Change इज एवरीथिंग..... विनीत वर्तक
आयुष्यात काहीतरी नवीन करावे असे वाटणे स्वाभाविक आहे पण नवीन साठी आधी आपल्या बेसिक गोष्टींची तरी पूर्तता व्हायला हवी. आपल सर्व आयुष्य बेसिक गोष्टी मिळवण्यात आणि त्या मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यात जाते नाही का? कार लोन, होम लोन, आणि लिस्ट गो ऑन.
वयात येताना आई वडिलांची बेसिक शिक्षण देण्यासाठी चाललेली धावपळ ते अगदी नोकरीला लागून मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली धावपळ ह्यात ५० वर्षांचा कालावधी जातो पण आपण बेसिक गोष्टींमध्ये अडकून असे पडतो कि श्वास घ्यायला उसंत नसते. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसे जगावे ह्याचे वाचन करत आयुष्य आपल्या हातून कधी निसटून जाते कळत नाही. नक्की काय हवे आहे? काय करतो आहोत ? कुठे जाणार आहोत ? कुठे येऊन पोहचलो आहोत सगळ्याच गोष्टी सापेक्ष. त्याची नक्की उत्तर कधीच मिळत नाहीत आणि मिळाली तर ती स्वीकारून बदल करण्याची आपली क्रयशक्तीच संपलेली असते.
अमेरिकेत असताना आपल्या आणि त्यांच्या जगण्यातील मुलभूत फरक मला जाणवला तो हाच. बेसिक गोष्टींच्या पलीकडे हि आयुष्य आहे ते जगण्यासाठी आपले प्रयत्न हवेत. अस अजिबात नाही कि तिकडे सगळ आरामात मिळते पण मोठे होताना अस सांगितल जाते.
' Stop waiting for things to happen, Go out and make them happen'
आणि आपल्याकडे सांगितल जाते
' Wait for things to happen, let them happen then you Go'
ह्या दोन वाक्यानमधला फरक जितका प्रचंड आहे तितकाच मानसिकतेमधला फरक प्रचंड आहे. आपल्या आवडी निवडी काय हे कळेपर्यंत पुलाखालून इतक पाणी वाहून जाते कि आता जे आहे तेच छान आहे इथेच आपली मजल राहते. बर त्या वेळी इतक्या जबाबदार्या असतात कि परत सुरवात करणे सगळ्यांना जमतेच असे नाही. शिवाय योग्य वेळेची वाट बघण्याची सवय असतेच आपल्याला त्यामुळे ती कधी येतच नाही. चाकोरी बाहेर जाऊन काही करावे तर सगळे मुद्दे बेसिक गोष्टीन वर येऊन थांबतात आणि मग आपणच सांगत सुटतो आयुष्य गेल फक्त एक फ्ल्याट घेण्यात.
कुठेतरी सगळाच गोंधळ आहे. काही महिन्यांपूर्वी कोकणात गेलो होतो तिकडे एक जर्मन कपल सायकल घेऊन येत मुंबई -गोंवा व्हाया कोकण सायकल वरून फिरते का तर आयुष्य जगायची, बघायची एक वेगळी इच्छा. मनात विचार आला आपण कधी करू शकू का असे ? फिजिकल आणि मेंटल स्ट्रेन्थ भरपूर आहे पण गोष्टी बदलण्याची धमक माझ्यात आहे? ह्या प्रश्नाच उत्तर शोधतो आहे.
'If you spend too much time thinking about a thing, You will never get it done"
Bruce Lee
Bruce Lee
ब्रूस ली ने म्हंटल्याप्रमाणे होऊ नये इतकीच इच्छा.......
No comments:
Post a Comment