Wednesday 22 October 2014

जोर का धक्का धीरे से लगे.... विनीत वर्तक

एकदा स्टेशन वर चालत असताना अचानक एका माणसाचा धक्का लागला. मागे वळून तो काही बोलायच्या आधीच मी आपल सोरी म्हंटल. ह्यावर तो म्हणाला कि चालताना अडखळलो आणि धक्का लागला.  मी अगदी प्रतिक्षिप्त क्रियेने नक्की काय झाल होत ते ओळखल होत. मग मनात विचार आला कि आपला मेंदू किती प्रगत आहे. एखादा स्पर्श सुद्धा कोणत्या हेतूने होतो आहे हे तो पटकन ओळखू शकतो. बोटांचा स्पर्श पण त्यात कोणती भावना आहे हे आपल्याला अगदी लगेच जाणवून येते. प्रेम, मत्सर , आपुलकी , द्वेष, फायदा , कोतेपणा , जळफळाट कि एक हवीहवीशी वाटणारी भावना किती तरी रंग आहेत. हे सगळे आपण अनुभवतोच कि. अगदी ट्रेन मधला नकोसा वाटणारा स्पर्श किंवा प्रियकराचा हवाहवासा वाटणारा स्पर्श सगळच एकदम सहज आपल्याला जाणवते.
आपण किती तरी काम इतक्या सहजतेने करत असतो कि हि कामे करायला किती गणित मेंदू ला करायला लागते. साध शूज ची लेस घाई मद्धे बांधताना आपण बघतो तरी का? इतकी सवय असते कि आपला मेंदू आपल्या हाताच्या बोटांना इतक्या सराईत पणे कमांड देतो कि आपण न बघता सुद्धा ती बांधू शकतो. किंवा शर्टाची बटणे बघताना हे किती सोप्प वाटत असले तरी ह्यात प्रचंड बोटांची लवचिकता लागते. आपल नाक १ ट्रिलियन वेगवेगळ्या वासांच वर्गीकरण करू शकते. जगातल्या सगळ्यात फास्ट प्रोसेसर सुद्धा जास्ती जास्त २० किमी ने येणारा क्रिकेट मधील बोलर ने टाकलेला चेंडू ओळखू शकतो. म्हणजे तो कुठे पडल्यावर त्याची उंची किती असेल, तो किती वळेल. आता सचिन तेंडूलकर ने ज्या चेंडूवर शोऐब अख्तर ला विश्वचषकात सिक्स मारली होती तो चेंडू जवळ पास १५० किमी पेक्षा जास्त वेगाने त्याच्याकडे येत होता. त्याला तो चेंडू समजून घेऊन परतीचा फटका मारायला मिळणारा कालावधी होता अर्ध्या सेकंदा पेक्षा कमी वेळ. आपला मेंदू किती कमी वेळात हि सारी प्रक्रिया पूर्ण करतो. माझ मन विचार करत होत कि इतकी अजोड आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने मानाचा बिंदू असलेल्या शरीर यंत्रणेविषयी मी किती जाणतो?
सगळ सांगण्याच कारण इतकच कि माझ मन विचार करायला लागल कि मी माझ्या शरीराची काळजी घेतो का? मी  कधी हा विचार करून बघतो का एक दिवस माझ्या हातानी काम करण बंद केल तर काय? किंवा पायांनी? किंवा डोळ्यांनी? किंवा नाकाने किंवा मेंदूने ?? बाईक चालवताना पोलीस बघतील म्हणून हेल्मेट घालणारा मी कधी आपल्या मेंदूच्या रक्षणाचा विचार करणार आहे का? नवीन गाडी आली तेव्हा सगळ्यांप्रमाणेच अगदी कट मारून गाडी चालवायला आवडायचे पण एका कट मध्ये काय होऊ शकते ह्याचा विचार केला नव्हता कधी. जे परिणाम होतील त्याने आपण आपल आयुष्य जगू शकू का? मस्ती आणि तारुण्याच्या नषे मद्धे आपण खूप पुढे जातो पण कधीतरी असा एक धक्का आपल्या सगळ्यांना गरजेचा आहे परत जमिनीवर येण्यासाठी नाही का?
एका धक्याने आलेले विचारांचे तांडव खूपच वेगळे होते. हा धक्का खूप काही शिकवून गेला. म्हणतात न जोर का धक्का धीरे से लगे तसच काहीस..

