Wednesday 8 November 2017

आपाचे गार्डियन...

आपाचे गार्डियन... 
आपाचे गार्डियन सिरीज मधील ए.एच ६४ श्रेणीमधील ६ हेलिकॉप्टर भारताने अमेरिकेकडून खरेदी करण्याचा सौदा केला आहे. ४१६८ कोटी रुपये इतकी अवाढव्य किमतीची हि हेलिकॉप्टर खरेदी करण्याची गरज भारताला होतीच पण अमेरिकेने ते देण्याच मान्य केल हे हि तितकच महत्वाच आहे. आपाचे गार्डियन सिरीज मधील हि हेलिकॉप्टर जगात सर्वोत्कृष्ट समजली जातात. नुसत्या त्यांच्या फोटोवरून त्यांच्या आयुधांची कल्पना आपण करू शकतो. सर्वोत्कृष्ट अशी आपाचे आपल्या सेनेचा भाग होणार आहेत व त्यामुळे शत्रूवर वचक बचवण्यास मदत होणार आहेत. काय आहे ह्या हेलिकॉप्टर मध्ये कि ज्याच्यामुळे शत्रू च्या पोटात गोळा येतो ते जाणून घेण महत्वाच आहे.
आपाचे ए एच ६४ हे ४ पाती असेलेल ट्वीन टर्बोशाफ्ट हेलिकॉप्टर असून ह्याच्या नाकावर सेन्सर आहेत. त्यामुळे कोणत्याही लक्ष्याचा मागोवा घेण्यात हे निष्णात आहे. लेझर, इन्फ्रारेड सारखी अस्त्र आपल्या भात्यात असणार हे हेलिकॉप्टर कोणत्याही वेळी म्हणजे दिवस रात्र, कोणत्याही ऋतूत कधीही, कुठेहि शत्रूचा मागोवा, लक्ष्य आणि त्याचा खातमा करण्यात सुस्सज आहे. ह्या हेलिकॉप्टर ला जमिनीवरील रणगाड्यांचा कर्दनकाळ समजले जाते. लेझर गायडेड हेलफायर मिसाईल, ७० एम.एम. रॉकेट, ३० एम.एम ऑटोम्याटिक बंदुकीत १२०० हाय एकस्प्लोसीव ड्यूअल पर्पज राउंड असून तब्बल २८४ किमी/ तास वेगाने शत्रूच्या गोटात खळबळ माजवण्यास तत्पर आहे.
युद्धाच्या काळात शत्रूच्या गोळ्या लागल्यावर सुद्धा काम करणाऱ्या सिस्टीम ह्यात असून एकर तो एअर टू एअर सरफेस मिसाईलमुळे ह्याची भेदक क्षमता बाकीच्या हेलिकॉप्टर पेक्षा खूप जास्ती आहे. युद्धाच्या काळात हेलिकॉप्टर मधली सिस्टीम एका वेळेस १२८ टार्गेट्स शोधून त्यांची लिस्ट करण्याच काम अवघ्या ६० सेकंदात करू शकते. हे हेलिकॉप्टर यु.ए.व्ही. म्हणजेच अन म्यान एरियल वेह्कल पण कंट्रोल करू शकते. ह्याच्या फ्युल सिस्टीम ला युद्धात आघात झाल्यावर ह्याची सिस्टीम सेल्फ सिलिंग करू शकते. ह्यामुळे फ्युल ची गळती न होता हेलिकॉप्टर अडचणीच्या वेळेस पण योग्य क्षेत्रात जाण्यास सक्षम रहाते. ह्याचा कोम्ब्याट रेडीयस ४८० कमी चा असून एकावेळेस १९०० किमी कापण्याची ह्याची क्षमता आहे. उड्डाण भरताना जवळपास ३-४ टन वजनाचा दारुगोळा घेऊन जाण्याची ह्याची क्षमता ह्याला जगातील सर्वोत्कृष्ठ हेलिकॉप्टर बनवते.
काही लोक असा हि विचार करतील कि इतके पैसे खरच खर्च करण्याची गरज भारताला आहे का? तर इकडे एक लक्षात घेतले पाहिजे आपल्या नशिबाने किंवा कमनशिबीमुळे आपल्याला असे शेजारी लाभले आहेत कि ज्यांची नजर सतत आपल्या देशावर वाईट अशीच आहे. अश्या वेळेस जर अडीच आघाड्यांवर जर भारताला सक्षम राहायचे असेल तर आपाची ची गरज भारतीय सेनेला आहे. नुसत्या देशभक्ती ने युद्ध जिंकता येत नाहीत. जेव्हा समोरचा अत्याधुनिक सैनिक असतो तेव्हा आपल्याला पण त्याच तोडीच रहाण गरजेच आहे. मायकेल शूमेकर नुसता ड्राईविंग स्कील ने जिंकत नव्हता तर त्याला सपोर्ट देणार फेरारी च इंजिन, गाडी सोबत होती. म्हणून जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या आपल्या सेनेला अश्या अत्याधुनिक आणि सर्वश्रेष्ठ आयुधांची गरज आहे. आपाचे गार्डियन भारतीय सेनेच्या भात्यातील एक प्रमुख अस्त्र असेल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment