Friday 26 May 2017

ढोला सादिया (भूपेन हझारिका ) पूल... विनीत वर्तक

आज पंतप्रधानांनी ढोला सादिया ह्या भारतातील सगळ्यात लांब पुलाच उद्घाटन केल. ह्यामागे कोणाच श्रेय हा राजकारणाचा विषय बाजूला ठेवून हा पूल कसा महत्वाचा आहे. हे लक्षात घेण महत्वाच आहे. ढोला आणि सादिया ह्या दोन गावांना जोडणारा पूल खरे तर आसाम आणि अरुणाचल प्रदेश ह्या भारताच्या दोन महत्वाच्या राज्यांना जोडतो. ९.१५ किमी लांबीचा हा पूल संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ( मुंबईतील वांद्रे- वरळी सेतूच्या लांबीपेक्षा हा ३.५५ किमी अधिक लांब आहे.)
अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमी आपला हक्क सांगत आला आहे पण भारताने नेहमीच हा आपला भूभाग असल्याच म्हंटल आहे. चीन शी आपली सीमारेषा ह्या राज्यातून जुळते. तसेच हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात असल्याने इकडे असे पूल बांधणे तितकच कठीण आहे. लोहित, ब्रह्मपुत्रा, दिबांग ह्या तीन नद्यांनी वेढलेला हा प्रदेश आहे. अश्या अभियांत्रिकीच्या दृष्टीने गुंतागुंतीच्या प्रदेशात सामरिक दृष्ट्रीने अतिशय महत्वाचा दुवा हा पूल ठरणार आहे.
हा पूल ५४० किमी दिसपूर जी कि आसाम ची राजधानी आहे तर ३०० किमी इटानगर जी कि अरुणाचल प्रदेश ची राजधानी आहे. तिथे वसलेला आहे. म्हणूनच दळणवळणाच्या दृष्ट्रीने हा पूल एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला होणार असेल तर भारतीय सैन्याला. ह्या आधी भारतीय सैन्याच्या तुकडीला ह्या भागातून बोटीतून प्रवास करावा लागत होता. सीमेवर जाणाऱ्या वाहनांना तर १० तास खर्ची घालून २५० किमी चा वळसा घालून अरुणाचल च्या सीमेवर जाव लागत होत. हे लक्षात ठेवूनच रणगाड्यांच्या वजनाला पेलेल अस ह्याच बांधकाम करण्यात आल. ह्या पुलावरून ६० टन वजनाचा रणगाडा नेला जाऊ शकतो. तसेच ह्याचे १८२ पिलर्स वर सेसमिक बफर्स लावण्यात आले आहेत. ह्यामुळे कोणत्याही आपात स्थिती ची कल्पना आधी मिळण्यास मदत होणार आहे.
ह्या पुलामुळे सीमेवर जाणऱ्या वाहनांच्या प्रवासात खूप बचत होणार आहे. भारतीय सेनेच्या वाहनांना ज्या प्रवासाला आधी दोन दिवस लागत होते तोच प्रवास आता काही तासांवर आला आहे. दररोज १० लाखांचं इंधन ह्या पुलामुळे वाचल जाणार आहे. इथे राहणाऱ्या अनेक लोकांची प्रचंड सोय ह्या पुलामुळे होणार आहे. एरवी रात्रीच्या प्रवासाठी इथे कोणताही रस्ता उपलब्ध नव्हता तसेच ब्रह्मपुत्रा आवेशात वाहत असताना हा प्रदेशाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असायचा पण ह्या पुलामुळे सगळच बदलून जाणार आहे. लष्करी रहदारी सोबत इथली इंडस्ट्री तसेच टुरिझम हि प्रचंड वाढणार आहे. ख्यातनाम गायक भूपेन हझारिका ह्याचं जन्मगाव हे सादिया आहे. म्हणूनच ह्या पुलाला त्यांच्या स्मरणार्थ भूपेन हझारिका ह्याचं नाव देण्यात आल आहे. हे आणि असे अनेक कार्यक्रम राष्ट्राच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप महत्वाचे असतात. हे अवघड अस अभियांत्रिकी मधल एक शिखर गाठणाऱ्या सर्वाना सलाम.

निर्णायक दिवस... विनीत वर्तक

१९९२ च वर्ष होत. अमेरिकेचे त्या वेळेचे अध्यक्ष सिनियर बुश नी अध्यादेश काढत रशियाला क्रायोजेनिक इंजिनच अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताला देण्यापासून परावृत्त केल. अगदी जवळचा आणि भरवशाचा मित्र असलेल्या रशियाने त्यावेळी अंतरराष्ट्रीय दबावाखाली भारताला हे तंत्रज्ञान देण्यापासून नकार दिला. १९९२ ते आज २०१७ खूप पाणी पुलाखालून वाहून गेल. आज त्याच अमेरिकेच्या नासा ने भारताच्या इस्रो सोबत सहकार्य करार केला. आता त्या करारानुसार २०२१ ला निसार ह्या मोहिमेची आखणी झाली. २०१६-१०१७ सालच इस्रो ची वार्षिक उलाढाल १.४ बिलियन अमेरिकन डॉलर ची आहे. तर नुसत्या निसार मोहिमेची किमंत तब्बल १.५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजे आपल्या एका वर्षाच्या जमा खर्चा पेक्षा जास्त किंमत असणाऱ्या मोहिमेसाठी व जगातील सगळ्यात महाग अर्थ इमेजिंग उपग्रहासाठी नासा ने इस्रो ची निवड करावी हा काळाचा महिमा म्हणा किंवा भारतीय वैज्ञानिकांचे अथक परिश्रम. हा उपग्रह ज्या रॉकेट मधून प्रक्षेपित होईल ज्या जी.एस.एल.व्ही. रॉकेट साठी १९९२ साली अमेरिकेने भारताचे सगळे दरवाजे बंद केले होते.
जी.एस.एल.व्ही. मार्क २ हे रॉकेट २ टना पर्यंत जी.टीओ. म्हणजेच भूस्थिर अश्या कक्षेत प्रक्षेपित करू शकतो कि जिथून पृथ्वीचा परिवलनाचा वेग आणि उपग्रहाचा वेग सारखा असतो. सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर हा उपग्रह ध्रुव ताऱ्या सारखा स्थिर एकाच ठिकाणी पृथ्वीवरून दिसू शकेल. हि कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सुमारे ३५,७८६ किलोमीटर उंचीवर आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला कोणताही उपग्रह जर ह्या कक्षेत स्थापन करायचा असेल तर रॉकेट ला उपग्रहाला घेऊन हि उंची गाठता यायला हवी. आजवर भारत मार्क २ च्या द्वारे २ टन वजना पर्यंतचे उपग्रह इथवर घेऊन जाऊ शकत होता. पण कम्युनिकेशन आणि ब्रोडकास्ट साठी लागणाऱ्या उपग्रहांच वजन ४ ते ५ टन इतक असते. आजवर भारत असे उपग्रह पाठवण्यासाठी एरियन ह्या युरोपियन संस्थेची मदत घेत होता. त्यासाठी भारताला ४०० कोटी रुपये किंवा ६० मिलियन अमेरिकन डॉलर प्रत्येक उपग्रहामागे मोजावे लागत होते.
येत्या ५ जून २०१७ ला भारत त्याच सगळ्यात मोठ रॉकेट म्हणजे जी.एस.एल.व्ही मार्क ३ प्रक्षेपित करत आहे. ४ टना हून अधिक भार भूस्थिर कक्षेत नेण्याची ह्याची क्षमता आहे. ह्या रॉकेट च्या सफल प्रक्षेपणामुळे भारताची दुसऱ्या देशांवर असलेल परावलंबित्व तर संपुष्टात येईलच पण जवळपास निम्म्या खर्चात आपण हे उपग्रह स्वबळावर प्रक्षेपित करू शकणार आहोत. ह्या रॉकेट मध्ये पहिल्या भागात किंवा स्टेज मध्ये एस २०० सॉलिड रॉकेट बुस्टर असतात. जे १३० सेकंद जळून ५०० टन इतक बल निर्माण करतात. हि स्टेज संपण्याआधीच दुसरी स्टेजच प्रज्वलन होते ह्यात एल ११० लिक्विड स्टेज विकास इंजिन प्रणाली वापरली जातात. ह्यामुळे ११० टन बल निर्माण होते. ११३ सेकंदानंतर हि स्टेज सुरु होऊन २०० सेकंद चालते. तिसरी व सगळ्यात महत्वाची स्टेज म्हणजे क्रायोजेनिक अप्पर स्टेज. ह्याच स्टेज साठी लागणार तंत्रज्ञान आजवर भारताला देण्यात आल नव्हत. पण स्वतःच्या हिमतीवर भारतीय व स्पेशली इस्रो च्या अभियंत्यांनी हे इंजिन बनवून यशस्वी करून दाखवलं. ह्यात सी ई २० क्रायोजेनिक इंजिनांचा वापर केला जातो. २० टन वजनाच इंधन ह्या प्रक्रियेत जाळून उपग्रहाला योग्य कक्षेत नेल जाते.
जी.एस.एल.व्ही मार्क ३ ची सध्या जरी ४ टन वाहून नेण्याची क्षमता असली तरी ह्याच्या पुढील विकसित भागात ७-८ टन वजन भूस्थिर कक्षेत वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. मार्क ३ च प्रक्षेपणाचा दिवस ह्या साठी निर्णायक ठरणार आहे कि ह्याच रॉकेट मधून एक दिवस भारतीय अंतराळवीर अवकाशात प्रवेश करणार आहे. त्याच सोबत चांद्रयान-२ सारख्या मोहिमेत ह्याच रॉकेट चा वापर होणार आहे. ह्याच शक्तिशाली रॉकेट चा वापर करून आपण मंगळावर किंवा इंटर प्लानेटरी प्रवास करू शकणार आहोत. ह्या रॉकेट मुळे भारतच परकीय चलन वाचणार तर आहेच पण येत्या काळात इस्रो आणि भारतासाठी पी.एस.एल.व्ही प्रमाणे परीकीय चलन निर्माण करण्याची ताकद ह्या रॉकेट मध्ये आहे. पुढील काळात अनेक कम्युनिकेशन उपग्रहांची गरज भासणार आहे. अश्या वेळेस कमीत कमी किमतीत सेवा उपलब्ध करून देणारा किंग मेकर ठरणार आहे. पी.एस.एल.व्ही ने जो दबदबा कमी आणि हलक्या वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणात केला आहे. तसाच लौकिक जर मार्क ३ ने घडवला तर येणाऱ्या काळात भारतात उपग्रह प्रक्षेपणासाठी वेटिंग लिस्ट लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.
१९९२ ते ५ जून २०१७ हा खूप मोठा प्रवास आहे. ह्या सगळ्या प्रवासात अनेक कटू अनुभव इस्रो च्या अभियंता आणि वैज्ञानिकांनी पचवले आहेत. आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी जेव्हा मानवी कल्याणाच्या दृष्ट्रीने उपयोगी असणार तंत्रज्ञान जेव्हा नाकारलं जाते. तेव्हा ते निर्माण करताना अनेक अपयशांची चव आणि अनेक अडथळे पार करावे लागतात. हे सर्व करत सगळ्या चाचण्या यशस्वी करत खऱ्या परीक्षेची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. अर्थात यशस्वी होण्याची खात्री भारताला आहेच. ह्या पूर्ण कालावधीत भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मेहनत घेतलेल्या इस्रो च्या आजी- माजी अभियंते आणि वैज्ञानिक ह्यांना सलाम.

फुसकी दर्पोक्ती... विनीत वर्तक

भारतीय सेनेने पाकिस्तानी बंकर उध्वस्त केल्याची चित्रफित भारतीय मिडिया आणि जनतेसमोर येताच पाकिस्तानी सेनेला घाम फुटला असेल. कोणत्याच पातळ्यांवर आपण भारताच्या सैन्य ताकदीशी मुकाबला करू शकत नाही ह्या वास्तवाची जाण त्यांना आहे. पण उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या उक्तीने पाकिस्तान ने आपल विमान सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच युद्धभूमीच्या आसपास उडवून आपण लढायला तयार आहोत असा संदेश द्यायचा प्रयत्न केला.
आपण इकडे एक लक्षात घेतले पाहिजे कि विमान आपल्याच भागात हवेत उडवण आणि युद्ध करणे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भारताच हवाई सामर्थ्य आणि पाकिस्तानी हवाई सामर्थ्य ह्यांचा हा खाली घेतलेला आढावा.
भारताच्या भात्यात असलेली लढाऊ विमाने
१) सुखोई ३० एम के आय – २२०- २७२ च्या आसपास
२) मिग २९ – संख्या ६९
 ३) एच ए एल तेजस
४) मिराज २००० – संख्या ५१
पाकिस्तान कडे असलेली लढाऊ विमाने
 १) जे. एफ १७ थंडर – संख्या ५९
२) एफ १६ फाल्कन – संख्या ७६
३) डसाल्त मिराज ३ – संख्या ७५
पाकिस्तान च्या सर्वात प्रथम फळीतील जे. एफ. १७ ची तुलना सुखोई तर सोडाच पण तेजस शी पण होऊ शकत नाही आहे. जे. एफ. १७ हे एकावेळेस १० टार्गेट चा मागोवा घेऊ शकते तर तेजस एकाच वेळेस ६४ टार्गेटचा मागोवा घेऊ शकते. जे. एफ. १७ हे मेटल अलॉय पासून बनलेलं आहे. तर तेजस हे कार्बन काम्पोझीट आणि टायटेनियम पासून बनलेलं आहे. ह्यामुळे जे.एफ. पेक्षा वजनाने हलक असूनसुद्धा त्याच्या पेक्षा जास्ती दणकट आहे.
भारताच्या सुखोई ३० एम. के. आय ला कोणतच उत्तर पाकिस्तान कडे नाही आहे. सुखोई ३० एम. के. आय. हे एअर सुपिरीयाटी फायटर प्लेन आहे. खर सांगायचं झाल तर ते आकाशावर राज्य करते. ३०० मीटर/ सेकंद वेगाने हवेत उंची गाठत ३००० किमी चा पल्ला माख २ वेगाने गाठू शकते. एकाच वेळी ६ वेगवेगळ्या शत्रू शी लढू शकते. तसेच मेटोर, ब्राह्मोस, हि खतरनाक क्षेपणास्त्र तर अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. तसेच सुखोई थ्री डी कसरती करू शकते. पुगाचेव कोब्रा हे सगळ्यात कठीण अशी हवेतील कसरत करण्यात सुखोई जगात प्रसिद्ध आहे.
हे फक्त झाल लढाऊ विमानांच्या बाबतीत बॉम्बर, चॉपर, आणि हवाई सामुग्री वाहून नेण्याच्या बाबतीत हि पाकिस्तान कुठे आसपास पण नाही. तसेच पुढल्या ५-७ वर्षात भारतीय हवाई दलात समाविष्ट होणारी यादी बघितली तरी पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकून जाईल. आधीच सक्षम असलेल्या भारतीय हवाई दलात सुखोई च्या बरोबर राफेल , एफ.जी.एफ.ए, तेजस हि एकापेक्षा एक सरस विमाने व आपाचे सारखी हेलीकोप्टर समाविष्ट होत आहेत. ब्राह्मोस सारख्या जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्र भात्यात असलेल सुखोई पाकिस्तान ला उफ करायची पण संधी देणार नाही. हे पाकिस्तान ला चांगलच माहित आहे.
विमानांच्या जोडीला ते चालवणारे वैमानिक आणि रडार तसेच जी.पी.एस. उपग्रह यंत्रणा भारताची कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे. सियाचीन सारख्या उंच युद्धभूमीवर आणि विषम परिस्थतीत लढाऊ विमान चालवण्यात भारतीय वैमानिक जगात सर्वश्रेष्ठ समजले जातात. म्हणून अमेरिका सुद्धा त्यांच्या वैमानिकांना भारतात प्रशिकक्षणासाठी पाठवते. त्यामुळे नुसत विमान उडवून फुसक्या दर्पोक्ती ने काही होत नाही. जेव्हा भारतीय विमान उडतील तेव्हा पाकिस्तान देवाला हाक मारण्याशिवाय काही करू शकत नाही. अर्थात भारताच्या हवेतील अधिराज्यामुळे त्या वेळेला देव पण काही करू शकणार नाही हा भाग वेगळा. ह्याची जाणीव पाकिस्तान ला पुरेपूर आहे. तूर्तास उडवून दे किती उडवायची ती. हम जब उडेंगे तब तुम आखरी सासें गिनोगे.

