Wednesday, 30 March 2016

मेमरीस्ट्रा आठवणींचा एक खजिना.... विनीत वर्तक
२४ डिसेंबर २०१५ ला मेमरीस्ट्रा च्या रूपाने एक अलिबाबा चा खजिनाच गवसला. निमित होते भूषण भन्साळी ह्यांनी लिहलेले मेमरीस्ट्रा ह्या पुस्तकाच प्रकाशन आणि शाळेतल्या गुरुजनांशी झालेल्या गाठीभेठी. शाळा हे दोन शब्द म्हंटले कि सगळ्यांच्या मनाचा एक कोपरा लगेच उघडून समोर येतो. रम्य ते बालपण अस म्हणत सुरु झालेला प्रवास पहिल्या प्रेमा पर्यंत कधी येऊन थांबतो कळतच नाही. म्हणून ह्या कार्यक्रमा बद्दल खूपच उत्सुकताहोती. कार्यक्रम संपल्यावर कधी एकदा ह्या खजिन्यात रमतो अस मला झाल होत. सर्व गुरुजन ,मित्र ,मैत्रिणी खूप सारे सिनियर मित्र,मैत्रिणी ह्यांना भेटल्याचा आनंद संपत नाही तोवर मेमरीस्ट्रा च्या रूपाने आठवणींचा एक खजिना समोर आला.
पुस्तकाबद्दल लिहिण्या इतपत मी मोठा नाही. कारण माझ्या दृष्टीने ते पुस्तक नाही तर आपल्यापेकी प्रत्येकाने अनुभवलेल्या, जगलेल्या आणि मनाच्या कोपर्यात बंदिस्त केलेल्या आपल्या शाळेच्या आणि गुरुजनाच्या आठवणीआहेत. भूषण च्या शब्दावर असलेल्या जादू ने त्याला फक्त जाग केल. मला वाटते प्रत्येक लेखकासाठी ह्याहून दुसरी मोठी पावती नसेल कि त्याच्या शब्दांनी वाचकाला पुन्हा एकदा हसवल , रडवल, डोळांच्या कडा ओल्या केला व मनातल्या मनात सगळ अनुभवल. मेमरीस्ट्रा माझ्या दृष्टीने अलिबाबाचा खजिना आहे. जो कधी न संपणारा आहे. फक्त आपल्याला त्यात डुंबता यायला हव. भूषण थान्क्स म्हणत नाही कारण आपल्या माणसांचे आपण आभार नाही मानत. फक्त ह्या मेमरीस्ट्रा साठी मनात आलेल्या भावना म्हणजे तुझ्या पुस्तकाला दिलेली पावती आहे.
अलीबाबाच्या गुहेत शिरायला सुद्धा पासवर्ड लागतोच. माझा पासवर्ड होता वृंदा देसाई. माझी आणि तिची ओळख फेसबुक वरची. विर्चुअल जगात फिरताना अश्याच एका टोकावर झालेली भेट. भेटीच रुपांतर एका छान मैत्रीत कधी झाल ते कळलच नाही. माउली ते राजकारण अश्या टोकांच्या गप्पा होताना आपण एकाच शाळेत होतो हे कळायला अनेक दिवस जावे लागले. मग तिकडून सुरु झालेला प्रवास इथवर येऊन पोचला. वृंदा नसती तर ह्या गोखले च्या सर्व स्टार्स न भेटताच आल नसत. सगळ्या गुरुजनाची भेट तर शक्यच नव्हती. वयाच , ब्याच अंतर आम्ही बोलताना कधीच जाणवलं नाही. वृंदा तुझेही आभार नाही मानत कारण तू नेहमीच एक मैत्रीण, गाईड आणि सखी म्हणून बरोबर आहेस ह्याची खात्री आहे.
जे तुम्हा लोकांना जमल तिथवर आम्ही, आमची ब्याच कधी पोहचू अस वाटत नाही. आमचा काळ हा परिवर्तनाचा होता. माणस आपुलकीतून , आपलेपणाच्या भावनेपेक्षा आकड्यांना, सर्टिफिकेट ला जास्ती महत्व द्यायला लागली होती. मला वाटते तुम्ही जो काळ अनुभवला तो सुवर्ण काळ होता. त्या नंतर लागलेली ओहोटी अजून थांबलेली नाही. गेले ते विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे गुरुजन. राहिले ते बेंच आणि फळे. संवेदनशीलता हरवत चाललेल्या आजच्या आभासी जगात मेमरीस्ट्रा च्या रूपाने खूप काही हाती लागल. स्टार ऑफ गोखले ग्रुप हेमंत घाडी आणि टीम मला त्या खजिन्यात डुंबायला दिलत ह्यासाठी खूप खूप धन्यवाद.

1 comment: