Thursday, 9 October 2014

यु एन मधील काल पंतप्रधानांच भाषण म्हणजे सर्वसमावेशक मुद्देसूद आणि एका बाणाने निदान १५ पक्षी मारावे तसे होते. कोणत्याही राजकीय नेत्याची ताकद हि जिभेवर असते. नुसत्या जिभेने आपण दृष्टीकोन बदलवू शकतो. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन तरी नक्कीच बदलतो आहे हे काल झालेल्या भाषणातून मोदींनी सांगितले. एकीकडे युनायटेड नेशन म्हणून आपण मिरवायचे आणि त्या खाली जी गट तयार करून एकमेकांची कोंडी करायची. पीस कीपिंग ऑपरेशन मद्धे मदत घ्यायची आशियायी देशांची मात्र काय आणि कसे , केव्हा कोठे हे ठरवायचा अधिकार मात्र आपली सेना न पाठवणार्या किंवा नावासाठी पाठवणार्या देशांनी घ्यायचा हि दरी त्यांनी अतिशय चपखल पणे अधोरेखित केली.
पाकिस्तान च्या पंतप्रधानांनी काश्मीर चा मुद्दा परत एकदा मांडल्याने त्याला सडेतोड उत्तर देणे भाग होतेच. मला वाटते उत्तर नाही कानाखाली आवाज काढला आणि विचारल कि लागला का? गुड टेररिझम आणि ब्याड टेररिझम असा भेदभाव करून जेहाद च्या नावा खाली आतंकवादाला पाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातले. नंतर आम्ही स्वताहून मदत दिली होती माणुसकीच्या दृष्टीकोनातून पण उगाच जमिनीच्या रेषेवरून भांडणार्या पाकिस्तानने ती अजून स्वीकारली नाही ह्यावरून पाकिस्तान चा दृष्टीकोन किती खालच्या पातळीवरचा आहे हे अधोरेखीत झाल.
मी मोदी चा कट्टर समर्थक नसलो तरी त्याचं भाषण ऐक्याण्यासाठी निर्माण झालेली उत्सुकता अतिशय समर्पक आहे. लोक म्हणतात त्यांनी खूप जाहिरात केली आणि करत आहेत कि किती लोक जमले जमतील वगरे पण मी म्हणतो आधीच्या पंतप्रधानांना कोणी अडवल होत का?? आणि नुसत्या जाहिरातीवर कोणी आपले काम धंदे सोडून १००० किमी लांब नाही जात का तर फक्त लांबून कुठेतरी दिसेल आणि ते हि नक्की नाही. निदान अमेरिकेत तरी नाही. मग ते अमेरिकन भारतीय का असोनात. त्याला करिष्मा असावा लागतो व्यक्ती ची उंची असावी लागते आणि त्याने ती टिकवावी लागते.
मोदी च्या करिष्म्याने भारतीय नाहीत तर इतर लोकही आकर्षिली जात आहेत. काल सेन्ट्रल पार्क वरील भाषण बघा. ६०००० तरुण अमेरिकन लोकां पुढे तितक्याच ताकदीने जेव्हा नेता संस्कृत चे श्लोक म्हणून दाखवतो तेव्हा ते म्हणण्यासाठी लोकांना किती आत्मसात कराव लागेल हा एखादा चांगलाच वक्ता जाणू शकतो.
सगळच कधी चांगले नसते काही वाईट गुण आणि चंद्रावर डाग असतात. मी डागांकडे नाही तर पांढर्या चंद्रांकडे बघतो. माझ्या आख्या आयुष्यात काम सोडून पंतप्रधानांच भाषण भाषण ऐकण्यासाठी टी व्ही समोर बसलो होतो आणि माझ्यासारखेच अनेक जण बसले होते. आनंद नक्कीच आहे कि मोदी नि नाराज नाही केल. एका भारतीय पंतप्रधानांना परदेशी भूमीवर युनायटेड नेशन मद्धे इतक्या कोन्फिदेन्तली बोलताना पहिल्याचा आनंद काही वेगळाच होता....

विनीत वर्तक..

No comments:

Post a Comment