विदर्भाचा स्वर्ग “आनंद सागर”... विनीत वर्तक

शेगाव म्हंटल कि आनंद सागर च नाव समोर आल्यावाचून राहवत नाही. गेल्या आठवड्यात शेगाव वर लिहिताना आनंद सागर बद्दल मुद्दामून लिहण्याच टाळल कारण हा एक वेगळाच विषय आहे. आनंद सागर हे शेगाव मंदिराच्या २ किलोमीटर अंतरावर वसवण्यात आल आहे. संत गजानन महाराज शेगाव ह्या संस्थानाने ह्याची निर्मिती केली आहे. विदर्भा सारख्या पाऊस कमी पडणाऱ्या आणि पाणाच्या समस्येने नेहमीच ग्रासलेल्या भागात एका उद्यान, अध्यात्मिक केंद्र तसेच ध्यान केंद्राची रचना करून शेगाव संस्थेने विदर्भात स्वर्गाची रचना केली आहे अस म्हंटल्यास वावग ठरणार नाही.
३२५ एकर इतक्या प्रचंड जागेवर वसलेले आनंद सागर मध्ये तब्बल ५०,००० हून जास्त वृक्ष संपदा आहे. हजारो वेल हि ह्या जागेमध्ये वसवून त्याचं संवर्धन करण्यात आलेल आहे. विदर्भा सारख्या पाउस कमी पडणाऱ्या जमिनीत सुद्धा इतकी वृक्षसंपंदा निर्माण करणे किती जिकरीच असेल हे नेहमीच छोट झाड लावून त्याकडे दोन दिवसांनी न बघणारे अनेक महाभाग सांगू शकतील. झाड लावण सोप्प पण त्याचं जतन करून वृक्ष वेलींची सुबत्ता निर्माण करण हिमालय चढण्याइतकच कठीण काम आहे. पाण्याचं दुर्भिक्ष तसेच उन्हाळ्यातील तापमान अश्या दोन्ही टोकांच्या गोष्टीत वृक्ष संपंदा आजही आनंद सागर मध्ये वर्षाचे सगळे दिवस आपल लक्ष वेधून घेते. ह्या मागे मेहनत आहे ती संत गजानन महाराज संस्थांनाची.
इतक मोठ उद्यान व्यवस्थित ठेवण्यासाठी तितकीच पाण्याची गरज होती. ह्यासाठीच शेगाव संस्थानाने ९ किमी लांब असलेल्या मन नदीतून पाण्याची व्यवस्था केली. ह्यासाठी दर महिन्याला ५० लाख रुपयांचा खर्च संस्थानाला उचलावा लागणार होता. तरीसुद्धा शेगाव मध्ये स्वर्ग बनवण्यासाठी हा उचलण्याची तयारी संस्थानाने दाखवली. त्यातून जे निर्माण झाल ते समोर आहेच. ५० एकर जागेवर एक कृत्रिम तलाव निर्माण झाला. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी सुद्धा वर्षभर ह्या तलावामुळे जमिनीत पाणी मुरत असते. ह्या तलावामुळे इथल्या भागातील पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे.
अध्यात्म आणि नाविन्य ह्यांचा संगम टिकवून ठेवताना उद्यानांच प्रचंड मोठ प्रवेशद्वार हे राजस्थान च्या कारागिरांनी आपल्या कुशल कौशल्याने घडवल आहे. आत शिरताच भारतातील १८ राज्यांच प्रतिनिधित्व करणाऱ्या १८ संतांच्या प्रतिमा गोलाकार रचनेत आहेत. मध्यभागी संत श्री गजानन महाराज ह्यांची प्रतिमा असून एक विलोभनीय दृश्य बघणाऱ्याच्या नजरेत भरते. आत समोर जाताच भव्य तलाव आपली नजर खिळवून ठेवतो. त्यावरील झुलता पुलावर जाणे म्हणजे वेगळीच जाणीव आहे. पूर्ण तलाव इतका मोठा आहे. कि त्याच्या भोवती जायला १-२ तासाचा अवधी लागतो. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ह्याच प्रतिरूप असलेल ध्यानमंदिर म्हणजे स्वर्गीय अनुभव. “Divine progress through Meditation” ह्या तत्वाला जागून इथला मेडीटेशन चा अनुभव घेतल्यावर असीम शांतता आणि समाधान मिळते.
नुसत हिंदू धर्माच प्रतिनिधित्व न करता इकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दोन्ही टोकांचा अनुभव मिळावा म्हणून मुलांना खेळण्यासाठी पार्क, ट्रेन, म्युजीकल कारंजे, मत्स्य संग्रहालय, अनेक लहान- मोठी मंदिरे आहेत. प्रत्येक ठिकाणी सेवेकरी आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत. प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृद्धांसाठी व्हील चेअर, लहान मुलांसाठी बाबा गाडी पासून अगदी छत्री पर्यंत भाविकांच्या सुविधेसाठी व्यवस्था केली आहे. इतक प्रचंड मोठ उद्यान अतिशय स्वच्छ आणि टापटीप आहे. पूर्ण उद्यान फिरायला तब्बल ५-६ तासांचा अवधी लागतो. चालत किंवा बोटीने पण आपण ह्या उद्यानाचा आनंद घेऊ शकतो.
इतक मोठ प्रोजेक्ट पहिल्यांदा मनात येण. त्याचा प्लान तयार करण आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक असलेला असा भव्यदिव्य प्रकल्प वेळेत पूर्ण करून आजहि त्याची अध्यात्मिक आणि त्यातल नाविन्य टिकवून ठेवण हे नक्कीच अदभूत अस आहे. महाराजांचा आशीर्वाद आणि प्रामाणिक नेतृत्व ह्या शिवाय हे अशक्य आहे. सेवाभाव मनात ठेवून रोज तब्बल ३० हजार भाविकांची व्यवस्था, त्यांना अध्यात्मिक आनंदाबरोबर नाविन्याचा अनुभव देताना महाराजांचं अस्तित्व जपण हे शब्दानपलीकडे आहे. विदर्भासारख्या ठिकाणी आनंद सागर सारखा स्वर्ग बघण त्याचा आनंद घेण हा नक्कीच वेगळा अनुभव आहे. हा स्वर्ग घडवणाऱ्या सर्वच सेवेकरी आणि संस्थानाला माझा नमस्कार.

हिडन फिगर्स... विनीत वर्तक

हिडन फिगर्स हा आत्ताच आलेला एक अप्रतिम चित्रपट पाहिला. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेऊनच हॉलीवूड मधील चित्रपट समोर येतात. कोणाच्या तरी आयुष्यावर बेतलेला असून सुद्धा चित्रपट अनेक कंगोरे समोर मांडतो. चित्रपटाच्या नावाने असलेल्या मार्गोट ली शेटरली ह्या लेखिकेच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. नासा म्हणजेच न्याशनल एरोनोटीक्स एंड स्पेस अड्मीनीस्ट्रेशन मध्ये काम करणाऱ्या आफ्रिकन अमेरिकन महिलां म्हणजेच क्याथरीन जॉन्सन, डोरोथी वॉगन आणि मेरी ज्याक्सन अश्या तीन कर्मचाऱ्यानवर हा चित्रपट भाष्य करतो.
लहानपणापासून गणितात हुशार असणारी क्याथरीन हि नासा मध्ये गणित तज्ञ म्हणून कामाला असते. गणितातील अनेक प्रमेय, कोडी चुटकीसरशी सोडवणारी व त्याच वेळी अंकांवर प्रेम असलेली क्याथरीन उपग्रहांच्या कक्षा तसेच त्याच्या उड्डाणाच्या रस्त्याच गणित सोडवण्याच काम करत असते. इकडे एक लक्षात घ्यायला हव कि हा सर्व काळ कॉम्प्युटर तयार होण्यापूर्वीचा आहे. ज्यावेळी किचकट अशी गणितातील प्रमेय आणि आकडेमोड करण्यासाठी अश्या हुशार व्यक्तींची खास गरज असायची.
क्याथरीन सोबत तिच्या दोन मैत्रिणी म्हणजेच डोरोथी आणि मेरी ह्या पण नासा च्या वेगळ्या विभागात काम करत असतात. डोरोथी नासा मध्ये सुपरवायजर तर मेरी इंजिनियर म्हणून कार्यरत असते. नासा सारख्या स्वप्नवत ठिकाणी काम करत असताना सुद्धा त्या काळी महिलांना स्पेशली आफ्रिकन- अमेरिकन महिलांना कशी दुय्यम वागणूक दिली जायची व एक स्त्री आणि पुरुष ह्यातील भेदभाव कसा केला जायचा ह्याच चित्रच ह्या चित्रपटाने मांडल आहे.
रशियाने अमेरीकेआधी उपग्रह सोडल्याने नासा वर ह्या शर्यतीत पुढे जाण्याच आव्हान उभ रहाते. त्याच वेळेस चुटकीसरशी आकडेमोड करणाऱ्या क्याथरीन ला सेप्स टास्क ग्रुप मध्ये कार्यरत होण्याची संधी मिळते. ह्या बिल्डींग मध्ये काम करणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला म्हणून तिला अनेक आव्हानांना, नजरांना आणि अनेक संकटाना सामोरे जावे लागते. ह्यातून तिचा प्रवास म्हणजे एक स्त्री आणि एक आफ्रिकन- अमेरिकन स्त्री जी दोन्ही स्तरावर म्हणजे पहिल्यांदा स्त्री म्हणून तर नंतर रंगामुळे तिच्या क्षमतांवर संशय घेतला जातो. तेव्हा ती स्वतःला कस सिद्ध करते ते चित्रपटात बघण चांगल.
एकीकडे क्याथरीन आपल्या नवीन जबाबदारी वर लढत असताना डोरोथी पुढे अडचणी वाढत जातात. आय.बी.एम. च्या नवीन कॉम्प्युटर मुळे आपला जॉब जाणार अस दिसत असताना व सतत काळ्या रंगाने रंगभेद अनुभवताना डोरेथी कशी आपल्या हुशारीने गोष्टी वळवते ते बघण म्हणजे एका स्त्री चा लढा बघण. आपल्याकडे बुद्धी असूनही फक्त रंगामुळे अमेरिकेन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मेरी ला पण अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. ती त्यात यशस्वी होते का? ह्या तिघींचा प्रवास कसा होतो? त्यात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय उलथापालथी होतात? हे सर्व अनुभवयाच असेल तर बघयला हवा हिडन फिगर्स.
ह्या तिन्ही व्यक्तिरेखा खऱ्या असून अमेरिकेत त्यांनी दिलेल्या नासाच्या योगदानात किंबहुना अमेरिकेला अवकाशात नंबर एक वर पोचवण्यात ह्या तिन्ही स्त्रियांचं खूप वाटा आहे. क्याथरीन जॉन्सन आता ९८ वर्षाच्या आहेत. १९५३ ते १९८६ त्यांनी नासा मध्ये काम केल. त्यांनी नासा ला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना २०१५ साली प्रेसिडेंशीयल मेडल ऑफ फ्रीडम देण्यात आल. अमेरिकेतील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तसेच नासाने ल्यान्गली रिसर्च सेंटर च्या बिल्डींग ला क्याथरीन जॉन्सन ह्याचं नाव दिल आहे. अश्या आपल्या प्रतिभेने अमेरीकेच नाव अवकाश क्षेत्रात उज्ज्वल करताना ह्या सर्वांनी एक स्त्री म्हणून आपली छाप पडताना खरोखरीच हिडन फिगर्स ह्या चित्रपटाच नाव सार्थक केल आहे. अवकाश तंत्रज्ञानात आपल्या प्रतिभेने स्त्री ला सन्मान देणाऱ्या ह्या तिघीसाठी तरी हा चित्रपट बघयला हवाच.

