प्रवास आणि नाती ... विनीत वर्तक
प्रवासातील ओळख कशी नवीन असते. कोण कोणाची ओळख नसताना आपले कधी होऊन जाते समजत हि नाही. नात्यांचे हि असे नाही का ? अनोळखी वाटणार माणूस कधी आपल्यात मिसळून जाते कळत नाही. ओढ , आपुलकी , आर्तता सगळ्याच बाजूने आपण जवळ येतो आणि एका सुंदर स्वनांचा प्रवास सुरु होतो.
काटेरी रस्त्यावरून गाडी हायवेवर आली कि कशी वेग पकडते तसच आपल नात नाही का वेगात किती अंतर गेल ह्याच अंदाजच येत नाही. ह्या वेगाच्या शर्यतीत आपण फक्त पुढे बघतो. बाजूने काय निघून जाते ह्याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि मागे बघायला काही सोयच नसते कारण येणारा पुढे आपली वाट बघत असतो.
गाडी त्या हायवेवर कधी मार्गिका बदलते ते कळतच नाही. अचानक असा सुसाट झालेला प्रवास एका अवघड वळणापाशी येतो. नात्याचं हि तसच नाही का चांगल म्हणत चाललेली गाडी एखाद्या प्रसंगात अशी काही वेळ येते कि काय करायच सुचत नाही. अश्याच वेळी खरे कौशल्य ते गाडी हळू करायचे आणि योग्य त्या वेगात पुढे जायचे.
ड्रायवर चे जसे हे कसब तसच त्याला साथ देणाऱ्या क्लीनरचे हि. तो किंवा ती जोडीदारा शिवाय प्रवास सुरूच होऊ शकत नाही तसा संपू हि शकत नाही. केलेल्या प्रवासातील आठवणी ह्या पण त्याच्या बरोबर शेअर केलेल्या वेळेचे गणित असते न. अश्या वळणावरती साथ द्यायची का सोडायची हा ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो नाही का?
गाडी खूप जोरात नेली म्हणजे जिंकल अस होत नाही. टायर फुटतो अतिवेगाने नियंत्रण जाते त्याला हि कारण तेच. आपल्याला झेपते तितकच जोरात जाव. मर्सिडीज आणि मारुती ची तुलना नाही होत तसी नात्यांची कशी होणार. मारुती असली म्हणजे खराब आणि मर्सिडीज चांगली अस नसतेच. मारुती चे नखरे कमी तर मर्सिडीज चे जास्ती. दोन्ही आपापल्यापरीने चांगल्याच कसब हे आपण कसे चालवतो त्याचच.
नात्यांची गणित हि ह्या प्रवासा सारखीच असतात. एकदा हायवे संपला कि आपला वेग कमी होतो मग अश्या वेळेस आपले गियर पण आपण बदलायला हवेत. गाडी चे गियर बदलले नाहीत तर अपघात होणार. नाहीतर गाडी बंद पडणार मधेच नात्याचं हि तेच कि. गियर बदलणे हीच तर मोठी कला. ते जर जमले तर अर्धा प्रवास झालाच.
कधी अशी वेळ येते कि आपली चुकी नसताना सगळच संपते. तो प्रवास नकोसा वाटू लागतो तो जोडीदार नकोसा वाटू लागतो. रस्ते बदलावेसे वाट्तात. नवीन जोडीदार , नवीन रस्ते सगळा खुणावत असतात. नवीन क्षितीजांची चाहूल असते पण म्हणून कोणी झालेल्या प्रवासाला वाईट म्हणत बसत नाही. तो संपला आणि हा सुरु झाला बस.
नात्यात अस करतो का आपला अर्धा वेळ तर हे अस झालच कस ह्यात जातो बर मी हा प्रवास सुरु केलाच का ह्याच मंथन. ज्या प्रश्नांना उत्तर नाहीत तेच आपण शोधात बसतो आणि ह्यात बाकीचा पेपर राहून जातो. समोर आलेले प्रश्न न सोडवताच आपण प्रवास करतो. न त्या रस्त्याच समाधान न ह्या रस्त्याच समाधान. कोठून आलो . कुठे जायचं आहे सगळच प्रश्नार्थक.
इतक कठीण आहे सगळ? झालेल्या प्रवासाची ओढ , आनंद , अनुभव गाठीशी बांधून पुढे जाउच शकतो कि पण इतका विचार करतो आपण कि करून सुद्धा आपल्याला नको असते ते सगळ. प्रश्न आपलेच उत्तरही आपलीच मग झालेला प्रवास का नको. कदाचित तोच एका नव्या क्षितिजाची सुरवात असेल... ओशो सांगतात तस...
Rather than clinging to each other in anger, in frustration, in rage, and being violent to each other and destructive, it is better to depart with grace.
One should know how to fall in love and one should also know how to fall out of it gracefully...
One should know how to fall in love and one should also know how to fall out of it gracefully...
No comments:
Post a Comment