Wednesday, 30 March 2016

व पु आणि मी... विनीत वर्तक
पुस्तक वाचण्याची गोडी असली तरी नेमक काय वाचल कि आनंद मिळतो हे लक्षात येत नव्हत. म्हणजे वाचल कि आवडल पण अधाशासारख वाचून संपवावं अशी एखादी कलाकृती किंवा लेखक- लेखिका भिडत नव्हती. त्याच वेळी वपुर्झा हाती आल. सगळच कुठेतरी बदलून गेल. मग पार्टनर, आपण सारे अर्जुन ते तप्तपदी असा सगळाच प्रवास झाला. व पु न कडून ओशोची ओळख झाली. सगळ्याच गोष्टी कडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची इच्छा झाली.
विचारांचा हा प्रवास फेसबुक आणि माझ्या जॉब मुळे कि प्याड वर कधी उमटला कळलाचनाही. पोस्ट पासून लिहित ब्लॉग पर्यंत जाऊन सुद्धा लेखक वगरे अशी बिरुदावली कधीच चिकटू न देता मनात आलेल फक्त व्यक्त करून द्यायची प्रेरणा मात्र व पु नि दिली.
कथा, कादंबरी, आत्मचरित्र ह्या आणि अश्या सारख्या पुस्तकानपेक्षा वर्तमान दाखवणाऱ्या आणि विचारांचं भविष्य घडवणारी पुस्तक मराठीत व पु काळे नि लिहिली. आजही फेसबुक वर सगळ्यात जास्त वाक्य व पू च्या लेखणीतून उतरलेली कित्येक जणांना वेगळ्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा देत राहतात.
जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या कित्येक घटना आपल्याच मनावर किती खोलवर परिणाम करतात. आपल्या नकळत सुद्धा आपल्या अनेक गोष्टींवर, विचारांवर, कृतीवर त्याचा एक रिमोट कंट्रोल असतो. तेच जर आपण समजू शकलो तर आपण स्वताला एका वेगळ्या पातळीवर, एका वेगळ्या दृष्टीने समजून घेऊ शकू. तेच जे समजलेल आणि उमजलेल मांडायची ताकद व पु च्या लिखाणातून मिळाली हे मला प्रांजळपणे मान्य करावेच लागेल.
एकच खंत मनात राहिली कि त्यांना भेटता आल नाही. माझ्या लिखाणावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याऱ्या व पु ना इतक जवळ असून सुद्धा भेटता आल नाही हे नेहमीच टोचत राहील. परवा त्यांचा ८४ वाढदिवस झाला. त्यामुळे त्यांची आठवण आली. त्यांच्यासाठी त्यांच्याच एका वाचकाने लिहिलेले हे शब्द.
"जगणं ही सुद्धा एक कला आहे हे उमगून जगणारा आणि सभोवताली माणूस म्‍हणून वावरणा-या सजीव वस्‍तूना जगण्‍याचा अर्थ समजावून जगण्‍यावर प्रेम करायला प्रवृत्‍त करणा-या माणसाच्‍या हातून लिहील गेलेली आयुष्यिका म्‍हणजे.......... वपूर्झा"

No comments:

Post a Comment