ईटा करीना... विनीत वर्तक

ईटा करीना हे नाव सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने खूपच अपरिचित असेल. हि एक ताऱ्यांची रचना आहे ज्यात दोन तारे आपसात एकाभोवती फिरत आहेत. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच दोन तारे एकमेकानभोवती फिरत आहेत. ईटा करीना अशीच एक रचना आहे पण विश्वात असणाऱ्या अनेक ताऱ्यान पेक्षा ईटा करीना वेगळी आणि खूप महत्वाची आहे. ज्यात ह्या दोन्ही ताऱ्यांचा प्रकाश हा सूर्याच्या प्रकाशापेक्षा ५ मिलियन पटीने जास्त आहे. ७५०० प्रकाशवर्ष इतक्या दूरवर हे तारे पृथ्वीपासून आहेत. ( एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जितक अंतर कापेल ते अंतर. प्रकाशाचा वेग सुमारे ३,००,००० किलोमीटर / प्रती सेकंद)
ईटा करीना रचनेत एक तारा सूर्यापेक्षा १०० पट मोठा आहे. इतक्या प्रचंड मोठा ताऱ्याच्या जवळच तितकाच दुसरा मोठा तारा आहे. सूर्यापासून शनी ग्रह जितका लांब आहे. तितकच हे अंतर आहे. आपल्याला हे अंतर जास्ती वाटल तरी अवकाश अंतराच्या मानाने हे अगदी कमी आहे. तारा प्रकाशमान असतो तेव्हा त्यावर खूप अणुविखंडन प्रक्रिया सुरु असतात. ह्या प्रक्रियेतून निर्माण झालेली उर्जा आणि प्रकाश हेच ताऱ्याला प्रकाशमान करत असतात. ताऱ्याच्या मधून निघणारी उर्जा आणि विकिरण हे बाहेरच्या दिशेने प्रचंड बल निर्माण करते. पण त्याच वेळी ताऱ्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्याच गुरुत्वीय बल हे उलट्या दिशेने कार्यरत असते. ह्या दोघातील समानता ताऱ्याला एकसंध ठेवते. म्हणजे ह्या दोघातील कोणतही बल जर कमी जास्त झाल तर ताऱ्याचा अस्त ठरलेला आहे.
जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याच आयुष्य. ज्या वेळेला ताऱ्याच आयुष्य संपुष्टात येत असते. तेव्हा नुक्लीयर फायर किंवा अणुकेंद्रीय विखंडन आणि गुरत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो. सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. हि जास्ती नसली तरी तिचा पृथ्वीवर खूप मोठा परिणाम होईल. त्या नंतर सूर्याच आकारमान इतक वाढत जाईल कि बुध, शुक्र ग्रह तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल. तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल.
प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत अस होईल अस नाही. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. ईटा करीना च्या बाबतीत ते वेगळ आहे. ईटा करीना मधील रेडीयेशन बल इतक प्रचंड आहे कि त्याच्या गुरुत्वीय बलाला वरचढ ठरते. ह्यामुळे त्यातील समतोल राखण अशक्य होत जाईल. रेडियेशन बल इतक प्रचंड होईल कि त्यामुळे ह्या ताऱ्याचा विस्फोट होईल. कदाचित झाला हि असेल. कारण आपण आत्ता उघड्या डोळ्यांनी जो ईटा करीना चा प्रकाश बघत आहोत तो ७५०० वर्षापूर्वीचा आहे. इतक्या प्रचंड मोठ्या ताऱ्याचा स्फोट मानवजातीच्या पूर्ण प्रवासात कोणीच बघितलेला नाही. त्यामुळेच जेव्हा तो होईल तेव्हा तो असेल एक हायपरनोव्हा. सुपरनोव्हा एक फटाक्याचा आवाज वाटेल इतक्या प्रचंड मोठ्या ताकदीचा स्फोट. त्याच्या आसपास जर एखादी सोलार रचना असेल तर त्यांचे दिवस भरले म्हणून समजा. ह्या स्फोटातून नुसता प्रकाश आणि उर्जा नाही तर एक्स रे आणि ग्यामा रे चा इतका प्रचंड स्त्रोत आजबाजूच्या पूर्ण ग्रह, तारे, सोलार सिस्टीम आणि पूर्ण अवकाशात फेकला जाईल. अगदी शंभर ते हजारो प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रह, तारे आणि आकाशगंगा वर ह्या रेडीयेशन चा परिणाम जाणवेल. त्याचं पूर्ण आयुष्य किंवा भविष्य बदलवण्याची ताकद ह्या विस्फोटात असेल.
आपल्या डोक्यात आलच असेल मग ह्याचा पृथ्वीवर काय परिणाम तर पृथ्वी ७५०० प्रकाशवर्ष ह्या ताऱ्यापासून लांब आहे. कोणतही रेडीयेशन हे अंतर वाढताच कमालीच घटते. इतक्या लांब असून सुद्धा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून हा तारा विस्फोट झाल्यावर चंद्राइतका प्रखर, तेजस्वी उघड्या डोळ्यांनी दिसेल. त्यातून पृथ्वीवर आपटणाऱ्या ग्यामा आणि एक्स रे जरी पृथ्वीच्या जीवनमानावर फरक नाही करू शकले तरी नक्कीच चुंबकीय क्षेत्र तसेच इतर गोष्टींवर परिणाम करतील अस अनुमान आहे. ईटा करीनाचा विस्फोट किंवा हायपरनोवा नक्कीच अवकाशात बघण एक वेगळा अनुभव असेल. प्रचंड अश्या ताऱ्याचा मृत्यू याची देही डोळा बघण म्हणजेच आपण किती सूक्ष्म आहोत ह्याचा अनुभव घेण हे सगळ खूप रोमांचक असेल. एक प्रश्न आपण ह्या निमित्ताने स्वतःला विचारूयात कि इतक्या प्रचंड मोठ्या ईटा करीना ताऱ्याला हि मृत्यू चुकला नाही तर आपण कोण? नाही का?

म्याकुले, लिंडसे आणि रेखा... विनीत वर्तक

म्याकुले, लिंडसे आणि रेखा हि तिन्ही नाव कदाचित आपल्याला परिचित किंवा अपरिचित असतील पण त्याचं आयुष्य मात्र नक्कीच अपरिचित असेल. ह्या तिघांमध्ये हि एक समान दुवा आहे तो म्हणजे ह्या सर्वांनी आपली सुरवात बाल-कलाकार म्हणून केली. यशाची चव अगदी लहान वयातच चाखली. पण अवघ्या १० वर्षांच्या प्रवासात कोणी रसातळाला गेल तर कोणी ६० वर्षानंतर हि आपल्या सौंदर्याने भुरळ घालते आहे.
होम अलोन चित्रपट बघितला नसेल किंवा ऐकल नसेल अस कोणीतरी आपल्या पिढीत तरी मिळण कठीणच. घरात चुकून राहिलेला एक लहान मुलगा आपल्या चतुराईने घराचा सांभाळ कसा करतो. त्याचवेळी त्याच्या भीती आणि मनातील आठवणी चा एक सुंदर मिश्रण म्हणजेच हा चित्रपट. ह्या चित्रपटात मुख्य हिरोची म्हणजेच लहान मुलाची भूमिका करणारा म्याकुले कल्कीन हा त्या वेळेस पूर्ण जगात प्रसिद्ध झाला. जगातील दोन नंबरचा सगळ्यात यशस्वी बाल कलाकार अशी बिरुदावली मिरवणारा म्याकुले त्याच्या तारुण्यात कुठे हरवून गेला कोणालाच कळले नाही.
वयाच्या ४ थ्या वर्षी पासून आपल्या निखळ अभिनयाने जगातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या म्याकुले खरा प्रसिद्ध झाला ते होम अलोन पासून. पण म्हणतात न यशाची धुंदी अनेक वाईट प्रवृत्तींना जवळ करते. प्रसिद्धीवर राहण्याची नशा मग हळूहळू अनेक वाईट प्रवृत्तींना जन्म देते. अस म्हणतात कि यश मिळवण खूप सोप्प असते पण ते टिकवून ठेवण सगळ्यात कठीण. तसच म्याकुले च्या बाबतीत झाल. पैसा, प्रसिद्धी ह्यामुळे वाईट सवयी लागल्या. कोकेन, मारिजुआना सारख्या अमंली पदार्थांच्या आहारी गेल्यावर त्यातून म्याकुले चा प्रवास कधीच सावरू शकला नाही. एक- दोन चित्रपटांशिवाय हाताशी काहीच काम लागल नाही. मारिजुआना बाळगल्या प्रकरणी २००४ साली त्याला अटक हि झाली. नशेच्या आहारी गेलेल्या म्याकुले कदाचित कोर्टाच्या शिक्षेपासून स्वतःला सोडवू शकला पण ह्या अमंली पदार्थांचे वाईट परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागले. लहानपणी अगदी हवाहवासा वाटणारा म्याकुलेकडे आता बघवत हि नाही.
लिंडसे लोहान अशीच एक गुणवंत अभिनेत्री. बबली पण गोड असा चेहरा असणारी हि अभिनेत्री लहानपणापासून क्यामेरा समोर आली. लिंडसे च्या त्या रूपाने अनेकांना वेड लावले. एकामागोमाग एक सुंदर चित्रपट देणाऱ्या लिंडसे च्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र यशाची धुंदी चढत गेली. त्याचा परिणाम म्हणजे अनेक वाईट गोष्टींच्या आहारी लिंडसे जात राहिली. अमंली पदार्थ जसे कोकेन जवळ बाळगल्या प्रकरणी तिला अटक पण झाली. अंधाधुंद गाडी चालवल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल झाले. ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या कामगिरी वर होत तर होताच पण अमंली पदार्थांच्या सेवनाने तिच्या चेहऱ्याची पूर्ण वाट लागली. एकावेळी बघता क्षणी प्रेमात पाडणाऱ्या तिच्या चेहऱ्याकडे आता बघवत पण नाही.
अमंली पदार्थ आपल्याला दोन मिनटांची मज्जा तर देतात पण आपल्या शरीरावर अश्या खुणा सोडतात ज्याची भरपाई कधीच होत नाही. म्याकुले आणि लिंडसे हि दोन्ही उदाहरण म्हणजे आजची पिढी जी कोकेन किंवा एक्स्टसी देणाऱ्या पदार्थांच्या आहारी किंवा निदान काहीतरी वेगळ म्हणून चव घ्यायचा प्रयत्न करते. त्या सगळ्यांनी एकदा म्याकुले आणि लिंडसे च्या अवघ्या १० वर्षातील प्रवास आणि त्यांच्या फोटोनकडे एकदा बघावं. हवेहवेसे वाटणारे चेहरे अगदी ई हे काय? अशी प्रतिक्रियेकडे येतात. तेव्हा त्या मागे ह्याच अमंली पदार्थांनी शरीराची केलेली हानी दिसून येते. १९८० सालचा म्याकुले आणि १९८६ साली जन्मलेली लिंडसे अवघ्या तिशी मध्ये साठीमधील दिसू लागले आहेत.
बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केलेली ६२ वर्षाची रेखा मात्र अजूनही तिशी मधील दिसते. ह्याच कारण तिने स्वतःची घेतलेली काळजी व पर्यायाने शरीराची. यशाच्या व अपयशाच्या गर्तेत राहून सुद्धा तिने स्वतःला सावरल. एक जास्त वजन आणि सर्वसाधारण रूप असणाऱ्या रेखाने स्वतःला सुंदर,काळाच्या पलीकडे आजही बघता क्षणी हृदयात उफ होणार अस स्वतःच सौंदर्य निर्माण केल.
अमंली पदार्थांच सेवन बंद केल म्हणजे आपण त्यातून बाहेर येतो अस नसते. त्यांनी केलेल्या शरीरावरच्या जखमा ह्या न भरून येणाऱ्या असतात. लहान वयात यशाची धुंदी कुठे नेऊ शकते ह्याचा बोध आपण म्याकुले आणि लिंडसे वरून घ्यायला हवा. तर मिळालेलं यश आणि सौंदर्य आयुष्यभर पण टिकवता आणि अजून सुंदर करता येऊ शकते ह्याचा बोध आपण रेखा कडून घ्यायला हवा. यशाची धुंदी न चढता त्याचा आदर करण आपल्याला शिकायला हव. आज अनेक प्रलोभन आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक बालकलाकार उदयाला येत आहेत. त्यांना मिळणार यश हि तितकच मोठ आहे. ते आयुष्यभर टिकवून आणि जमिनीवर राहण्यासाठी त्यांना म्याकुले, लिंडसे आणि रेखा ला ओळखता आणि समजून घ्यायला हव.

२१ व्या शतकातील देवस्थान शेगाव... विनीत वर्तक

गेले अनेक दिवस मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. भारतातील सर्वात सुंदर देवस्थान निदान माझ्या दृष्टीने तरी असलेल अस शेगाव बघण्याचा योग जुळून आला. मुंबई वरून शेगाव जवळपास ५६० किमी अंतर त्यामुळे इतक्या लोंग ड्राईव चा योग कोण सोडणार. मग काय मुंबई वरून ५:३० ला निघून नाशिक नंतर तिकडून येवला मार्गे औरंगाबाद गाठलं. औरंगाबाद ते जालना आणि मग तिकडून सिंदखेड राजा- खामगाव असा प्रवास करत संध्याकाळी ६:३० ला शेगाव मध्ये पोचलो. निवासाची व्यवस्था आधीच झाली असल्याने गाडी आनंद विहार इकडे वळवली.
आनंद विहार खरोखर आनंदायी होत. गाडी आत वळवताक्षणी आपण दुसरीकडे कुठे नाही न आलो? असच वाटू लागल. विदर्भात असूनही सगळीकडे हिरवीगार झाड. ज्यासाठी शेगाव प्रसिद्ध आहे ती स्वच्छता सगळीकडेच दिसत होती. आनंद विहार मध्ये आल्यापासून सगळीकडे दिशादर्शक फलक. पार्किंग ची उत्कृष्ठ व्यवस्था हे पाहून सुखावतो नाही तोच समोर समान नेण्यासाठी ट्रोली बघून नक्कीच आपण २१ व्या शतकातील एका देवस्थानाला भेट देत आहोत ह्याचा पदोपदी अनुभव येत होता. चौकशी च्या ठिकाणी अगदी ५ मिनिटांत रूम च्या चाव्या सुपूर्द. सगळी यंत्रणा अगदी चोख. कुठेही उर्मटपणा, कंटाळा ह्याचा लवलेश हि चेहऱ्यावर नाही. सेवाभाव हेच ब्रीदवाक्य ठेवत अगदी चोख व्यवस्था.
आनंद विहार मधील रूम बघून जागीच थबकलो. उत्कृष्ठ हि शब्द कमी पडतील अशी रूम. वातानुकुलीत व्यवस्थेपासून ते अगदी रूम मधील साबणाच्या वडीपर्यंत सर्वच एका फाईस्टार हॉटेल ला लाजवेल अशी व्यवस्था. गेल्या १३ तासापासून ड्राईव केल्याने आलेला शीण अगदी २ मिनिटात पळाला. चौकशी करताच असलेली चहा कॉफी ची व्यवस्था, बिस्किटा पासून ते औषधापर्यंत सगळ काही तिकडे अगदी बिग बझार च्या सेल पेक्षा कमी भावात. २४ तास तयार असणारी रुग्णवाहिका, आपत्कालीन स्थितीत जाण्याची व्यवस्था, आपण कुठे आहोत ते पूर्ण परिसराचा नकाशा, नियम सगळच क्लास. देवस्थानाला जाण्यासाठी बसेस च्या वेळा, त्या थांब्यावर बसण्यासाठी केलेली व्यवस्था सगळच आपण एखाद्या परक्या देशात आहोत असाच भास व्हावा. पूर्ण परिसरात झाडाच एक पान मला शोधून सापडल नाही जिकडे आक्खा परिसर झाडांनी वेढलेला आहे इतकी स्वच्छता.
महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश घेताच मेटल डिटेक्टर तसेच सुरक्षा रक्षक ह्यांनी केलेली तपासणी. करायची म्हणून नाही तर सगळ्या मशीन योग्य कार्यरत. माझ्या वडिलांच्या ब्याग मध्ये चुकून राहिलेली कात्री अगदी नम्रपणे बाजूला काढून ठेवून दर्शन झाल्यावर परत मिळण्यासाठीची व्यवस्था ह्याच मार्गदर्शन. पादत्राणे ठेवण्यापासून ते उष्णतेने पाय भाजू नये म्हणून पूर्ण चालण्याच्या मार्गावर गालिचे तसेच स्पेशल रंगाचा लेप त्यामुळे बाजूची लादी प्रचंड गरम असताना सुद्धा ह्या लेपामुळे पायाला अजिबात चटका बसत नाही. रांगेत उभ राहण्याआधी दर्शनाला लागणारा कालावधी मिनटामिनटाला भल्यामोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर अपडेटेड. रांगेत पदोपदी सेवेकरी, कुठेही गडबड गोंधळ नाही. न बोलता फक्त दिशा सांगत योग्य रीतीने पुढे जाणारी रांग. रांगेत सगळीकडे कुलर, पंखा तसेच पाणी, चहा ह्याची विनामूल्य व्यवस्था. जेष्ठांना बसण्यासाठी तसेच लहान मुलांना दुध पाजण्यासाठी मातृरूम ची व्यवस्था. डॉक्टर व वैद्यकीय व्यवस्था पण रांगेत कार्यरत.
स्तिमित होत जस समाधी च्या जवळ आलो तशी वातानुकुलीत व्यवस्था. कुठेही झुंबड नाही. महाराजांच्या समाधीच दर्शन घेताना कुठेही सुरक्षा रक्षक किंवा तिकडे असलेल्या ब्राह्मण आणि पंडिताकडून पैश्याचा व्यवहार नाही. अतिशय हसत, नम्रतेने पुढे जाण्याची विनंती. दर्शन घेऊन मंदिरात काही क्षण विसवताना सेवेकर्यांची सेवा बघून थक्क झालो. शांतता राखा अस सांगण्याची पद्धत म्हणजे बोलणाऱ्याला लाज वाटावी. समोर येऊन एकही शब्द न बोलता समोर धरलेल्या पाटीवरील सूचना वाचण्यासाठी केलेली मूक विनंती कि समोरचा वाचताक्षणी शांत. म्हणूनच इथल वेगळेपण टिकून आहे.
महराजांचा सहवास इकडे पदोपदी जाणवतो. एक असीम शांतता मनाला मिळते. इतक्या लांबून इथे येण्याच सार्थक त्या दोन क्षणात पुर्णत्वाला जाते. शेगाव देवस्थानात दान केलेल्या प्रत्येक पैश्याचा उपयोग इकडे भक्तांच्या सोयीसाठी केलेला पदोपदी जाणवतो. म्हणूनच इकडे दान करण मी तरी माझ भाग्य समजतो. ४२ कार्यानपेकी कोणत्याही कार्याला दान करताना मनात एकदा पण किंतु येत नाही. मी दिलेल्या रकमेनंतर देवस्थानांनी मला एक महाराजांची मोठी थ्री डी प्रतिमा दिली. (२१ व्या शतकात असलेला अजून एक अनुभव जिकडे थ्री डी सारखे शब्द आपल्याला त्याची जाणीव करून देतात.) त्या सोबत कापडाचा प्रसाद ( कापड हि साधसुध नाही तर रेमंड च ) देताना पण दोन्ही हात जोडून सेवेसाठी मदत केल्याच धन्यवाद जेणेकरून देण्यार्याला पण त्या देण्याच समाधान मिळाव.
आनंदसागर हा वेगळाच विषय आहे. त्यावर वेगळ लिहेन पण अध्यात्माचा, महाराजांच्या वास्तव्याचा स्पर्श अबाधित ठेवून सुद्धा २१ व्या शतकातील सुविधांनी परिपूर्ण असलेल अस शेगाव देवस्थान भारताच्या काय जगाच्या कोणत्याच कोपऱ्यात मला तरी आढळल नाही. आनंद विहार असो वा आनंद सागर किंवा देवस्थान सगळ्याच ठिकाणी नाव ठेवाव अस काहीच नाही. जेवण, राहण सगळ्याच बाबतीत अगदी कमीत कमी पैश्यात अप्रतिम व्यवस्था देण्यासाठी शेगाव ला तोड नाही.
चंद्रावर पण डाग असतात त्या प्रमाणे आपण हि डाग लावतोच. अभिप्रायाच्या वहीत लिहलेले अभिप्राय वाचत असताना काही गोष्टी अश्याच होत्या. चपाती निट नाही, चहा मशीन चा आहे अश्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात. जिकडे हे सर्व सेवेकरी कोणत्याही वेतनाशिवाय महाराजांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतात. ते काही वेटर आणि आपले नोकर नाही. आनंद विहार हे काही हॉटेल नाही न आपण रिसोर्ट मध्ये आलो आहोत ह्याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यायलाच हवी. कोणत्याही वेतनाशिवाय महिन्याचे सात दिवस सेवा देत ह्या २१ व्या शतकातील देवस्थानाला वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या सर्वच सेवेकर्यांना साष्टांग दंडवत. सेवा म्हणजे काय हे आम्ही तुमच्याकडून शिकायला हव. मोठे मोठे म्यानेजमेंट चे धडे देणाऱ्या सर्वच विद्यापीठांनी शेगाव चा अनुभव एकदा घ्यावाच. इकडे मिळालेली सर्विस हि मनाच समाधान तर देतेच पण आपल्यात तो भाव जागृत करते. माझ्यामते हे कुठेच पाहयला मिळत नाही. म्हणूनच २१ व्या शतकातील शेगाव देवस्थानाच्या सर्व अधिकारी, सेवेकरी ह्यांना सलाम.

पुत्र व्हावा ऐसा... विनीत वर्तक

पुत्र व्हावा ऐसा ह्या लोकमान्य सेवा संघ च्या विलेपार्ले येथील कार्यक्रमाला काल आवर्जून उपस्थिती लावली. असही खूप कमी वेळ मुंबईत असल्याने अनेकदा चांगल्या कार्यक्रमाचा अनुभव घेता येत नाही. चांगल म्हणजे तरी काय? ह्याची व्याख्या लोक आपल्याला हवी तशी लावतात. त्यामुळे सगळेच कार्यक्रम चांगल्याच्या नावाखाली येतात. मग तो अगदी जस्टीन बिबर असेल अथवा एखाद लग्न, मुंज सुद्धा. माझ्यासाठी तरी चांगल ह्या शब्दाचा अर्थ अश्याच कार्यक्रमासाठी लागतो कि जिकडे आपण घड्याळ बघतो ते अजून किती वेळ बाकी आहे त्यासाठी नाही तर इतका वेळ पटकन कसा गेला हे बघण्यासाठी. काल पुन्हा तोच अनुभव आला. घडाळ्याच्या काट्यांनी ८ ला इतक्या लवकर का स्पर्श केल हाच विचार मनात आला. इतक भरभरून मिळत होत कि तो काळ इकडेच थांबवा अस वाटला. सैनिकी भाषेत हाच तो आत्ताचा क्षण पूर्ण जागून घ्यावा असा.
सैनिकी पालकांचे अनुभव, त्यांना आपल्या मुलांविषयी वाटणाऱ्या भावना, त्यांचा प्रवास, त्यांची जडणघडण अस एक,दोन नाही तर दहापेक्षा जास्ती पालकांकडून त्यांच्याच शब्दात ऐकण म्हणजे स्वर्गीय अनुभव. एकतर आपल्या मुलांविषयी असलेला ज्वाज्वल्य अभिमान, त्याच वेळी समाज आणि कुटुंब ह्यांची नव्याचे नऊ दिवस असणारी आस्था, मुलांपासून लांब राहताना त्यांचा प्रवास बघताना जो कि पूर्णतः त्यांच्यासाठी अनभिज्ञ असतो. अश्यावेळी मनात असलेला अभिमान पण क्षणोक्षणी आपल्या मुलांच्या जीवाची असलेली भीती अश्या विचित्र परिस्थतीत पालकांचा प्रवास उलगडताना अनु मावशीने म्हणजेच अनुराधा प्रभुदेसाई नी त्यांच्या अंतरंगाचे अनेक पदर प्रश्नोत्तरातून प्रेक्षकांसमोर उलगडत नेले. सैनिकी नोकरी हि नोकरी असली तरी तो एक धर्म आहे. म्हणूनच त्या धर्माची पूजा हे समजण्याची मानसिकता आपल्या समाजाची अजून झालेली नाही. हि दरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजेच लक्ष फौंडेशन किंवा कालचा आयोजित कार्यक्रम.
सैनिक म्हंटल कि आपल्या समोर पुरुषच येतात. पण ह्या क्षेत्रात स्त्रियांना हि खूप संधी आहेत. आपल्या सैन्यात गेलेल्या मुलीचा अनुभव एका आईकडून ऐकण म्हणजे वेगळाच अनुभव होता. हातावर शहारे तर डोळ्यांच्या कडा ओल्या अश्या विचित्र परिस्थितीमध्ये सगळेच श्रोते होते. अभिमानाने उर भरून तर येत होताच पण एक सातव्या महिन्यांची गरोदर असलेली स्त्री अधिकारी २५० सैनिकांचं नेतृत्व करते ते ऐकताना हात मात्र सलाम ठोकण्यासाठी आपोआप कपाळाकडे जात होता. गरोदर आहे हे कळताच बेड रेस्ट च्या मागे धावणाऱ्या स्त्रिया तर सातव्या महिन्यात पूर्ण गणवेशात सैनिकी शिस्तीने २५० सैनिकांचं नेतृत्व करणारी स्त्री. हे सगळ सांगताना त्या मातेच्या बोलण्यात कुठेच अभिमान आणि गर्व नाही तर हे माझ्या मुलीसाठी एक रोजचा दिनचर्य आहे असच सगळ्या प्रेक्षकांना जाणवत होत. कडक सलाम त्या स्त्री अधिकारी, तिचे कुटुंब आणि भारतीय सेना जे इतक्या प्रचंड जोशाने भरलेले अधिकारी घडवते.
ह्या सगळ्यातून सावरतो न सावरतो तोच अगदी पुढच्या रांगेतून एक सैनिकी अधिकारी उभा राहतो. आपल्याच आईला स्वतःविषयी बोलताना एक सामान्य व्यक्ती म्हणून श्रोत्यांमध्ये बसून ऐकताना स्वतःला इतक जमिनीवर ठेवण खूप कठीण आहे. तो अधिकारी म्हणजे मेजर केदार दळवी. त्याचा प्रवास आईच्या शब्दातून ऐकताना तो सगळ्यांना स्फूर्तीदायक असेल असाच होता. इतके वर्ष भारताच्या सीमांच रक्षण डोळ्यात तेल घालून करताना अश्या एका अधिकाऱ्याला प्रत्यक्ष समोर बसून त्याचे अनुभव ऐकण म्हणजे कालच्या कार्यक्रमाचा परमोच्च क्षण होता अस मला वाटते. सैनिक म्हंटला कि त्यालाच देशप्रेम असते का? त्याला काही भावना नसतात का? त्याला कधी दुखं, आनंद, एकटेपणा जाणवत नसेल का? असे सर्व प्रश्न समोर होते. समाज आणि आपण मात्र देशावर लढताना गोळी लागली कि शहीद म्हणून आपण बोलणार. आर.आई.पी. म्हणून पुढे जाणार आहोत. लंगड देशप्रेम आणि त्याच राजकारण करणारे खालच्या बुद्धीचे राजकारणी, समाज ह्यांच्या पाशातून मुक्त होऊन समाज आणि आपण एका सैनिकाला कधी समजून घेणार आहोत? मेजर केदार च्या शब्दात माझी नोकरी माझा धर्म आहे. धर्मासाठी किंतु वाटण म्हणजेच त्याचा अपमान त्यामुळे वाढदिवस, नवीन वर्ष, दिवाळी हे नंतर आहे. देश हा माझा धर्म आणि तो सगळ्यात आधी.
अरे कुठल्या हाडामांसाची हि माणस बनलेली आहेत? इतक देशप्रेम, इतकी निष्ठा, इतका आदर. धन्य तो अधिकारी, त्याच कुटुंब आणि त्याला घडवणारी भारतीय सेना. मला काल अनेकदा वाटत होत कि मी खरच लायक आहे का? त्याच्या देशप्रेमाला? त्याच्या शौर्याला? एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करतो? तर आम्ही कर भरतो. आम्ही आरक्षण मागतो, आम्ही मनाला येईल तस बिनदिक्कतपणे बोलतो, फेसबुक, व्हात्स अप वर देश आणि त्यांच्या सीमा, सैनिक ह्यांच्यावर लिहितो. राजकारण करतो. आम्ही जस्टीन बिबर, सलमान खान किंवा बाहुबली साठी वेळ काढतो. कारण आम्हाला स्वातंत्र्य आहे. पण जे ह्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात त्या सैनिकाला समजून घ्यायला आम्हाला वेळ नाही. हीच खरी शोकांतिका आहे. आमचे अभिमान हे दीड लाखाच तिकीट काढून शो बघितला हे सांगण्यात किंवा बाहुबली चा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला हे सांगण्यात आहे. आम्ही खूप छोटे आहोत किडे मुंगीपेक्षा लहान निदान अगदी अभिमानाच्या बाबतीत तरी.
काल मेजर केदार दळवीनां आधी एक कडक सलाम ठोकून त्यांना म्हंटल आज मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो. एका शूरवीर सैनिकी अधिकाऱ्याशी हस्तालोन्दन करत आहे. तो क्षण माझ्यासाठी एक संस्मरणीय असाच क्षण होता. उद्या कोणी मला विचारल तर मी नक्की सांगेन कि मी एका भारतीय सेनेच्या अधिकाऱ्याशी हस्तालोन्दन केल आणि हि माझ्यासाठी खूप खूप गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय सेनेच्या एका जाहिरातीत एक वाक्य आहे “Did you have it in you?” काल मला ते जाणवल ते आत असावं लागते. कदाचित त्याची जाणीव मला उशिरा झाली असेल पण निदान समाजामध्ये ती आधीच निर्माण आणि दाखवून देण्यासाठी माझ्यापरीने जे काही होईल ते नक्कीच करेन.
एक अवर्णनीय असा कालचा कार्यक्रम खूप काही शिकवून गेला. अनु मावशी तू बोलतेस न तेव्हा तू मनाला हात घालतेस. तुझ भारतीय सेनेवरच प्रेम, त्यांची काळजी आणि झोपलेल्या समाजाची चीड अगदी सगळच भिडते. त्यामुळेच हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. आलेले सगळेच सैनिकी पालक, त्यांचे कुटुंबीय, लोकमान्य सेवा संघ, लक्ष्य फौंडेशन आणि मेजर केदार दळवी तुम्हा सर्वाना कडक सलाम. तुमच्यामुळे आम्ही आहोत. निदान हे समाजाला ह्या लेखातून पटवून देऊ शकलो तरी ह्या शब्दांचे सार्थक झाले अस मी मानीन. शेवटी ह्या चार ओळी भारतीय सेनेसाठी.
कंधो से मिलते हे कंधे, कदमो से कदम मिलते हे,
हम चलते हे जब ऐसें, तो दिल दुश्मन के हिलते हे.
वंदे मातरम...

क्रायोजेनिक ची साउथ एशियन उडी... विनीत वर्तक

आज संध्याकाळी अपेक्षेनुसार इस्रो च्या जी.एस.एल.व्ही ने उड्डाण भरल. आपल्या सोबत २२३० किलोग्राम वजनाचा साउथ एशियन उपग्रह घेत त्याला त्याच्या निश्चित कक्षेत स्थापन केल. २३५ कोटी रुपयांचा हा उपग्रह भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांना भेट म्हणून दिला आहे. तब्बल ४५० कोटी रुपये खर्चाची हि मोहीम सबका साथ सबका विकास ह्या तत्वाला जागत भारताने हि फत्ते केली आहे.
चीन च्या वाढत्या वर्चस्वाला कुठेतरी शह देण्याची गरज होती. म्हणूनच भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांना आपल्याकडे वळवण्यासाठी साउथ एशियन उपग्रहाच प्याद पुढे केल. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची भारताची व्युव्हरचना प्रचंड यशस्वी ठरली. पहिला पक्षी म्हणजे चीन च्या वर्चस्वाला कुठेतरी भारताने मोडीत काढल. भारतासारखा शेजारी आपला खरा मित्र आहे हा संदेश पोचवण्यात भारत यशस्वी ठरला. दुसरा पक्षी म्हणजे पाकिस्तान सोडून सार्क मधील ७ देशांना भारताने ह्यात सामील करून घेतल.
प्रक्षेपणानंतर लगेच सातही देशांच्या राष्ट्रप्रमुख व राष्ट्राध्यक्ष ह्यांनी भारताच्या त्या योगे इस्रो च प्रचंड कौतुक केल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारत जागतिक पातळीवर आपल वर्चस्व वाढवण्यात यशस्वी झाला. सगळ्यात महत्वाच म्हणजे कुत्र्याच कापलेल शेपूट व त्याच्या नाकावर टिच्चून लगावलेली सणसणीत थोबाडीत. पाकिस्तान नेहमी प्रमाणे खो घालणार हे भारताला माहित होतच. ह्या जाळ्यात पाकिस्तान अलगद अडकला. पाकिस्तान सोडून सगळ्याच सार्क देशांनी ह्या मोहिमेत भाग घेतला. एकीकडे इराण, सौदी अरेबिया ह्या सारखे मित्र गमावले असताना पाकिस्तान साउथ एशियन देश म्हणजेच सार्क मध्ये हि एकटा पडला. भारताने एकाच वेळी चीन व पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांना त्यांच्याच जाळ्यात अडकवत डिप्लोमसी चा मास्टर स्ट्रोक खेळला ह्यात शंका नाही.
आजच उड्डाण महत्वाच होते ते इस्रो च्या नॉटी बॉय म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क २ साठी. ह्या प्रक्षेपण यानात तीन स्टेज असतात. पहिली स्टेज सॉलिड रॉकेट बुस्टर जसे त्याच्या भावामध्ये म्हणजेच पी.एस.एल.व्ही मध्ये वापरले जातात. दुसरी स्टेज आहे ती लिक्विड प्रोपेलंट. तिसरी महत्वाची स्टेज आहे ज्यामुळे ह्या यानाला इतकी वर्ष लागली तयार होण्यासाठी ती म्हणजे क्रायोजेनिक स्टेज. क्रायोजेनिक म्हणजे काय? तर अतिशीत तपमानात हायड्रोजन व ऑक्सिजन स्टोअर करून त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. ऑक्सिजन -१९६ डिग्री सेल्सियस तर हायड्रोजन -२५३ डिग्री सेल्सियस ला द्रवरुपात येतो. मग उड्डाणाच्या वेळी पहिल्या दोन स्टेज संपेपर्यंत हे तापमान असच ठेवणे अत्यावश्यक असते. एकतर ह्या दोन स्टेज मधील इंधांच्या ज्वलनातून निर्माण होणारी उर्जा त्यात रॉकेट च्या वेगामुळे उत्पन होणारे घर्षण ह्या सर्वांवर मात करून ह्या दोन्ही टाक्यांमधील तापमान अतिशीत ठेवावे लागते.
एकाच वेळी दोन वेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळे अतिशीत तापमान टिकवायचे तसेच हि दोन्ही इंधन अत्यंत ज्वालाग्रही असल्याने त्यांना वेगळ ठेवून योग्य तितकच आणि योग्य त्या वेळीच त्याचं मिश्रण करण अत्यंत गरजेच असते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तस कवच ह्या दोन्ही टाक्यांना देण. हे मिश्रण योग्य त्या वेळेत प्रज्वलित करून उपग्रहाला योग्य त्या कक्षेत पोचवणे हे अत्यंत किचकट आणि कठीण अभियांत्रिकी विज्ञान आहे. म्हणूनच खूप कमी देश अस इंजिन बनवू शकले आहेत. अशीच इंजिन का? तर हि इंजिने कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त उर्जा वा बल उत्पन्न करतात. कोणत्याही रॉकेट उड्डाणात वजन खूप महत्वाचे असते. जितक रॉकेट व इंधनाच वजन कमी तितका जास्ती पे लोड तुम्ही घेऊन जाऊ शकाल अस साध गणित आहे. म्हणूनच क्रायोजेनिक इंजिन हा उपग्रह प्रक्षेपणांचा आत्मा आहे.
आजच्या उड्डाणाने पूर्णतः भारतीय बनवटीने बनवलेल्या क्रायोजेनिक इंजिनावर शिक्कामोर्तब झाल आहे. इस्रो च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सार्क देश असो वा साउथ एशियन देश क्रायोजेनिक इंजिन बनवू शकणारा ह्या भूभागात भारत एकमेव देश आहे. अश्या प्रचंड किचकट आणि अभियांत्रिकीच्या दृष्ट्रीने एक मैलाचा दगड असणारी इंजिन भारत आपल्या शेजारील देशांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या लोकहितासाठी फुकटात उपलब्ध करून देऊ शकतो. अस दिलदार मन ठेवणारा जगातील एकमेव देश असाच संदेश ह्या उड्डाणाच्या माध्यमातून जगात गेला आहे. म्हणूनच क्रायोजेनिक ची हि साउथ एशियन उडी भारताला प्रचंड पुढे घेऊन गेली आहे. ह्या सर्व योजेनेचे शिल्पकार इस्रो चे सगळे अभियंते, वैज्ञानिक आणि ज्यांच्या कल्पनेतून हे साकार झाल ते भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नक्कीच कौतुकास पात्र आहेत. इस्रो च्या सर्वच टीम ला नेहमीप्रमाणे सलाम.

WALL इ... विनीत वर्तक

माझ्या सगळ्यात आवडत्या चित्रपटानंपैकी एक म्हणजेच WALL इ. हा एक मानव निर्मित रोबोट असतो. त्याच्या पूर्ण प्रवासावर हा चित्रपट बेतलेला आहे. ह्याच नाव मुद्दामून इंग्रजी आणि मराठी अस लिहील कारण त्याच्या नावामध्ये खूप काही आहे. जश्या दोन वेगळ्या भाषा एक होऊन एक मूर्त स्वरूप होऊ शकते. तर दोन वेगळ्या काळातील, ग्रहावरील रोबोट मध्ये का नाही? WALL इ आणि इवा दोघे वेगळ्या कालखंड आणि वेगळ्या रुपात बनलेले रोबोट यांत्रिक शक्तीपलीकडे जेव्हा भावना समजतात. तेव्हा ते समजण किती सुंदर असू शकते ह्याच उत्तम आणि सुंदर सादरीकरण म्हणजे हा चित्रपट.
हा चित्रपट प्रेमाच भावविश्व अगदी अलगद मांडताना अनेक विषयांना साद घालतो. कोर्पोरेट क्षेत्र, माणसाचे निसर्गावरील अत्याचार आणि त्याचे परिणाम, कचऱ्याची व्हीलेवाट, वैश्विक संकट ते अगदी लठ्ठपणा अश्या सगळ्याच विषयांवर येणाऱ्या काळातील परिस्थिती विषद करतो. चित्रपटाची सुरवातच मुळी कचऱ्याची व्हीलेवाट लावणाऱ्या रोबोट पासून होते. त्यातील एक रोबोट मात्र काळाच्या कसोटीवर टिकून रहातो. तो म्हणजेच WALL इ.
त्याचा प्रवास पृथ्वीवरून कसा वेगळ्या स्पेस शटल मध्ये होतो. त्याची आणि इवा ची भेट. ते त्यांच्या भेटीतून एकमेकांना समजून जाण्याचा प्रवास बघण म्हणजे प्रेमाला अनुभवण. हा चित्रपट बघताना आपण त्यांची जागा कधी घेतो कळतच नाही. निदान मी तरी नेहमीच त्याच्या भूमिकेत स्वतःला बघत आलो. रोबोट असून सुद्धा अंकुरलेल्या एका पालवी साठी जीवाच्या पलीकडे संरक्षण करणारे ते दोघेही आपल्याला पुढे येणाऱ्या कठीण काळाची एक झलक दाखवून देतात. वृक्षसंवर्धन किती महत्वाचे आहे. हा साधा पण एक प्रचंड महत्वाचा संदेश आपल्याला पूर्ण चित्रपटातून मिळतो.
हा चित्रपट मला अनेक कारणांसाठी खूप आवडतो. एकतर रोबोट ना दिलेली भावनांची जोड आणि त्या भावनांची उकल करताना यंत्रांची होणारा गोंधळ आणि शेवटी समजल्यावर त्यांची व्यक्त होण्याची पद्धत ज्या तर्हेने दाखवली आहे. त्याला तोड नाही. दोन रोबोट मधील प्रेम, राग, भांडण आणि सगळ्याच व्यक्त अव्यक्त भावना दाखवताना प्रत्येक क्षणाक्षणाला हा चित्रपट हळूच चिमटे पण काढतो. आवाज, एनिमेशन ह्याचा अतिसुंदर मिलाफ, भावनांची परिपूर्ण गुंफण, त्या जोडीला अनेक संदेश देणारा हा चित्रपट मला नेहमीच खूप वेगळा वाटतो.
पिक्सार ह्या एनिमेटेड चित्रपट बनवणाऱ्या कंपनी चा हा पहिलाच चित्रपट होता. १८० मिलियन अमेरिकन डॉलर नि बनलेल्या ह्या चित्रपटाने ५३३ मिलियन डॉलर ची तुफानी कमाई केली. एनिमेशन चित्रपटाला ह्या चित्रपटाने एका वेगळ्याच उंचीवर नेल. टाईम च्या नुसार ह्या शतकातील सर्वोत्तम चित्रपट, ऑस्कर पुरस्कार बेस्ट एनिमेशन साठी तर इतर भागात ५ नामांकन, गोल्डन ग्लोब पुरस्कार. असे अनेक पुरस्कार पटकावणारा हा चित्रपट मनात कायम रुंजी घालत रहातो त्या WALL इ आणि इवा साठी. इंग्रजी चित्रपट न बघणाऱ्यानी सुद्धा अगदी वेळात वेळ काढून हा चित्रपट बघावा. २००८ साली जरी हा चित्रपट आला असला तरी त्याच एनिमेशन आत्ताच्या बाहुबली पेक्षा प्रचंड उच्च गुणवत्तेच आहे. कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळी प्रेमात पाडणारा त्याच वेळी भावनांची गुंफण सांगणारा हा नितांत सुंदर चित्रपट नक्की बघाच.

लोणार एक रहस्य... विनीत वर्तक

मागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हव तस गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबई ला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता मग काय निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कस परत येणार. शेवटी त्या चमत्काराच रूप बघून स्तिमीत तर झालोच. पण अस जगातील एकमेव गोष्ट माझ्या भारतात, किंबहुना महाराष्ट्रात आहे ह्याचा आनंद झाला. पण त्याची अवस्था व त्याच्या जपणुकी बद्दलची समाजाची, सरकारची मानसिकता बघून हिरमोड हि झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात.
इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल तापमान १८०० डिग्री सेल्सियस पर्यंत गेल असेल. ह्यामुळे पूर्ण अशनी वितळून वायूत रुपांतर झाल असेल असा अंदाज आहे. लोणारच वैशिष्ठ इतकच नाही तर लोणार हे बसाल्ट दगड म्हणजेच अग्निजन्य खडकात तयार झालेलं जगातील एकमेव विवर आहे. आता कोणी विचार करेल कि ह्यात काय विशेष? तर अग्निजन्य खडक हा खडकातील सगळ्यात कठीण असा समाजला जातो. अश्या दगडात इतक खोल विवर तयार होण हेच एक आश्चर्य आहे. त्याशिवाय अग्निजन्य खडक हे चंद्र, मंगळ तसेच इतर ग्रहांवर आढळतात. त्यामुळे तिथे असलेल्या विवारांशी लोणारच्या विवराच कमालीच मिळते जुळते. चंद्रावरील तसेच मंगळावरील दगड, मातीच्या नमुन्यात व लोणार येथे मिळणाऱ्या दगड, मातीच्या नमुन्यात खूप साधर्म्य आहे. म्हणूनच क्युरोसिटी ह्या नासा च्या मंगळावरील मोहिमेआधी नासा चे वैज्ञानिक लोणार मध्ये तळ ठोकून होते. येतील दगडांच्या नमुन्याचा अभ्यास त्यांनी आपल्या यानात मंगळावर पाठवण्याआधी बंदिस्त केला. त्यायोगे ह्या दोन्ही वेगळ्या ग्रहांवरील अभ्यासातून जीवसृष्टीचा उगम शोधण्यात मदत होईल.
लोणार अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार विवरात असलेल्या पाण्याची पी.एच. व्ह्यालू हि ११ च्या आसपास आहे (१०.७). समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा ९ च्या आसपास असतो. पण लोणार च्या आसपास कोणताही स्त्रोत नसताना इथल पाणी समुद्रापेक्षा खारट आहे. ह्यामुळे ह्या पाण्यात कोणतेच जलचर पाणी जिवंत राहू शकत नाही. इथल पाणी आरोग्याच्या दृष्टीने औषधी आहे. इथे अजून एक वेगळा अविष्कार बघयला मिळतो. इथल्या मातीत खूप लोखंड आहे. येथील दगडात म्याग्नेटीक प्रोपर्टी आहेत. शास्त्रज्ञाच्या मते अशनी च्या वितळण्यामुळे ह्या गोष्टी येथील परिसरात आढळून येतात. लोणार च्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आहेत. इथल्या विवरामुळे पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागात न आढळणाऱ्या आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टी इकडे आढळून येतात.
इतके वर्षानंतर हि लोणार मध्ये अजूनही संशोधन चालू आहे. अजूनही सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधू शकलेले नाहीत. इथे असलेली मंदिरे, इथले खडक त्याचे गुणधर्म आणि लोणार सरोवर ह्यावर अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे. पण जीवसृष्टीच उगम स्थान आणि आपण कुठून आलो? अश्या वैश्विक प्रश्नांची उत्तर आपल्या गर्भात लपवलेल लोणार आज सरकारी अनास्था, ह्या सरोवराविषयी माहित नसलेली माहिती, अंधश्रधेने धावणारे लोक, कचरा टाकणारे, अंतिम कार्य सारखे विधी आणि इकडे येणाऱ्या अनेक प्रकारच्या दुषित पाण्याने इथली जैवविविधता धोक्यात येत आहे. जिकडे नासा अमेरिकेवरून मंगळावर जाण्याआधी वैज्ञानिकांना अभ्यास करण्यासाठी लोणार ला पाठवते. त्याच लोणार बद्दल उराशी मराठी अस्मिता बाळगणारे स्वताला भारतीय, मराठी म्हणवणारे सगळेच किती अनभिज्ञ आहेत हे बघून नक्कीच वाईट वाटल.
रामायण, महाभारतात उल्लेख असणाऱ्या इतक्या प्रचंड कालावधीच प्रतिनिधित्व करणाऱ्या लोणार येथील ठेवा डोळ्यात बंदिस्त करताना स्तिमित तर झालोच पण जगातील एकमेव अश्या बसाल्ट लेक विवर समोर उभ राहून निसर्गाच्या ह्या अदाकारीला माझा कुर्निसात केला. अजूनही खूप काही लोणार इकडे बाकी आहे. जेव्हा जमेल, जस जमेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या माजघरात असलेल्या लोणार ला भेट देऊन निसर्गाचा अविष्कार अनुभवयाला हवाच पण त्याचवेळी त्याच्या संवर्धनासाठी काही करता येत असेल तर त्याचा पुढाकार हि घ्यायला हवा. एक अमुल्य ठेवा आपल्या माजघरात आहे त्याच संवर्धन हे उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक असेल.

अनुभवांच अनुभवण... विनीत वर्तक

माणसाची प्रगल्भता अनुभवातून समृद्ध होते अस म्हणतात. प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवून जातो आपण अस म्हणतो. पण खरच आपण अनुभवातून शिकतो का? हे शिकण म्हणजे तरी नक्की काय असते? आपल्या चुका शोधण? स्वतःला अथवा दुसऱ्यांना दोष देण कि काहीच नाही तर परिस्थितीच्या डोक्यावर त्याच खापर फोडून मोकळ होण. अगदी ते पण नसेल तर डेस्टिनी आणि देव असतातच आपल्या अनुभवांच्या शिकवणीसाठी.
अनुभवाच अनुभवण आपण कधी अनुभवतो का? आपली कोणी तरी सतत मस्करी करते किंवा सतत कोणी आपला वापर करून घेते. तर आपण त्या व्यक्तीला दोष देत रहातो. आपण आपल्या बदलान बद्दल कधी बोलत नाही. अनुभवातून आपण काय शिकतो तर त्या व्यक्तीपासून लांब रहाण किंवा ती व्यक्ती तशीच आहे असा स्वताचा समज. पण हेच नेहमी होत असेल तर आपली शिकवण तशीच रहाते. मुळात लोकांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करून देतो तिथेच आपण चुकत असतो. जर आपल्या प्रतिक्रिया बदलल्या नाहीत तर येणारे अनुभव कसे बदलतील? वेगळे अनुभव अनुभवण्यासाठी गोष्टीनकडे वेगळ्या रीतीने बघण्याची खूप गरज असते. फेसबुक वरच्या कमेंट नी लोक प्रचंड अपसेट होतात. मला कोणी अस बोलू कस शकते? किंवा माझ्या मुद्याला कोणी खोडूच कस शकते? असे अनेक मुद्दे आपण नकळत स्वतःच्या अंगाला चिकटवून घेत असतो. फेसबुक च्या कमेंट किंवा लिहण्याने खरच आपला स्वाभिमान इतका दुखावला का जातो? ह्या सर्वातून आलेल्या अनुभवांच अनुभवण आपण अनुभवत नाही. म्हणून त्याच त्याच चुका पुन्हा करत रहातो. शेवटी कशातच मन रमत नाही व फेसबुक पण नकोसे होते.
खऱ्या आयुष्यात हि अनेकदा माणसांचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. जवळपास सगळ्याच वेळी अनुभावंची शिदोरी एकतर वाट्याला जाऊ नका अथवा गेलात तर समोरच्या च्या कलेने घ्या असच सांगत असते. परिस्थिती सगळ्याच वेळी सारखी किंवा माणस सगळ्याच वेळी सारख्या प्रतिक्रिया देतील अस नसताना आपल्या प्रतिक्रियेमुळे आपल्याला सारखेच अनुभव येत रहातात. कोणताही धंदा, व्यवसाय किंवा कोणतही काम ज्यात अनुभावंची शिदोरी जास्त तो जास्ती तालावून सुखावून निघालेला असतो अस म्हणतात. पण खरेच तस असते का? कोणी एका अनुभवातून शिकते तर कोणी अनेकदा सारखे अनुभव येऊन पण शिकत नाहीत. आपल्या चांगल्या- वाईट दोन्ही काळात आपण अनुभवातून किती स्वतःला प्रगल्भ करतो त्यावर आपला पुढला टप्पा अवलंबून असतो.
अनुभव घेण म्हणजे प्रगल्भ होण नाही. तर त्यातून आपण काय शिकलो? त्या अनुभवातून पुढे काय? काय करता आल असत? ह्या सर्वांचा एक माणूस म्हणून आपल्यावर होणारा परिणाम व त्यातून आपला प्रवास हेच तर अनुभवण असते. वयाने वाढल म्हणजे अनुभव जास्ती अस नसते. १०० वेळा अनुभवून सुद्धा माणूस त्याच प्रतिक्रिया देत असेल तर झाडावरून पडलेल्या सफरचंदा मध्ये आपल्याला नवीन अस काहीच दिसणार नाही. तो सुद्धा आपल्याला एक अनुभव देईल. पण ते का? ते कस? ह्याचा नेमक अनुभवण जगाच विज्ञान बदलवणाऱ्या एका शोधाचा उगम पण असू शकते. म्हणून अनुभवातून अनुभवण जमल कि बऱ्याच गोष्टीनकडे आपण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या प्रकारे त्याची प्रतिक्रिया देऊ शकतो आणि काहीवेळा तर अनुभवण्या आधीच अनुभव कळून येतात.

छोट पाउल... विनीत वर्तक

कोणत्याही ध्येया पर्यंत पोचण्याची सुरवात अनेक वर्ष आधी होते. ऑलम्पिक मधल एक मेडल मिळवण्यासाठी ४ वर्ष अथक मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे आपण तिथवर पोहचतो. बघताना एका रात्रीतल यश वाटल तरी त्या साठी अनेक रात्रींची झोप उडालेली असते हे ज्याच त्यालाच माहित. माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे हे असेच एक स्वप्न. राकेश शर्मा नी जो “सारे जहा से अच्छा” भारत बघितला. तो आपल्याच यानाने बघण्याच भाग्य अजूनही आपल्या वाटेला आलेल नाही.
माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे तितकस सोप्प नाही. एकतर माणूस हा एक चालता बोलता सजीव आहे. अवकाशाच्या निर्वात पोकळीत ऑक्सिजन तसेच इतर अनेक गोष्टी प्रतिकूल असताना त्याला ह्या सगळ्या अवस्थेत जिवंत ठेवण व त्याच वेळी अश्या वातावरणाशी एकरूप होणारा माणूस घडवणे हे खूप खर्चिक तर आहेच पण त्या शिवाय खूप धोके त्यात आहेत. अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवून अनेक काळ झाला. पण त्याच अमेरिकेने डिस्कव्हरी, च्यालेंजर सारख्या दुखद घटना हि पचवल्या आहेत. जी कामे माणूस अंतराळात राहून करू शकतो ती जवळपास सर्वच रोबोट हि करू शकतो. म्हणूनच मानवी मोहिमान पेक्षा अश्या रोबोटिक मोहिमांवर सगळ्याच राष्ट्रांनी लक्ष केंद्रित केल आहे.
पण अस असूनही काही बाबतीत रोबोट माणसाला रिप्लेस करू शकत नाही हे वास्तव आहे. म्हणूनच पृथ्वीशिवाय मानवी वस्ती तसेच काही प्रोयोगांसाठी मानवाची अंतराळ सफर अतिशय गरजेची आहे. येत्या काळात उर्जेची गरज, पृथ्वीशिवाय एक घर असण्याची गरज मानवाला खुणावते आहे. इंटरन्याशनल स्पेस स्टेशन हि त्याचीच एक पायरी आहे. भारत अजूनही ह्या स्पेस स्टेशन चा भागीदार नाही आहे. ह्याला अनेक कारणे आहेत. अंतराळ क्षेत्र हे फक्त श्रीमंत आणि प्रगत देशांची मक्तेदारी आहे असा एक समज जगातील प्रगत देशांमध्ये आहे. भारत ज्यावेळी अवकाश क्षेत्रात धडपडत होता तेव्हा प्रगत राष्ट्रांना भारताला बरोबर घेण्याची गरज वाटली नाही. आज स्थिती वेगळी आहे. भारत ह्या क्षेत्रातील अनेक शिखरे पादाक्रांत करतो आहे. भारताचा दबदबा हळूहळू का होईना ह्या क्षेत्रात वाढतो आहे म्हणून अमेरिकेसह अनेक राष्ट्र भारताला मेंबर करून घेण्यास आग्रही आहेत. पण इथेच खरी मेख आहे. ह्या स्पेस स्टेशन चा आर्थिक डोलारा सांभाळताना सगळ्यांची दमछाक होते आहे. त्यातून भारता सारख्या आर्थिक घोडदौड करणाऱ्या राष्ट्राला बरोबर घेऊन खर्चाची माळ भारताच्या गळ्यात उतरवायची असा सगळा खेळ आहे.
म्हणूनच भारताने आपल्या परीने छोटी पावले टाकायला सुरवात केली आहे. इस्रो ला आत्ताच अश्या एका प्रोजेक्ट ची मंजुरी मिळाली आहे. ह्या प्रोजेक्ट नुसार इस्रो अस तंत्रज्ञान विकसित करेल कि ज्यामुळे दोन स्पेस वेह्कल एकमेकांना अवकाशात जोडता येतील व त्याच्यात आपापसात साधन सामुग्री आणि इतर गोष्टींची देवाणघेवाण होऊ शकेल. ह्या गोष्टी अगदी सोप्प्या वाटल्या तरी ते तितकस सोप्प नाही. अवकाशात दोन्ही गोष्टी प्रचंड वेगाने एखाद्या कक्षेत फिरत असतात. अश्या वेळी दोन्ही गोष्टींचा वेग व कक्षा एकच असणे गरजेचे आहे. त्याच वेळी जवळ आल्यावर त्यांच्यातील वेग व इतर गोष्टींचा समन्वय अतिशय अचूक असणे गरजेचे आहे. हे कोणत्याही मानवी हस्तक्षेपा शिवाय पृथ्वीवरून नियंत्रित करणे बरेच कठीण आणि जिकरीच आहे. एकदा का हे तंत्रज्ञान आपण मिळवलं कि आधीच अवकाशात असलेल्या उपग्रहाना इंधन तसेच इतर गोष्टींचा पुरवठा आपण करू शकू व त्याच वेळी अवकाशातील स्पेस डेब्रिस कमी होण्यास खूप मदत होईल.
हेच छोट पाउल उद्याच्या मानवी उड्डाणासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. जर आपण अतिशय सुरक्षिततेने ह्या गोष्टींची देवाण घेवाण करू शकलो तर ह्याच्या पुढली पायरी मानवाच्या देवाणघेवाणीची असणार आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा पल्ला अजून बाकी आहे. पण मोठी स्वप्नच तर एक दिवस छोट्या पावलातून सत्यात उतरतात. इस्रो ला त्यांच्या ह्या छोट्या पावलासाठी खूप शुभेछ्या.
“If you want to shine like a sun. First burn like a sun.” – Dr.A.P.J Abdul Kalam

साउथ एशियन उपग्रह... विनीत वर्तक

नेबर फर्स्ट हि पॉलीसी घेत जून २०१४ मध्ये पंतप्रधानांनी इस्रो ला सार्क देशांसाठी उपयोगात येईल असा उपग्रह बनवण्याची विनंती केली. आपल्या पंतप्रधानाच्या शब्दाचा मान ठेवत इस्रो ने ह्या उपग्रहासाठी कंबर कसली. इकडे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सार्क सदस्य देशातील सर्वच राष्ट्र टेक्नोलोजी च्या बाबतीत बरीच मागे आहेत. भारत हा सार्क मधील प्रथम आणि एकमेव देश आहे कि जो स्वबळावर उपग्रह बनवू शकतो. ते उपग्रह स्वताच्या बळावर प्रक्षेपित करू शकतो. अस असताना आपल्या शेजारी राष्ट्रांना पण सोबत आणण्यासाठी व एकूणच सार्क देशांना टेक्नोलोजी मध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी भारताने हि कल्पना मांडली.
भारत नेहमीच “वसुधैव कुटुंबकम” ह्या उक्तीला धरून नेहमीच त्या दृष्टीने पावल टाकत आला आहे. उपग्रहांच्या मिळणाऱ्या लाभाने भारतातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. अगदी मोबाईल पासून ते जीपीस, डी.टी.एच. पर्यंत. ह्याच लाभाचा फायदा आपल्या शेजारी देशांना हि व्हावा ह्या दृष्टीने भारताने सार्क उपग्रहाची कल्पना मांडली. १८ व्या सार्क परिषदेत याची घोषणा भारताने केली. नेपाळ, मालदीव, भूतान, ह्या छोट्या तर बांगलादेश, अफगाणीस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, ह्या मोठ्या राष्ट्रांनी मिळून बनवलेल्या सार्क राष्ट्रानां आपल्या टेक्नोलोजी ने प्रगतीपथावर नेण्याची भारताची योजना होती.
नेहमीप्रमाणे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीने आपला रंग दाखवलाच. सुपार्को हि पाकिस्तान ची ह्या क्षेत्रात काम करणारी इस्रो सारखी संस्था आहे. इस्रो च्या आधी स्थापन झालेल्या ह्या संस्थेबद्दल न बोललेच बर. इतके वर्ष ह्या क्षेत्रात असून स्वतःच रॉकेट तर सोडाच साधा उपग्रह हि बनवता आलेला नाही. त्याच वेळी इस्रो ने आपल्या कामगिरीने नासा सारख्या संस्थाना टक्कर तर दिलीच आहे. पण त्या सोबत मंगळयान, एकाच वेळेस १०४ उपग्रह प्रक्षेपित करत एक मैलाचा दगड अवकाश क्षेत्रात गाठला आहे. अस म्हणतात कि मंगळयान मोहीमेने अवकाश क्षेत्रात आखल्या जाणाऱ्या मोहिमांच पूर्ण आर्थिक गणित बदलवून टाकल आहे. अश्या अनेक यशांची पिसं आपल्या मुकुटात अभिमानाने मिरवणाऱ्या इस्रो कडून एक अजून उंची जर आपल्याच नाकावर टिच्चून गाठली गेली तर ते पाकिस्तान ला रुचेल कस.
वेगवेगळी कारण काढत पाकिस्तान ने अनेक अडथळे ह्या मोहिमेत निर्माण केले. अनेक राष्ट्रांना भारताने हि छुपी नजर ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे अस सांगत आपल्या जाळ्यात ओढण्याचा सगळ्याच लेवल वर प्रयत्न केला. त्यामुळेच ह्या मोहिमेच सार्क उपग्रह नाव भारताला साउथ एशियन उपग्रह अस ठेवावं लागल. ह्या सगळ्यांना पुरून उरत पाकिस्तान शिवाय भारताने हि मोहीम सुरु केली. तब्बल २३५ कोटी रुपयांचा जीस्याट- ९ हा उपग्रह भारताने तयार केला. येत्या ५ मे च्या आसपास तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. ह्या मोहिमेचा सर्व खर्च तसेच सगळा टेक्निकल, इंजिनिअरींग सपोर्ट भारताने फुकट आयुष्यभर म्हणजे उपग्रहाच्या १२ वर्षाच्या कालावधीसाठी सार्क राष्ट्र ( पाकिस्तान सोडून) उपलब्ध करून दिला आहे. ह्या उपग्रहामुळे डी.टी.एच, व्ही स्याट आणि डिझास्टर म्यानेजमेंट , लायब्ररी सारखे सगळे फायदे इंटरलिंक केले जाणार आहेत. प्रत्येक देश त्यांना दिलेल्या ट्रान्सपोर्टर चा वापर त्यांच्या साठी हवा तसा करू शकणार आहे. ह्यामुळे सर्व देशातील समन्वय वाढण्यास मदत होणार आहे.
आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. बदलू शकतो ते आपण त्यांच्याशी कसे वागतो. काही वाकडेच रहातात. त्यांना बंदुकीची भाषा समजते त्यांना उपग्रहाची भाषा कधी कळणार नाही. अनेक पल्ल्याची विध्वंसक क्षेपणास्त्र खूप बनवता येतात पण एक स्वयंपूर्ण रॉकेट ते बनवू शकत नाही. ह्यावरून होणाऱ्या जळफळाटा ची कल्पना आपण करू शकतो. आपण प्रगत आहोत म्हणून आपण सगळ्यांना दाबून ठेवू शकतो ह्या विचारसरणी चा भारत कधी होता न कधी इथले लोक. हजारो वर्षाची संस्कृती असून सुद्धा भारताने आजवर कोणत्या देशाला इंनव्हेड केल नाही. ह्या पुढे हि करण्याची इच्छा नाही म्हणून “सबका साथ सबका विकास” ह्या तत्वाला आजही पाळत “वसुधैव कुटुंबकम” करण्याची पावलं भारत आणि इस्रो उचलत आहे. मे च्या साउथ एशियन उपग्रहाच्या उड्डाणासाठी इस्रो ला खूप खूप शुभेछ्या.

मदर ऑफ ऑल बॉम्ब... विनीत वर्तक

काल अमेरिकेने इसिस च्या तळांवर टाकलेल्या बॉम्ब ने सगळ्यांची झोप उडवली आहे. कारण हि तसेच आहे. जो बॉम्ब अमेरिकेने टाकला त्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब अस संबोधल जाते. न्युक्लीयर बॉम्ब पेक्षा थोडी कमी पण इतर कोणत्याही बॉम्ब च्या तुलनेत ह्याची संहारक क्षमता जास्ती आहे. ह्या हल्यात किती हानी झाली ह्याचा कोणताच अंदाज अजून आलेला नाही. पण ह्या बॉम्ब मध्ये अस काय आहे? कि ज्यामुळे ह्याला एम.ओ.ए.बी किंवा मदर ऑफ ऑल बॉम्ब अस संबोधल जाते ते बघण रंजक आहे.
एम.ओ.ए.बी. किंवा जी.बी.यु ४३ अस नाव असणारा हा बॉम्ब तब्बल २१,६०० पौंड वजनी आहे. आता तुलना करायची झालीच तर ६ टोयोटा इनोव्हा ह्याचं एकत्रित वजन हे त्या एका बॉम्ब च असेल. ३० फुट लांब असलेल्या ह्या बॉम्ब मध्ये तब्बल ११ टन एकस्प्लोसीव मटेरियल असते. काल इसिस च्या गुप्त गुहांवर टाकल्या क्षणी काही मिलीसेकंदात १०० फुटावरील ऑक्सिजन त्याने शोषून घेतला असेल. त्या परिसरातील प्रत्येकाचा जीव त्याच वेळी घेत. त्या नंतर दुसऱ्या क्षणी ह्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या शॉकव्हेव मुळे २ मैल परिसरातील सगळ्यांचे कान बधीर झाले असतील. जे कोणी गुहेमध्ये लपले असतील ते १९,००० पौंड वजनाच्या एकस्प्लोसीव खाली गाडले गेले असतील. जे कोणी ह्यातून वाचले असतील त्यांनी ह्या बॉम्ब च्या फुटण्याने जे मशरूम क्लावूड बघितल असेल ते क्षण त्यांच्या आयुष्यात ते कधीच विसरू शकणार नाहीत.
अमेरिकेने अफगाणिस्तान च्या नांग्रहार रिजन मध्ये काल हा बॉम्ब टाकला. जमिनीखाली असलेल इसिस च्या अतिरेक्यांच जाळ उध्वत्स करणे हाच ह्या मागील उद्देश होता. जमिनी पासून अवघ्या ६ फुटांवर ह्या बॉम्ब च्या फुटण्याने तयार झालेलं विवर हे ३०० फुट मोठ आहे. एम.ओ.ए.बी. हा बॉम्ब थर्मोब्यारिक प्रकारातील आहे. ह्यातील थर्मो म्हणजे हिट आणि ब्यारिक म्हणजे प्रेशर. ह्या दोघांचा उद्रेक अश्या प्रकारच्या बॉम्ब मधून होतो. ह्या बॉम्ब मध्ये टू स्टेज डिटोनेशन केल जाते. आधी अल्युमिनियम ची डस्ट फुटते. त्या नंतर ब्यारिक ब्लास्ट होतो जो लिटरली आजूबाजूचा गुहेतील सगळा ऑक्सिजन सक करून घेतो. ह्या दोन प्रक्रियांमुळे निर्माण झालेली शॉक व्हेव पुढील काम फत्ते करते.
ह्या बॉम्ब च एक्स्प्लोजन हे हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्ब च्या १/१० दशांश आहे. इतका अवजड बॉम्ब योग्य ठिकाणी टाकायला सुद्धा तश्या प्रकारचे विमान लागते. काल हा बॉम्ब टाकण्यासाठी एम सी १३० ह्या विमानाचा वापर केला गेला. २००३ निर्माण करण्यात आलेल्या हा बॉम्ब प्रत्यक्ष युद्धात काल पहिल्यांदा वापरण्यात आला. अमेरिका कितीही पुढे गेली तरी तिला टक्कर देण्याच काम निदान सैन्य शक्तीत रशिया करत आहे. म्हणूनच ह्या मदर ला फादर ची निर्मिती २००७ मध्ये रशियाने केली आहे. फादर ऑफ ऑल बॉम्ब ह्या मदर बॉम्ब पेक्षा तब्बल ४ पट ताकदवर आहे.
शेवटी मदर असो वा फादर बॉम्ब हे नेहमीच विध्वंस करतात ह्याची कोणाच्या मनात शंका नसेल. शत्रूला नमोहरण करण्यासाठी नक्कीच असे बॉम्ब हवेच. पण त्याच वेळी हे टाकताना निरपराध जीव जे ह्या महाविनाशकारी बॉम्ब च्या कक्षेत येतात त्यांचा हि विचार व्हायला हवा. हिरोशिमा मधील बॉम्ब ने अमेरिकेने शत्रूला म्हणजे जापान ला नक्कीच नामोहरम केल पण ज्या निरपराध लोकांचा ह्यात जीव गेला किंवा जे लोक वाचले आणि त्यांच्या कित्येक पुढच्या पिढ्या हा बॉम्ब चे चटके आजही सोसत आहेत तिकडे अमेरिका जिंकून पण हरली. माणुसकीच्या दृष्टीकोनातून अमेरिका काल पण हरलीच आहे. कदाचित ह्या बॉम्ब ने इसिस चा कणा मोडेल पण ह्याच्या विध्वंसाने घायाळ झालेल्या निरपराधी जनतेला अमेरिका काय उत्तर देणार आहे?

