Wednesday 8 November 2017

पाणबुडी एक सर केलेल शिखर...

पाणबुडी एक सर केलेल शिखर... 
पाणबुडी नेहमीच एक आव्हान देणार तंत्रज्ञान मानल गेल आहे. अस तंत्रज्ञान अवगत करण म्हणजे शत्रूच्या एक पाउल पुढे असण. २००५ साली भारताने स्कोर्पियन डिझाईन प्रमाणे ६ पाणबुड्या बनवण्याचा ३ बिलियन अमेरिकन डॉलर चा करार फ्रांस च्या डी.सी.एन.एस. मध्ये झाला. प्रोजेक्ट ७५ आणि प्रोजेक्ट ७५ (आय) ह्या ३० वर्षाच्या प्लान नुसार भारत दोन असेम्बली लाईन वर १२ पाणबुड्या बनवणार आहे. तर अजून १२ पाणबुड्या भारतीय डिझाईन नुसार बनवण्यात येणार आहेत. म्हणजे २०३० पर्यंत २४ पाणबुड्या भारताकडे अद्यावत तयार असतील. ज्या भारताच्या ७००० किमी. पेक्षा जास्ती लांबीच्या किनाऱ्यांच रक्षण तर करतील पण हिंद महासागरामधील प्रत्येक जहाजावर पाण्याखालून लक्ष ठेवण्याची ताकद भारतीय नौदलाला मिळेल.
ह्या ६ पाणबुड्या मधील पहिली पाणबुडी २१ सप्टेंबर २०१७ ला नौदलाच्या हवाली करण्यात आली. ३० ऑक्टोबर २०१५ ला बनवून पूर्ण झाल्यावर अनेक पद्धतीच्या चाचण्यांना सामोरी जाऊन आता ती भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली आहे. आय.एन.एस. कलावारी (एस ५०) डीझेल- इलेक्ट्रिक पाणबुडी असून अतिशय प्रगत अश्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने बनवली गेली आहे. ह्या पाणबुडी वर ६ X ५३३ मिमी टोर्पिडो ट्यूब असून १८ ब्ल्याक शार्क टोर्पिडो आहेत. एस.एम ३९ नौकाविरोधी मिसाईल बसवलेली आहेत. त्याशिवाय ३० माईन्स ने हि पाणबुडी अद्यावत आहे. १५६५ टन वजनाच डिस्प्लेसमेंट असणारी हि पाणबुडी ५० दिवस पाण्याखाली राहू शकते तर तब्बल ३५० मिटर खोल पाण्याखालून प्रवास करू शकते. १२,००० किमी चा प्रवास १५ किमी/तास वेगाने ती करू शकते.
आय.एन.एस कलावरी हि पूर्णतः भारतात बनवली गेलेली पहिली पाणबुडी आहे. २००५ साली जेव्हा भारताने स्कोर्पियन तंत्रज्ञानावर आधारित ६ पाणबुड्यांची ऑर्डर दिली तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवून हा करार केला गेला. चीन ची समुद्रातील वाढती ताकद, साउथ चायना सी सोबत हिंद महासागरावर सुरु झालेली चीन च्या अरेरावी ला शह द्यायचा असेल तर भारताला झपाट्याने आपल्या सागरी क्षमतांमध्ये वाढ करण गरजेच होत. त्याच सोबत वय झालेल्या आणि कालबाह्य होत जाणाऱ्या पाणबुड्याना निवृत्त करणे हि गरजेचे होत चालले होते. पण अश्या वेळी त्यांची जागा घेणाऱ्या नव्या दमाच्या पाणबुड्यांची हि गरज होतीच. ह्या करारानुसार फ्रेंच नेव्ही ने तंत्रज्ञान हस्तांतर करण्याच मान्य केल आणि ह्या पाणबुड्याची निर्मिती माझगाव डॉक इकडे सुरु झाली.
कलावारी सोबत खांदेरी आणि कारंज ह्या दोन पाणबुड्याच काम अंतिम टप्प्यात असून २०१८ मध्ये ह्या दोन्ही पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट होती. आण्विक पाणबुडी च तंत्रज्ञान असताना डीझेल पाणबुडी का? आण्विक पाणबुडी च तंत्रज्ञान क्लिष्ट आहे. त्यामुळे त्याची बांधणी सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप कठीण आहे. ह्याशिवाय ह्या पाणबुड्यांचा एक मोठा अवगुण म्हणजे ह्या पाणबुड्या मध्ये असणाऱ्या अणुभट्टी ला सतत कुलंट पंप कराव लागते. हे पंपिंग छोटा पण ओळखता येईल असा ध्वनी निर्माण करते. ह्यामुळे पाणबुडी शत्रूच्या नजरेत येण्याची शक्यता खूप असते. पण ह्या तुलनेत डीझेल-इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर पाणबुड्या ए.आय.पी. म्हणजेच एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन चा वापर करत आवाज न होऊ देता काम करू शकतात. एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन मध्ये इथेनॉल आणि ऑक्सिजन चा वापर करत वाफ निर्माण केली जाते. ह्या वाफेचा वापर करून टर्बाईन ला फिरवून उर्जेची निर्मिती पाणबुडीत केली जाते.
हवेतून प्रवास करण जितक सोप्प त्याच्या बरोबर उलट पाण्याखालून प्रवास करण कठीण आहे. मॉरीशस ला मी असताना अश्याच एका पाणबुडीतून ३० मिटर खालच माशांच, जलचरांच विश्व बघण्याचा योग आला. अवघ्या एका तासामध्ये जीवाची झालेली घालमेल, झालेला कोंडमारा तसेच पाण्याच्या वजनामुळे डोळ्याच्या बुबुळावर पडणाऱ्या दाबामुळे रंगसंगती ओळखण्यात झालेले बदल ह्या सगळ्या गोष्टीनी पाण्याखाली रहाण किती कठीण असू शकेल ह्याचा अंदाज आला होता. हे सगळ अवघ्या ३५ मिटर वर तर ३५० मिटर खोलीवरच्या त्रासाची कल्पना मी करूच शकत नाही. म्हणूनच अश्या पाणबुडी मध्ये काम करून देशाच रक्षण करणाऱ्या सर्वच नौसैनिकांना मानाचा सलाम.
माणसाच्या शारीरिक क्षमताना धाप टाकायला लावणाऱ्या अश्या पाणबुड्याच निर्माण आणि त्यामागच तंत्रज्ञान अवगत करून त्यांची निर्मिती करण हा खूप मोठा टप्पा आहे. म्हणून पाणबुडी निर्मिती तंत्रज्ञान आज मोजक्याच देशांकडे आहे. ह्यात स्वबळावर निर्मिती करून भारत अश्या देशांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे. आय.एन.एस. कलावारी च्या येण्याने भारतीय नौदलाची ताकद कमालीची वाढली आहेच पण हे तंत्रज्ञान स्वबळावर निर्माण करणार माझगाव गोदीतील संपूर्ण कामगार वर्ग कौतुकास पात्र आहे. ह्याच्या मागोमाग अजून २ पाणबुड्यांची निर्मिती आणि त्यांची भारतीय नौदलाकडून स्वीकृती येत्या वर्षभरात होईल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आय.एन.एस कलावारी च्या सर्व निर्मात्यांचे अभिनंदन आणि सलाम.

सहानभुतीच्या निमित्ताने...

सहानभुतीच्या निमित्ताने...
आपल्याकडे लोकांच लक्ष जाव म्हणून आपण नेहमीच काही न काही वेगळ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी कपड्याच्या रंगसंगती पासून ते ओठांवर लावणाऱ्या लिपस्टीप पर्यंत. केसांच्या रचनेपासून ते नखांच्या पॉलीश पर्यंत. आभासी पडद्यापाठीमागे काही दिसत नसताना हे सर्व लक्ष वेधण्याचे उपाय लागू पडत नाहीत. एकतर तुमच्याकडे गुणवत्ता हवी विचारांची, ते मांडण्याची, ते पोचवण्याची ह्यापेकी काही एक जमत नसेल तर मग कला हवी सहानभूती जमा करण्याची.
माझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत ह्याचा डोंगर आपल्याला रचता यायला हवा किंवा तस नसेल तरी ते दाखवता यायला हव. त्यावर मात कशी केली किंवा कोणी आपला फायदा कसा घेतला हे सांगत त्यावर दुखांचे इमले तरी चढवता यायला हवेत. स्त्रियांच्या बाबतीत तर हे सहानभुतीच अस्त्र थोड अधिक सोप्प आहे. डोळ्यातून थेंब पडत नाही तोच ते पुसणारे आणि न मागता खांदा देणारे तयारच असतात. पुरुषांच्या बाबतीत मात्र एकतर आर्थिक किंवा व्यवहारावर सहानभूती जमा करता यायला हवी.
आयुष्यात कोणाला सगळ सहज मिळते? प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतेच. ते कोणाला सुटलेल नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आर्थिक, कौटुंबिक कलह नसतात? पण ते सांभाळून ते निस्तारून प्रत्येकजण आयुष्याच्या रस्त्यावर वाटचाल करत असतो. अर्थात काही वेळा ह्या गोष्टी डोंगऱ्या एवढ्या मोठ्या असतात, अनपेक्षित असतात. मन तोडणाऱ्या तर आयुष्य उध्वस्थ करणाऱ्या हि असतात. पण अस कोणाच्या आयुष्यात किती वेळा होते? म्हणजे अनेकदा होत असेल तर त्याला ती व्यक्ती हि जबाबदार असू शकते? ह्याचा विचार कोणीच करत नाही. पण काही जणांना ह्या दुःखाचा बाजार मांडायची सवयच असते. कारण त्या नंतर मिळणाऱ्या सहानभूती वर त्यांच्या स्व ला आनंद मिळत असतो.
सहानभूती दाखवून आपल दुःख जगासमोर मांडण्याची आता स्पर्धाच सुरु झाली आहे. मी किती कर्जात, मी किती आजारात किंवा मी सध्या हॉस्पिटलमध्ये भरती. असे एक न अनेक निमित्त काढून पोस्ट टाकण्याची संधी काहीजण शोधत असतात. काहीवेळा नक्कीच वर उल्लेख केलेल्या गोष्टी खूप खऱ्याखुऱ्या असतात आणि आयुष्याच्या त्या वेळेस खरेच सहानभूती ची गरज हि भासते. पण म्हणतात न सुक्या सोबत ओलही जळते तस कोण खर आणि कोण खोट हे समजून घ्यायला वेळ आणि मानसिकता किती जणांची असते.
आभासी विश्वातली सहानभूती हि आभासी असते हे सत्य माहित असून सुद्धा आपल्या माणसांना बाजूला टाकून आपण आभासी विश्वात आधार शोधतो. काहीवेळा आयुष्यातील कटू अनुभवांमुळे ती गरज हि बनत असेल. पण सहानभूतीचा बाजार मांडण कितपत योग्य? आपली दुःख हि आपल्यालाच झेलावी लागतात. आपले गुंते आपल्याला सोडवायला लागतात मग आभासी दुनियेत मिळणाऱ्या सहानभूतीने नक्की आपण काय साधतो ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. जर ते फक्त लाईक आणि पोस्ट ला मिळणाऱ्या प्रसिद्धी साठी असेल तर भावनांचा असा खेळ मांडणे कितपत योग्य? तस नसेल तर त्या वेळी आपल्या माणसांची सहानभूती सोडून आभासी दुनियेतल्या लोकांकडून आभासी सहानभूती मिळवण कितपत योग्य?
काहीवेळा आपण एकटे पडतो तेव्हा खरच आपल्याला माणसांची गरज लागते. त्यांच्या नुसत्या शब्दांची लागते तर कधी कोणीतरी ऐकून घेणार हव असते. पण पोस्ट टाकून पूर्ण जगाकडे त्याची विनवणी करण कितपत योग्य आहे ह्याचा ज्याचा त्याने विचार करावाच. आपले आभासी मित्र मैत्रीण ह्यांना आपण अनेक वेगवेगळ्या मार्गाने सांगूच शकतो. ज्याला आपण कधी बघितलं नाही, बोललो नाही, माहित नाही अश्या व्यक्तीकडून सहानभुतीची अपेक्षा कितपत योग्य आहे. सहानभुतीच्या अनेक पोस्ट बघून हाच चिचार मनात आला कि सहानभुतीच्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावून बघण्याची खूप गरज आहे.

माकडाच कोलीत...

माकडाच कोलीत...
लहानपणी रोज रात्री ७:३० च्या बातम्या बघणे हा माझ्या आयुष्यातील एक भाग होता. कारण पूर्ण दिवसात कुठे काय झाल निदान महाराष्ट्राच्या बाबतीत जाणून घ्यायला तीच वेळ असायची. हळूहळू उपग्रह क्रांतीमुळे २४ तास टी व्ही बघण्याची सोय उपलब्ध झाली आणि बातम्या पण २४ तास झळकू लागल्या. १-२ बातम्यांचे च्यानेल होते तोवर ठीक होत. बातम्यांच्या मध्ये एक सुसूत्रता होती. पण हळूहळू जशी स्पर्धा वाढली तसतसा टी.आर.पी. राखण्यासाठी काय वाट्टेल ते करून पहिला मी अस करण्याची अहमहमिका सुरु झाली. फेसबुक, व्हात्स अप, ट्विटर च्या उत्क्रांतीमुळे प्रत्येक नागरिकाला आपल्याला काय वाटल ते सांगण्याची तसेच आपल्या सोबत झालेल्या घटना किंवा आपल्या भागात झालेल्या घटनांची माहिती इतरांना देण्यासाठी एक माध्यम मिळाल.
माणूस हा माकडापासून उत्क्रांती झालेला प्राणी आहे हे पुन्हा एकदा ह्या माध्यमांच्या उत्क्रांतीमुळे दिसून आल. घरबसल्या किंवा जिकडे असू तिकडे काय वाट्टेल ते पूर्ण जगाला सांगण्याच माध्यम आपल्या बोटावर मिळाल्यावर आणखी काय हव होत. माकडाला जस हातात कोलीत मिळाल कि सगळीकडे आनंदात तो आग लावत फिरतो. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची चिंता न करता फक्त आणि फक्त समोर दिसेल ते पेटवून देण्याची अहमिका त्याला दिसत असते. माणूस ह्याहून वेगळ काय वागतो. आपल्या समोर आलेल्या बातमीला कधी एकदा १०-५० ग्रुप मध्ये आणि २००-५०० मित्र मैत्रीणीना सांगतो अशीच त्याची अवस्था असते. मला बातमी मिळाली म्हणजे ती सगळ्यांना सर्वात आधी सांगितल तर होणारा आनंद कोणाला नको असतो? पण खरच ह्या नंबर च कोणाला काही पडलेल असते का? नक्की उताविळपणा करून बातमी पोचवताना आपण किती ठिकाणी आग लावतो ह्याचा विचार तरी आपण करतो का?
मला मिळालेली कोणतीही बातमी किंवा माहिती खरी का खोटी ह्याची शहानिशा करण्याच तंत्रज्ञान पण हाताच्या बोटांवर उपलब्ध असताना किती जण ती करण्याची तसदी घेतात. Forwarded as Received म्हणत माझी जबाबदारी संपली असच आपण सूचित करतो. पण खरीच अशी जबाबदारी संपते का? आपल्या शिक्षणाने, अनुभवांनी, वयाने किंवा विचारांनी आपण प्रगल्भ असू तर ह्या प्रगल्भपणाचा वापर आपण करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तो किंवा ती तशी वागली म्हणजे एखादी बातमी आपल्याला न बघता पाठवली तर आपण पण तेच करणार का? कोणीही माती खाल्ली तर आपण पण खाणार कारण ती जबाबदारी माझी कुठे कारण मी तर Forwarded as Received केल नाही का?
एखाद्या दुर्घटनेची बातमी असो, नैसर्गिक प्रलयाची बातमी असो वा आपल्या घराशी, गल्ली शी , शहराशी किंवा देशाशी संबंधित बातमी असो. आपण एकदा ती पुन्हा तपासण्याची तसदी घेतो का? कोणाच तरी नाव लिहून आलेला सुविचार, लेख, विचार, किंवा घोषणा प्रत्यक्ष त्या माणसाने केली आहे का? हे तपासून बघतो का? अनेक संस्थाच्या, अनेक व्यक्तींच्या नावाने आपल्याला आलेले मेसेज पुढे ढकलताना खरच असा काही आहे का? ह्याची शहनिशा न करता पुढे पाठवतो तेव्हा आपण आपली जबाबदारी टाळतो अस वाटत नाही का? एक सेकंद असा विचार करा तुम्ही ती व्यक्ती असाल? किंवा तुम्ही किंवा तुमच जिवलग कोणीतरी त्याच वेळी त्या भागात असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्या बातमीशी निगडीत असाल तर होणारा मनस्ताप किती असेल ह्याची एकदा नक्कीच कल्पना करा.
आपण जिकडे बातमी पाठवतो त्या ग्रुप मध्ये कोणता वयोवर्ग आहे ह्याच हि भान ठेवायला हव. चित्रविचित्र अपघातांचे फोटो, सेक्सी किंवा प्रौढ अर्थ असणारे मेसेज किंवा कोणताही मेसेज पाठताना २ मिनिट थांबून आपण कोणाकोणाला तो पाठवत आहोत ह्याचा विचार आपण करायला हवा. कळतनकळत आपण कुठेतरी कोणाच्या मनावर वाईट संस्कार ते कोणाच्या मनात घृणा आणि कोणाच मानसिक स्वास्थ बिघडवत आहोत हे पण लक्षात घ्यायला हव. हि जबाबदारी फक्त सॉरी म्हणून टाळता येत नाही. काय मोठा फरक पडणार असतो कि आपण ५ मिनिट आलेल्या बातमीच आकलन करून पुढे पाठवली तर. जास्तीत जास्त काय तर आपण कोणाच्यातरी नंतर सांगू. पण आपण योग्य ती बातमी सांगतो हा विश्वास निर्माण होण जास्ती गरजेच असते ह्या पेक्षा कि आपण पहिली बातमी सांगतो.
सर्वाना कळाव हा हेतू उद्दात असला तरी कोणत्या प्रकारची माहिती कश्या पद्धतीने आपण देत आहोत ह्याचा विचार आपण करायला हवा. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. आधी मी आधी मी करत आपण आपल्या स्व ला तर खुश करू पण ते करताना आपण निर्माण केलेल्या चुकांची किंवा पाठीशी घातलेल्या एखाद्या गोष्टीची जबाबदारी पण आपलीच असते हे सर्वानीच ध्यानात ठेवायला हव. माहिती तंत्रज्ञान च्या ह्या युगात आपण क्षणात जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो. आपण क्षणात हजारो, लाखो, अब्जोवधी लोकांपर्यंत पोहचू शकतो. हि ह्या तंत्रज्ञानाची जशी ताकद आहे तशी आपल्या वाढलेल्या जबाबदारीची हि. एक साध १०० लोकांसमोर बोलायचं असेल तर आपण किती तयारी करतो. प्रत्येक शब्द, उच्चार सगळ तपासून बघतो. त्याच एक अनामिक दडपण आपल्यावर असते मग आपण पुढे केलेली माहिती क्षणात अब्जोवधी लोकांपर्यत जर जात असेल तर आपल्याला त्याच किती दडपण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव असायला हवी.
माहिती तंत्रज्ञान जरी माणसाच्या आयुष्याच अविभाज्य अंग आता झाल असल तरी त्यायोगे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि जबाबदारीसाठी पण आपण स्वतःला तयार करायला हव. हे करण्यासाठी जास्ती काही लागत नाही. आपला माकड न बनू देण आपल्या हातात आहे. आपण जर स्वतःला सुशिक्षित, प्रगल्भ, उत्क्रांती झालेला माणूस मानत असू तर माणसाचे गुण वापरण हेच आपल्या माणूसपणाच लक्षण आहे. अन्यथा माकड सगळ्यांना बनता येत. आपण ठरवायचं आपल कोलीत आपण माणूस बनून पुढे न्यायचं कि माकड बनून.

(फ्लाइंग सिख) मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स अर्जन सिंग...

(फ्लाइंग सिख) मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स अर्जन सिंग... 
लायलपूर ( आत्ताच फैसलाबाद, पाकिस्तान) इकडून एक २१ वर्षाचा अर्जन सिंग त्यावेळच्या एअर फोर्स मध्ये पायलट ऑफिसर म्हणून निवडला गेला. नियतीच्या मनात त्यावेळी वेगळच होत. काळाच्या ओघात ह्या ठिकाणाहून प्रसिद्ध होणारा तो भगत सिंग नंतर दुसरा सिंग म्हणून नावारूपास आला. ह्यांचे आजोबांचे आजोबा अफगाण युद्धात शहीद झाले होते. तर आजोबांनी पण सेम रेजिमेंट मधून युद्धात भाग घेतला होता. आपल्या घराण्याचा वारसा हक्क पुढे चालवत सिंग एअर फोर्स मध्ये दाखल झाले. राझमाक इकडे जाण्यासाठी एकदा उड्डाण भरताना जमिनीवरून त्यांच्या विमानाला गोळी लागली आणि विमान नुलाह मध्ये उतरराव लागल. आपात स्थितीत विमान उतरवताना डोक समोरच्या प्यानेल वर आदळल्याने त्यांच्या नाकाला दुखापत झाली. त्या स्थितीत हि आपल्या गनर सोबत मदत येईस्तोवर सिंग हे दटून राहिले. त्यातून जन्म झाला तो जिगर असणाऱ्या एका सैनिकाचा एका फ्लाइंग सिख चा.
१९४४ चे ते वर्ष अर्जन सिंग भारतीय वायू सेनेच्या पहिल्या युनिट ला लीड करत होते. इम्फाळ इकडे दाखवलेल्या शौर्याबद्दल तसेच त्यांच्या नेतृत्व गुणाबद्दल त्यांना Distinguished Flying Cross (डी.एफ.सी.) प्रदान करण्यात आला. लॉर्ड माउंटब्याटन ह्यांच्या हस्ते वयाच्या २५ वर्षी हा पुरस्कार मिळाला. हा मान मिळवणारे ते चौथे भारतीय होते. भारत १९४७ साली स्वातंत्र्य झाला. स्वतंत्र भारतात रॉयल एअर फोर्स आणि रॉयल इंडियन एअर फोर्स सयुंक्तपणे आयोजित केलेल्या पहिल्या लाल किल्यावरील फ्लाय पास मध्ये विंग कमांडर तसेच ग्रुप क्याप्टन असा दुहेरी बहुमान त्यांना मिळाला होता. वयाच्या अवघ्या ४५ वर्षी ते चीफ ऑफ एअर स्टाफ झाले. ५ वर्ष भारतीय वायू सेनेच नेतृत्व करणारे ते एकमेव अधिकारी होते.
१९६५ च्या युद्धात भारतीय वायू सेनेची कमान अर्जन सिंग ह्यांच्याच हातात होती. ह्या युद्धात भारतीय वायू सेनेने पाकिस्तान च कंबरड मोडल. ह्यामुळेच आपल्याला पाकिस्तान वर विजय मिळवता आला. ह्या अश्या अचूक नेतृत्वासाठी चीफ ऑफ एअर स्टाफ वरून त्यांना एअर चीफ मार्शल हा मान देण्यात आला. हा मान मिळवणारे ते पहिलेच अधिकारी ठरले. वयाच्या ५० व्या वर्षी १९७० मध्ये त्यांनी एअर फोर्स मधून निवृत्ती घेतली. १९७१ मध्ये भारत सरकारने त्यांची नियुक्ती राजदूत म्हणून स्विझरलंड आणि वेक्टीकन ह्या देशांसाठी केली. १९७४ ते १९७७ त्यांनी केनिया साठी हाय कमिशनर म्हणून हि काम बघितल. १९७५ ते १९८१ ते नेशनल कमिशन ऑफ मायनोरीटी चे पदाधिकारी होते. १९८९ ते १९९० दिल्ली चे राज्यपाल म्हणून पण आपली सेवा त्यांनी देशाला दिली. अश्या ह्या शूरवीर, निडर अधिकाऱ्याला २००२ रोजी भारत सरकारने मार्शल ऑफ एअर फोर्स बनवल. हा बहुमान मिळवणारे मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग हे एकमेव अधिकारी आहेत. फिल्डमार्शल साम माणेकशॉ नंतर पाच तारे मिळवणारे एकमेव सैनिकी अधिकारी होते.
सैनिकी बाणा काय असतो ते ह्या अधिकाऱ्याकडे बघितल कि कळते. जास्ती लांब नाही २८ जुलै २०१५ ला स्वर्गीय राष्टपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या पार्थिवाच दर्शन घेण्यासाठी मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग हजर तर राहिलेच. पण प्रकृती बरी नसताना पण व्हील चेअर मधून उठून त्यांनी भारताच्या सुपुत्राला शेवटचा कडक स्याल्युट केला. वयाच्या ९६ व्या वर्षी ते आले नसते किंवा उभे राहिले नसते तर कोणाला काही वाटल नसत पण आपल्यातला सैनिक त्यांनी त्या वेळेस हि जागा ठेवला होता. वयाच्या ९८ वर्षापर्यंत ते आठवड्यातून दोनदा गोल्फ खेळत असत. इतक आपल शरीर त्यांनी व्यवस्थित ठेवल होत. वयाच्या २१ व्या वर्षी आपल्या मागच्या ३ पिढ्यांची कर्तृत्ववान सैनिकी धुरा हाती घेऊन पुढे नेणाऱ्या ह्या मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग ह्यांना माझा साक्षात दंडवत.
भारतात खूप असे सैनिक आहेत कि ज्याचं आयुष्य एक अविस्मरणीय शौर्यकथा होऊ शकेल. अनेक वर्ष, अनेक पिढ्यांना प्रोत्साहित करू शकेल. खूप काही शिकण्यासारख आहे ह्या प्रत्येक सैनिकाकडून मग तो एक साधा सैनिक असो वा मार्शल ऑफ एअर फोर्स. तो बाणा, ती विजीगुषी वृत्ती, ते समर्पण, तो देशाभिमान, ती निडरता, ह्या सगळ्या पलीकडे तो आत जपलेला सैनिक. पण काय कि आम्ही आमचे हिरो हे चित्रपटासाठी सीमित असतात. आमचे आदर्श हे कोणी किती घोटाळा केला ते असतात. आमची स्वप्न हि मोठा बंगला आणि गाडी घेण्यापुरती मर्यादित असतात तिकडे आमच्यात सैनिक निर्माण होणार कसा? कारण सैनिक निर्माण करायला आधी तो समजून घ्यावा लागतो. त्याच आयुष्य वेचाव लागते.
कोणी करो वा न करो पण देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करणाऱ्या प्रत्येक सैनिकाच आपण देण लागतो. निदान ह्याची तरी जाण आपण ठेवू. मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग सारखे अधिकारी आपल्याला लाभण हे आपल भाग्य आहे. ह्या आणि अश्या सैनिकांमुळे आज आपण सुखाने आपल्या घरात झोपू शकतो. मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग ह्यांना पुन्हा एकदा कडक स्याल्युट. असे सैनिक कधी जात नसतात म्हणून तुम्ही माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयांच्या मनात नेहमीच घर करून रहाल. ( फ्लाइंग सिख ) मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स अर्जन सिंग ह्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोक्याच वळण...

Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोक्याच वळण... 
Artificial Intelligence किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की काय? तर अगदी गुगल च्या सर्च इंजिन च अल्गोरिदम पण कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. चालक रहित गाडी ते स्वचालित क्षेपणास्त्र, युद्ध प्रणाली हे सगळच Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या खाली येत. नुसत रोबोट नाही तर ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याचा भाग आहेत. आता जी कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्वात आहे त्याला विक किंवा प्राथमिक कृत्रिम बुद्धीमत्ता अस म्हंटल जाते. इंटरनेट सर्च किंवा गाडी ला चालवण हा त्यातील प्राथमिक भाग पण स्ट्रोगं कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा दुसऱ्या फळीतील कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र माणसाला सगळ्या क्षेत्रात मागे टाकेल. एखाद गणित किंवा प्रमेय सोडवण असो वा बुद्धिबळ खेळण असो. पण अशी माणसाला मागे टाकणारी क्षमता आपल्यासोबत काय घेऊन येईल ह्याचा नेम नाही.
स्टीफन हॉकिंग, एलन मस्क, स्टीव वोझ्निक, बिल गेट्स हि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील दादा लोक मिडिया मध्ये पण ह्या धोकादायक वळणाबद्दल सांगत आहेत. वैज्ञानिक सध्या तरी अस सांगत आहेत कि माणसाच्या भावना मशीन मध्ये आणण सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे प्रेम आणि द्वेष ह्या भावना कृत्रिम बुद्धिमत्ते मध्ये येण शक्य नाही. मग कोणत्या भागात कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला धोकायदायक ठरू शकेल तर वैज्ञानिकांच्या मते दोन भागात.
१) कृत्रिम बुद्धिमत्तेला विध्वंसक कृती करण्यासाठी बनवलं जाईल. स्वयंचलित क्षेपणास्त्र किंवा युद्ध सामुग्री जी कोणालाही मारण्यासाठी विकसित केली जाईल जर अशी प्रणाली चुकीच्या हातात गेली तर खूप मोठ्या प्रमाणावर माणसांची हानी संभव आहे. हि प्रणाली अश्या रीतीने विकसित असेल कि तिला थांबवणे सहज शक्य नसेल. पुढे येणारा विनाश हा माणसाला वाटत असून पण टाळता येणार नाही.
२) कृत्रिम बुद्धिमत्ता काहीतरी चांगल करण्यासाठी विकसित केली जाईल पण तिची पद्धत जी असेल ती माणसाला हानी करणारी असेल. आता तुम्ही एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या गाडीला आज्ञा केली कि मला कसही करून विमानतळावर लवकरात लवकर घेऊन चल तर ती गाडी कोणालाही ठोकत किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन करत तुम्हाला विमानतळावर पोचवेल पण तुमची आज्ञा फक्त विमानतळावर पोहचवण्याची होती पण त्या शब्दांना आदेश मानून ती प्रणाली आपल कार्य करेल. अर्थात हे एक उदाहरण झाल.
मग आत्ताच हे विचार करण्याची वेळ का येते आहे तर माणूस झपाट्याने ह्या धोकादायक वळणाकडे वाटचाल करतो आहे. गेल्या ५ वर्षापूर्वी ज्या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेने मिळवण्यासाठी १० वर्षाचा कालावधी लागेल अस वैज्ञानिकांना वाटत होत. त्या गोष्टी आत्ता लागलेल्या शोधामुळे आपण आत्ताच पूर्णत्वाला नेल्या आहेत. ज्या वेगाने माणूस ह्या क्षेत्रात मुसंडी मारतो आहे ते बघता अनेक शतकांनंतर दिसणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात बघू अस वैज्ञानिकांना वाटायला लागल आहे. हे धोक्याच वळण आपण कस पार करतो ह्यावर मानवजातीचा पुढला प्रवास अवलंबून आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याला घडवणारी बुद्धिमत्ता ह्या दोघात जोवर बुद्धिमत्ता जिंकते आहे तोवर आपला प्रवास पुढे सुरु राहील पण ज्यावेळेस मशीन किंवा तंत्रज्ञान ह्यावर भारी पडेल तेव्हा माणसाने आपल्या प्रवासाच सुकाणू कृत्रिम बुद्धिमत्ता च्या हवाली केल असेल. मग आपण पुढे जायचं नाही का?
पुढे नक्कीच जायचं पण त्यासोबत जगातील वैज्ञानिक, तंत्रज्ञान अभियंते, राजकारणी, पुढारी आणि राज्यकर्ते सर्वांनाच भान ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. कारण आज दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्यात आपण कधी पडून जाऊ ह्याचा पत्ता पण लागणार नाही. कारण त्या खड्यात तुम्हाला ढकलणारी कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी प्रगत असेल कि तिच्यापुढे तुमच काहीच चालणार नाही. अजून वेळ गेलेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्ते चा आपल्या आयुष्यातील वापर हि काळाची गरज असली तरी तिच्या आहारी आपण किती जायचं हे आपणच ठरवायला हव. सुरवात आपल्यापासून केली तर आपण सर्व मिळून Artificial Intelligence किंवा कृत्रिम बुद्धिमत्ते च्या ह्या वळणाला निश्चितच चागल्या तऱ्हेने पार करू शकू.

गॉसिपिंग...

गॉसिपिंग... 
एखाद्या व्यक्तीच्या विषयी संबंधित असलेल्या गोष्टीची पूर्ण शहनिशा न करता त्यावर गप्पा करण म्हणजेच गॉसिपिंग. फेसबुक ने जस लोकांना एकत्र आणल तस त्यांच्या वैयक्तिक जिवनात ढवळाढवळ करण्याची संधी हि दिली. काहींनी स्वतःहून तर काहींनी आपला हक्क समजून ह्याची दुकान जागोजागी उघडली. ग्रुप हा लोकांचा समूह असताना तिथे घडलेल्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी च्याट चा ऑप्शन म्हणजे हातात कोलीत. मग ग्रुप वर घडलेल्या घटनेवर त्याने किंवा तिने काय मत दिल ह्याच्या चर्चा पडद्यामागे व्हायला लागल्या आणि गॉसिपिंग ची सुरवात झाली.
सोशल नेटवर्क ने जस लोकांना जवळ आणल तशी नवीन नाती पण बनत गेली. किंबहुना भावनांना नात्यात बसवण्यात फेसबुक कुठेच मागे राहील नाही. अगदी आई- वडील ते ताई, माई आक्का पर्यंत आणि मैत्र मैत्रिणी पासून प्रियकर आणि प्रेयसी पर्यंत सगळेच नातेसंबंध निर्माण होत गेले. आपल्या ह्या पसाऱ्यात सगळ्यांना चांगले अनुभव आले अस नाही. किंवा हि नाती काळाच्या कसोटीवर टिकून राहिली असहि झाल नाही. मग काय त्या नात्यात असताना विश्वासाने मोकळ्या केलेल्या भावनांचा बाजार मांडायला सुरवात झाली.
गॉसिप आता फक्त दोन तीन व्यक्तींपुरती मर्यादित न रहाता आता त्याचा पसारा वाढत गेला. व्हास्त अप च्या येण्याने तर अगदी दुसर लपून बोलण्याच माध्यम आपल्याला उपलब्ध करून दिल. फेसबुक च्या ग्रुप पासून सुरु झालेला हा प्रवास एकमेकांच्या खाजगी जिवनात शिरकाव बिनदिक्कतपणे करू लागला. आपण ह्यात काही चुकीच करतो आहोत ह्याच भान पण काही लोकांना राहील नाही. चोरी करताना पण चोरांचे काही एथिक्स असतात. नात्यात पण काही एथिक्स असतात ते आपण पाळायचे असतात आणि ते पाळता येत नसतील तर आपली प्रगल्भता हि शब्दांपुरती मर्यादित राहते अस असताना काहींनी बिनदिक्कतपणे कोणीतरी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टींचा बाजार आणि गॉसिप ह्याची दुकान सुरु केली. हे सगळ करताना आपण कोणाच आयुष्य दावणीला बांधतो आहोत. ह्याच सोयरसुतक पण त्यांना नव्हत.
गॉसिप आता टार्गेट साठी वापरल जाऊ लागल. कोणाला तरी धडा शिकवायचा तर त्याच्या किंवा तिच्या बद्दल इतक गॉसिप करायचं कि त्यांनी स्वतःहून एकतर आपल आकाउंट बंद तरी करायचं किंवा सगळीकडे त्याच्या किंवा तिच्या बद्दल बोलून कोणाच्याही व्यक्तिमत्वाच सर्टिफिकेट दयायचे सगळ स्वामित्व आपल्याकडे आहे असाच आभास निर्माण करायचा. ह्या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला किती मानसिक त्रासातून जाव लागेल ह्याबद्दल आपण निदान अनभिज्ञ तरी राहायचं किंवा दाखवायचं तरी. मग सॉरी बोलून वेळ मारून तरी न्यायची किंवा गिरे तो भी टांग उपर करत आपला कार्यक्रम पुढे सुरु ठेवायचा.
कोणीही व्यक्ती आपल्या पर्सनल आयुष्यात कोणाच्याही प्रेमात असेल, रिलेशनशिप मध्ये असेल किंवा अजून कोणत्या लेवल वर जोडलेली असेल तर त्याचा आपल्याशी काय संबंध? जोवर ती व्यक्ती स्वतःहून आपल्याकडे येत नाही किंवा त्याचा स्वीकार करत नाही तर आपण सगळीकडे जाऊन आपल्याला नक्की काही माहित नसताना त्याचा बोभाटा करण किती योग्य? कारण अश्या वेळी त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक लोकांची जबाबदारी असू शकते. आयुष्याच्या त्या वळणावर अनेक घरातील, कुटुंबातील तसेच प्रोफेशनल आयुष्यातील व्यक्ती असताना आपल्या गॉसिपमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती गोंधळ उडत असेल ह्याची पुसटशी कल्पना तरी आपण गॉसिप करताना करतो का? ह्या गोष्टी एखाद्याच आयुष्य उधळावून लावत असताना आपण त्याबद्दल किती विचार करतो?
कोणीतरी सांगितलं म्हणून आपण लगेच समोरच्याला त्याच चष्म्यातून बघायला लागतो. बघताना एक मिनिट पण विचार करत नाही कि सांगणारा आणि ज्याच्या बद्दल आपल्याला सांगितलं त्याच्या बद्दल आपण बोलणारे कोण? ऐकून आपण सावध व्हावं हा हेतू असला तरी खरच आपल्याला असा अनुभव आलेला नसताना आपण समोरच्या बद्दल ग्रह करून मोकळ होतच कि. काय मिळते ह्या सगळ्यातून? नक्की कोणता बदला? आणि नक्की कोणत सुख मिळवत आहोत ह्यातून? कोणाच तरी आयुष्य दावणीला बांधून त्यातून मिळणाऱ्या सुखाने आपण खरच काही आनंदी होत का?
गॉसिप करून हाताशी काही लागत नाही. लागते ते फक्त आणि फक्त कोणाच तरी आयुष्य उध्वस्थ होण. खरच एखादी व्यक्ती आसयुयेतून काही करत असेल तर आपल्या व्यक्तीला सांगणे त्याला किंवा तिला सुरक्षित करणे नक्कीच चांगले. पण कोणीतरी काही तरी सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल अजून ४ लोकांकडे आपल्याला खात्री नसताना काहीही सांगणे म्हणजे आपण पण ह्या सगळ्या साखळीचा भाग होण. गॉसिप एखाद्याच आयुष्य उध्वस्थ करू शकते. आज ती व्यक्ती असेल उद्या तुम्ही असू शकाल तेव्हा एक सेकंद आपल्याला तिकडे ठेवून विचार करा. कोणाच कोणाशी काय नात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोवर गोष्टी आपल्यासोबत होत नाही किंवा समोरचा तस वागत नाही तोवर एखाद्याला कोणाच तरी ऐकून साच्यात बसवण हे प्रगल्भपणाच लक्षण नव्हे.
कोणाबद्दल गॉसिप करताना आपल्या हि लक्षात असू द्या. हीच वेळ जर आपल्यावर आली किंवा कोणी आपल्याबद्दल अस कोणी बोलल तर आपल्याला काय वाटेल ह्याचा विचार करून आपण पुढे गेलो तर कदाचित आपण नक्की काय करायचं हे आपल्याला समजेल. गॉसिप ने कोणाच चांगल नक्कीच होत नाही. पण वाईट नक्कीच होत. त्यात भाग घेऊन आपण त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावतो ह्याची जाणीव आपल्याला असायला हवी. बाकी आपल कर्मसंचित ज्याच त्याने कस भरायचं हे पण ज्याच त्याने ठरवायचं.

सुखातल समाधान कि समाधानातल सुख...

सुखातल समाधान कि समाधानातल सुख... 
आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते अखेर पर्यंत माणूस सुखाच्या क्षणांनसाठी धडपडत असतो. ते जितके जास्ती तितकाच आयुष्य समृद्ध आणि आनंदी असत अस आपण मानतो. सुख कोणत्याही स्वरूपात असो मग तो पैसा, उन्नती, भरभराट, शिक्षण, नोकरी, जोडीदार असे अनेक टप्पे त्यात येतात. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते मिळाव ह्यासाठी माणूस जीवाच रान करतो. पण ते खरच मिळते का? मिळाल तरी किती टिकते? ह्याचा उलगडा व्हायला आयुष्य निघून जाते. आनंदाची / सुखाची व्याख्या आपण करू तशी सापेक्ष असते. आपण आयुष्यभर सुखातून समाधान शोधतो पण समाधानातल सुख नेहमीच चिरकाळ टिकणारा आनंद देते.
दहावीला ९०% मिळाले हि गोष्ट खूप आनंदाची/ सुखावह गोष्ट असू शकेल पण ते किती वेळ टिकते? हे ९०% आपल्याला हव्या त्या कॉलेज ला प्रवेश मिळवून देतील ह्याची शाश्वती नाहीच. सुखाने समाधान होईलच अस नाही. खूप पैसा कमावला पण तो किती काळ टिकेल? किंवा टिकवता येईल ह्यावर आनंदाचे क्षण अवलंबून असतात. पैश्याने सुख विकत घेतल पण समाधान? हवा तसा जोडीदार शोधला रंग, रूप, शिक्षण, सामाजिक पातळीवर जुळणारा तरी जेव्हा तो किंवा ती आपल्याला किती समाधान देईल ह्यावर सुख अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आनंद आणि सुख हे सापेक्ष असते. त्याला मर्यादा असते. त्याचा शेवट असतो आणि सगळ मिळवून सुद्धा ते मिळेलच ह्याची खात्री नसते. मग नक्की कशाचा शोध घ्यावा सुखातल्या समाधानाचा कि समाधानातल्या सुखाचा?
आपल लिखाण लोक वाचतात ह्याचा आनंद मला नक्कीच खूप होतो. खूप लोकांपर्यंत जाते. फेसबुक वर अनेक लाईक चा पाउस तर व्हात्स अप वर अंगठ्यांचा भडीमार होतो. आनंदी वाटतही पण कुठे तरी ते त्या क्षणापुरतीच असत. म्हणजे तो क्षण गेला कि त्यातल नाविन्य संपत जाते. नक्कीच कुठेतरी मनात छान भावना नेहमीच रहाते पण ती मनातच. त्याने समाधान होतेच अस नाही . मनाला समाधान वाटणाऱ्या गोष्टीत खर सुख आणि आनंद असतो. हजारो लाईक आणि शेकडो कमेंट मध्ये जे समाधान मिळत नाही ते एका कमेंट मध्ये मिळून जाते. म्हणूनच अश्या कमेंट किंवा दाद माझ्यासाठी समाधानातल सुख देतात ज्यांच्या शोधात मी नेहमीच असतो.
परवाचा माझा “आयुष्याला घडवणारी माणस” हा लेख वाचून एक छान प्रतिक्रिया आली. “माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझ्या लहान बहिणीचा खूप हात होता. मे महिन्यात तिच्याकडे राहिले असताना काही वादामुळे आमच्यात वितुष्ट आल. आपल्या घरी आल्यावर पुन्हा तिच्याकडे कधी जायचं नाही असच मनाशी ठरवलं. पण तुझा लेख वाचला आणि आयुष्याला घडवणाऱ्या त्या बहिणीची मला आठवण झाली. सगळ बाजूला ठेवून पुन्हा तिला भेटून आले मळभ दूर झाल. आता त्या निरभ्र आकाशाला पुन्हा अनुभवते आहे”. हे वाचून मी क्षणभर स्तब्ध झालो. आपले शब्द कोणाच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण आणू शकतात. हे समाधान मला जे सुख देऊन गेल. ते मी शब्दात पण मांडू शकत नाही.
माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. माझ्या आई बाबांना माझ्या लिखाणाबद्दल काहीच माहिती नव्हत. म्हणजे आई ला खूप कल्पना होती कारण तिचे आणि माझे शाब्दिक वाद चालूच असायचे. पण बाबा मात्र खूपच अनभिज्ञ होते. समोर असलेले सगळेच वाचक त्यातले काहीतर पहिल्यांदा भेटलेले समोर येऊन जेव्हा माझ्या लेखांबद्दल आणि माझ्याबद्दल बोलत होते तेव्हा त्यांच्या कौतुकांच्या शब्दांपेक्षा बाबांच्या डोळ्यात दिसलेल्या आनंदाश्रूनी जे समाधान आणि सुख दिल त्याची तुलना कशातच नाही.
इस्रोच्या लेखावर एका ७० वर्षाच्या आजीनी मला अभिप्राय पाठवला होता. “इतके वर्ष मला कुतूहल होत कि नक्की रॉकेट मधून एकतर हे उपग्रह पाठवतात कसे? एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेत ते स्थापन कसे करतात? त्यांची कक्षा अशी वेगवेगळी का? अश्या अनेक प्रश्नांना गेल्या कित्येक वर्षात मी उत्तर शोधू शकली नव्हती आज तुझ्या लेखामुळे त्याची उत्तर मिळाली”. माझा लेख विज्ञानाच्या कक्षेत येतो का मला माहित नाही? तो पूर्ण असतो का? मला माहित नाही. पण तो जर एका ७० वर्षाच्या आजींना समजत असेल तर तो नक्कीच सगळ्यांन पर्यंत पोहचत असेल. हे समाधान कित्येक पुरस्कार आणि पुस्तकाच्या विक्रीच्या खपाच्या आकड्यांपेक्षा जास्ती आहे.
आयुष्यात आपण कशाच्या मागे धावायचं हे आपण ठरवायचं. सुखातल्या समाधानाकडे कि समाधानातल्या सुखाकडे. दोन्हीकडे आनंद आणि सुख आहेच. सुखातल समाधान कदाचित आपण पटकन मिळवू पण ते चिरकाळ टिकेल ह्याची काहीच खात्री नाही. तर समाधानातल सुख मिळायला कदाचित खूप वर्ष जातील पण ते चिरकाळ आनंद देणार असेल अगदी शाश्वत. प्रसिद्धी, लाईक, शेअर आणि आपल्या स्व ला मिळणाऱ्या सुखापेक्षा लिखाणातून मला समाधान मिळते. वर आलेल्या प्रतिक्रिया त्या समाधानातल सुख मला देतात जे चिरकाळ माझ्यासोबत टिकणार असते. सुखातल समाधान कि समाधानातल सुख आपण काय निवडायच ह्याचा विचार ज्याचा त्यांनी करायला हवा.

'आयफोन' बस नाम ही काफी है!...

