज महाल पॅलेस उभारले. ह्या हॉटेल च मूळ डिझाईन एका मराठी माणसाने केल होत त्यांचं नाव होतं 'रावसाहेब सीताराम खांडेराव वैद्य त्यांच्या सोबत डी. एन. मिर्झा'. १९०० साली वैद्य यांच्या अचानक मृत्युनंतर हे काम डब्लू. ए. चेंबर्स ला देण्यात आल. असं म्हणतात कि ज्या व्हॅटसन हॉटेल मध्ये जमशेदजी टाटांना प्रवेश नाकारला होता त्याच हॉटेल च्या स्थापत्यकाराला हे काम देण्यात आलं तो म्हणजे हाच ग्रुप डब्लू. ए. चेंबर्स. टाटांनी आपल्या अपमानाचा बदला ब्रिटिशांपेक्षा सुंदर हॉटेल उभारून घेतला व त्यांना त्यांची औकात दाखवली. आज टाटा ग्रुप ची १०० पेक्षा जास्ती हॉटेल भारतात तर १७ हॉटेल परदेशात आहेत. टाटा हॉटेल ग्रुप हा सर्वोत्कृष्ठ हॉटेल आणि त्यांच्या देण्यात येणाऱ्या सेवेसाठी जगभर नावाजलेला आहे. २६/११ च्या अतिरेकी हल्यात ह्या हॉटेल ची नासाडी झाल्यावर रतन टाटा ह्यांनी पुन्हा एकदा त्याला आपलं गतवैभव प्राप्त करून दिलं.
१९९८ मध्ये रतन टाटा नी भारतात 'इंडिका' कार आणली. पण ही कार लोकांच्या पसंतीस उतरली नाही. कार क्षेत्रातून टाटा नी मागे फिरावं हा सल्ला अनेकांनी रतन टाटांना दिला. हा सल्ला ऐकून रतन टाटा अमेरीकेतील डेट्रॉईट इकडे आपली कंपनी विकण्यासाठी अमेरीकेच्या फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते. ह्या मिटिंग मध्ये फोर्ड चे अध्यक्ष बिल फोर्ड ह्यांनी रतन टाटांचा अपमान केला. बिल फोर्ड म्हणाले होते,
"तुम्हाला ह्या कार बिझनेस मधलं कळत नसताना कशाला ह्यात उतरतात, ही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर आम्ही तुमच्यावर उपकार करू".
बिल फोर्ड ह्यांचे शब्द रतन टाटांना खुप लागले. रतन टाटांनी आपली कंपनी न विकता लहान गाड्यांच्या उत्पादनात खुप मोठी मजल मारली. बरोबर दहा वर्षानंतर काळाचे फासे उलटे पडले. २००८ साली आता फोर्ड कंपनी आर्थिक गटांगळ्या खात होती. टाटा ग्रुप ने त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली. फोर्ड कंपनीला पैश्याची प्रचंड गरज होती. आता तेच बिल फोर्ड अमेरीकेतून मुंबईत 'बॉम्बे हाऊस' ह्या टाटा ग्रुप च्या मुख्यालयात आपली कंपनी विकण्यासाठी दाखल झाले. टाटा ग्रुप ने जगात अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठा असणारे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड तब्बल २.३ बिलियन अमेरीकन डॉलर ( ९३०० कोटी रुपये) देऊन खरेदी केले. त्या वेळेस बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते,
"आज जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले."
एकेकाळी ब्रिटिशांनी आपला चहा जगभर नेला. चहाची ओढ पूर्ण जगाला लावणाऱ्या ह्या चहाच्या निर्मितीची सूत्र ब्रिटिशांकडे होती. टेटली हा ब्रँड युरोप ,कॅनडा प्रथम क्रमांकाचा तर अमेरीकेत दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड होता. भारताला एकेकाळी हिणवणाऱ्या ब्रिटिशांच्या हातातून टाटा ग्रुप ने तब्बल २७१ मिलियन पौंड मोजत २००० साली ह्या ग्रुप ची मालकी आपल्याकडे घेतली. आज टाटा ग्लोबल बेव्हरेजेस जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. २००७ मध्ये टाटा स्टील ही जगात स्टील चं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ५६ व्या स्थानावर होती. आपल्यापेक्षा ४ पट मोठ्या असणाऱ्या डच कंपनी 'कोरस' ला टाटा ग्रुप ने ८.१ मिलियन डॉलर ला खरेदी केलं. संपुर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटांनी केली. भारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहे. त्यातील १७% हिस्सा टाटांचा आहे. ज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टी. सी. एस. ची स्थापना टाटांनी केली. आज जगातील पहिल्या ४ आय. टी. कंपन्यांमध्ये तिची गणना होते. ३.५ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट कॅपिटल असणारी टी. सी. एस. भारतातील अग्रणी आय.टी. कंपनी आहे.
TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केलेल्या आहेत. ज्यांचा आजचा भारत घडवण्यात खुप मोठं योगदान आहे. ३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कॅन्सर वर उपचार घेतात. ह्यातील तब्बल ७०% रुग्णांवर फुकट उपचार केले जातात. टाटा कंपन्यांची जवळपास ६६% मालकीहक्क हा वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहे. टाटांना होणाऱ्या वार्षिक ७ बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो.
What advances a nation or a community is not so much to prop up its weakest and most helpless members, but to lift up the best and the most gifted, so as to make them of the greatest service to the country."
- Jamsetji Tata
आज भारत कोरोना शी लढा देताना चाचपडत असताना रतन टाटा आणि टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतीयांसाठी भक्कमपणे उभा राहिला आहे. मदत पैश्याची असो वा वैद्यकीय सेवेची, तंत्रज्ञानाची असो वा रोजगाराची. टाटा नेहमीच आपल्या शब्दाला जागले आहेत.
A Promise is a Promise.........
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment