कायच्या काय .... विनीत वर्तक
परवा अचानक मळभ दाटून आल आणि पावसाला सुरवात पण झाली. मार्च महिन्यात पाउस अस कोणी म्हंटल असत तर माझ उत्तर हेच असत कायच्या काय. येड बीड लागल आहे का आत्ता आणि पाउस?? घरी फोन वरून झालेल संभाषण संपते न संपते तोच इकडेही आभाळाने आपले रंग बदलेले होते आणि काही वेळात जलधारांनी पाण्याकडे धाव घेतली.
समुद्र इतका सुंदर वाटत होता कि बस हेच काय ते आयुष्य अस उत्तर मिळाव. अगदी क्षितिजाच्या टोकाच्या पलीकडे दिसेल इतक मोकळ आकाश आणि वातावरण त्यात काळ्या मेघांनी केलेली धावपळ आणि शांत समुद्र. आज उलट दिसत होत. निळ्या रंगाची जागा पाण्याने घेतली होती तर जमिनीचा काळा रंग आकाशाने. मंद वारा वाहत होता आणि नकळत मंगेश पाडगावकरांच्या ओळीनी मनाचा ताबा घेतला.
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥
काश इथे मस्त पेकी एखादि अशी स्वताची बोट घेऊन मस्त पेकी डेकवर निसर्गाच्या त्या अप्रतिम रुपात स्वताला विरघळून टाकाव असच मनात चालू होत. हनिमून साठी सगळ्यात चांगल डेस्टीनेशन कोणत असावं, तर माझ्या मते ह्या निळ्या समुद्रात निरव शांततेत दोघांनी स्वताला विसरून जाव हेच ते एक अदभूत ठिकाण. जागा कोणतीही असो पण त्या निळ्या समुद्रात त्या शांततेत स्वताला विसरण्यासाठी काही कराव लागत नाही. जस
"Love isn't planned or projected. True love just happens to us when we are not even looking or searching. That's what makes it so undefined"
ह्या धुंदीत हरवताना रिग च्या आवाजाने पुन्हा जमिनीवर आलो. मित्राशी मनात झालेल्या विचारांचं तांडव शेअर केल तर त्याच्या चेहऱ्यावर तेच भाव होते जे मी मगाशी घरी बोलताना होते. कायच्या काय . काहीही बोलतोस...
No comments:
Post a Comment