'आयफोन' बस नाम ही काफी है!...
तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं... असंच काहीसं 'आयफोन'च्या बाबतीत म्हणता येईल. त्याच्या प्रत्येक आवृत्तीला रांगा लागतात. त्याचं रूप सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडते. कितीही महाग असो, अमेरिकेत असो वा भारतात असो, आयफोन आपल्याजवळ असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मीही त्यातून सुटलो नाही. २०१० साली अमेरिकेत कॅलिफोर्नियाला असताना जेव्हा आयफोन ४ घेतला तेव्हासुद्धा त्याचं जवळ असणं म्हणजे एक वेगळं समाधान देऊन जात होतं.एखादी वस्तू आपल्या मनावर गारुड कशी करते, हे दाखवायचं असेल तर आयफोनसारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. २९ जून २००७, या दिवशी आयफोनचं आगमन जगाच्या पाठीवर झालं. बघता बघता त्याने जगातील एक एक बाजारपेठ अशी काबीज केली की, आजवर १ बिलियनपेक्षा आयफोन जगभरातील लोकांच्या हातात आहेत.
एप्रिल २००३ चा तो काळ... स्टीव जॉब्स या अॅपलच्या निर्माताच्या डोक्यात काही वेगळं घोळत होतं. काळाच्या पुढे विचार करणारे जे क्रांतिकारी असतात, त्यातलेच एक स्टीव जॉब्स होते. तेव्हा भरपूर नफा देणाऱ्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या बाजारपेठेत पुढे तितकासा वाव नसेल हे स्टीवच्या मनात घोळत होतं. पुढचा काळ हा मोबाईल क्रांतीचा असणार, हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. मोबाईल फोनच्या सेवेत मिसळून जाईल, असं अॅप्लिकेशन त्यांना हवं होतं. मोटोरोलासोबत त्यांनी आपल्या आय ट्युन्सला जोडत ७ सप्टेंबर २००५ ला हा ROKR E1 मोबाईल फोन ज्यात आय ट्युन्स होतं त्याचं लाँचिंग केलं. पण, जॉब्स मनातून कुठेतरी समाधानी नव्हते. म्हणूनच शेवटी अॅपलने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय एका क्रांतिकारी दिवसाची सुुरुवात होता. या दिवसांपासून अॅपलने आयफोन या नवीन तंत्रज्ञानावर काम करायला सुुरुवात केली.
९ जानेवारी २००७ ला स्टीव जॉब्स यांनी आयफोन बाजारात लवकरच दाखल होईल, अशी घोषणा केली. त्याचवर्षी जून महिन्यात आयफोन बाजारात दाखल झाला. बाजारात दाखल होताच गिऱ्हाईकांची मनं काबीज करण्यात आयफोन यशस्वी ठरला. पुढल्या एका वर्षात ६.१ मिलियन आयफोन विकले गेले. यामुळे नोकिया आणि सॅमसंगनंतर अॅपल ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल कंपनी बनली. पुढील येणाऱ्या काळात आयफोनची जादू वाढत गेली. २०१२ पर्यंत आयफोन आणि सॅमसंग मोबाईल यांनी बाजारातील ९९% हिस्सा काबीज केला तर, १% एच.टी.सी.चा होता. बाकी सगळ्या कंपन्यांना नुकसान होऊ लागलं होतं. इतका तडाखा आयफोनचा होता. ५.३ बिलियन डॉलर्सचा नफा २०१० मध्ये कमावणारी अॅपल अवघ्या दोन वर्षांत १४.२ बिलियन डॉलर्सचा नफा कमावू लागली होती. यात सगळ्यात सिंहाचा वाटा होता तो, आयफोनचा!
आयफोनला वजन दिलं ते त्याच्या दिसण्यानं... त्याचं आतलं प्रगत तंत्रज्ञान, ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याही पलीकडे त्यात असणाऱ्या सेन्सर्सनीही त्यात भरच टाकली. प्रोक्सिमा सेन्सर, एक्स्ल्रोमीटर, मॅग्नेटोमिटर, जाय्रोस्कोपिक अशा अनेक विविध सेन्सर्समुळे अनेक गिऱ्हाईकांना आयफोनने आपलंसं केलं.इकडे लक्षात घ्यायला हवं की आयफोन अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थांपासून ते बिझनेस करणाऱ्या व्यक्तीपर्यंत, त्यांना हवं तसं सगळं देऊ शकत होता. हेच आयफोनच्या प्रसिद्धीचं प्रमुख कारण ठरलं. एकामागोमाग एक आयफोनच्या आवृत्त्या येत गेल्या, पण जनमानसांवरचं त्याचं वलय अजूनही तितकंच आहे.
अमेरिकेमध्ये आपली पालंमूळं रोवणाऱ्या आयफोनचं लक्ष आता जगातील सर्वांत मोठी मोबाईल बाजारपेठ असणाऱ्या भारताकडे गेलं नसतं तर नवलच! स्टीव जॉब्सनंतर टीम कुक यांनी भारताकडे लक्ष केंद्रीत केलं. गेल्या काही वर्षांतील त्यांच्या गाठीभेटी बघितल्या तर भारताचं महत्व किती अधोरेखित होतं आहे ते दिसून येतं. मेक इन इंडियासारख्या भारताच्या योजनेत अॅपलने स्वतःला सहभागी करून घेतलं यातच त्यांची काळापुढे बघण्याची दृष्टी दिसून येते.
या महिन्याच्या अखेरीस आयफोन ८ बाजारात दाखल होतो आहे. ६४,००० रुपये इतकी मोठी किंमत घेऊन बाजारात दाखल होणारा आयफोन ८ पुन्हा काय चमत्कार करतो हे बघण रंजक असेल. भारतासारख्या बाजारात चीनी मोबाईल कंपन्यांची रेलचेल असताना आयफोनचं एक वेगळं स्थान आजही कायम आहे. पूर्ण विश्व बाजारात आयफोन ८ काय धमाका करतो, यापेक्षा भारतीय त्याला किती आपलंसं करतात, यावर अॅपल आणि टीम कुक ह्यांचं लक्ष असणार आहे. कारण भारतासारख्या बाजारपेठेत जर आयफोन चीनी कंपन्यांना शह देऊ शकला तर, अॅपलची वाटचाल पुन्हा एकदा एका नव्या क्रांतीकडे होईल, यात शंका नाही.

आपलं सेकंड होम असेल तरी कसं?...

आपलं सेकंड होम असेल तरी कसं?... 
आपलं एक घर झाल्यावर अजून एक सेकंड होम असावं, असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. म्हणूनच, त्याचा शोध घेतला जातो आणि ते कसं असेल याबाबतचे आपले इमले मनात तयारही असतात.
शेवटी वैज्ञानिक हा पण माणूसच! पृथ्वीपलीकडे दुसरं घर असू शकेल का? ह्याचं उत्तर माणूस गेली कित्येक वर्ष शोधतो आहे. आताच्या तंत्रज्ञान प्रगतीने माणसाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच नासासारख्या संस्था अवकाशात या गोष्टींचा शोध घेत आहेत.
मिल्की वे ह्या आपल्या आकाशगंगेत सूर्यासारखे तब्बल २०० बिलियन तारे आहेत. म्हणजे, आजूबाजूला कुठेही बघण्याआधी आपल्या माजघरात आपलं सेकंड होम शोधणं हेच मोठं दिव्य आहे. त्यासाठीच नासाने २००९ साली केपलर दुर्बीण अवकाशात पाठवली.
केपलर दुर्बिणीच्या साहाय्याने आत्तापर्यंत असे २५०० तारे शोधण्यात आले आहेत, ज्यांच्याभोवती आपल्यासारखीच सौरमाला अस्तित्वात आहे. या ताऱ्यांभोवती आपल्या सौरमालेसारखेच ग्रह कक्षेत फिरत आहेत. हे पण अगदी छोटासा भाग आहे, जो की आपण आजवर शोधू शकलो आहोत. या ग्रहांना एक्सोप्लॅनेट असं म्हटलं जातं. म्हणजे, पृथ्वी पण सूर्याचा एक्सोप्लॅनेट आहे. अशा ग्रहांना अवकाशात शोधणं कठीण आहे.
आपल्याला ग्रह, तारे रात्रीच का दिसतात? तर, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे बाकीच्या अवकाशातून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असंच या ग्रहांच्या बाबतीत होतं. ते ज्या ताऱ्याच्या कक्षेत फिरत असतील, त्या ताऱ्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की ट्रिलीयन किलोमीटरवरून त्या ग्रहाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग, आपलं सेकंड होम शोधायचं कसं? हे बघण मोठं रंजक आहे.
एक्सोप्लॅनेट शोधण्यासाठी दोन पद्धती वापरात येतात. एक म्हणजे, वोबली तारे शोधणे. ज्या ताऱ्यांच्या कक्षेत ग्रह फिरत आहेत. ते तारे आपल्या कक्षेत समान वर्तुळाकार फिरत नाही. लांब अंतरावरून बघताना हे असं समान न फिरणं वोबलिंग इफेक्ट देत. म्हणजे, गाडीचा किंवा सायकलचा टायर सेंटरमध्ये नसेल, तर कसा फिरताना दिसतो तसं. या पद्धतीचा वापर करून अनेक ग्रहांचं अस्तित्व शोधण्यात आलं आहे. पण यासाठी ग्रहाचं वस्तुमान गुरु ग्रहाएवढं किंवा त्यापेक्षा जास्ती असेल तर हे दिसून येतं. म्हणजे, पृथ्वीसारखे ग्रह शोधायला ही पद्धत उपयोगी पडत नाही.
आपलं सेकंड होम पण कोणत्याही सौरमालेत स्वीट स्पॉटला असणं अत्यंत गरजेचं आहे. वैज्ञानिक भाषेत हॅबिटेबल झोन असं म्हणतात. केपलर दुर्बीण ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून असे एक्सोप्लॅनेट शोधते त्याला म्हणतात ट्रान्झिट मेथड! आपली पृथ्वी जेव्हा सूर्यासमोरून जाते तेव्हा, त्याला ट्रान्झिट असं म्हणतात.
जेव्हा कोणताही ग्रह आपल्या ताऱ्यासमोरून जातो तेव्हा, लांबून बघताना त्याचं तेज थोडं काळवंडलं जातं. कारण, या ताऱ्याकडून येणारा प्रकाश हा ग्रहामुळे अडला जातो. वैज्ञानिक या दोन्ही प्रकाशातील बदलांचा अभ्यास करून ग्रहाची साईज ओळखू शकतात. तसेच, दोन ट्रान्झिटमधील वेळेचा अभ्यास करून तो त्या ताऱ्यापासून किती लांब आहे हे ओळखू शकतात. या अंतरावरून त्या ग्रहावरचं तापमान किती असेल, पाण्याचं अस्तित्व कसं असेल याचंही अनुमान आपल्याला लावता येतं. असे ग्रह जर स्वीट स्पॉटवर असतील तर, तिकडे द्रवरूप पाण्याचं अस्तित्व शक्य आहे. पाणी म्हणजे जीवन असणं किंवा पुढे अस्तित्वात येणं अशा ग्रहांवर नक्कीच शक्य आहे.
असे एक्सोप्लॅनेट शोधताना अनेक विस्मयकारक ग्रह समोर आले आहेत. एच.डी. ४०३०७ जी नावाचा ग्रह पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ८ पट आहे. म्हणजे तिथं आपलं वजन हे जवळपास दुप्पट जाणवेल.
केपलर – १६ बी नावाचा ग्रह एकाच वेळी दोन ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. म्हणजे, या ग्रहावर सूर्यास्ताच्या वेळेला दोन सूर्यांचा अस्त होताना दिसेल.
TRAPPIST-1 ह्या ग्रहमालेत ७ पृथ्वीसारखे ग्रह आसपास फिरत आहेत.
म्हणजे ह्यातल्या एका ग्रहावर आपण उभे राहिलो तर ६ ग्रह आपल्याला क्षितिजावर दिसतील. ह्या सगळ्या ग्रहांवर पाणी असण्याची शक्यता आहे. कारण ह्यांचा आकार आणि ताऱ्याभोवती फिरण्याची कक्षा आपल्या पृथ्वीसारखीच आहे.
सेकंड होम हे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्याची सुुरुवात जागा बघण्यापासून होते. आपल्याला आवडेल, पटेल आणि राहता येईल असं ठिकाण. त्या दृष्टीने मानवाने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. २५०० अशा ताऱ्यांची नोंद केपलरने केली आहे. तर, अशा आणखी ५००० ताऱ्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो, हे दाखवून दिलं आहे. नासा पुढल्या वर्षी अशा सेकंड होमच्या शोधासाठी जेम्स वेब दुर्बीण अवकाशात पाठवत आहे. केपलरपेक्षा ही दुर्बीण क्षमतेत अत्युच्य असून ह्यामुळे आपल्या सेकंड होमच्या शोधाला बळकटी मिळणार आहे.
अर्थात, हे सर्व ग्रह आणि सौरमाला आपल्यापासून प्रचंड अंतरावर आहेत. तिकडे पोहचणं हे मोठं दिव्य असेल. पण निदान मनासारखं सेकंड होम मिळालं तर आपण कसंही करून तिकडे जायचा प्रयत्न करूच. आपलं विश्व तर पलिकडची गोष्ट आहे. पण, आपल्याच माजघरात जर अशी जागा म्हणजेच ग्रह मिळाला तर तिकडे सेकंड होम असणं कोणाला आवडणार नाही. सध्या तरी या प्रचंड विश्वात आपलं एकच घर आहे, ते म्हणजे पृथ्वी. पृथ्वी व्यतिरिक्त अजून आपलं सेकंड होम किंवा सेकंड होमसाठी ग्रहाच्या रुपातील नव्या जागेचा शोध सुरूच आहे.

Do You Have It In You?…

Do You Have It In You?… 
इंडियन आर्मी च हे वाक्य कानावर पडल कि आजही माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. आर्मी मध्ये भरती होण्याची माझ स्वप्न हे स्वप्नच राहील. पण आजही हे वाक्य कानावर पडते तेव्हा माझ्या मनात प्रश्नांचा डोंगर उभा राहतो. खरच माझ्यात ते तेज आहे का? खरच मी लायक आहे का? ह्या प्रश्नांची उत्तर मी आजही शोधतो आहे. पण लेफ्टनंट स्वाती महाडिक ह्यांच्या कडे ते होत जे तो युनिफोर्म अंगावर घालायला लागते. त्याला तुम्ही देशभक्ती म्हणा, शौर्य म्हणा किंवा धाडस म्हणा किंवा जिगर म्हणा. शब्द फिरवले तरी ते सगळच आत असावं लागते आतून जेव्हा ते पेटून बाहेर येत तेव्हाच तो मान, ती शान तुमच्या अंगावर तुम्ही घालू शकता.
कर्नल संतोष महाडिक एलाईट अश्या २१ प्यारा शुटर मध्ये ऑफिसर असलेला महाराष्ट्राचा एक वीर सुपुत्र. एका दुधवाल्याचा मुलगा ते एक आर्मी ऑफिसर असा प्रवास त्यांनी केला होता. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा मध्ये झालेल्या दशहतवादी हल्यात शहीद झाले. आपल्या सीमेजवळच्या जंगलात अतिरेक्यांना शोधताना डोक्यात आणि पोटात गोळी लागल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या ह्या शौर्याबद्दल भारत सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला त्यांना शौर्य चक्राने सन्मानित केल. हा सन्मान शांतता काळात अतुलनीय शौर्यासाठी क्रमांक दोन चा पुरस्कार समजला जातो. आपल्या दिवंगत पतीच्या अतुलनीय शौर्याचा पुरस्कार स्वीकारताना ह्या शूरवीर पत्नीच्या मनात काही वेगळच घोळत होत. आपल्या घरात टांगलेला तो रिकामा आर्मी युनिफोर्म तोच प्रश्न विचारत होता Do You Have It In You?
स्वाती महाडिक ह्यांनी त्याच उत्तर शोधलं. आपल्याला जर काही हव असेल तर तो युनिफोर्म. एका जाज्वल्य विचारांनी प्रेरित झालेली स्त्री काय करू शकते हे त्यांनी पूर्ण भारताला, जगाला दाखवून दिल. विचार येण आणि ते प्रत्यक्षात उतरवण ह्यात खूप मोठा फरक असतो. तो युनिफोर्म आपल्या अंगावर घालण्यासाठी जाव्या लागणाऱ्या अग्निदिव्याची कल्पना त्यांना होती पण कसही करून आपण तिकडे जायचच हा निर्धार त्यांनी केला. आपल्या पतीच राहिलेलं काम पूर्ण करण हीच सगळ्यात मोठी आदरांजली त्यांना होतीच पण त्याही पलीकडे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. पुणे विद्यापीठातून पदवी धारक असलेल्या स्वाती महाडिक ह्यांनी आर्मी मध्ये भरती होण्यासाठी अर्ज केला. एका शूरवीर सैनिकाची पत्नी म्हणून आर्मी च्या कोणत्याच नियमातून त्यांना मुभा मिळाली नाही.
सगळ्यात मोठी अडचण होती वयाची. स्वाती महाडिक वय वर्ष ३८ दोन गोंडस मुलांची आई कार्तिकी १२ तर स्वराज ६. वयाच्या नियमामुळे कुठेतरी हे स्वप्न धुळीला मिळते का अस वाटायला लागल. पण त्यावेळचे भारतीय आर्मी चीफ जनरल दलबीर सिंग ह्यांच्या सांगण्यावरून त्याकाळचे डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रीकर ह्यांनी परीक्षेला बसण्याची मुभा दिली. इकडे एक लक्षात घ्यायला हव कि वयाची फक्त अट शिथिल केली होती. परीक्षा वगळून किंवा कोणत लेटर घेऊन त्यांची शिफारीस केली नव्हती हे खूप मह्त्वाच आहे. कारण एका सामान्य सैनिकाला ज्या सगळ्या प्रक्रियान मधून जाव लागते. त्या सर्व प्रक्रियांन मधून स्वाती महाडिक ह्यांना जाव लागणार होत. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी एस.एस.बी. बोर्डाची परीक्षा पास केली. मुलाखत ते मेडिकल पास केल्यावर जे समोर होत ते कठीण होत. ११ महीन्याच लष्करी ट्रेनिंग. एका स्त्री साठी एका माउली साठी हे किती खडतर असेल ह्याची कल्पना पण करू शकत नाही. भारतीय आर्मी च हे ट्रेनिंग जगात सर्वोत्तम पेकी एक समजल जाते. ह्यावरून त्यांच्या समोर काय वाढून ठेवल आहे. ह्याची कल्पना त्यांना आली होती. आपल्या दोन्ही मुलांना बोर्डिंग शाळेत टाकण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलांनीही आईच्या स्वप्नांसाठी बोर्डिंग शाळेत प्रवेश घेतला. मग सुरु झाल आपल्या शरीराच्या, मनाच्या क्षमतांना टोकाला नेणार ट्रेनिंग. जिकडे त्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा १० वर्ष लहान असणारे इतर मुल- मुली होत्या. पण मनात एकच होत तो प्रश्न Do You Have It In You?
अखेर सर्व अडथळे पूर्ण करत स्वाती महाडिक ह्यांनी चेन्नई च्या ऑफिसर ट्रेनिंग अकाडमी मधून ३३२ इतर ऑफिसर सोबत आपल्या अंगावर तोच युनिफोर्म घालत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली. काल त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट ह्या पदावर रुजू करण्यात आल. पुण्याच्या ऑर्डनन्स कोर्प मध्ये ऑफिसर ह्या पदावर नियुक्ती केली गेली आहे. एकूणच त्यांचा हा प्रवास थक्क करणारा, एका स्त्री च्या क्षमताना उंचीवर नेणारा तर जिद्द, देशभक्ती, जाज्वल्य देशाभिमान ह्या पलीकडे आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या त्या प्रश्नाच उत्तर देणारा होता. तो प्रश्न म्हणजे Do You Have It In You? ह्या भारतीय सैन्यातील एका शूरवीर ऑफिसर ला माझा मानाचा कडक स्याल्युट. एकच सांगतो You Have It In You.
जिकडे मोलकरणीची जात आणि एअरपोर्ट वर कोण्या एका अभिनेत्री चा पोरगा रडला म्हणून ब्रेकिंग न्यूज देऊन त्यावर खमंगपणे चर्चा फेसबुक आणि व्हात्स अप वर होत असताना ह्या माउलीचा प्रवास कोणाला दिसला पण जात नाही. हीच आपली शोकांतिका आहे. इकडे कोणी जात बघणार नाही? इकडे कोणी विचार नाही करणार त्या माउलीच्या दोन मुलांच्या रडण्याचा कारण इकडे वेळ कोणाला आहे. आम्हाला फक्त स्वातंत्र्य हव. आमची कर्तव्य पूर्ण करायला बाजूचे आहेत. आम्ही फक्त सिस्टीम बद्दल बोलणार. पंतप्रधान आणि बाकी कोणी काय करावे ह्याच्या गोष्टी करणार. एकमेकांची जात बघत त्यांना शिव्या घालणार कारण आमच्यात नाही ते न आम्हाला कधी असे प्रश्न पडतात कि खरच Do You Have It In You??

आयुष्याला घडवणारी माणस...

आयुष्याला घडवणारी माणस... 
आयुष्य घडवणारी माणस खूप असतात. पण आयुष्याला घडवणारी माणस थोडीच असतात. शाळा, कॉलेज ते अगदी आयुष्याच्या उत्तरार्धा पर्यंत अनेक माणस आपल्या आयुष्यात येतात. काही राहतात तर काही निघून जातात. तर काही न येऊन सुद्धा आपल्या आयुष्यावर प्रभाव ठेवून जातात. कळत नकळत अनेक व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. पण काही माणस आपल आयुष्य घडवतात. त्यांचे शब्द, आचरण, स्वभाव, व्यक्तिमत्व ह्याचा प्रभाव तर आपल्यावर असतोच पण त्यापलीकडे आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याच काम त्यांनी केलेलं असते.
शाळेपासून सुरु झालेला हा प्रवास शेवटापर्यंत सुरु असतो. जेव्हा कळायला लागते तेव्हापासून ते अनुभव समृद्ध झाल्यावर पण अशी घडवणारी माणस आपल आयुष्य उजळून टाकत असतात. आपण ज्या रस्त्याने जात असतो. तो रस्ता किंवा पूर्णपणे आपल्या विचारांची बैठक बदलवण इतक सोप्प असते का? काय असते अश्या माणसात? खर सांगायच झाल तर ती पण आपल्या सारखीच सर्वसाधारण असतात. कदाचित आपल्यावर झालेला प्रभाव आणि त्यातून आपल्यात होणारे बदल हे दुसऱ्यांवर पण होतील अस नाहीच. म्हणून हि माणस माणसांच्या कळपात मिसळून पण जातात. आयुष्याच्या प्रवासात आपण पुढे चालत रहातो आणि अशी माणस आपला प्रभाव सोडून आपल्या मनातून निघून पण जातात.
आपण कृतज्ञ रहायचं कि कृतघ्न बनायचं हे आपल्या हातात असते. अशी माणस कोणती अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्यावर त्यांची छाप सोडून जातात. कधी तरी दोन शब्द, एक भेट, तर कधी आयुष्यातला एक काळ ते एक तप आपण अश्या लोकांसोबत घालवतो. ते कोणीही असतात. आई- वडील, भाऊ, बहिण, प्रियकर, प्रेयसी, शिक्षक, गुरु, मित्र, मैत्रीण किंवा कोणत्याही नात्यात न बसणारे अगदी फेसबुक च्या आभासी भिंतीपलीकडे असणार कोणीतरी. पण आयुष्याची शिकवण म्हणा किंवा एखादा निर्णय ज्याने पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते अस काहीतरी ते देऊन जातात. आपण आनंदात इतके रममाण होतो कि अश्या लोकांच्या त्या पाठींब्याला किती लोक लक्षात ठेवतात?
निरपेक्ष भावनेने आयुष्य घडवणाऱ्या माणसांना काही नको हि असते. आपली आठवण ठेवली हेच खूप झाल इतकीच माफक अपेक्षा असताना आपण ती ठेवतो का हा खरा प्रश्न आहे. आयुष्यात धावता धावता असे अनेक क्षण येतात कि जिकडे आपल्याला आठवण हि होते पण किती लोक त्या आठवणीला शब्दातून व्यक्त करतात? ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यांच्यासाठी आपण किती वेळ काढतो? अगदी काही नाही तर किती वेळा फोन करून चौकशी करतो? ते कोणी असो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो. काळाच्या ओघात लुप्त झालेले असो पण त्यांना शोधण इतक अवघड असते का? आपल्याला घडवणारी माणस आपल्यासाठी खूप मोठी असतात. पण त्यांना त्यांची जागा आपण देतो का? ह्याचा विचार आपण प्रत्येकाने वेळ काढून करायला हवाच.
आपल आयुष्य घडवणाऱ्या माणसांची भेट, बोलण किंवा नुसत त्यांना बघण पण अत्युच्य समाधान देऊन जाते. कोणाला कळो वा न कळो पण अश्या लोकांचा आपल्या आयुष्यावरील प्रभाव आपल्याला नक्कीच समजत असतो. मग जे आपल्याला आत जाणवते ते व्यक्त करायला किंतु कसला? पण आपण नेहमी एक पाय मागे घेऊन चालतो. आपला स्व , आपला समाज किंवा अजून आपले काही ह्यांना कस वाटेल ह्याचा विचार करून काढता पाय घेतो. पण खरच अशी गरज असते का? आपल आयुष्य घडवणारे आपणच असतो पण कोणाच तरी आयुष्य घडवणारे खूप कमी असतात. त्यांना तो मान देण हे आपल्या प्रगल्भतेच लक्षण आहे. तो कसा, किती, केव्हा, कश्या प्रकारे हे ज्याच त्याने ठरवायचं पण एक नक्की कि अस माणूस आपल्या आयुष्यात लाभण हे खूप मोठ नशीब असत.

आवड आणि स्वप्न...

आवड आणि स्वप्न... 
पहिल्या श्वासापासून आपला प्रवास सुरु झाला कि आपण आयुष्यात अनेक स्वप्न बघू लागतो. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर कुठेतरी आपल्याला जाणवते कि नक्की आपली आवड कशात आहे? आपल्या स्वप्नांना आपल ध्येय बनवताना आपण आपली आवड बाजूला ठेवतो. आपली आवड आणि आपली स्वप्न ह्यातल्या चुकीमुळे आपली स्वप्न कधी आपली आवड बनतात तर आपली आवड आपल स्वप्न राहून जाते. नक्की काय मिळाल काय निसटल हे लक्षात येण्यात इतका वेळ निघून जातो कि मग वाटते आता कुठे? आता आपल वय राहील का? आता कस शक्य आहे?
आपल शिक्षण, करियर, लग्न, संसार आणि मुल- बाळ ह्यात आयुष्याची वर्ष कशी पटकन निघून जातात कळत नाही. आत्ता कुठे स्वप्न बघत सुरु झालेलं आयुष्य बघता बघता मागे पडते. ज्यांच्यासाठी सगळ बाजूला ठेवल ती फुलपाखर कोशातून निघून कधी उडून जातात कळत पण नाही. अश्या वेळेस स्वप्नातलं खूप काही असत आपल्या आजूबाजूला अगदी पैश्यापासून ते नात्यांपर्यंत पण तरीपण कुठेतरी आपल्याला आवडणार वाटणार काहीतरी राहतेच. त्याचा मुहूर्त आयुष्याच्या स्वप्नांना पूर्ण करताना आपण पुढे पुढे ढकलत रहातो. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शरीर साथ देते अस नाही. किंवा सगळ नीट असूनही आपल्याला मुहूर्त काढताच येत नाही.
आवडीला खरच मुहूर्ताची गरज असते का? जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती करायला, जोपासायला कसला आला आहे मुहूर्त, वयाची बंधन आणि कोण काय म्हणेल किंवा कोणाला काय वाटेल ह्याचा विचार? आपली स्वप्न आणि आपली आवड ह्यात एक मोठा फरक आहे. स्वप्न आपण अनुभवलेली नसतात तर आवड आपण जोपासलेली असते. म्हणजेच आवड कशात आहे हे कळायला एकदा तरी ती गोष्ट आपण अनुभवलेली असते. स्वप्न हि पूर्ण होतात अस नाही. कारण अनेक असू शकतात पैश्या पासून ते आपल्या क्षमतान पर्यंत. पण कोणतीही आवड हि अनुभवलेली असल्याने तिला पुन्हा अनुभवयाला तितकीशी अडचण नक्कीच नसते.
आवडीला मुहूर्त नसतो तो ह्याचसाठी. आपण बरेचदा स्वप्न आणि आपली आवड ह्यात गल्लत करतो. दोघांपासून लांबच रहातो. जेवण बनवण्यापासून ते त्याचा आस्वाद घेण्यापर्यंत, लिहिण्यापासून ते वाचनापर्यंत आपल्या आवडी असतात. पण अमुक एक पदार्थ बनवता येण किंवा अमुक एक पदार्थाचा आस्वाद घेता येण हे स्वप्न असू शकते. लिह्ण्यातून लेखक बनण किंवा आपल पुस्तक येण हे स्वप्न असू शकते किंवा आपल पुस्तक कोणीतरी वाचाव हे पण. ह्या दोन्ही मधला फरक खूप कमी जणांना कळतो. तो कळत नाही म्हणून आपण आवडीला स्वप्न बनवून फक्त मनात तिचे इमले बांधतो. तर स्वप्नांना आपली आवड मानून ती पूर्ण करण्यात पूर्ण आयुष्य वेचतो.
जेव्हा हि गल्लत होते तेव्हा तिकडे पोचून हि हाताशी ते एक समाधान लागत नाही. कारण सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत तर सगळ्या आवडी स्वप्नवत नसतात. धावण्याची म्यारेथोन जिंकण हे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल पण धावण्याची, हेल्दी राहण्याची आपली आवड तर आपण नेहमीच जोपासू शकतो. जेव्हा आपण ती जोपासतो तेव्हा दररोज त्यातून मिळणार समाधान हे ती स्पर्धा जिंकण्यापेक्षा जास्ती आनंद देऊन जाते. स्वप्न आयुष्यात एकदा अनुभवता येतात. कारण एकदा स्वप्न सत्यात आली कि त्याचा अनुभव होतो. आवड आयुष्यभर आपल्या सोबत असते तिला आपण नेहमीच जोपासून शकतो. त्यासाठी वेळ काढू शकतो.
धकाधकीच्या आपल्या आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टीना मुहूर्त मिळण तस कठीणच. पण दोघातला फरक लक्षात आला तर निसटणारे अनेक क्षण आपण वेचू शकतो. आपली आवड आणि आपली स्वप्न हि वेगळी करता यायला हवीत. म्हणजे नक्की आपल्याला काय हव आहे आणि आपण कशाच्या पाठी धावतो आहोत ह्याची जाणीव आपल्याला होईल. स्वप्न पूर्ण करताना आपल्या आवडीला तर बाजूला नाही न टाकत ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सगळीच स्वप्न पूर्ण झाल्यावर आनंद मिळेलच अस नाही पण आपली आवड जोपासण्याचा आनंद आणि समाधान हे ठरलेल असते. अजूनही वेळ गेलेली नाही विचार करा नक्की आपण कशाच्या पाठी धावतो आहोत स्वप्नांच्या कि आपल्या आवडीच्या.

कोणीतरी आहे तिथे?...

कोणीतरी आहे तिथे?... 
आपल्या पलीकडे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात कोणी आहे का? हा प्रश्न सामान्य माणसापासून ते वैज्ञानिका पर्यंत सगळ्यांना पडलेला आहे. इतक्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एकटेच असू हि शक्यता खूप कमी आहे. विश्वाचा पसारा इतका प्रचंड आहे कि आपण त्याच आयुर्मान पण ठरवू शकलेलो नाही. मानवनिर्मित हबल टेलिस्कोप ने १२.५ बिलियन वर्षापूर्वीचा प्रकाश आत्तापर्यंत बंदिस्त केला आहे. त्यावरून सध्या तरी विश्वाच वय तितकच आहे अस मानण्यात येते. इकडे हे लक्षात घेतल पाहिजे कि हा प्रकाश १२.५ बिलियन वर्षानंतर पृथ्वीवर पोहचू शकला आहे. त्या पलीकडच काय आहे हे जाणून घ्यायला कदाचित अजून वेळ लागेल. म्हणूनच ह्या विश्वाच्या पोकळीत अशी अनेक रहस्य दडलेली आहेत ज्याचा मानव अजून शोध घेतो आहे.
आपल्या सारखच किंवा आपल्या पेक्षा प्रगत अस कोणीतरी आहे तिथे ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी आजही अनेक वैज्ञानिक अवकाशाचा वेध घेत असतात. युरी मिलनर आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकीन्स ह्यांनी सुरु केलेल्या ब्रेकथ्रू लिसन ह्या संस्थेने अश्याच काही रेडीओ सिग्नल ज्याला एफ आर बी अस म्हंटल जाते त्याचा शोध लावलेला आहे. एफ.आर.बी म्हणजेच फास्ट रेडीओ बस्ट. ह्यात खूप कमी मिलीसेकंद आयुष्य असलेली रेडीओ प्लस शोधली जाते. ह्या एफ.आर.बी. कश्या निर्माण होतात? त्याचा स्त्रोत काय? ह्याबद्दल प्रचंड गूढ आहे. काही वैज्ञानिकांच्या मते कृष्णविवरामुळे तर काहींच्या मते पल्सार तार्यांमुळे तर काहींच्या मते इ.टी. म्हणजेच एलियन द्वारा संदेश पाठवण्यासाठी ह्या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात सोडल्या जात आहेत.
आता जी एफ.आर.बी. शोधली आहे तिचा नंबर आहे एफ.आर.बी. १२११०२ आता ह्याचा अर्थ हि पल्स पहिल्यांदा १२ नोव्हेंबर २००२ मध्ये शोधली गेली. पण हि प्लस पुन्हा एकदा २०१५ मध्ये जाणवली होती. पण २६ ऑगस्ट २०१७ ला काही तासांच्या विश्लेषणात तब्बल १५ वेळा ह्याच अस्तित्व दिसून आल आणि पूर्ण जगाच लक्ष इकडे वळल आहे. एफ.आर.बी. जरी आत्तापर्यंत शोधल्या गेल्या असल्या तरी पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणाहून जाणवणारी हि एफ.आर.बी. १२११०२ ने संशोधकांच लक्ष वेधून घेतल आहे. हि एफ.आर.बी. १२११०२ ड्वार्फ आकाशगंगेतून येत असून पृथ्वीपासून हि आकाशगंगा ३ बिलियन प्रकाशवर्ष दूर आहे.
भारतासाठी आनंदाची बातमी हि कि आत्ताचा ह्याचा शोध भारतीय संशोधक डॉक्टर विशाल गज्जर ह्याने लावला आहे. आपल्या पोस्ट डॉक्टरेट रिसर्चचा अभ्यास ग्रीन ब्यांक टेलिस्कोप वेस्ट वर्जिनिया इकडे करताना डॉक्टर विशाल ने हा शोध लावला. ४०० टी.बी. इतका प्रचंड डाटा ह्या अभ्यासादरम्यान त्याने गोळा केला आहे. गुजरात मधल्या बोतड ह्या गावी आपल शालेय शिक्षण तर इंजिनिअरींगचे शिक्षण शहा इंजिनिअरिंग कॉलेज भावनगर इकडून पूर्ण केलेल्या विशाल ला डॉक्टरेट साठी केलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश मिळाला. आपल्या प्रोजेक्टसाठी तो ब्रेकथ्रू लिसन ह्या टीम चा सदस्य झाला. आता त्याच्या शोधामुळे पुन्हा एकदा माणसाच्या कोणीतरी आहे तिथे ह्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
ह्या शोधामुळे वैज्ञानिक का अचंबित झाले आहेत ते आपण लक्षात घेतल पाहिजे. एफ.आर.बी. आधीपासून माहित असल्या तरी एकाच ठिकाणाहून पुन्हा पुन्हा त्या कधीच दिसलेल्या नाहीत. एफ.आर.बी. १२११०२ हि एकमेव अशी रेडीओ प्लस आहे कि जी अनेकदा एकाच सोर्स कडून दिसून आली आहे. अश्या रेडीओ लहरीनसाठी ज्या गोष्टी कारणीभूत असतात त्या ह्या एफ.आर.बी. च्या बाबतीत दिसत नाहीत. समजा प्लसारमुळे झाली तर कोणत्याही एक्स रे मिळालेल्या नाहीत किंवा कृष्णविवराच अस्तित्व. ह्यामुळेच जी अजून एक शक्यता वर्तवली जाते. ती म्हणजे एलियन किंवा इ.टी. असण्याची शक्यता. कारण अश्या प्रमाणात एफ.आर.बी. निर्माण होण सध्यातरी मानवाच्या दृष्ट्रीने गूढ आहे.
कोणीतरी आहे तिथे? हा प्रश्न किंवा कोड अजून न उलगडलेल आहे. एफ.आर.बी. च मूळ जोवर शोधलं जात नाही तोवर त्याचा संबंध हा कोणीतरी असण्याशी जोडला जाणार हे निश्चित आहे. कारण विज्ञान पुरावे मागते. जोवर त्याच मूळ सप्रमणात सिद्ध करता येत नाही तोवर आपल्याला भास होत राहणार. एलियन किंवा अशी कोणती व्यवस्था तिथे असली तरी अंतर बघता पृथ्वीला त्याचा सध्या तरी काही धोका नाही पण माणसाच्या कुठेतरी निपचित पडलेल्या प्रश्नाला आता पुन्हा एकदा धुमारे फुटले आहेत हे नक्की. एका भारतीयाने पूर्ण जगात संपूर्ण अवकाश संशोधकांच लक्ष आपल्या नवीन शोधाने एका अनुत्तरीत प्रश्नाकडे वळवल आहे. जगातील कित्येक टेलिस्कोप आता एफ.आर.बी. १२११०२ वर लक्ष ठेवून असून त्याचा अभ्यास करत आहेत. अशी संधी देणार ब्रेकथ्रू लिसन ची टीम आणि डॉक्टर विशाल गज्जर ह्यांना सलाम व त्यांच्या पुढील संशोधनासाठी शुभेछ्या.

व्यावहारिक मैत्री...

व्यावहारिक मैत्री... 
मैत्री एक सुंदर नात पण ते टिकवण तितकच अवघड असते. विशेषतः त्यात व्यवहार आला कि अशी नाती किती पोकळ असतात ते प्रकर्षाने दिसून येते. अडचणीच्या काळी मदत करणारा आपला खरा मित्र-मैत्रीण जेव्हा दिलेल्या मदतीची आठवण सतत करून देऊन हक्क गाजवतात तेव्हा हेच मदतीचे हात नकोसे वाटू लागतात. खरे तर केलेली मदत हि उजव्या हाताची डाव्या हाताला कळू नये अस असताना त्या मदतीसाठी आपल्या स्वाभिमानाला दुखावणारे असे व्यावहारिक मित्र – मैत्रीण अनेक असतात.
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण हतबल असतो. भावनिक, शारीरिक, आर्थिक दृष्ट्या. मदतीची अपेक्षा ज्यांच्याकडून करावी असे नातेवाईक पण अश्या वेळी बाजूला पळतात. मग कोण आधार देतो ते आपले मित्र- मैत्रिणी. पण ह्या आधाराची किंमत जर त्यांनी लावली तर होणारा त्रास आणि दुखावला जाणारा आपला स्वाभिमान ह्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. पैसे देऊन आपण व्यक्तीचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही ह्याची जाणीव मैत्री मध्ये हवीच. एकतर मैत्रीत व्यवहार नकोच आणि केलाच तर आपल्या शब्दाला आपण जागायला हवे.
आपण पैसे दिले म्हणून त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीवर आपला हक्क मानणारे व्यवहारी मित्र मैत्रीण अनेक असतात. आपण मदत केली म्हणून त्या पुढच्या प्रत्येक कृती आपल्याला विचारून, सांगून करावी अश्या अविर्भावात नकळत ते असतात. तस केल नाही तर मग त्यांना दुखावल जात त्याच्या इगो ला धक्का बसतो आणि काही परिस्थती समजून न घेता आपल्या मदतीची जाणीव समोरच्याला करून देतात. मदत हि नेहमीच निस्वार्थी असायला हवी पण उपकारांची जोडवी त्याला असे मित्र लावतातच.
मैत्रीतला व्यवहार पण मैत्री सारखा निखळ हवा. आपण समोरच्याला मदत केली म्हणून आपण त्याला विकत घेत नाही न तो आपला गुलाम होतो. पण हे कळण्याइतपत जर मैत्रीची प्रगल्भता नसेल तर अशी मैत्री काय कामाची? ज्यात मैत्री हि व्यवहारात तोलली जाते. अडचणीच्या वेळेस खरे मित्र मैत्रिणी दिसतात अस म्हणतात. पण त्या खऱ्या मैत्री मध्येहि व्यवहार आला कि वेगळीच नाती आपल्या समोर येतात. आपले कधी काळी घनिष्ठ नाते असणारे ते सर्वच अचानक सूर बदलून जेव्हा बोलतात तेव्हा नक्की हेच का ज्यांना आपल मानत होतो असा प्रश्न मनात पडतो.
मित्र - मैत्रिणी हे प्रत्येकाच्या आयुष्याच अविभाज्य अंग आहे. ते कोणाला नाहीत असा माणूस शोधून मिळणार नाही. आपणही कोणाचे तरी मित्र – मैत्रीण असतोच. मैत्रीच छान नात निभावून नेता येण हि दोन्ही बाजूंची परिपक्वता आहे. पण मैत्रीच्या नात्याचा आधार घेऊन कोणाच्या तरी स्वामित्वावर, स्वाभिमानावर हक्क गाजवण हे तकलादू मैत्रीच लक्षण आहे. मैत्रीतील व्यवहार किंवा व्यवहारातील मैत्री जपताना त्यातून व्यवहार बाजूला काढता यायला हवा. आपण कोणत्याही टोकाला असलो तरी व्यवहाराचा मैत्रीवर परिणाम म्हणजे आपली अपरिपक्वता. आपण व्यवहारा बद्दल बोलताना समोरच्याचा मनाचा विचार आपण करायला हवा. आपल्या बोलण्याने आपण नकळत कोणाच्या स्वाभिमानाला तर ठेच नाही न पोहचवत ह्याची काळजी घ्यायलाच हवी.
मैत्री खूप सुंदर नात आहे. एकमेकांच्या विश्वासावर ते उभ आहे. त्या विश्वासाच्या जोरावर तर आपण मैत्रीत व्यवहार करत असू तर त्या विश्वासाला एकदा संधी द्यायला हवी. नुसत्या गैरसमजातून अथवा उपकार केलाच्या भावनेतून समोरच्याला वागवणार असू तर अश्या मैत्रीत व्यवहार न आणलेला बरा. व्यवहार केला तरी तो नियम घालून करावा म्हणजे उगाच कोणाच्याही विश्वासाचा, भावनांचा चुराडा होत नाही. व्यवहारातली मैत्री म्हणजे सापाशी असलेली मैत्री. कधी फुत्कारेल ते सांगता येणार नाही. म्हणून एकतर मैत्रीत व्यवहार करूच नये आणि केलाच तर प्रत्येक पावलावर काळजी घ्यावी. काही चुका केल्या तर निदान केलेल्या मदतीचा बाजार मांडून मैत्रीच्या नात्याला कलंक तरी नक्कीच लावू नये.

कृष्णविवर...काळोखानंतरची एक नवीन पहाट... विनीत वर्तक ©

कृष्णविवर...काळोखानंतरची एक नवीन पहाट... विनीत वर्तक ©

जगाच्या कोपऱ्यात कुठेही आपण वावरतो, तेव्हा एक गोष्ट जवळपास सारखी असते..ती म्हणजे, गुरुत्वाकर्षण!

समजा, आपण एखाद्या रस्त्यावरच म्हणजे, मुंबईतल्या एस.व्ही. रोड किंवा पुण्यामधल्या डेक्कनवरचं गुरुत्वाकर्षण नाहीसं केलं तर..? जे लोक आधीच कोणत्याही मोशन म्हणजे वेगात आहेत ते अवकाशात फेकले जातील. तसेच, गाड्या हवेत उडायला लागतील. पण, समजा उलटं केलं तर..?

आपल्यावर पृथ्वीचं जे बल काम करते ते १ जी असतं. समजा, आपण ते ८-९ जी केलं, तर आपल्याला अस्वस्थ वाटेल. काही काळ आपण सहनही करू, जसे लढाऊ विमानातील पायलट अनुभवतात. समजा, हा फोर्स काही मिलियन जी केला तर? तुमच्या डोक्याच्या वजनाने तुम्ही पूर्णपणे चेपले जाल. म्हणजे तुमच्या डोक्याच्या वस्तुमानाच वजन इतकं होईल की तुमचं शरीर पूर्णपणे त्यात दबून जाईल.

आता हाच फोर्स किंवा गुरुत्वीय बल जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढतं, तेव्हा प्रकाश पण त्याच्या वजनापुढे गुडघे टेकतो. म्हणजे की, या प्रचंड बलापुढे तो इच्छा असूनही पुढे जाऊ शकत नाही. आता, प्रकाश जर आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही, तर आपल्याला काय दिसेल? फक्त काळोख! पण, त्या काळोखात दडलेलं असेल ते प्रकाशाला झुकवणारं प्रचंड गुरुत्वीय बल.

प्रचंड मोठे तारे म्हणजे, सूर्याच्या २० पट वजन असणारा एखादा तारा आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी सगळं इंधन जाळून झाल्यावर आपल्याच वजनाला झेलू शकत नाही. त्या वजनाखाली तो दबला जातो. किती तर अवघा १६ किलोमीटरच्या एका साच्यात. विचार करा, सूर्याच्या २० पट वजनाचा तारा जेव्हा फक्त १६ किमीचा होईल, तेव्हा किती प्रचंड वस्तुमान त्यात दाबलेलं असेल? (त्याचा आकार कमी झाला तरी त्याच वस्तुमान हे सारखं असेल) या वस्तुमानापुढे प्रकाश पण झुकेल. त्याचवेळी, त्या ताऱ्याचं गुरुत्वीय बल (गुरुत्वाकर्षण) मात्र वस्तुमानाच्या पटीत काम करत असेल. म्हणजे, काय होईल की त्याच्या जवळ येणारी प्रत्येक गोष्ट या गुरुत्वीय बलाने त्याच्याकडे ओढली जाईल आणि त्या काळोखात लुप्त होईल. पण प्रकाश बाहेर येत नसल्याने त्या काळोखात ती वस्तू कुठे गुडूप होते आहे याचा काहीच अंदाज आपल्याला येणार नाही. अश्या जागेलाच म्हणतात, स्टेलर किंवा मध्यम कृष्णविवर!

प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी अशी प्रचंड मोठी सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल किंवा कृष्णविवरं आढळून येतात. आपल्या आकाशगंगेच्या म्हणजेच 'मिल्की वे' च्या मध्यभागी जे कृष्णविवर आहे त्याला 'सॅजेटेरीयस ए' असं म्हणतात. ४ मिलियन (४० लाख) सूर्यांचं वस्तुमान एका सूर्यात, या कृष्णविवरामध्ये एकवटलेलं आहे. विचार करा की ४० लाख सूर्य एकत्र केले तर त्यांच गुरुत्वाकर्षण किती प्रचंड असेल. आपल्या पृथ्वीसारखे ग्रह या गुरुत्वाकर्षणात कुठे गायब होतील आपल्याला कळणार पण नाही. मग जिकडे काहीच म्हणजे अगदी प्रकाश पण बाहेर येत नाही तर, ते कृष्णविवर आपण ओळखणार तरी कसं? जरी काही दिसत नसलं तरी आधी म्हटलं तसं गुरुत्वीय बल आपलं काम करत असतं. आता या बलाच्या भोवती जे काही असेल ते त्याच्याकडे खेचलं जातं.

