अव्यक्त प्रेम ... विनीत वर्तक
14 फेब्रुवारी आला जवळ कि प्रेम दिवसाचे मेसेज चालू होतात. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस पण खरेच नेहमी प्रेम व्यक्त केलेच पाहिजे का? मनातील भावना नक्कीच ज्याच्या बद्दल वाटतात त्याला सांगायला हव्याच पण सगळ्यावेळी हे शक्य होईलच असे नाही ना. कधी परिस्तिथी, कधी वेळ. तर कधी ती व्यक्ती मुळे आपल्याला गप्प राहणे शहाणपणाचे असते नाही का? माझ तुझ्यावर प्रेम आहे अस सांगून ती व्यक्तीच जर दूर जाणार असेल तर न सांगता तिला सोबत केलेली काय वाईट.
प्रेम म्हणजे काही मिळवण नव्हे न मग जी गोष्ट मिळणार नसेल तर तिला सांगाच कशाला? नक्कीच कधी कधी गोष्टी बदलतात हि पण हि शक्यता धूसर असते. स्पेशली जेव्हा फिलिंग या एकतर्फी असतात. १४ फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण डेरिंग करतो पण खरच तिथवर जातो का? आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी सांगायला एकच दिवस पुरेसा असतो का? प्रेमाची भरती त्याच दिवशी येते का तर तसे हि नाही. मग नक्की काय आणि कोणासाठी कशासाठी वहात जातो आपण.
कधी कधी उंच हवेत विहारणाऱ्या पतंगाला तसच सोडून देण्यात पण खूप मज्जा असते न तो हि आनंद काही वेगळाच. आपल्याला काय हव पतंग कि त्याची उंच आकाशात घेतलेली भरारी आणि त्याला जोडणारी दोरी. दोरीने बांधल कि तो हवा तसा वळवता येतो पण वाऱ्यावर वहात नाही. तो आनंद तेव्हाच जेव्हा दोरी आपण सोडून देतो अलगद आणि एका क्षणाचे साक्षीदार होतो त्याला त्या वाऱ्यावर झोके घेताना. प्रेमाच हि असच असते नाही का? कधीतरी सोडून द्यावं. कधी शांत बसून बघावं तर कधी त्या भावना आपल्यात मिटून त्या वाऱ्यावर वाहणाऱ्या पतंगासारख जाऊ द्यावं आपल्याच प्रेमाला.
लपून ठेवण्यात पण एक मज्जा असते. न दाखवण्यात पण खूप कौशल्य लागते कारण प्रेम जर तितकच निर्व्याज, स्वच्छ असेल तर मिलनाची मज्जा न मिळता सुद्धा येते. आयुष्यभर लपवून ठेवलेल्या प्रेमाची मज्जा काही औरच. जस व्यक्त केल्याच समाधान असते न तस अव्यक्त राहून खूप काही मिळवल्याच सुद्धा. १४ फेब्रुवारी असेल कि प्रेम दिवस पण ह्या दिवशी सुद्धा ह्या अव्यक्त प्रेमाची मज्जा घ्यायला काय हरकत आहे. नाही का?
No comments:
Post a Comment