झिंगाट... विनीत वर्तक

बरोबर एक वर्षापूर्वी हा शब्द नेट किंवा विडीओ रुपात यु ट्यूब वर अवतरला आणि बघता बघता ह्या शब्दांनी इतक गारुड केल कि त्याची नशा आज एक वर्षांनी पण उतरलेली नाही. १४ एप्रिल २०१६ ला झिंगाट ह्या सैराट चित्रपटातील गाण्याचा ऑफिशियल विडीओ यु ट्यूब वर रिलीज झाला. अजय- अतुल च संगीत आणि आवाज असलेल हे गाण अल्पावधीत लोकप्रिय तर झालच पण ह्या गाण्याने अगदी अबाल वृद्धांपासून सगळ्यांनाच पुन्हा एकदा ठेका धरायला लावल.
आत्तापर्यंत झिंगाट चा विडीओ तब्बल ४ कोटी पेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. मराठी संगीत हे नेहमीच दर्जेदार गीतांसाठी पहिल्यापासून प्रसिद्ध राहील आहे. पण काही गीतांची मोहिनी अशी असते कि ती भाषेपुढे असतात. म्हणजे त्यातले शब्द कळले नाही तरी ते गाण आपल्या पर्यंत पोहचते किंवा त्याच संगीत मंत्रमुग्ध करते. झिंगाट हे ह्याच पठडीतील गाण ठरल. भाषा, जात, धर्म, देश ह्या पलीकडे जाऊन झिंगाट ने लोकांना ठेका धरायला लावला ह्यात शंका नाही. यु ट्यूब च्या ह्या विडीओ वरील अनेक कमेंट वाचल्या तर अस लक्षात येत कि कितीतरी अमराठी लोकांना हे गाण काय आहे? किंवा काय चालू आहे समजत नसताना आवडलेलं आहे किंबहुना गाण ऐकून त्यांनी ठेका धरलेला आहे. मला नाही आठवत कि मराठी चित्रपटातील अजून कोणत गाण इतक प्रसिद्ध झाल असेल.
गाण अनेक विभागात विखुरलेलं असते. काहींच संगीत, काहींचे शब्द, तर काही गाण्यांचा अर्थ त्याला एक वेगळीच उंची देतात. पण ह्यात अजून एक वेगळा विभाग आहे तो म्हणजे ठेका धरायला लावणारी गाणी. मग ती उडत्या चालीची असोत वा त्याचं संगीत जशी कोळी गीत. लग्नात, मुंजीत, वाढदिवसाला किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी नाचायला ठेका धरण्यासाठी अशी गाणीच लागतात. मला वाटते झिंगाट चा नंबर त्यात खूप वरचा आहे. “माउली-माउली” सारख सुंदर गाण देणाऱ्या अजय- अतुल कडून अजून काही तरी असच अपेक्षित होत. माउली ह्या गाण्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली होती कि देवाच्या गाण्यात हि ठेका किंवा आवेश आणण्याची ह्या दोघांची हतोटी नक्कीच त्यांना एक वेगळ संगीत जोडी बनवत होती. नंतर आलेल्या झिंगाट ने जी उंची गाठली त्याला शब्द नाहीत. म्हणजे मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांना चित्रपटाच्या स्क्रीन समोर नाचताना बघितल नव्हत. चित्रपटगृहाच्या बाहेर एखाद गाण लोकाग्रहास्तव दोन वेळा दाखवलं जाईल अशी जाहिरात तिकीटबारीवर करून तिकीट विक्री झालेली बघितलेली नाही आणि तीही हाऊसफुल चे बोर्ड लावून.
सैराट च्या यशात सिंहाचा वाटा हा नक्कीच अजय- अतुल च्या संगीताचा होता. त्यातही सगळ्यात मोठ श्रेय होत ते झिंगाट च. हे गाण आल आणि चित्रपटाचा नूरच पालटून गेला. मला अजूनही आठवते कि सई आणि अर्णव दोघे हे गाण लागल कि अगदी बेभान होऊन नाचायला सुरवात करत. मराठी शब्द कळतील किंवा संगीत काय असते? ह्याची परिपक्वता नसताना अस बेधुंद होऊन नाचण्यासाठी त्या गाण्यात तशी ताकद असावी लागते. मला वाटते झिंगाट च ते यश होत. पंजाबी, दक्षिणी अश्या सगळ्याच गाण्यांनी भारतीयांच्या मनात राज्य केल होत स्पेशली उडत्या गाण्यांच्या बाबतीत. पहिल्यांदा कुठेतरी एक मराठी गाण ह्या सर्वाना पुरून उरल. सगळ्यात मोठा किस्सा तर माझ्या एका इजिप्शियन मित्राच्या बाबतीतला आहे. त्यान चक्क हे गाण मी ऐकत असताना माझ्याकडून मागून घेतल. त्याच्या मते हे गाण काहीतरी स्पेशल होत. त्याला ऐकून ह्यावर डान्स करावासा वाटला.
उद्या ह्या झिंगाट च्या ह्या यशाला एक वर्ष होईल. अनेक गाणी आपल्या आयुष्यभरात आपल्याला आवडतात पण काहीच अशी असतात कि ती आपल्याला बसल्या जागेवरून उठून ठेका धरायला लावतात. अनेक वेळा ऐकली तरी तो आवेश तसाच प्रत्येक वेळी जाणवून देतात. मला वाटते झिंगाट हे त्यातल एक आहे. एक अतिशय वेगळ अशी रचना दिल्याबद्दल अजय-अतुल ह्यांचे आभार तर आहेतच पण एका मराठी गाण्याला मिळालेला इतका प्रतिसाद पण नक्कीच कौतुकाचा भाग आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊन दे जाळ आणि धूर करत झिंगाट.

गोळावाला कम सरबतवाला... विनीत वर्तक

गोळावाला कम सरबतवाला नावातच जादू आहे नाही का? त्याच नाव ऐकल कि तोंडाला पाणी सुटते अजूनही. मला आठवते लहानपणी मे महिना म्हंटला कि मामाकडची सुट्टी, तिथला धुडगूस, धमाल आणि त्या सगळ्या मधला एक कॉमन माणूस म्हणजे तो गोळावाला कम सरबतवाला काही म्हणा त्याला. दुपारी जेवण झाली आणि सगळे दुपारच्या वामकुक्षी साठी पहुडले कि आमची स्वारी ह्याच्या गाडीसमोर हजर.
एका विहारीच्या बाजूला रस्त्याच्या कोपऱ्यात दुपारी ह्याची गाडी लागायची. तिकडे २-३ रस्ते मिळत असल्याने तसेच गाडी थांबवण्यासाठी जागा असल्याने त्याने आपल बस्तान योग्य जागी बसवलं होत. मग काय रोज दुपारी आम्ही सायकल वर तर कधी चालत शतपावली करत तिथवर जायचो. मग एक तास तिकडे कसा जायचा कळायचा नाही. १ रुपयाच सरबत साध वाल, २ रुपयाच कलर वाल, ३ रुपये स्पेशल असलेल दोन कलर मिक्स सरबत आणि २ रुपयाचा गोळा त्यात, ५ रुपयाचा स्पेशल काला कट्टा आणि सप्तरंगी गोळा. अश्या सगळ्या वेगळ्या मेनू कार्ड वर आम्ही हक्क सांगायचो.
बर रोजच गिऱ्हाईक असल्याने मग आमचा रोख “इसके साथ वो भी” असा व्हायचा मग ते कलर असो व थोडा जास्ती मोठा गोळा. बर एका सरबत किंवा गोळ्याने आमच कधीच आटपायच नाही. त्यामुळे ते चक्र सुरूच राहीच. अगदी जिभेवर आणि ओठांवर सप्तरंग दिसेपर्यंत. कधी अगदीच पैसे जास्ती असतील तर मग ५ आणि १० रुपये वाली लस्सी. त्यातला सबजा चे गोळे असे तोंडात गुदगुल्या करायचे कि त्याची सर कोणत्या फालुद्यात पण येणार नाही. वर्षोन मागे वर्ष गेली तरी हा गोळेवाला प्रत्येक मे महिन्यात माझ तरी हक्काच ठिकाण होता. मे महिन्यात घरी फक्त दोन वेळा जाण होत असे. एक म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा पैसे संपले तर. बाकीच्या वेळेत कुठे पडलेलो असायचो ते घरच्यांना पण माहित नसायचं.
सरबत किंवा गोळा खाऊन झाल्यावर खांद्याला तोंड पुसायची सवय आमच्या दुपारच्या कृत्यांची सबूत त्या कपड्यांवर सोडून जायची. पण तेव्हा कोणाला कुठल भान होत? तो भैया सरबत बनवायला बिसलरी पाणी वापरतो का विहारीच? बर्फाच पाणी कुठल असते? रंग फूड असोसिएशन ने सर्टिफाईड केलेले असतात कि नाही? हे असले प्रश्न अगदी स्वप्नात पण माझ्याच काय आमच्या आख्या २५-३० जणांना किंवा त्यांच्या पालकांना किंवा त्या भैया ला पण पडले नाहीत. घसा बसेल, ताप येईल, काळ्या मातीच्या हातांनी सरबत पितांना किंवा गोळा खाताना जंतू तोंडात, पोटात जातील किंवा उष्ट प्यायल्याने त्रास होईल असले फालतू विचार आम्हा मित्रांच्या चांडाळ चौकडी ला कधीच शिवले नाहीत. एक सरबत १० लोकात नाही पिणार तर मग त्या सरबताची मज्जा काय? असा प्रश्न मात्र आमच्या मनाला शिवून जायचा.
खिशात १० रुपयांची नोट असलेला राजा असायचा. कारण जो पैसे भरेल त्याला सरबताचा पहिला घोट तर ज्याला मीठ आवडेल त्याला शेवटचा. अश्या रीतीने तो ग्लास किती लोकांच्या तोंडाची चव घ्यायचा त्याच त्याला माहित. आज ऐकायला कसतरी वाटल तरी ते असे बिनधास्त दिवस होते. जातीची , धर्माची आणि आजारांची वेस मैत्रीच्या आड कधीच आली नाही. तेव्हा एका कामगाराचा मुलगा ते ज्याच्या घरी काम करत त्याचा मुलगा एकाच ग्लास मधून सरबत प्यायचो. तो सरबतवाला म्हणजे माझ्या तहानलेल्या जीवाला अमृत पाजून तृप्त करणारा एक भैया होता.
आज ते सरबत आणि गोळेवाले कुठे हरवून गेले. बिसलरीच्या युगात त्या सरबत आणि गोळेवाल्याला हरवून बसलो. त्या निंबूझ आणि सेवन अप, थम्स अप ला कुठली येणार त्या सरबताची टेस्ट? न्याचरल च्या आणि म्याग्नस च्या आईस्क्रीम ला कुठे आहे त्या बर्फाच्या गोळ्यांची चव. दुपारच्या त्या रणरणत्या उन्हातून तहान भागवणाऱ्या सरबताला कोणीच रिप्लेस करू शकत नाही. तो आनंद, ते क्षण वेगळेच होते. आजही तिकडून गेली कधी तर नजर तिकडेच जाते पटकन त्याच विहारीच्या बाजूला. आठवतात ते क्षण जेव्हा २०-३० मुलांचा घोळका त्या भैयाच्या गाडीला सर्व बाजूंनी लुप्त करायचा आणि त्याच मित्रांच्या मैत्रीला जे गळ्यात गळे घालून चिअर्स करायचे मैत्रीचे ते क्षण. जे आज त्या गोळेवाल्या आणि सरबताच्या गाडी प्रमाणे लुप्त झाले आहेत.
चेनानी – नशरी टनेल... विनीत वर्तक
गेल्या रविवारी पंतप्रधानांनी चेनानी – नशरी टनेल च उदघाटन केल. एखाद्या टनेल च्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधानांनी जाणच ह्या टनेल च महत्व विशद करते. जम्मू ते श्रीनगर ह्या महत्वाच्या ठीकाणानां जोडणारा हा टनेल देशासाठी खूप महत्वाचा होता. हिमालयाच्या पर्वतरांगान मधुन प्रवास करणे नेहमीच जिकरीच राहील आहे. बदलणार हवामान, गोठवणार तापमान, अचानक होणारी ढगफुटी, दरड कोसळण्याची कधीही शक्यता अश्या सगळ्या प्रतिकूल गोष्टी असताना हा मार्ग देशाच्या सुरक्षितता आणि एकूणच जनजीवनासाठी महत्वाचा होता. अश्या कठीण परिस्थितीत बोगदा किंवा टनेल बांधणे किती जिकरीच असू शकते ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. कोकण रेल्वे ज्या सह्याद्रीच्या भागातून जाते. तिथल्या पेक्षा ठिसूळ दगडांनी आणि प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात असे टनेल उभारणे अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक कठीण लक्ष आहे. म्हणूनच चेनानी – नशरी टनेल च महत्व जास्ती आहे.
चेनानी – नशरी टनेल भारतातील सगळ्यात लांब रस्त्यावरील टनेल आहे. तब्बल ९.२८ किमी. लांब हा टनेल आहे. ह्या टनेलमुळे जम्मू ते श्रीनगर मधील ४१ किमी मधील अंतर आता अवघ ९.२८ किमी कमी झाल आहे. जम्मू ते श्रीनगर हा प्रवास २९३ किमी आहे. चेनानी – नशरी सारखे तब्बल १२ टनेल बांधले जात आहेत. त्यामुळे हे अंतर अवघ्या ६२ किमी इतक कमी होणार आहे. चेनानी – नशरी टनेल बांधायला तब्बल ३७२० कोटी रुपये खर्च आला आहे. १५०० अभियंते, जीओलॉजीस्ट, कामगार ह्यांच्या अथक मेह्नीतून आकाराला आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा देशातील सर्वात सुरक्षित टनेल आहे.
६००० एल.ई.डी लाईट, ११८ सी.सी.टी.व्ही क्यामरे म्हणजे प्रत्येक ७५ मीटर ला एक ह्या प्रमाणे, ११८ एस.ओ.एस. प्रत्येक १५० मीटर ला एक ह्या प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा, स्मोक आणि हिट डिटेक्टर ह्यात ठेवले गेले आहेत. तसेच ह्या टनेल मधील रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी ऑटोम्याटिक इंटिग्रेटेड सिस्टीम बसवण्यात आली आहे. कोणत्याही गाडीच तापमान अधिक झाल्यास त्या गाडीला थांबवून तिला योग्य त्या तापमान असताना पुढे जाऊन देण्याची अशी हि यंत्रणा २४ तास X ३६५ दिवस कार्यरत असणार आहे. ह्या टनेल मधील वीज व्यवस्था हि त्रिस्तरीय ब्याक अप यंत्रणेने सपोर्ट केलेली आहे.
इतक्या लांबीच्या टनेल मध्ये हवेची योग्य ती पातळी ठेवण्यासाठी प्रत्येक १२ मीटर वर सेन्सर बसवण्यात आले आहेत. जे हवेतील कार्बन डायओक्साईड आणि कार्बन मोनोओक्साईड च प्रमाण मोजून एक्झोस्ट पंख्यांची दिशा तसेच हवेची शुद्धता मेंटेन करणार आहेत. ह्या टनेल मध्ये आपत्कालीन किंवा रहदारीच्या वेळी मार्गिका बदलण्यासाठी २९ क्रोस रोड ठेवले आहेत. तसेच एक वेगळी मार्गिका हि राखीव ठेवण्यात आली आहे.
एन.एच. ४४ ह्या महामार्गावर बनवण्यात आलेल्या ह्या टनेल मुळे तब्बल दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. ह्या टनेल मध्ये जी.एस.एम. नेटवर्क असणारे फोन चालू शकणार आहेत तर प्रत्येक गाडीला ९२.७ एफ.एम हे रेडीओ स्टेशन लावण बंधनकारक असणार आहे. आपत्कालीन स्थितीत ह्याच च्यानल वरून संदेश देण्यासाठी हि व्यवस्था केली गेली आहे. ज्याने कोणत्याही स्थितीत गोंधळ न होता. गाडयांच नियंत्रण करणे सोप्पे जाणार आहे. अश्या वेगवेगळ्या व्यवस्थांनी परिपूर्ण असलेला हा टनेल मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया ह्या प्रोग्राम च्या माध्यमातून बनवलेला आहे. स्वदेशी अभियंते पण जगातील एक सर्वोत्तम टनेल उभारू शकतात हा आत्मविश्वास ह्या निमित्ताने सगळ्यांनी दाखवून दिला आहे. १४ किमी लांब असणाऱ्या झोझिला टनेल ची मुहूर्तमेढ हि ह्या टनेल च्या मुळे यशामुळे रोवली गेली आहे. ह्या प्रोजेक्ट वर काम केलेल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन.