Thursday, 9 October 2014

नाती .....
कधीतरी आपण खरे बोलूच नये असे वाटते. काय आहे आपल्या मनात ते सांगूच नये असे वाटते. बघ न नात्याला जपण्याच्या प्रयत्नात आपण इतके रुतून जातो कि नक्की आपण नात्याला जपतोय कि ते आपल्याला हेच उमगत नाही. म्हणजे कधी कधी आपण हा विचार करतो कि जो आपल्या इतका जवळचा आहे त्याला खरे सांगून टाकावे का कुणास ठाऊक आपल्या नकळत कळले तर त्याला त्रास होऊ नये हीच इच्छा पण खरेच असे घडते का?
नात्याला आकार देणारे आपण त्याला बिघडवायला असा कितीसा वेळ घेतो. चूक भूल द्यावी घ्यावी अस म्हणताना आपण खरच एखाद्याला त्याच्याच विचारांनी समजून घेऊ शकतो का? त्याची परिस्तिथी , त्याचे विचार खरेच आपल्यापर्यंत पोहचले का आणि मिळालेच तर समजून आपण तीच उंची गाठू शकतो का नव्याने ...
इतके सोप्पे असते का माणसे मिळवणे? नात्यांची गुंतागुंत इतकी असताना आपण उसवलेले धागे शिवण्यासाठी वेळ पण काढत नाही. उलट त्या उसवलेल्या जागेचीच आपल्याला सतत आठवण येत राहते त्या खाज आलेल्या जागेसारखी. ते निर्माण करताना एकत्र घालवलेल्या क्षणांना आपण कसे एका क्षणात तोडून टाकतो. काय असते एकच कि कोणीतरी मला समजून नाही घेतल कि फसवल कि विश्वासघात केला. ह्यातल काही असेल तरी समोरच्याला आपण एक संधी देतो का?
विश्वास , नाती , संधी सगळ बोलायला सोप्प आहे पण खरेच सोप्प आहे का? हा हि एक प्रश्न आहे. आपण धावतो आहोत. उद्या च्या सुखासाठी. हातातून आज जातो आहे कालच्या आठवणीतून आणि नात्यांची परिभाषा समजवायला समजून घ्यायला आपल्याकडे वेळ आहे???? प्रत्येकाने विचार करून उत्तर शोधा काय माहित ह्यातून कदाचित नात्यांची एक गुंतागुंत सुटू शकेल..

विनीत वर्तक ...

No comments:

Post a Comment