२०१५ .... विनीत वर्तक
प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्या वर्षात आपण काय मिळवले ह्याचा लेखा जोखा घ्यायचा असतो. खूप काही गोष्टी हाताशी लागल्या. खूप चांगली माणस भेटली, जोडली गेली. काही दूर हि झाली. पण सगळ्याच गोष्टी अनुभव देऊन गेल्या हे मात्र खर.
लेह-लडाख ची ट्रीप ती पण अनु मावशी (अनुराधा प्रभुदेसाई) सोबत हा ह्या वर्षातला सगळ्यात जास्ती आनंद देणारा अनुभव होता. ठिकाण बघण्यापेक्षा भूस्तललाने रस्त्यावर काढलेले ते ३ दिवस कधीच विसरू शकत नाही. त्याच वेळी भारतीय जवानांनी केलेली मदत आणि त्यांच्या सोबत आलेले अनुभव खूप काही शिकवून, दाखवून गेले. भारतीय सेनेच कार्य बघितलं कि आपण किती सुष्म आहोत आणि किती फालतू गोष्टींचा अभिमान बाळगत असतो ह्याची जाणीव होते. माझी पोझिशन, स्टेटस, गाडी, बंगला, पैसा, डिग्री सगळ्या गोष्टी पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. निसर्गाच्या त्या रूपापुढे हतबल होताना कोणी आपल्या सोबत असते तर भारतीय आर्मी. त्यांच्या कर्तुत्वाला दंडवत.
२५ जुलै ला भर पावसात कारगिल - द्रास सेक्टर मध्ये तिरंगा डौलाने फडकत असतानाचा तो क्षण २०१५ सालातला सगळ्यात परिपूर्ण क्षण होता. आम्ही युद्धभूमी वर उभ होतो. समोर टायगर हिल, कारगिल- द्रास क्षेत्रातील पर्वत राजी आणि त्या सगळ्यांच्या पुढे डौलाने फडकत असणारा तिरंगा. एका बाजूला भारतीय सैन्यांच्या कामगिरीने ५६ इंच फुललेली छाती तर दुसर्या बाजूला ज्यांनी आपले प्राण गमावले असे असंख्य सैनिक. ""Ya toh Tiranga lehrake awunga, ya fir Tirange mein lipta huwa awunga, lekin awunga jaroor" हे क्यापटन विक्रम बात्रा चे शब्द मनात रुंजी घालत असताना समोर दिसत असलेले युद्ध मेमोरियल लिहिलेले शब्द " शहीदो कि चिताओ पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का यहि बाकी निशा होगा" डोळांच्या कडा ओल्या करून त्यातून अश्रू भावनांना मोकळी वाट करून देत होते.
लेह-लडाख नंतर सगळ्यात जास्ती उत्सुकता होती ती २४ डिसेंबर ची मेमरीस्ट्रा पुस्तकाच प्रकाशन आणि स्टार ऑफ गोखले सोबत सर्व गुरुजनाची भेट. तब्बल २० वर्षाच्या काळानंतर पुन्हा सोनेरी दिवसात जाताना खूप काही आठवलं. पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांचे स्वभाव भूषण भन्साळी च्या लेखणीतून अनुभवताना पुन्हा ते दिवस जगलो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असले तरी ते सगळेच आपल्याला खूप आनंद देतात. तीळ- गुळ समारंभ ते शाळेच ग्यादरिंग सगळच कस शब्दांच्या पलीकडल. फक्त अनुभवायचं आठवणीत.
२०१५ चे हे दोन अनुभव मात्र पूर्ण आयुष्यभर सोबत राहतील ह्यात शंका नाही.
No comments:
Post a Comment