रॉयल एन्फिल्ड एक दुमदुमणारा आवाज.... विनीत वर्तक
काही नाव अशी असतात कि त्यांच्या नावावर वस्तू विकल्या जातात. जसे सीलबंद पाणी म्हंटल कि बिसलरी , टूथपेस्ट म्हंटली कि कोलगेट , किंवा झेरोक्स. असच बुलेट म्हंटल कि एकमेव नाव समोर येते एन्फिल्ड. तिचा तो अजरामर आवाज आज सुद्धा प्रत्येक बायकर ला प्रेमात पाडतो. अगदी लांबून सुद्धा एकू येणारी ती धक धक आजही प्रत्येक माणसाला बुलेट च अस्तित्व दाखवून देते. रॉयल एन्फिल्ड का रॉयल आहे तर १०० वर्षा पेक्षा जास्त वर्ष ती आपल अस्तित्व टिकवून आहे. १९०१ ते २०१५ इतका प्रचंड मोठा प्रवास आणि स्तीथंतर पाहिलेली दुसरी कोणती बाईक आज अस्तित्वात नसेल.
एकेकाळी ब्रिटीश साम्राज्याच प्रतिनिधित्व करणारी त्याच ब्रिटीशांनी अस्तित्व पुसून टाकल्यावर सुद्धा भारतात आपल अस्तित्व टिकवून ठेवून पुन्हा एकदा त्याच जोशात आणि जोमात जगातील सर्वाधील विकली जाणारी २०१४ साला मधील बुलेट ठरली आहे. तब्बल ३ लाख बाईक २०१४ साली विकल्या गेल्या आहेत. हि वाढ तब्बल ४३% टक्यांची आहे. बुलेट चा राजा म्हणून दिमाखात फिरणाऱ्या अमेरिकन संस्कृती च गोडव गाणार्या हर्ले डेविडसन च अढळपद रॉयल एन्फिल्ड ने मोडीत काढल आहे. रॉयल एन्फिल्ड ची विक्रीतील वाढ तब्बल ७०% ची आहे तर हर्ले डेविडसन ची ३%.
अगदी गेल्या आठवड्यात तोंडात बोटे घालून बी एस एफ च्या जवानांच कौतुक करणाऱ्या बराक ओबामांना हि बुलेट काय करू शकते ह्याच प्रत्यंतर आलच असेल. नक्कीच स्कील आणि त्यावरची प्रात्यक्षिक हा जरी त्या जवानांच्या शौर्याचा भाग असला तरी त्याच तोडीची बुलेट तयार करणे , ती तितक्याच दमदारपणे योग्य वेळी काम करणे हा हि तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. मायकल शूमेकर हा जरी उत्कृष्ठ ड्राईवर असला तरी फेरारी ची गाडी हा त्याच्या पर्फोर्मंस चा ५०% भाग होती हे सगळेच मान्य करतील. म्हणूनच ते कर्तब दाखवणाऱ्या रॉयल एन्फिल्ड च हि कौतुक तितकच महत्वाच आहे.
१९५५ साली पोलीस आणि लष्करी अधिकार्यांसाठी भारत सरकार एक चांगली बाईक शोधात होती जी भारताच्या सीमेवर अगदी सियाचेन पासून कच्छ च्या रणा पर्यंत उपयोगी असू शकेल. रॉयल एन्फिल्ड जी पायामुळ त्या वेळी रोवली ती आजतागायत. १९७१ साली ब्रिटीशांनी बंद केल्यावर रॉयल एन्फिल्ड च अस्तित्व भारतात उरल. १९९४ साली आयशर कंपनीने ह्यावर ताबा मिळवला आणि खर्या अर्थाने एका नवीन वळणावर बुलेट ने प्रवास सुरु केला. पुन्हा एकदा भारतीयांच्या आणि आता जगाच्या मानावार अधिराज्य गाजवायला सुरवात केली आहे.
हर्ले डेविडसन ची भारतातील कमीत कमी किंमत २ लाख रुपये आहे. तर रॉयल एन्फिल्ड ची सगळ्यात जास्त किंमत २ लाख रुपये आहे. किमतीतला हाच फरक रॉयल एन्फिल्ड ला प्रचंड वेगाने वर घेऊन जातो आहे. भारतीय नेहमीच जुगाड किंवा फ्रुगल इंजिनियरिंग साठी प्रसिद्ध राहिले आहेत मार्स मिशन तर त्याच एक अप्रतिम उदाहरण आहे. रॉयल एन्फिल्ड येत्या काही काळात अमेरिका , युरोप मद्धे आपली पायामुळ रोवत आहे. येत्या काही काळात तोच दमदार धक धक चा आवाज अमेरिकन रस्त्यावर आला तर भारतीयांच्या अटकेपार झेंड्याचे अजून एक उदाहरण इतिहासात लिहिले जाईल.
No comments:
Post a Comment