Wednesday 30 March 2016

न कळलेला भारतीय .... विनीत वर्तक
सहानभूती ची लाट आली आहे. अचानक सर्वाना विद्यार्थांच्या भविष्याची त्यांच्या स्वातंत्र्याची काळजी वाटायला लागली आहे. एका विद्यार्थाला अटक केल्यावर लगेच भेट देऊन जाहीर पाठींबा देणारे हुजरे नेते बघितले कि खरोखर तळपायाची आग मस्तकात जाते. भारताविषयी आपण बोलणारे कोण खरे तर?
काय केल आहे आपण भारतासाठी. पैसे कमावून ट्याक्स भरतो इतकच न?? तो हि आपल्याच सोयीसाठी. आंदोलन करून जे हव ते पदरात पडून घेतो ते आपल्याचसाठी न? आरक्षणाच्या कुबड्याना सोन्याचा मुलामा दिला आपणच न? पण आम्ही भारतीय का तर आमचा जन्म इकडे झाला म्हणून कि आम्ही इकडे राहतो म्हणून
ज्या संविधानाने स्वातंत्र्य दिल त्यासाठी आपण काय दिल फक्त आपले हक्क मागून घेतले. हुजरे राजकारणी असल्या संविधान आणि भारतासाठी सहिष्णू म्हणून ज्या लोकांनी प्राणांची पर्वा केली नाही त्यांची लक्तरे वेशीवर टांगताना आपण फक्त बघत आहोत तमाशा. लहानपणी जत्रेत बघायला मिळायचा आज काल मिडीयावर अश्या जत्रा रोजच भरताना बघतो.
" ए मेरे वतन के लोगो" ऐकल तरी शहारा येणारा भारतीय कुठे गेला? स्वातंत्र्या साठी पेटून उठणारा भारतीय कुठे गेला? लांब कशाला वयाच्या विशी मद्धे आपल्या पत्रात ""Either I will come back after hoisting the Tricolour (Indian flag), or I will come back wrapped in it, but I will be back for sure." " लिहिणारा विक्रम बात्रा कुठे गेला ?? सगळयांना आपण विसरलो का? आपले आदर्श भारताचे तुकडे होऊ दे म्हणणारे विद्यार्थी बनले आहेत का? त्याचं स्थान आणि त्यांना काय वाटते हे आजच्या सरकारच्या पुढील महत्वाचे प्रश्न आहेत का?
कोण बरोबर आणि कोण चुकीच ह्या पेक्षा आपण कोणाला किती महत्व द्यायचं ह्याच भान राजकारण्याना , मिडीया आणि सो कोल्ड भारतीय म्हणून घेणाऱ्या आपल्यासारख्यांना नको का? आपण हि धावत सुटायचं. वीरश्री प्राप्त झालेल्या त्या सैनिकांची नावे कोणालाच माहित नसतील पण जे एन यु मधील त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे सर्व राजकारणी आणि भारतीय लोकांना पाठ असतील.
खूप खूप त्रास होतो. गेल्याच वर्षी कारगिल च्या त्या टोकावर तिरंगा फडकताना पाहून डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. ज्या अधिकारांच्या कमांड खाली विक्रम बात्रा सारखे ऑफिसर घडले त्या ब्रिगेडियर वाय के जोशी सरांना भेटून खूप काही मिळवले असे वाटले होते. भारतीय म्हणजे काय?, देशभक्ती काय असते ते तेव्हा जाणवले होते... आज सगळा बाजार बघून खूप लाज वाटते स्वताची आणि भारतीय म्हणवून घेत सगळ्याची मूक पणे दखल घेण्याची. भारतीय म्हणजे काय आपल्याला कळलेले नाही म्हणून तर असल्या लोकांचे चोचले पुरवण्यासाठी मीडियापासून अख्खा देश पण अनाहूतपणे राबत आहे.

No comments:

Post a Comment