Sunday 8 March 2015

सवांद ते विसंवाद ...

सवांद ते विसंवाद ... विनीत वर्तक
फेसबुक ने माझ्यातील काही गुणांचा शोध मलाच लावून दिला आणि नकळत का होईना त्याची सवय लागली हे मान्यच कराव लागेल. प्रत्येक गोष्टीच्या अनेक पातळ्या असतात सुरवात मग उच्चतम पातळी आणि मग हळू हळू पुन्हा शेवट. शेवट येईलच असे सांगता येत नाही ती एक सुरवात हि असू शकते पण ह्या गोष्टी घडतात ह्याच क्रमाने बहुतेकवेळी.
आता फेसबुक ची जागा व्हात्स अप ने घेतली आहे.उद्या अजून कोणी ती जागा घेईल माणसा माणसामधील सवांदाची जागा एक एक नवीन माध्यम घेते आहे. त्याची खोली किती असावी हे मात्र आपण ठरवायला हवे. आजच एक पोस्ट वाचली. घरातील कोणी तरी गेल्याची बातमी म्हणजे अगदी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे एखाद्या बायकोने नवरा गेल्याची बातमी टाकावी आणि नवर्याने बायको गेल्याची ती हि अवघ्या एका तासात.
हे कुठे तरी सुन्न करणारे आहे. फेसबुक हे जरी माध्यम असले तरी माणूस इतक्या तीव्र वैचारिक वादळाच्या आणि मानसिक स्तिथी योग्य नसताना फेसबुक चा विचार करू शकतो हेच खूप मला विचित्र वाटल. अश्या दुखद घटनेची माहिती सर्वांपर्यंत पोचावी हा एक हेतू जरी त्या मागे असला तरी त्या जवळच्या व्यक्तीने कोम्पूटर चालू करून स्टेटस अपडेट करून त्यावर सहानभूती व्यक्त करावी हे कुठेतरी सवांद नाही तर विसावंदाच लक्षण आहे.
आपण आत्ता काय करतो? कोणा बरोबर आहोत? आज जेवायला काय केल ? ते घरातील पाळीव प्राणी काय करतात म्हणजे कुत्रा , मांजर ? सर्वच एका क्षणाला योग्य वाटल तरी ते खरच सवांदाच माध्यम आहे का हा विचार मी आणि सर्वानीच करायला हवा. फेसबुक , व्हात्स अप किंवा अजून काही जरी आपल्या जीवनाचा मुलभूत अंग बनले असले तरी ते आपल्या मुलभूत रचनेलाच आतून पोखरत आहेत.
आज वाचलेल्या पोस्ट ने लागलेल्या वाळवीची चाहूल दिली आहे. आता योग्य तो फवारा करावाच लागणार आहे. पण प्रत्येकाने तडा जाण्याआधीच औषध केल तर सवांदाच हे सुंदर माध्यम अजून सुंदर होईल ह्यात शंकाच नाही.
"Never do something permanently foolish just because you are temporarily upset"

No comments:

Post a Comment