Thursday 11 June 2015

    वेळेच महत्व....... विनीत वर्तक
    वेळेच महत्व सांगणारी एक गोष्ट लहान असताना वाचली होती. अगदी एका तपापासून ते एका शतांश सेकंदा पर्यंत. काल त्याच महत्व अजून अधोरेखित झाल. जेव्हा सगळे देश नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेत नेपाळ ला सहानभूती देत होते तेव्हा भारतीय वायुसेनेच विमान काठमांडू मद्धे मदत घेऊन उतरल सुद्धा होत.
    माझ्या दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे दृष्टिकोनाचा. सी-१७ ग्लोब्मास्तर जगातील एक अत्याधुनिक विमान जे अगदी मोजक्या जागेत अगदी कठीण परिस्तिथीत कुठेही उतरू शकते. प्...रचंड महाग असलेल हे अत्याधुनिक विमान युद्धासाठी वापरले जाते अश्या अत्यधुनिक विमानातून एन. डी. आर. एफ जे जवान ,सामुग्री , डॉक्टर, बाकी मदत जसे पाणी, फ्युल , ब्लान्केत , टेंट इत्यादी सामान काठमांडू मध्ये भारताने पाठवून पण दिल.
    भारतीय सेना , वायुसेना , नौसेना जगात अद्वितीय आहेतच त्यांच्या शौर्याला , देशाविषयीच्या निष्ठेबद्दल प्रचंड आणि खरच खूप प्रचंड आदर जनमानसात आहे. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला सलाम आणि अगदी कुर्निसात आहेच. पण ह्या वेळेस कुठे तरी तो आदर राजकारण्यांविषयी वाटू लागला आहे.
    एखादी सेना कितीही चांगली असली तरी त्याला एक लीडर लागतो. तेव्हाच त्या सेनेच कर्तुत्व उजळून निघते. मोदींच्या रूपाने एक कणखर लीडर भारतीय सेनेला मिळाला आहे ह्यात कोणाच दुमत नसेल. येमेन मधील भारतीयांना परत आणण्याची कामगिरी असो वा आता नेपाळ मद्धे दिली जाणारी मदत ह्या मद्धे खास मोदि टच आहे हे आपण मान्य करायला हव.
    येमेन मधून भारतीयांना परत आणताना २ तासासाठी बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारी बंद करावी ज्या योगे भारतीय विमानांना उडता येईल अशी रिक्वेस्ट मोदी नि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला केली होती. भारताच्या ह्या स्पेशल रिक्वेस्ट चा मान ठेवून सौदी अरेबियाने दोन तासांची मुभा दिली होती. त्या वेळेतच आपण भारतीय नागरिक तसेच ४१ देशांच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवू शकलो. ह्यात भारतीय सेनेच, जनरल व्ही. के . सिंग ह्याच कर्तुत्व आहेच पण सगळ्यात पुढे राहून लीडर प्रमाणे राजकारणातून मार्ग काढणाऱ्या मोदींच हि आहे.
    आज पर्यंत मला नाही आठवत कि भारताने कधी इतक्या प्रचंड वेगाने सूत्र हलवली आहेत. वर बघता ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज वाटत असल्या तरी अश्या गोष्टींसाठी प्रचंड प्लानिंग, अनेक संस्थांचा ताळमेळ तसेच राजकीय मनोबल लागते. सगळ्याच आघाड्यांवर मोदि आणि त्यांचे सहकारी प्रशंसेस पात्र आहेत. मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, एस जयशंकर,राजनाथ सिंग तसेच अगदी सुरेश प्रभून पर्यंत सगळ्यांनीच आपला वाटा उचलेला आहे.
    भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेना ह्याचं कार्य जितक उच्च कोटीच आहे त्याच लेवल पर्यंत राजकारण जाताना बघण हा ह्या दुखांच्या क्षणात एक सुखद अनुभव आहे. त्या लोकांवर जे दुख आल त्याची तुलना आपण करू शकत नाही किंवा सांत्वन सुद्धा पण ह्या दुःखाच्या आणि प्रचंड अडचणीच्या वेळेस भारताने , भारतीय सेनेने, भारतीय राजकारण्यांनी , भारताच्या लोकांनी जी तत्परता दाखवली आहे त्याला नेपाळ च नाही तर सगळ जग सलाम करते आहे.


No comments:

Post a Comment