विनीत ...  
  

Monday 13 October 2014

टीवी आणि मी ....... विनीत वर्तक

आज काल क्रिकेट बघावासच वाटत नाही. साला काय काळ होता त्या वेळी. क्रिकेटच्या म्याच साठी लोक सुट्टी घ्यायचे. ट्रेन मध्ये , बस मध्ये त्याचीच चर्चा. विकेट गेली कि त्याने कस खेळायला हवे होते आणि काय करायला हवे होते ह्याच्या एक्स्पर्ट कमेंट.
मला अजून आठवते भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मधली म्याच म्हणजे रस्त्यावर शुकशुकाट. कामाच्या ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी आणि ती बघण्यासाठी दुकानांच्या समोर झालेली गर्दी.
आमची पिढी इतक्या वेगवेगळ्या बदलातून जात आहे कि आपण कुठ आलो ह्याचा मागोवा घेतला कि किती गोष्टी हाती लागतात.
एक वेळ होती कि रिमोट चा टीवी म्हणजे खूप मोठा माणूस. मित्राकडे पहिल्यांदा रिमोट चा सोनी चा टीवी आणला तेव्हा साला तो आम्हाला घराच्या बाहेर जाऊन च्यानेल बदलून दाखवायचा आणि आम्ही आपले मनात काय सही रे. आज माझीच ५ वर्षाची मुलगी रिमोट घेऊन टीवी चालू करून झी मराठी लावते तेव्हा नक्की विचार करतो जग बदलला कि आपण बदललो.
लहान होतो तेव्हा सुट्टीत माझा मामाकडे म्याच बघायला आजू बाजूचे शेजारी यायचे आणि बघताना  २०-३० जण जेव्हा प्रत्येक बोल मागे एक्स्पर्ट कमेंट आणि विकेट हुकल्यावर असले हुंकार काढत कि आपण ३ डी आणि ४ डी पेक्षा ज्वलंत म्याच बघतो आहे असच वाटायचे.
ती मज्जा काय वेगळीच होती. एकतर टीवी वर च्यानेल दोन त्यात एक तर फार मध्ये मध्ये लागायचा आणि दुसर्यावर काहीतरी रटाळ कार्यक्रम नाहीतर व्यत्यय आणि ते सप्तरंगी कलर चे पट्टे असलेली स्क्रीन अगदी परिचयाची होती.
 आवाज कमी जास्त करायचं काम टीवी बघताना असलेल्या सगळ्यात कच्या लिंबू च काम. आपण तर अनेक वेळा हि जबाबदारी अगदी इमान इतबारे निभावली आहे. च्यानेल बदलयाचा तर प्रश्नच नाही. पिक्चर बघताना ते ढिशुम ढिशुम चे आवाज अगदी प्रेक्षकातून हि यायचे हि मज्जा आजची पिढी कधीच लुटू शकणार नाही.
टीवी आणि घर ह्याच नात जितक जवळचे होते कि घरातल्या भांडण असणार्या चुलत्यांना जोडणारा तो एकमेव धागा होता. आज सगळ हरवल. डिजिटल , एल इ डी च्या काळात पिक्चर खूप चांगल झाल पण ते बघणारा आज धुरकट झाला आहे. रिमोट आणि टच स्क्रीन च्या जमान्यात आपण ते बदलवणारे हात आणि कच्चे लीम्बुच हरवून बसलो आहे. आज कोण जिंकल हरल तरी साला तोंडातून उसासे येतच नाहीत कारण आपण एकतर किती हरले आणि जिंकले बेटिंग मध्ये ह्याचा हिशोब करतो नाहीतर त्यांनी पैसे खाल्ले म्हणून गपचूप च्यानेल बदलतो.
ह्या दोन टोकांमध्ये खूप काही आहे जे आज निसटल आहे. मला पुन्हा एकदा दरवाजाच्या बाहेर जाऊन टीवी च च्यानेल बदलायच आहे. कदाचित ते करताना माझी मुलगी विचारेल बाबा तुम्ही ठीक आहात न पण साला पुन्हा एकदा आपल्याला कौटुंबिक टीवी हवा आहे.     