अवकाशाच्या काळोखात आजूबाजूला कोणत्याही ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसताना एका समान रस्त्याने जेव्हा एखादा तारा किंवा ग्रह अंधाऱ्या काळोखात परिक्रमा करतात तेव्हा, एक न दिसणारं बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण त्यावर काम करत असतं. हे बल काही वेळा इतकं प्रचंड असतं कि ताऱ्याभोवती असलेले वायू आपल्याकडे खेचून घेतं. परिवलन गती आणि एका काळोख्या बिंदूकडे खेचला जाणारा वायू मिळून एखाद्या  सी. डी. प्रमाणे डिस्क तयार होते. या डिस्कमधील वायू प्रचंड गरम होऊन एक्स-रे लाईट बाहेर पडतात. हा एक्स-रे लाईट जेव्हा आपण बघतो तेव्हा या प्रचंड बलाचं म्हणजेच कृष्णविवराचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं.

कोणत्याही कृष्णविवराचा पृथ्वीला धोका सध्यातरी नक्कीच नाही. सूर्याच्या आकाराचं कृष्णविवर आपण सूर्याच्या ठिकाणी ठेवलं तरी सगळे ग्रह त्या भोवती आता फिरतील तसेच परिक्रमा करतील. फरक एकच, आपण कोणाभोवती फिरतो आहोत ते आपण बघू शकणार नाही. दिवस न होता रात्रीचं राज्य पृथ्वीवर असेल. अर्थात, सूर्याच्या कमी वस्तुमानामुळे त्याचं रुपांतर रेड जायंट स्टार आणि नंतर व्हाईट डार्फ ताऱ्यात होईल. आता समजा, अशा भल्या मोठ्या प्रचंड कृष्णविवरांची टक्कर झाली तर काय? दोन प्रचंड अशा वस्तुमानांची टक्कर नक्कीच पूर्ण विश्वात आपलं अस्तित्व दाखवेल. पण, ती स्फोटाच्या किंवा प्रकाशाच्या रूपाने नाही तर, गुरुत्वीय बलाने. दोन प्रचंड अश्या गुरुत्वीय बलात झालेली अशी टक्कर संपूर्ण विश्वाच्या पटलावरती गुरुत्वीय तरंग तयार करतील जे पाण्यात दगड टाकल्यावर तयार होणाऱ्या तरंगा प्रमाणे विश्वाच्या संपूर्ण पटलावर प्रवास करतील असं जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन याने आपल्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मधे सिद्धांताने सिद्ध केलं आणि यालाच म्हणतात 'ग्रॅव्हिटेशनल वेव्ह'. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी लिगोने पहिली अशी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधली. १५ जून २०१६ ला दुसऱ्या अशा प्रचंड टकरीतून निर्माण झालेल्या ग्रॅव्हिटेशनल व्हेवचं अस्तित्व लिगोने दाखवून दिलं. त्यानंतर प्रकाशापलिकडे बघण्याची एक वेगळी नजर आपल्याला मिळाली. यामुळेच अल्बर्ट आईनस्टाईन च विश्वाला समजून घेण्यात दिलेलं योगदान असामान्य मानण्यात येतं. 

कृष्णविवराच्या आत नक्की काय आहे? हा प्रश्न सामान्य माणसापासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांना सतावतो आहे. जिकडे भौतिकशास्त्राचे नियम गळून पडतात. जिकडे, प्रकाश झुकतो. जिकडे, वेळ थांबते... तिकडे काय? आपण विचार पण करू शकत नाही असं विश्व तिथे असेल. कदाचित, नवीन नियम, नवीन प्रवास असेल. दिवसानंतर रात्र ठरलेली आहे, तशी काळोखानंतर एक पहाट आहे. आपण कदाचित भूतकाळात जाऊ, कदाचित भविष्यकाळात. कारण, जिकडे वेळ थांबते तिथे आपण केलेला प्रवास हा काळाच्या पलिकडे असेल.

विचार करताना मती गुंग होत असेल. पण, असं होऊ शकतं आणि होत असेल. विज्ञान अजून या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेलं नाही. पण एक मात्र नक्की, आपल्या विश्वाचा जन्म ज्या बिग बँगने झाला, कदाचित तो अशाच एका प्रचंड, अतिप्रचंड कृष्णविवराचा स्फोट असेल..... 

 जिकडे जन्म आहे तिकडे मृत्यू आहे आणि जिकडे मृत्यू आहे त्यानंतर एक नवीन पहाट आहे. कृष्णविवर अशीच काळोखानंतरची एक नवीन पहाट आहे..... 

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



भविष्यकाळात प्रवास करणं शक्य आहे!...

भविष्यकाळात प्रवास करणं शक्य आहे!... 
काळ आणि वेळ कोणाला चुकलेली नाही, असं आपण नेहमी म्हणतो. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणारे आपण वेळेचं महत्व जाणतोच. पण हीच वेळ किती सापेक्ष असू शकते हे आपल्याला माहीतही नाही. २० व्या शतकातील ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनने स्पेशल रिलेटिव्हिटिचा सिद्धांत मांडला. हे समजून घ्यायला साधं उदाहरण बघितलं, तर आपण चक्रावून जाऊ.
बाईकवरून वेगाने जाणारे आपण आपला वेग बघतो तो स्थिर असलेल्या वस्तूंपासून म्हणजे झाड, बिल्डींग किंवा रस्ता. या सर्व गोष्टींच्या सापेक्ष आपण वेगात असतो. पण खरंच या वस्तू स्थिर आहेत का? आपली पृथ्वी विषुववृत्ताजवळ जवळपास १६०० किमी /तास या वेगाने परिवलन करते. मग या गोष्टी स्थिर कशा? मग सूर्याला आपण स्थिर मानलं, तर असं खरंच आहे का? आपला सूर्य आणि पूर्ण सौरमाला तब्बल ८ लाख २८ हजार किमी/तास वेगाने आपल्या आकाशगंगेत म्हणजेच मिल्की वे मध्ये भ्रमण करत आहेत. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीला एक प्रदक्षिणा पृथ्वीला घालायला फक्त २ मिनिटे ५४ सेकंद पुरेशी आहेत, इतका हा वेग प्रचंड आहे. मग आपण जो वेग, काळ मोजतो तो किती सापेक्ष आहे?
मग या जगात स्थिर काय आहे कि ज्याला आपण मानून गती आणि वेळेची तुलना करू? आईनस्टाईनने सांगितलं प्रकाश! प्रकाशाचा वेग म्हणजे ३ लाख किमी/सेकंद हा स्थिर आहे. म्हणजे समजा तुम्ही तुमची बाईक प्रचंड वेगाने चालवली, कित्येक हजार किमी/तास वेगाने जरी चालवली, तरी त्याच्या हेडलाईटमधून निघणारा प्रकाश हा ३ लाख किमी/सेकंद याच वेगाने प्रवास करतो. तुमच्या बाईकचा स्पीड १० किमी/तास असो अथवा १०,००० किमी/तास. तुमच्या बाईकचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक होत नाही. प्रकाश सगळीकडे त्याच्या ठरलेल्या वेगानेच प्रवास करतो.
आईनस्टाईनने अजून एक गोष्ट आपल्या सिद्धांताने सिद्ध केली, ती म्हणजे जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करता, तेव्हा वेळ/काळ संथ होतो. हे तुम्हाला जाणवेल, जेव्हा तुम्ही परत तिकडेच याल जिथून प्रवास सुरु केला होता.
एक उदाहरण घेऊ....
तुम्ही १५ वर्षांचे असताना समजा प्रकाशाच्या वेगाने म्हणजे जवळपास ९९.५% पट वेगाने अवकाशात प्रवास सुरु केला आणि आपल्या आयुष्याचे ५ वाढदिवस अवकाशात साजरे करून पुन्हा पृथ्वीवर आलात तर तुमचं वय फक्त २० वर्षांचं असेल, पण जे पृथ्वीवर तुमचे मित्र होते, त्यांचं वय असेल ६५ वर्ष. कारण वेळ तुमच्यासाठी संथ झाली. म्हणून, तुम्ही जे ५ वर्षाचं आयुष्य अनुभवलं ते पृथ्वीवरच्या मित्रांनी ५० वर्षात अनुभवलं. समजा, तुम्ही २०१० साली प्रवास सुरु केला, तर तुम्हाला २०६० मध्ये पोचायला फक्त ५ वर्ष लागली. यालाच म्हणतात Time Travel.
आईनस्टाईनची प्रतिभा इतकी उच्च होती, कि त्याने अजून एक सिद्धांत मांडला. तो म्हणजे जनरल रिलेटिव्हिटी. हा सिद्धांत असं सांगतो कि जिथे गुरुत्वाकर्षण असते, तिथेही वेळ संथ होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर पण वेळ संथ होते, जेव्हा आपण तिची तुलना गुरुत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणांशी करू. मग ज्या कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणापुढे प्रकाशही झुकतो, तिथे काळ-वेळ प्रचंड संथ असतील. विज्ञानाने हे सिद्ध झालं आहे, कि असे वर्महोल किंवा कृष्णविवरातून Time Travel हे शक्य आहे.
काही वैज्ञानिकांनी याच सिद्धांताचा वापर करून अशी एखादी मशीन कि जी या क्षेत्रातून प्रवास करू शकेल, या दृष्टीने संशोधन सुरु केलं आहे. सध्यातरी कागदावरच शक्य असलेला प्रवास वास्तवात शक्य नाही. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, त्यांना कधी असा प्रवास करणं शक्य होईल? याबाबत खात्री देता येत नाही. पण हे शक्य आहे. जर असं तंत्रज्ञान आपण बनवू शकलो तर! आपण १०,००० वर्षांचा भविष्यातील प्रवास एका वर्षात करू शकू! विज्ञानाने हे सिद्ध केलं कि आपण भविष्यात जाऊ शकू, पण भूतकाळात जाण्यासाठी असं कोणतं Time Travel विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही.
मानवनिर्मित सगळ्यात दूर गेलेली वस्तू म्हणजे व्होयेजर १ हे यान ६१,००० किमी/तास वेगाने पृथ्वीपासून १८.८ बिलियन किलोमीटर वर गेलेलं आहे. हे अंतर आपल्याला खूप वाटलं, तरी अवकाशाच्या समुद्रातल्या पाण्याच्या थेंबाएवढंही नाही. अजून खूप पल्ला आपल्याला गाठायचा आहे. जर त्या टोकाला आपल्याला जायचं असेल, तर Time travel शिवाय पर्याय नाही. २० व्या शतकात आईन्स्टाईनने माणसाचं Time Travel चं स्वप्न कागदावर विज्ञानाच्या सहाय्याने सिद्ध केलं. पण त्याला सत्यात उतरवायला आपल्याला काही शतकांची वाट बघावी लागणार हे नक्की. पण Time Travel उद्याचं सत्य आहे, यात शंका नाही!

बदललेला शिक्षक...

बदललेला शिक्षक... 
५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. शाळेत असताना शिक्षक बनण्याचा हा दिवस. नेहमीच बेंच वर बसून समोर लक्ष द्यावं लागताना एकदा वेगळ्या रोल मध्ये स्वतःला अनुभवण्याचा दिवस मला नेहमीच आवडायचा. त्याकाळी समोर उभ राहून ५०-६० विद्यार्थांना समजवण इतक सोप्प नसते हे कळून चुकल होत. सगळेच सारखे अस बघता येण तितक सोप्प नसते ह्याची जाणीव तेव्हा झाली होती. ते प्रेम, ती आपुलकी शिक्षक बनून एका दिवसात इतक समाधान देत असे कि ती पुंजी अगदी कित्येक वर्ष पुरायची.
काळाच्या ओघात शिक्षक बदलत गेले. एकेकाळी आपल्या विद्यार्थांवर प्रेम करणारे शिक्षक आता इतिहासजमा झाले आहेत. नोकरी म्हणून जेव्हा शिक्षकी पेशा झाला तेव्हा त्यातली आत्मीयता पण तितकीच आटत गेली. मला आठवते एकेकाळी विद्यार्थांना समजेस्तोवर समजावून सांगणारे शिक्षक आता परीक्षेपुरती शिकवतात. आपण काय देतो ह्यापेक्षा आपल्या ब्यांक अकाऊंट मध्ये किती जमा होतात ह्याची काळजी जास्ती असते. हट्टाला पेटून ज्ञानार्जन करणारा शिक्षक आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकाच शिल्लक राहिला आहे. एकूणच आपली शिक्षण पद्धती जेव्हा कारकून घडवण्याच्या स्पर्धेत ढकलली गेली त्याला गुणवत्तेपेक्षा जातीच, मार्कांचं सर्टिफिकेट लागायला लागल तेव्हा शिक्षक पण त्याच वेगाने त्यात ढकलले गेले.
आता अनेक स्नेहसंमेलन होतात. शाळेतले शिक्षक भेटतात. पण सगळ्यांची खंत हीच कि कुठेतरी विद्यार्थी बदलत गेला. तो बदलला तसेच शिक्षक बदलत गेला आणि त्याचं नातही. आधी शाळेपलीकडे असणार आणि जपवलेल नात आता फक्त त्या वर्गांच्या भिंती पुरतीच मर्यादित राहायला लागल. शिक्षक जसा जसा फक्त मार्गदर्शक ह्या साच्यातून फक्त ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करणारा बनत गेला तसतस विद्यार्थी घडवण बाजूला राहून वर्ष संपवण हेच कर्तव्य बनत गेल. शाळेची, कॉलेजांची वाख्या जेव्हा ज्ञानाच भांडार सोडून सर्टिफिकेट मिळवण्याचा धंदा झाला तेव्हाच शिक्षक संपला.
आता तर त्यात पण कोर्पोरेट कल्चर आल आहे. शाळेचा आणि कॉलेजांचा वार्षिक बाजार भरतो. बोली लागतात. मग विद्यार्थी करार करतात. आता शिक्षकांपेक्षा करार पूर्ण करणाऱ्या कोर्पोरेट शिक्षकांची खोगीर भरती केली जाते. ठरलेल्या तासांपेक्षा जास्ती आणि ठरवलेल्या अभ्यासाशिवाय जोवर ब्यांकेच अकाऊंट भरत नाही तोवर जास्ती काहीच नाही अन्यथा आपला करार संपुष्टात. प्रेम, आत्मीयता, शिक्षक-विद्यार्थी नात आता सगळच मागे जाऊन शोधाव लागते. बघा शाळेचे किती शिक्षक लक्षात आहेत आणि कॉलेज मधील किती? आताच्या पिढीला तर शाळेत पण कोण होत हे आठवावे लागेल इतक ते नात धूसर झाल आहे.
आजचा दिवस शिक्षकांन विषयी असलेला आदर व्यक्त करण्याचा दिवस, ते नात जपण्याचा दिवस, ते नात टिकवून ठेवण्याचा दिवस पण आजच्या काळात हे नातच संपुष्टात आल आहे ते जपणार कुठे? शिक्षक बनायला आज मुलांना समजून घेण्याची मानसिकता, गुणवत्ता नाही तर कारकून बनवण्याची तुमची तयारी किती आहे ते लागते तिकडे ते नात तयार होणार कुठे? आजही माझे शाळेतले शिक्षक आवर्जून माझ्या लेखावर लिहतात तेव्हा कुठेतरी मिळणार समाधान हे मिळालेल्या १०० लाईक पेक्षा जास्ती असते. कारण आमच्या वेळी ते नात होत. ते नात जपणारे शिक्षक होते. आजही तसे काही शिक्षक आहेत. पण बाजारू बनलेल्या शिक्षणपद्धतीला आणि कोर्पोरेट कल्चर ला जर आटोक्यात आणल नाही तर पुढे येणारा शिक्षकदिन हा फक्त नावासाठीच आणि कारारापुरती शिल्लक राहील ह्यात शंका नाही.

लिव्ह इन रिलेशनशिप.. मृगजळातील वास्तव...

