Wednesday, 22 October 2014

जोर का धक्का धीरे से लगे.... विनीत वर्तक

एकदा स्टेशन वर चालत असताना अचानक एका माणसाचा धक्का लागला. मागे वळून तो काही बोलायच्या आधीच मी आपल सोरी म्हंटल. ह्यावर तो म्हणाला कि चालताना अडखळलो आणि धक्का लागला.  मी अगदी प्रतिक्षिप्त क्रियेने नक्की काय झाल होत ते ओळखल होत. मग मनात विचार आला कि आपला मेंदू किती प्रगत आहे. एखादा स्पर्श सुद्धा कोणत्या हेतूने होतो आहे हे तो पटकन ओळखू शकतो. बोटांचा स्पर्श पण त्यात कोणती भावना आहे हे आपल्याला अगदी लगेच जाणवून येते. प्रेम, मत्सर , आपुलकी , द्वेष, फायदा , कोतेपणा , जळफळाट कि एक हवीहवीशी वाटणारी भावना किती तरी रंग आहेत. हे सगळे आपण अनुभवतोच कि. अगदी ट्रेन मधला नकोसा वाटणारा स्पर्श किंवा प्रियकराचा हवाहवासा वाटणारा स्पर्श सगळच एकदम सहज आपल्याला जाणवते.
आपण किती तरी काम इतक्या सहजतेने करत असतो कि हि कामे करायला किती गणित मेंदू ला करायला लागते. साध शूज ची लेस घाई मद्धे बांधताना आपण बघतो तरी का? इतकी सवय असते कि आपला मेंदू आपल्या हाताच्या बोटांना इतक्या सराईत पणे कमांड देतो कि आपण न बघता सुद्धा ती बांधू शकतो. किंवा शर्टाची बटणे बघताना हे किती सोप्प वाटत असले तरी ह्यात प्रचंड बोटांची लवचिकता लागते. आपल नाक १ ट्रिलियन वेगवेगळ्या वासांच वर्गीकरण करू शकते. जगातल्या सगळ्यात फास्ट प्रोसेसर सुद्धा जास्ती जास्त २० किमी ने येणारा क्रिकेट मधील बोलर ने टाकलेला चेंडू ओळखू शकतो. म्हणजे तो कुठे पडल्यावर त्याची उंची किती असेल, तो किती वळेल. आता सचिन तेंडूलकर ने ज्या चेंडूवर शोऐब अख्तर ला विश्वचषकात सिक्स मारली होती तो चेंडू जवळ पास १५० किमी पेक्षा जास्त वेगाने त्याच्याकडे येत होता. त्याला तो चेंडू समजून घेऊन परतीचा फटका मारायला मिळणारा कालावधी होता अर्ध्या सेकंदा पेक्षा कमी वेळ. आपला मेंदू किती कमी वेळात हि सारी प्रक्रिया पूर्ण करतो. माझ मन विचार करत होत कि इतकी अजोड आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने मानाचा बिंदू असलेल्या शरीर यंत्रणेविषयी मी किती जाणतो?
सगळ सांगण्याच कारण इतकच कि माझ मन विचार करायला लागल कि मी माझ्या शरीराची काळजी घेतो का? मी  कधी हा विचार करून बघतो का एक दिवस माझ्या हातानी काम करण बंद केल तर काय? किंवा पायांनी? किंवा डोळ्यांनी? किंवा नाकाने किंवा मेंदूने ?? बाईक चालवताना पोलीस बघतील म्हणून हेल्मेट घालणारा मी कधी आपल्या मेंदूच्या रक्षणाचा विचार करणार आहे का? नवीन गाडी आली तेव्हा सगळ्यांप्रमाणेच अगदी कट मारून गाडी चालवायला आवडायचे पण एका कट मध्ये काय होऊ शकते ह्याचा विचार केला नव्हता कधी. जे परिणाम होतील त्याने आपण आपल आयुष्य जगू शकू का? मस्ती आणि तारुण्याच्या नषे मद्धे आपण खूप पुढे जातो पण कधीतरी असा एक धक्का आपल्या सगळ्यांना गरजेचा आहे परत जमिनीवर येण्यासाठी नाही का?
एका धक्याने आलेले विचारांचे तांडव खूपच वेगळे होते. हा धक्का खूप काही शिकवून गेला. म्हणतात न जोर का धक्का धीरे से लगे तसच काहीस..

विनीत ...  
  

No comments:

Post a Comment