Thursday 9 October 2014

टोयलेत्स म्हणजे काय रे भाऊ.....
टोयलेत्स बांधले म्हणजे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. बांधलेल्या टोयलेत्स ला शुल्क ठेवा म्हणजे त्याची नीट निगा राखली जाईल. मोदी ना अभिप्रेत असलेल कोर्पोरेशन कोर्पोरेट जगताकडून हे पैश्याच्या पलीकडे असल पाहिजे.
आज कोणी १०० कोटी देईल उद्या १००० कोटी देईल पण त्यातून बनणाऱ्या वस्तू ची निगा राखणे किंवा ती घाणेरडी जागा नाही तर स्वच्छतागृह आहे हि मानसिकता आपल्यात भिनण्यासाठी सुद्धा सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. नाहीतर आहेत आपल परत येरे माझ्या मागल्या. उदाहरणार्थ रेल्वे प्ल्यातफोर्म वरील स्वच्छतागृह म्हणजे ह्या नावावर ती ठपका आहेत. कारण अति कोंडत वातावरण ती घाण , पान खाऊन पिचार्या ने रंगणाऱ्या भिंती आणि पाणी नसलेले नळ आणि १-२ रुपयांसाठी हुज्जत घालणारे लोक बघितले कि आपण किती मागे आहोत ह्याचा अंदाज येतो.
स्वच्छतेबद्दल चा अमेरिकेतील एक अतिशय बोलका अनुभव सांगतो. नायगारा ला जात असताना एका रेस्तोरंत पाशी थांबलो होतो. सकाळची वेळ थंड हवा कोफी घेऊन मी आणि माझे काही सहप्रवासी बोलत होतो. अचानक आलेल्या वार्याच्या झुळुकीने एकाच्या हातातील कप निसटून रस्ताच्या पलीकडे गेला. हवेमुळे तो कप अतिशय दूर वर गेला आणि एका गटाराच्या झाकणा पाशी येऊन थांबला. तो परत कचरा पेटीत टाकण्यासाठी आम्ही निघालो तोच त्याच्या जवळ असणार्या एका वृद्ध महिलेने अगदी वाकता येत नसताना तो कप उचलून जवळच्या कचरा पेटीत टाकला. आम्ही थ्यांक्स म्हणालो तर त्या बाईचे शब्द होते. "इट्स माय सिटी इट्स माय जोब तो कीप क्लीन अंड टू सी इट्स रिमेन लाईक द्यात" आपल्यापेकी किती जण फक्त मी मुंबईकर , मी पुणेकर करतात पण खरोखर आपण मुंबईकर आणि पुणेकर आहोत का आणि असू तर त्या साठी आपण आजपर्यंत काय केल ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.
ह्याच बस मध्ये लांबचा प्रवास असल्याने टोय्लेत होत. (वोल्वो सारख्या अतिशय उत्कृष्ट बस आहेत आपल्याकडे पण त्यात टोय्लेत का नाही हा प्रश्नच उत्तर मी अजून हि शोधतो आहे ) बसवल्याने सुरु होण्या आधीच सांगितल कि हे तुमच्या सोयीसाठी आहे. अगदीच इमर्जन्सी असेल तेव्हा वापर करा. वापर केल्यावर ते तितकेच स्वच्छ राहील ह्याची काळजी घ्या कारण त्याच्या दुर्गंधी चा त्रास तुम्हालाच होईल. प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारे शब्द जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा माणूस काळजी घेतो. भारतात चलता हे च्या नावाखाली आपल्यावर ती वेळ येत नाही आणि जेव्हा ती येईल तेव्हा आपण खरोकर एक सुजाण नागरिक बनू आणि मग मुंबईकर ,पुणेकर ज्याचा आपल्याला खरोखर अभिमान असेल.
विनीत वर्तक...
यु एन मधील काल पंतप्रधानांच भाषण म्हणजे सर्वसमावेशक मुद्देसूद आणि एका बाणाने निदान १५ पक्षी मारावे तसे होते. कोणत्याही राजकीय नेत्याची ताकद हि जिभेवर असते. नुसत्या जिभेने आपण दृष्टीकोन बदलवू शकतो. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन तरी नक्कीच बदलतो आहे हे काल झालेल्या भाषणातून मोदींनी सांगितले. एकीकडे युनायटेड नेशन म्हणून आपण मिरवायचे आणि त्या खाली जी गट तयार करून एकमेकांची कोंडी करायची. पीस कीपिंग ऑपरेशन मद्धे मदत घ्यायची आशियायी देशांची मात्र काय आणि कसे , केव्हा कोठे हे ठरवायचा अधिकार मात्र आपली सेना न पाठवणार्या किंवा नावासाठी पाठवणार्या देशांनी घ्यायचा हि दरी त्यांनी अतिशय चपखल पणे अधोरेखित केली.
पाकिस्तान च्या पंतप्रधानांनी काश्मीर चा मुद्दा परत एकदा मांडल्याने त्याला सडेतोड उत्तर देणे भाग होतेच. मला वाटते उत्तर नाही कानाखाली आवाज काढला आणि विचारल कि लागला का? गुड टेररिझम आणि ब्याड टेररिझम असा भेदभाव करून जेहाद च्या नावा खाली आतंकवादाला पाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातले. नंतर आम्ही स्वताहून मदत दिली होती माणुसकीच्या दृष्टीकोनातून पण उगाच जमिनीच्या रेषेवरून भांडणार्या पाकिस्तानने ती अजून स्वीकारली नाही ह्यावरून पाकिस्तान चा दृष्टीकोन किती खालच्या पातळीवरचा आहे हे अधोरेखीत झाल.
मी मोदी चा कट्टर समर्थक नसलो तरी त्याचं भाषण ऐक्याण्यासाठी निर्माण झालेली उत्सुकता अतिशय समर्पक आहे. लोक म्हणतात त्यांनी खूप जाहिरात केली आणि करत आहेत कि किती लोक जमले जमतील वगरे पण मी म्हणतो आधीच्या पंतप्रधानांना कोणी अडवल होत का?? आणि नुसत्या जाहिरातीवर कोणी आपले काम धंदे सोडून १००० किमी लांब नाही जात का तर फक्त लांबून कुठेतरी दिसेल आणि ते हि नक्की नाही. निदान अमेरिकेत तरी नाही. मग ते अमेरिकन भारतीय का असोनात. त्याला करिष्मा असावा लागतो व्यक्ती ची उंची असावी लागते आणि त्याने ती टिकवावी लागते.
मोदी च्या करिष्म्याने भारतीय नाहीत तर इतर लोकही आकर्षिली जात आहेत. काल सेन्ट्रल पार्क वरील भाषण बघा. ६०००० तरुण अमेरिकन लोकां पुढे तितक्याच ताकदीने जेव्हा नेता संस्कृत चे श्लोक म्हणून दाखवतो तेव्हा ते म्हणण्यासाठी लोकांना किती आत्मसात कराव लागेल हा एखादा चांगलाच वक्ता जाणू शकतो.
सगळच कधी चांगले नसते काही वाईट गुण आणि चंद्रावर डाग असतात. मी डागांकडे नाही तर पांढर्या चंद्रांकडे बघतो. माझ्या आख्या आयुष्यात काम सोडून पंतप्रधानांच भाषण भाषण ऐकण्यासाठी टी व्ही समोर बसलो होतो आणि माझ्यासारखेच अनेक जण बसले होते. आनंद नक्कीच आहे कि मोदी नि नाराज नाही केल. एका भारतीय पंतप्रधानांना परदेशी भूमीवर युनायटेड नेशन मद्धे इतक्या कोन्फिदेन्तली बोलताना पहिल्याचा आनंद काही वेगळाच होता....

विनीत वर्तक..
नाती .....
कधीतरी आपण खरे बोलूच नये असे वाटते. काय आहे आपल्या मनात ते सांगूच नये असे वाटते. बघ न नात्याला जपण्याच्या प्रयत्नात आपण इतके रुतून जातो कि नक्की आपण नात्याला जपतोय कि ते आपल्याला हेच उमगत नाही. म्हणजे कधी कधी आपण हा विचार करतो कि जो आपल्या इतका जवळचा आहे त्याला खरे सांगून टाकावे का कुणास ठाऊक आपल्या नकळत कळले तर त्याला त्रास होऊ नये हीच इच्छा पण खरेच असे घडते का?
नात्याला आकार देणारे आपण त्याला बिघडवायला असा कितीसा वेळ घेतो. चूक भूल द्यावी घ्यावी अस म्हणताना आपण खरच एखाद्याला त्याच्याच विचारांनी समजून घेऊ शकतो का? त्याची परिस्तिथी , त्याचे विचार खरेच आपल्यापर्यंत पोहचले का आणि मिळालेच तर समजून आपण तीच उंची गाठू शकतो का नव्याने ...
इतके सोप्पे असते का माणसे मिळवणे? नात्यांची गुंतागुंत इतकी असताना आपण उसवलेले धागे शिवण्यासाठी वेळ पण काढत नाही. उलट त्या उसवलेल्या जागेचीच आपल्याला सतत आठवण येत राहते त्या खाज आलेल्या जागेसारखी. ते निर्माण करताना एकत्र घालवलेल्या क्षणांना आपण कसे एका क्षणात तोडून टाकतो. काय असते एकच कि कोणीतरी मला समजून नाही घेतल कि फसवल कि विश्वासघात केला. ह्यातल काही असेल तरी समोरच्याला आपण एक संधी देतो का?
विश्वास , नाती , संधी सगळ बोलायला सोप्प आहे पण खरेच सोप्प आहे का? हा हि एक प्रश्न आहे. आपण धावतो आहोत. उद्या च्या सुखासाठी. हातातून आज जातो आहे कालच्या आठवणीतून आणि नात्यांची परिभाषा समजवायला समजून घ्यायला आपल्याकडे वेळ आहे???? प्रत्येकाने विचार करून उत्तर शोधा काय माहित ह्यातून कदाचित नात्यांची एक गुंतागुंत सुटू शकेल..