लिव्ह इन रिलेशनशिप.. मृगजळातील वास्तव... 
अमेरिकेच्या संस्कृतीच अप्रूप आपल्या भारतीयांना खूप असते. मोकळेपणा, स्वातंत्र्य आणि आपल्या दृष्ट्रीने असेलला स्वैराचार हा त्यांच्या नॉर्मल आयुष्याचा भाग असतो. अश्या काही अमेरिकन मित्र- मैत्रिणी सोबत भारतीय लग्नसंस्था आणि एकूणच अमेरिकन कुटुंब व्यवस्था ह्यात संवाद झाला. त्यात समोर आलेले काही मुद्दे नक्कीच शेअर करावेसे वाटतात.
भारतीय लग्नसंस्थेचे तोटे अमाप आहेत. मन मारून एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढण्याच दिव्य आधल्या पिढीने पेलल असल तरी आताची पिढी ते पेलेल कि नाही शंका आहे. स्वातंत्र्य जन्मापासून अनुभवलेली हि पिढी पहिल्यापासून आपल्या विचारात ठाम आणि निर्णय स्वातंत्र्य ठेवणारी आहे. लग्न संस्थेतील तडजोडी मान्य करणारी मुळीच नाही म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप हा अमेरिकन प्रकार आता आपल्या समाजाचा भाग बनू पाहतो आहे किंबहुना बनला आहे. तुम्ही, आम्ही विचार करतो त्या पेक्षा अधिक वेगाने आपल्या घरात तो पोहचला आहे. आपल्या जोडीदाराच ओझ नको, मूल-बाळ ते सासू- सासरे अश्या सगळ्या नात्यांपासून सुटका. कोणी प्रश्न विचारण नको ते कोणाला उत्तर देण नको. आपल्या आयुष्याच आपणच कर्ता करविता. आज वाटल तर राहिलो एकत्र, घालवले काही क्षण सगळ्याच लेवल वर. उद्या नाही वाटल तर तुझा- माझा रस्ता वेगळा. वाटल तर पुढे पुन्हा परत एकत्र. स्वातंत्राच्या ह्या अभूतपूर्व कल्पनेने आपण हुरळून गेलो नाहीत अस होणारच नाही. स्पेशली ज्या समाजाने पिढ्यान पिढ्या लग्न संस्थेचे, स्त्री च्या अत्याचाराचे आणि नातेसंबंधांच एकूणच ओंगळवाण प्रदर्शन बघितल आहे त्यासाठी हा प्रकार म्हणजे जेलमधून झालेली सुटकाच.
मोकळ्या हवेची सवय नसताना हे स्वातंत्र्य कितीही आवडल तरी त्या मोकळ्या हवेतील मृगजळ लक्षात येत तोवर बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असत. लग्नसंस्था चांगली का वाईट ह्या प्रश्नात मला जायचे नाही कारण दोन्ही प्रवृत्ती त्यात असताना एक उत्तर आपण देऊ शकत नाही. आधी कोंबडी कि आधी अंड असलाच प्रकार दोन्ही सापेक्ष. पण त्याच वेळी लिव्ह इन रिलेशनशिप च अंधानुकरण होऊ नये ह्यासाठी दोन्ही गोष्टी त्यांच्या नफ्या तोट्यानसहित पुढल्या पिढीकडे मांडता यायला हव्यात बाकी शेवटचा निर्णय त्यांचाच. अमेरिकेत संवाद करताना हि संस्कृती अमेरिकेत अनेक पिढ्यांचं प्रतिनिधित्व करत आलेली आहे. माझ्या मित्राने एक मांडलेला मुद्दा मला निरुत्तर करून गेला. अमेरिकेत काय सगळेच फ्री नाहीत. त्यांच्यात पण कमीटमेंट असते. मोकळेपणा, स्वातंत्र्य असल तरी स्वैराचार हा तिकडे हि नात्यात खपवून घेतला जात नाही. पण मग हे स्वातंत्र्य मिळून सुख , समाधान आहे का? तर उत्तर हो आणि नाही अस आहे.
हो ह्यासाठी कि आपल्या मर्जीनुसार जगता येत नक्कीच. पण कोणी आपल होत नाही. आपल झाल तरी त्यातल आपलेपण कधी संपेल ह्याची शाश्वती देता येत नाही. तिकडे नाती फुलतात उमलत नाही. कारण उमलण्यासाठी वेळ असतो कोणाकडे. मग जे जाणवत ते भीषण असते. माझ्या मित्राच्या मते तो घरी परत आला कि नाही त्याच्या आई किंवा बाबाला काही फरक पडत नाही. आई एका दुसऱ्या सोबत राहते. बाबा एका दुसऱ्या स्त्री सोबत आहेत. त्यांना जी पहिली मुल आहेत ते सगळे ह्याचे हाफ बहिण- भाऊ. ह्या सगळ्यात आपुलकी आली कुठे? करियर, पैसा, स्टेटस सगळ कमावताना एवरेस्ट वर पोचल्यावर ते बघणार कुणी लागते. ते असेल का ह्याची शाश्वती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नाही. नो स्ट्रिंग अट्याच असताना धागे मोकळेच रहाणार.
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहायचं पण कमीटमेंट नाही. प्रेम असल तरी ते किती वेळ, वर्ष टिकेल ह्याची शाश्वती नाही. ८ तास एकत्र ऑफिस मध्ये घालवल्यावर आपल्या कलीग सोबत आपला जीव लागतो त्याच्या जाण्याने मन अस्वस्थ होते. तर आयुष्य शेअर केलेल्या व्यक्ती सोबत अशी रिलेशनशिप तुटली तर ते पचवण इतक सोप्प असेल? त्यात अजून एखादा जीव गुंतला असेल तर? बर आपण अयशस्वी झालो किंवा आयुष्याच्या वेगात एखादा अपघात घडला असताना आपल माणूस सगळ्यात जास्ती जवळ हवहवस वाटताना ती कमीटमेंट जोडीदाराने नाकारली तर सगळ पेलून नेण सोप्प असेल का? आयुष्याच्या उत्तरार्धात आपल कोणीतरी नेहमी आपल्या सोबत प्रवास केलेलं नसेल तर ते एकटेपण किती त्रासदायक असेल ह्याचा अंदाज पण नाही आपल्याला. लास वेगास ला असताना असे अनेक जण मला भेटले. आयुष्यात खूप पैसा कमावला पण भावनांचा फुटबॉल झाल्यावर आता खेळावस वाटत नाही. म्हणून तिकडे बसून जुगार खेळणारे अमेरिकेत खूप बघायला मिळतील.
माझ्या मित्राच्या भाषेत यु इंडियन आर लकी. यु ह्याव समवन हु विल स्किप मिल फॉर यु, प्रे फॉर यु, यु ह्याव समवन व्हू विल वेटिंग फॉर यु. व्ही अमेरिकन आर फ्री सो व्हेन आय गो ब्याक होम आय ह्याव टू सर्च फॉर माय पिपल. ह्या त्याच्या वाक्यात त्याने मला पूर्ण लिव्ह इन रिलेशनशिप चा अर्थ सांगितला. भारतीय लग्नसंस्था हि अनेक वर्षांच्या अभ्यासातून पुढे आली आहे. नक्कीच पुरुषाला वर्चस्व देणारी आणि स्त्री ला कमी महत्व देणारी त्याची परिभाषा चुकीची आहेच. पण मुळापासून सगळच चुकीच सांगताना त्याला पर्याय आपण देत आहोत का हा विचार करायला हवा. लिव्ह इन रिलेशनशिप हाच जर पर्याय असेल तर त्याच्या हि इतिहासाचा किंवा ती संस्कृती काही पिढ्या अनुभवलेल्या लोकांकडून अभ्यास व्हायला हवा.
लिव्ह इन रिलेशनशिप हे स्वातंत्र्य आहे पण त्याच सोबत मृगजळ पण आहे. भारतीय लग्नसंस्था हे शाश्वत पण बंधन असलेल स्वातंत्र्य आहे. पुढल्या पिढीने काय निवडायच हा निर्णय नक्कीच त्यांचा आहे. पण नाणाच्या योग्य त्या बाजू समोर मांडणे हे आपले पालक म्हणून कर्तव्य आहे. लग्नसंस्था किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या दोहोत चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. तडजोड दोन्ही कडे आहे. समजून घेण दोन्हीकडे आहे. पण त्याचे वेळी दोन्हीकडे दाहक बाजू हि आहेत. हे सगळ समर्थपणे आपल्या पुढल्या पिढीला समजून द्यायचं असेल तर आपण ते समजून घेण्याची गरज आहे अस मला तरी वाटते.

एक नवीन क्रांती.. इंडियन स्पेस इंडस्ट्री...

एक नवीन क्रांती.. इंडियन स्पेस इंडस्ट्री...
१९ एप्रिल १९७५ चा तो दिवस भारतासाठी खूप महत्वाचा ठरला. कॉसमॉस ३ एम ह्या रॉकेट च्या साह्याने भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट सोव्हियत युनियन म्हणजेच रशिया च्या साह्याने प्रक्षेपित केला. गेल्या ४० वर्षात भारताने मागे वळून पहिले नाही. एकेकाळी रशिया ची मदत घेणारा भारत स्वतःचे उपग्रह स्वतःच प्रक्षेपित करू लागला. इतक्यावर न थांबता भारताने दुसऱ्या राष्ट्रांचे उपग्रह आधी मदतीतून तर नंतर धंदेवाईक दृष्ट्रीने प्रक्षेपित करण्याची जबाबदारी उचलली. ह्या सगळ्या प्रवासात भारताने म्हणजेच इस्रो ने आपल्या शिरपेचात यशस्वितेचे अनेक तुरे रोवले. एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करत भारताने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ज्या रशियाच्या मदतीने भारताने आपला पहिला उपग्रह सोडला त्याच रशियाचा विक्रम ४ पटींनी मोडावा हा कोणता चमत्कार नाही तर भारतीय संशोधक, वैज्ञानिक, अभियंते ह्यांच्या मेहनितच ते फळ होत. १९७५ ते आज तब्बल १५० पेक्षा जास्त मोहिमा इस्रो ने यशस्वी केल्या आहेत.
उपग्रह निर्मिती आणि त्याच प्रक्षेपण ह्या दोन्ही क्षेत्रात आपला उत्कर्ष साधताना इस्रो ने आपला एक वेगळा ठसा जागतिक पातळीवर उमटवला. चंद्रावर पाणी शोधणारी पहिली मोहीम, मंगळावर पहिल्याच प्रयत्नात उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थापन करणारा जगातला पहिला देश ह्यामुळे जागतिक पातळीवर इस्रो तसेच भारताच स्थान कमालीच उंचावल. ह्या सगळ्याला गुणवत्ते बरोबर किफायीतशीर किमतींच एक वेगळ कोंदण भारताने अवकाश क्षेत्रात निर्माण केल. ह्या सगळ्यामुळे जगाच लक्ष भारताकडे वेधल गेल आहे. काही वर्षापूर्वी भारतात जी इन्फोर्मेशन टेक्नोलोजी जी क्रांती झाली. त्याच धर्तीवर भारतात आता अवकाश तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
गुणवत्ते सोबत कमी पैश्यात दर्जा राखणारी स्पेस एजन्सी म्हणून इस्रो च स्थान उंचावलेल असताना कामाचा व्याप प्रचंड वाढत जातो आहे. एकेकाळी वर्षाला एखाद दुसर प्रक्षेपण करणारी इस्रो ला आता २० पेक्षा जास्ती उड्डाणाची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उपग्रह निर्मिती तसेच रॉकेट निर्माण त्यासोबत त्याच प्रक्षेपण ह्या सगळ्याच नियोजन इस्रोला स्वबळावर करण जड जाते आहे. म्हणूनच इस्रो ने आपल तंत्रज्ञान हे भारतातील उद्योगांसाठी खुल केल आहे. आधी हे उद्योग समूह इस्रो ला वेगवेगळे भाग बनवून द्यायचे पण आता पूर्ण उपग्रह प्रणाली त्याच निर्माण करण्याची जबाबदारी इस्रो ने ह्या उद्योगांकडे देण्याच ठरवलं आहे. इस्रो भारतासाठी कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंग, नेव्हिगेशन, वैज्ञानिक अश्या चार स्वरूपाचे उपग्रह बनवते. अश्या सगळ्या श्रेणीतील उपग्रह निर्मितीसाठी इस्रो ने आपले दरवाजे खुले केले आहेत.
१००० किलो पासून ते ४००० किलो पर्यंत वजन असणारे हे उपग्रह प्रचंड किंमतीचे असतात. एक २००० किलो वजनाचा उपग्रह बनवायला इस्रो ला २०० कोटी रुपयांचा खर्च येतो. म्हणजे वर्षाला १८-२० उपग्रह निर्मिती जर भारतातील उद्योगांनी जरी बनवले तर किती कोटी रुपयांची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हे फक्त झाल इस्रोसाठी ह्यात जर परदेशी कंपन्या विचारात घेतल्या तर हा आकडा किती मोठा होईल. भारतातील उपग्रह निर्मिती चा खर्च हा जागतिक पातळीवर सर्वात कमी आहे. जे आय.टी. च्या बाबतीत झाल ते आता अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत होते आहे. ३०० बिलियन अमेरिकन डॉलर इतक्या प्रचंड किमतीची बाजारपेठ भारताकडे सरकण्याची पूर्ण शक्यता आहे. स्वस्त, मस्त आणि उत्कृष्ठ अश्या तिन्ही पातळ्यांवर आपण आपला उत्कर्ष केलेला आहे. इस्रो च्या तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यामुळे ह्या जटील तंत्रज्ञांनावर प्रभुत्व भारतीय कंपन्यांना गाजवता येणार आहे. ह्या सगळ्यामुळे भारतात ह्या क्षेत्रात प्रचंड रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
ह्याच पाहिलं पाउल म्हणजे श्रीगणेशा आज होत आहे. आज भारतात पहिल्यांदा इस्रो शिवाय एका प्रायवेट इंडस्ट्री ने बनवलेला उपग्रह प्रक्षेपित होतो आहे. आय.आर.एन.एस.एस.- १ एच ह्या उपग्रह निर्मितीतील २५% काम हे अल्फा डिझाईन टेक्नोलोजी ने केलेल आहे. ह्या निर्मिती ने प्रेरित होऊन इस्रो ने पुढील ३ वर्षासाठी वर्षाला १८ ह्या वेगाने उपग्रह निर्मितीसाठी भारतातल्या अनेक प्रायवेट कंपन्या, स्टार्ट-अप ना निमंत्रित केल आहे. हि खूप मोठी संधी, बाजारपेठ भारतात उपलब्ध झाली आहे ती इस्रोमुळे. इस्रोतील वैज्ञानिक, अभियंते, संशोधक ह्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा भारत एका नव्या क्रांती च्या उंबरठ्यावर उभा आहे. हरित क्रांती जमिनीवर आणि भारतात, माहिती-तंत्रज्ञान क्रांती कॉम्प्यूटर आणि जगात घडवणारा त्याची चव घेणारा भारत आता अवकाश क्रांती आणि ती हि अवकाशात घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत हे आपल भाग्य आहे.
आज गणरायाच्या साक्षीने संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी इस्रो चा वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. एक्स एल रॉकेट आपल्या ४१ व्या उड्डाणात ( ह्या रॉकेट ने सलग ४० उड्डाण यशस्वी केली आहेत ) १४२५ किलोग्राम वजनाचा आय.आर.एन.एस.एस.-१ एच उपग्रह घेऊन त्याला त्याच्या कक्षेत स्थापन करेल तेव्हा भारताने एका नवीन क्रांतीचा श्रीगणेशा केला असेल. इंडियन स्पेस इंडस्ट्री हे नाव येत्या काळात जगात तसेच भारतीयांच्या ओठांवर रुळणार आहे. एका नवीन क्रांतीसाठी भारताला सज्ज करणाऱ्या इस्रो ला मानाचा सलाम तसेच आजच्या उड्डाणासाठी शुभेच्छा.