Sunday, 8 March 2015

चाय पे चर्चा ...

चाय पे चर्चा .... विनीत वर्तक
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोन्ग्रेस चे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर ह्यांनी एक विधान केले होते, कि आम्ही चहावाल्याला लोकसभेत येऊन देणार नाही. हवी तर लोकसभेच्या बाहेर चहासाठी एक जागा देऊ. आज त्याच चहाला, त्याच चहावाल्याने जगाच्या नकाशावर इतक्या उंचीवर नेऊन ठेवल कि अमेरिकेच्या राष्ट्राधाक्ष्याना चाय पे चर्चा हे बोलण्याचा मोह टाळता आला नाही.
व्हाईट हाउस मध्ये अश्या चाय पे चर्चा व्हाव्यात इथवर हि बराक ओबामा बोलून मोकळे झाले. एकूणच काय आपलेच दात आपल्याच घशात ह्याच ह्याहून दुसर प्रातिनिधिक उदाहरण नसेल. बराक ओंबामा ना बोलवण्यापासून ते भारत- अमेरिका संयुक्त निवेदनात सगळ्या जगाच्या पत्रकार, मिडिया समोर त्यांना बराक म्हणे पर्यंत नरेंद्र मोदि नि जे टायमिंग साधल त्याला तोड नाही. सध्या आंतरराष्ट्रीय मिडिया मद्धे "मोदी-ओबामा ब्रोमांस" ह्या नावाने रकाने च्या रकाने भरून लेख लिहिले जात आहेत. कोणती गोष्ट कुठे , कधी, कोणासमोर केली कि जास्तीत जास्त त्याचा ठसा उमटेल ह्या राजकारणातील मोदी च्या चातुर्याला तोड नाही.
विमानतळावर प्रोटोकोल तोडून स्वतः भेटण्यापासून ते अगदी कालच्या बिझनेस मिटिंग पर्यंत बराक ओबामाच्या मनाचा ठाव घेण्यात मोदि ११०% यशस्वी झाले ह्यात शंका नाही. आपल वलय अस निर्माण करून त्यात ओबामा न गुंतवून ठेवण्याची चाणक्य नीती राबवण्यात मोदि नि हात आखडता घेतला नाही. ह्याचे फार दूरगामी परिणाम जगाच्या एकूणच परिस्थितीवर होणार आहेत. लोक लगेच विचारतील आपल्याला काय मिळाल? अमेरिका आपलाच फायदा बघते? ते फक्त विकण्यासाठी इकडे आले आहेत? आणि अजून बरच काही. मला सर्वाना दोन प्रश्न विचारायचे आहेत एक म्हणजे काल नवाज शरीफानी घाईघाईने संध्याकाळी भारताला दिलेल्या शुभेच्या हे कश्याच द्योतक आहेत?? दुसरा पाकिस्तान च्या आर्मी चीफ ने घाईघाईने चीन ची घेतलेली भेट आणि चीन ने पाकिस्तान ला दिलेल जुन्या मैत्रीच आश्वासन हे काय सांगते?
ह्या सगळ्या घटना योगायोग नाही आहेत. चीन भारताचा कधीच मित्र नव्हता न कधी होऊ शकेल. साऊथ चायना सी अस म्हणत अगदी हिंदी महासागरावर सुद्धा चीन आपला हक्क आहे अस सांगत सुटला आहे. चीनच्या आरमारी, सैन्य, राजकीय , आर्थिक सामर्थ्याला टक्कर देऊ शकेल असा एकच देश आशिया खंडात आहे आणि तो म्हणजे भारत. व्हियेतनाम, फिलिपिन्स, म्यानमार सारखे अनेक देश चीन च्या विरोधात भारताकडे बघत आहेत आणि अश्या वेळेस भारताला आपल स्थान मजबूत तसेच आपल्या सीमांच रक्षण करण्यासाठी , आधुनिक होण्यासाठी, सगळ्याच पातळ्यांवर अमेरिकेची किंवा रशियाची गरज आहे. नेमका हाच मुद्दा अमेरिका आणि भारत ह्या दोघांसाठी गरजेचा आणि महत्वाचा आहे.
अमेरिकेचा ह्यात फायदा असला तरी १२,००० कि मी वर मिळणाऱ्या फायद्या पेक्षा ज्या ठिकाणी अमेरिका मदत करते आहे करणार आहे तिकडे सगळ्यात जास्ती फायदा होणार हे निश्चित आहे. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता हे मोदी च्या पुढच्या डिप्लोमसी च पाउल आहे आणि काल घडलेल्या ह्या दोन घटना नक्कीच कुठेतरी चायना आणि पाकिस्तान चे पहिले प्रतिसाद आहेत.
मोदी सगळ्यात बेस्ट राजकारणी वगरे अस म्हणत नाही, आणि त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीनच समर्थन हि करत नाही. पण डिप्लोमसी मग अगदी ती ट्विटर वरून ओबामा यांना बोलावण्याची असो, गळाभेट करण्याची असो, आपल्यावर झालेल्या टीकेला शस्त्र बनवून जगात त्याचच ब्रान्डींग करणे असो कोन्ग्रेस काय भाजपा तील एकही नेता त्यांच्या आसपास नाही हे आपल्याला मान्य करावच लागेल.
तुमच्यात आणि बराक ओबामाच्या मद्धे काय केमिस्ट्री आहे हा प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या राष्ट्राध्क्ष्याना एकेरी बराक असा उल्लेख करून पुढच्या सगळ्या गोष्टी पडद्यामागे राहून दे अस सांगत जो काही मास्टर स्ट्रोक खेळला आहे. त्याला तोड नाही. २ दिवस होऊन सुद्धा लोक , मिडिया , सोशल मिडिया ह्यांच्या बरोबर पाकिस्तान, चायना ह्या सारखे देश सुद्धा बुचकळ्यात पडली आहेत, कि नक्की भारत आणि अमेरिका ह्या मद्धे पुढील संबंध कसे असतील आणि त्याची व्याप्ती काय असू शकेल. ह्याच उत्तर आज तरी कोणाकडेच नाही.
एकूणच काय चाय पे चर्चा ने मणिशंकर तर आडवे पडले पण ज्या चहा ला आणि चहावाल्याला खिजवलं होत तो आज त्याच चहा ला अवघ्या ६ महिन्यात जगातील सगळ्यात ताकदवान देशाच्या सगळ्यात ताकदवान माणसाच्या घरात विराजमान करण्यात यशस्वी झाला हे यश निसंकोचपणे आपल्याला मान्य कराव लागेल.

No comments:

Post a Comment