विनीत वर्तक ...

Thursday 2 October 2014

ती ............. विनीत वर्तक
कधी कधी काय आहे पहिली ओढ कळतच नाही. शाळेच्या त्या दिवसात नक्की काय वाटते अजून हि उमगत नाही. तीच ती शाळा, तोच तो वर्ग आणि तेच ते आपण सगळे. कस लक्ख डोक्यात आहे अजून सगळ. २२ वर्ष निघून गेली. खूप काही बदलल खूप काही शिकलो, विसरलो पण तू अजून आहेस तिकडेच. अजून हि दिसते मला आणि मी सुद्धा अजून हि रमतो तुझ्या त्याच आठवणीत.
किती मज्जा असते न शाळेचे ते निरागस दिवस आणि त्यात त्या खर्या भावना. खरे तर त्या कधी कळल्याच नाहीत आणि कळल्या तरी सांगायची ताकद आपल्यात कुठून. आपण साले सज्जन असल्या गोष्टी संस्कारामध्ये बसतच नाहीत त्यामुळे साला कधी त्याचा विचारच केला नाही. पण ते तुला चोरून बघणं , बोलायचं प्रयत्न करण , तुझा तो कटाक्ष आणि माझी भेदरलेली नजर कि साला काय लोचा तर होणार नाही न...
सगळच कस एकदम निरागस. एखाद्या भुंग्याने निरागसतेने फुलाकडे आकृष्ठ व्हावे तसे. खूप जणी भेटल्या पण तुझ्यासारखी तूच. आजही ते स्थान कोणाला मिळवता आल नाही. ते काय होत आजही न उलगडलेल कोड आहे. प्रेम, मैत्री काय असते त्याची परिभाषा काय असते ह्याची काडीमात्र अक्कल नसणारे आपण दोघे खरे तर मीच तुझ्या पर्यंत मी पोहचू शकलो का नाही आजही मला माहित नाही पण काहीतरी चुंबकीय होते ग तुझ्यात साला तो भुंगा अजून तेच फुल शोधत फिरतो आहे.
आशा आहे कि कधी तरी तू दिसशील आणि पुन्हा एकदा मी असाच आकृष्ठ होईन तुझ्याकडे त्याच निरागस भावनेने आणि त्याच तीव्रतेने. पण ह्या वेळी तू समजून घेशील का? कि अव्यक्त पणेच आपण व्यक्त होऊ. खूप काही आहे पण काहीच नाही अशीच अवस्था आहे माझी....