Wednesday 8 November 2017

डोकलाम गुंतवलेला गुंता...

डोकलाम गुंतवलेला गुंता...
सध्या डोकलाम ह्या प्रश्नावरून बरच युद्ध सुरु आहे. भारत- चीन संबंध ताणले गेले आहेत. आता भारत – चीन युद्ध होणार अस दिसते आहे? कोण चूक कोण बरोबर? ह्या सोबत स्वदेशी चे नारे गुंजत आहेत. चीनी वस्तू ना भारतात बंदी पासून ते बहिष्कार टाकण्यासाठी मेसेज वर मेसेज येत आहेत. अनेक लोक डोकलाम काय आहे माहित नसताना राजकारण्यांची दूरदृष्टी ते इतके वर्षात काय केल नाही असा सगळा उपापोह करत आहेत. ह्या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाला नक्की माशी कुठे शिंकते आहे. हेच कळत नाही आहे. तर ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.
डोकलाम हे एक पठार असून हा भाग भारत, चीन आणि भूतान ह्या तीन देशांच्या सीमेलगत किंबहुना सीमा जोडतो. २८९ स्क्वेअर किलोमीटर चा भूभाग चीन साठी सामरिक दृष्ट्र्या खूप महत्वाचा आहे. म्हणून चीन कित्येक वर्ष ह्या भूभागाच्या बदल्यात भूतान ला ४९५ स्क्वेअर किलोमीटर चा जाकुर्लुंग आणि पसामलुंग हा प्रदेश भूतान ला देत आहे. पण भूतान ने सध्यातरी अश्या कोणत्याही हस्तांतर करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. डोकलाम च्या पठारावर प्रवेश म्हणजे भारताच्या पूर्ण उत्तर पूर्व भागावर वर्चस्व हे चीन जाणून आहे. अरुणाचल प्रदेश ला चीन आपला हिस्सा आजही मानतो. पण भारतीय सेनेच्या बहादुरीमुळे अरुणाचल प्रदेश आजही भारताच अविभाज्य अंग आहे. ह्या डोकलाम भागापासून जवळ आहे तो चिकन नेक प्रदेश. अवघी १७ किमी ची रुंदी असलेला हा भाग पूर्ण उत्तर पूर्व भारताला मुख्य भारतापासून जोडतो. म्हणजे डोकलाम आपल्या हातात आल तर ह्या चिकन नेक वर आपला कब्जा कि उत्तर पूर्व भारताचा मुख्य भारताशी संबंध तुटला. चीन च हे स्वप्न भारत पूर्णपणे ओळखून आहे. म्हणूनच भूतान पेक्षा डोकलाम मधील चीन चा वाढता प्रवेश भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
जून २०१७ मध्ये चीन च्या सेनेने ह्या प्रदेशातील झोम्परी भागात पक्के रस्ते बनवण्यास सुरवात केली. ज्यावरून रणगाडे किंवा लष्करी युद्ध साहित्य नेता येऊ शकेल. भारताने लगेच भूतान सोबत असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन कराराची (२०१२) ग्वाही देत आपल सैन्य तिकडे उभ करून चीन ला रस्ता बांधण्यास मज्जाव केला. डोकलाम मध्ये आजही भारतीय सेना व चीन ची सेना एकमेकानसमोर उभे ठाकले आहेत. ह्या सगळ्यात जो धुराळा उडाला आहे त्याला काही कारण आहेत. ती बघण मोठ रंजक आहे. राजकारणात मला जायचं नाही. कारण सगळ्यात भारताला कोणी अखंड ठेवल आहे ते भारतीय सेनेने सो त्यांच्यापुढे कोणीच नाही.
चीन च्या अरेरावी ला अद्दल घडवण्यासाठी चीनी वस्तूवर वगरे बहिष्कार वगरे सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. चीन – अमेरिका मधला बाजार आहे ४०० बिलियन अमेरिकन डॉलर, चीन – जपान मधला बाजार आहे १५० बिलियन अमेरिकन डॉलर आणि चीन भारतामधला बाजार आहे ७० बिलियन अमेरिकन डॉलर. चीन च्या एकूण बाजारपेठेच्या तो फक्त २ % हिस्सा आहे. जरी अगदी सगळ्या भारतीयांनी मिळून चीनी मालावर बहिष्कार टाकला तरी चीन ला फक्त ओरखडा उठेल. कारण चीन ची बाजारपेठ इतकी विस्तारलेली आहे कि भारता सारख्या मोठ्या बाजारपेठेने बहिष्कार टाकून सुद्धा काही फरक पडणार नाही. उलट फरक पडेल तो भारताला. भारतात टेलीकॉम सेक्टर मध्ये ७०,००० करोड रुपयांची खरेदी भारत चीन कढून करतो. ८ बिलियन अमेरिकन डॉलर मार्केट असणाऱ्या मोबाईल मार्केट मध्ये ५१% हिस्सा चीनी कंपन्यांचा आहे. सोलार मार्केट मधला हिस्सा ८७% इतका आहे ३०% पॉवर जनरेटर चीन मधले आहेत. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत चीन चा हिस्सा प्रचंड आहे. त्यामुळे चीनी मालाचा वापर थांबवण खरे तर भारताची प्रगती थांबवण्या सारख आहे. मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम आणले तरी त्यांची उपलब्धी दिसायला काही वर्षाचा कालावधी लागणार आहे. तूर्तास भारताला चीनी गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही हे सत्य आहे.
युद्ध च्या दृष्ट्रीने बघयला गेल तर चीन ची सेना भारतापेक्षा जास्ती मोठी आणि लष्करी आयुधांच्या बाबतीत सरस आहे. पण पुस्तकावर असेलेला शेर जमिनीवर शेर असलेच अस नाही. कारण ह्याला अनेक कारण आहेत. ज्या भागात म्हणजेच डोकलाम भागात हे चालू आहे तिकडे भारताची बाजू उजवी आहे. चीन ला युद्ध सामुग्री डोकलाम ला ज्या रस्त्याने आणावी लागेल त्यातील जवळपास १५० किमी च्या रस्त्याच्या तीनही बाजूने भारत आहे. त्यामुळे चीन ची अवस्था युद्ध काळात कात्रीत सापडल्या सारखी होईल. भारतीय सेना एक एक करून टिपून चीन च्या सैन्याला मारू शकेल हे चीन ला चांगलच माहित आहे. ह्या शिवाय आंतरराष्ट्रीय मंचावर जग भारताच्या बाजूने झुकलेल आहे. युद्ध झालच तर अमेरिका, जपान, ओस्ट्रेलिया, इस्राइल सकट अमेरिकेची मित्र राष्ट्रे म्हणजे युरोप मधील सगळेच देश भारताच्या बाजूने उभे रहातील. जरी एकदम बाजू नाही घेतली तरी छुपी मदत नक्कीच असेल. पाकिस्तान, मलेशिया आणि यु.ए.ई, नॉर्थ कोरिया सह काही राष्ट्रे जरी चीन च्या बाजूने असली तरी भारतीय सेना अडीच आघड्यांवर लढायला सक्षम आहे. एकीकडे पाकिस्तान, दुसरीकडे चीन तर अर्धी आंतरिक. अतिरेकी कारवाईमुळे भारतीय सेना हिमालय तसेच अन्य ठिकाणी युद्धासाठी तयार तसेच सराव असणारी सेना म्हणून जगात गौरवली जाते. भारतीय सेनेचा ह्या भागातील अनुभव अन्य कोणत्याही सेनेपेक्षा वरचढ आहे. हिंद महासागरात भारतीय नौदल सगळ्यात सक्षम समजले जाते. त्याच्या जोडीला जर अमेरिका नॉर्थ कोरिया च्या नावाखाली युद्धात आली तर चीन ला तीन बाजूने लढाई करावी लागेल.
अर्थात ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. युद्ध हा उपाय नाही हे भारत आणि चीन दोघांना हि चांगलच ठाऊक आहे. त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता कमीच आहे. डोकलाम मध्ये भारताने पहिला डाव जिंकला असला तरी पुढे भारत काय भूमिका घेतो ह्यावर डोकलाम च यश – अपयश अवलंबून आहे. डोकलाम वरून मागे जाण चीन ला परवडणार नाही तर पुढे जाण सुद्धा परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय मंचावर बाजार करून चीन ने आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे. चीन डोकलाम साठी वेगवेगळ्या दबावतंत्राचा प्रयोग करत आहे. आपल्या सुजाण राजकरण्याची चीन चे अधिकारी भेट घेऊन भारतात विरोध करण्यासाठी पण प्रयत्न करत आहेत. सगळ्या लेवल वर कसही करून चीन ला वर्चस्व हव आहे. तूर्तास भारताने डोकलाम च्या गुंतवलेल्या गुंत्या ला जस आहे तस ठेवण्याची भूमिका घेतली आहे. पुढल्या भविष्यात किसकी चाल ओर किसकी मात हे बघण मोठ रंजक असणार आहे.

No comments:

Post a Comment