Thursday 11 June 2015

    ब्रेकिंग न्यूज...... विनीत वर्तक
    काल लागला बुवा एकदाचा निकाल. सगळ्यांचे जीव नुसते कासावीस होत होते. मिडीयाने पण भारतात सध्या ह्या खटल्या च्या निकालाशिवाय काहीच घडत नाही आहे. अस चित्र निर्माण केल. त्यात वृत्तपत्रे हि काही मागे नव्हती. लहानपणी वाटायचे कि आपल नाव टी व्ही किंवा वृत्तपत्रात यायला काहीतरी चांगले करावे लागते. मोठे व्हावे लागते. पण आजकाल वाईट कामाची प्रसिद्धी पहिल्या पानावर आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये मिळते.
    त्यात पण शिक्षेचा निकाल ऐकून कस डोळ्यात पाणी आल. आणि त्याने... कपडे काय घातले. त्याच्या आईच सांत्वन कोणी कोणी केल. ह्यावर आपल्या मीडियाची मदार. ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला. केस इथवर यायला किती तरी जणांची आयुष्य बरबाद झाली. त्याच्या डोळ्यातील अश्रून पर्यंत आपला मिडिया, आपली पत्रकारिता कधी पोहचू शकली नाही. कारण तिकडे गेले तरी ती ब्रेकिंग न्यूज होत नाही. ती फक्त एक बातमी असते.
    मला काल गम्मत वाटत होती कि काय लोक त्याच्या पुढे मागे धावतात. त्याने काय केल आहे तुमच्या आमच्या साठी?? एकवेळ अण्णा हजारे किंवा अजून कोणतेही सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या हाकेला असे लोक धावले असते. तर खरच खूप छान वाटल असत. पण तो दिवस कधी येणार नाही. कारण तिकडे सेलिब्रेटी नाही, पैसा नाही , मेन म्हणजे बाईट नाही. कोण आधी बातमी पोहचवते ह्यात सुद्धा स्पर्धा. शेवटी काय हजेरी लावून गोष्टी आहेत तश्याच.
    गिरे तो भी टांग उपर ह्या युक्ती प्रमाणे गोंजार्ण्यासाठी बरेच लोक लाईन लावून उभे होते. मग झोपलेले लोक कुत्रे काय ते रेल्वेचे मोटरमन इथपर्यंत सगळ्यांनीच आपले तारे तोडले. काय आहे वाहत्या प्रसिद्धीच्या गंगेत हात धुवायला फुकट मिळाले तर कोणाला नको आहे. पण शेवट काय आपण तरीही पिक्चर बघणार , शिट्या मारणार , ते दिसले कि सही घ्यायला मागे पुढे करणार. आता तर काय सेल्फी घेऊन कधी एकदा फेसबुक आणि व्हात्स अप वर टाकणार आणि एवरेस्ट सर केल्याच्या जल्लोषात सहभागी होणार.
    कायदा आपल्याला कधी समजलाच नाही. असला कायदा समजून घेण्याची माझी तरी मानसिक किंवा बौद्धिक पातळी नाही. जिकडे न्याय कोण कोणाला देत हे न्याय देवतेलाच ठाऊक. असो आता हे सगळ बिगुल संपून पुन्हा मिडिया आणि वुत्तपत्रे ब्रेकिंग न्यूज कडून बातम्यांकडे वळतील अशी भाबडी आशा बाळगूया.

No comments:

Post a Comment