स्वातंत्र्या चे शनी मंदिर ... विनीत वर्तक
तीन , चार दिवस नुसत त्या शनी मंदिरावरून गदारोळ सुरु आहे. मानवी हक्क, न्याय, समानता ह्याची पायमल्ली होते आहे असा एक सूर तर दुसरीकडे परंपरा, रूढी आणि देव असा एक सूर. पण ह्या गोंधळात हाती काय लागणार आहे का ?
म्हणजे समजून चालू कि स्त्रियांना प्रवेश मिळाला, पूजा घालयला मिळाली तर स्त्रियांना न्याय मिळाला का? मानवी हक्का चा विजय झाला का ? समानतेचा अंकुर फुटला अस काही होणार आहे का? जिकडे अजून ३३% साठी अजून मारामारी करावी लागते तिकडे एका देवळात दर्शनाची , पुजेची परवानगी मिळाली तर हे सर्व प्रश्न सुटतील अस नक्कीच नाही. जिकडे स्त्री कडे संभोगाच साधन म्हणून बघितल जात. जिकडे अनेक क्षेत्रात स्त्री चा प्रवेश वर्ज्य आहे. तिकडे कोणत्या विजयाची पताका आपण मिरवणार आहोत.
समजा नाही दिला प्रवेश तर स्त्री च्या सगळ्या अधिकाराची पायमल्ली होणार आहे का? एक शनी देव निदान भारतातील सगळ्या स्त्रियांचं स्वातंत्र ठरवतो आहे का? स्वातंत्र्याची वाख्या जर देऊळ प्रवेशातून जात असेल तर नक्कीच आपल्याला विचार करायची गरज आहे. देवाला हात लावल्याने किंवा पूजा करायला मिळाल्याने जर देव प्रसन्न होऊन सगळ्या स्त्रियांना बंधमुक्त करणार आहे अस काही घडणार असेल तर नक्कीच तो प्रवेश हवा.
सगळे धावले कि आपण हि धावायचं कशाच्या पाठी आणि कशाला ह्याच काही सोयर सुतक नाही. आपल्याला काय मिळणार ह्याचा काही अंदाज नाही. तो म्हणतो न मग बरोबर. राजकारण आणि भावना ह्याना हात घातला कि विषयाला पुढे जायला वेळ लागत नाही. हे ज्यांना समजते तेच आज गादी चालवत आहेत. आपण किंवा आपल्यासारखे नुसतेच तोंडाच्या हवा आणि रक्त आटवतो आहोत.
खरच जर इच्छा आणि काही करायची तळमळ आहे तर असे कितीतरी अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या परीने करू शकतो. स्त्री ला सशक्त करण्यासाठी. ह्यात मी सुद्धा आहे. कारण मी काही कोणी मोठा नाही पण प्रश्न आहे कि आपण कोणत्या मुद्यांना किती महत्व द्यायचं. जर आपण काय विचार करायचा हे लोक ठरवणार असतील तर अशी अनेक शनीची देवळ आणि स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी आपली वाट बघत आहेत.
No comments:
Post a Comment