Wednesday 30 March 2016

देऊळाचे द्वारी.... विनीत वर्तक
देऊळाचे द्वारी असा कार्यक्रम आहे तू ये. असा आदेश वजा मेसेज माउलीन (वृंदा देसाई) कडून माझ्या मोबाईल स्क्रीन वर झळकल्यानंतर कार्यक्रम अतिशय सुंदर असेल ह्याची शाश्वती होतीच. इंडोलोजी असा विषय, श्री उदयन इंदुरकर हे सादरकर्ते आणि देऊळ हा तसा वाचलेला, अनुभवलेला विषय. पण अनेक प्रश्न डोक्यात नक्की स्वरूप काय? ३ तास काय देवळांच ऐकणार? पण माउलीने सांगितल म्हणजे काहीतरी वेगळ असणार हा विश्वास होताच.
३ मंतरलेले तास झाल्यावर अदभूत अनुभूतीचा भास, आपण आपल्या संस्कृतीला किती ओळखतो ह्याची झालेली चिरफाड म्हणजे शरमेने मान खाली जाईल इतकी. आपली संस्कृती, धर्म, देश, साहित्य, कला, विज्ञान ह्यांना समजून घेण्यात दाखलेला निष्काळजीपणा हे सगळ समोर आल. आपले पूर्वज किती समृद्ध होते सगळ्याच बाबतीत. आता आपण फक्त भिकारी उरलो आहोत असच वाटत होत. विज्ञानाने आपल्याला समृद्ध केल, मानवी जीवनाची उत्क्रांती विद्नाने झाली अस म्हणतात. २१ वे शतक विज्ञानाचे असेल पण भारतात १०-१२ व्या शतकात हुग्स बोसान (दैव कण) ह्या बद्दल माहित होत अस कळल तर आपण स्वताला भिकारी म्हणणार नाहीतर काय करणार. न्युक्लीयर फिशन, अणु- इलेक्ट्रोन ह्या संकल्पना ज्ञात होत्या. त्या पुढल्या पिढी पर्यंत पोचवाव्या म्हणून सौंदर्य, कला, विज्ञान आणि स्थापत्य शास्त्र ह्याचा अदभूत मेळ राखून अत्युच्य अश्या कलाकृती जन्माला घालणाऱ्या संस्कृती मधील फक्त खजुराहो सारख्या ठिकाणी फक्त सेक्स शिल्लक राहतो. तर हा मनाचा भिकारडे पणा आपलाच आहे.
ज्या दैव कणांचा शोध सर्न प्रयोगशाळेने लावला त्या प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारावर नृत्य करणाऱ्या शंकराची प्रतिमा का लावली गेली ह्याचा आपण विचार तरी कधी केला का? हुग्स बोसान म्हणजे काय? हे समजायचं असेल तर त्या नटराजाला तुम्ही समजून घ्यायचं हे कोण आपल्याला सांगते तर सर्न प्रयोगशाळा. आता ते सांगतात म्हणजे नक्की काहीतरी असेल ह्यावर आपला विश्वास. पण तब्बल १०-१२ व्या शतकापासून ह्या सर्वांचा खजिना आपल्याच आजूबाजूला विखुरलेला आहे तो बघण्याची दृष्टी मात्र आपण गमावून बसलो आहोत. खजुराहो, वेरूळ, रानी कि वाव, अशी भारतातील तर हिंदू संस्कृतीच्या गणितातील अत्युच्य अश्या ज्ञानाची पताका समुद्रापार पेटवत ठेवणारे अंगकोर वाट सारखे कंबोडिया मधील मंदिर म्हणजे सर्न सारख्या अत्युच्य अश्या प्रयोगशाळा, स्थापत्य शास्त्राची विद्यापीठ, कलेची- संस्कृतीची माहेरघर आहेत. ह्या सर्वाना एकत्र आणणारे आपले पूर्वज किती मोठा भाग आपल्यासाठी मागे ठेऊन गेले आहेत. आम्ही मात्र त्यावर नाव कोरण्यात आपला मोठेपणा मानतो.
कलेला, संस्कृतीला, स्थापत्य शास्त्राला, विज्ञानाला आणि अभियांत्रिकीला एकत्र करणे सोप्पे आहे का? आमच्याकडे साधी एक मेट्रो रेल्वे बांधायला १०-१५ वर्षाचा कालावधी गेला. तर ५-६ वेगवेगळ्या विषयांना कोणत्याही विषयाला झुकत माप न देता एकत्र आणून, सर्व क्षेत्रातील विद्वान आणि विद्वत्ता ह्याचा योग्य तो मान राखून समतोल साधत जवळपास १००० वर्षापेक्षा अधिक काळ तेच सौंदर्य जपणारी कलाकृती साधायची म्हणजे विचार करून चक्कर येते. अंगकोर वाट ची प्रतिभा बघा. हे मंदिर अवघ्या ३५ वर्षात उभ केल गेल.
( Angkor Wat (Khmer: អង្គរវត្ត or "Capital Temple") is a temple complex in Cambodia and the largest religious monument in the world, with site measuring 162.6 hectares (1,626,000 sq meters). The outer wall, 1,024 m (3,360 ft) by 802 m (2,631 ft) and 4.5 m (15 ft) high, is surrounded by a 30 m (98 ft) apron of open ground and a moat 190 m (620 ft) wide. The outer wall encloses a space of 820,000 square metres (203 acres)).
जगातील सगळ्यात मोठ धार्मिक स्थान आजच्या दिवशी सुद्धा हिंदू संस्कृतीने उभारलेल १००० वर्षाहून अधिक काळ. जगातील गणिती, शास्त्रज्ञ ना अजून हि न कळलेल गणित आणि विज्ञान शिकवत तितक्याच दिमाखाने तग धरून असणार हे मंदिर हिंदू आहे हे भारतीयांनाच माहित नाही. ह्याहून मोठा आपला करंटेपणा काय असेल?
भारत माता कि जय बोलायचं म्हणून बोलण्यापेक्षा ह्या संस्कृतीत जन्माला आलो ह्याचा अभिमान म्हणून बोलण्यासाठी आपल्याच संस्कृतीला समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकलो तरी ते हि नसे थोडके. वृंदा Vrinda Desai माउली धन्यवाद. एका उत्कृष्ठ कार्यक्रमाला अनुभवण्याची संधी दिलीस. श्री उदयन इंदुलकर ह्यांचा अभ्यास, शैली, तळमळ अत्युच्य होती. कंबोडिया ला त्यांच्या सोबत अभ्यास सहल करण्याची इच्छा घेऊनच बाहेर आलो ह्यातच कार्यक्रमांच सार आल. एकच खंत. देऊळ हि म्हातारपणात बघण्याची गोष्ट नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात ह्या गोष्टी समजून देणारे इंदुरकर सरांसारखे शिक्षक मात्र हवेत. तारुण्यात जर आपल्या संस्कृतीला समजून घेऊ शकलो तर ह्यावून वेगळ काय हव. मग तोंडातून आलेल भारत माता कि जय हे मनापासून आलेल असेल.

No comments:

Post a Comment