टीवी आणि मी ....... विनीत वर्तक
आज काल क्रिकेट बघावासच वाटत नाही. साला काय काळ होता त्या वेळी. क्रिकेटच्या म्याच साठी लोक सुट्टी घ्यायचे. ट्रेन मध्ये , बस मध्ये त्याचीच चर्चा. विकेट गेली कि त्याने कस खेळायला हवे होते आणि काय करायला हवे होते ह्याच्या एक्स्पर्ट कमेंट.
मला अजून आठवते भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मधली म्याच म्हणजे रस्त्यावर शुकशुकाट. कामाच्या ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी आणि ती बघण्यासाठी दुकानांच्या समोर झालेली गर्दी.
आमची पिढी इतक्या वेगवेगळ्या बदलातून जात आहे कि आपण कुठ आलो ह्याचा मागोवा घेतला कि किती गोष्टी हाती लागतात.
एक वेळ होती कि रिमोट चा टीवी म्हणजे खूप मोठा माणूस. मित्राकडे पहिल्यांदा रिमोट चा सोनी चा टीवी आणला तेव्हा साला तो आम्हाला घराच्या बाहेर जाऊन च्यानेल बदलून दाखवायचा आणि आम्ही आपले मनात काय सही रे. आज माझीच ५ वर्षाची मुलगी रिमोट घेऊन टीवी चालू करून झी मराठी लावते तेव्हा नक्की विचार करतो जग बदलला कि आपण बदललो.
लहान होतो तेव्हा सुट्टीत माझा मामाकडे म्याच बघायला आजू बाजूचे शेजारी यायचे आणि बघताना २०-३० जण जेव्हा प्रत्येक बोल मागे एक्स्पर्ट कमेंट आणि विकेट हुकल्यावर असले हुंकार काढत कि आपण ३ डी आणि ४ डी पेक्षा ज्वलंत म्याच बघतो आहे असच वाटायचे.
ती मज्जा काय वेगळीच होती. एकतर टीवी वर च्यानेल दोन त्यात एक तर फार मध्ये मध्ये लागायचा आणि दुसर्यावर काहीतरी रटाळ कार्यक्रम नाहीतर व्यत्यय आणि ते सप्तरंगी कलर चे पट्टे असलेली स्क्रीन अगदी परिचयाची होती.
आवाज कमी जास्त करायचं काम टीवी बघताना असलेल्या सगळ्यात कच्या लिंबू च काम. आपण तर अनेक वेळा हि जबाबदारी अगदी इमान इतबारे निभावली आहे. च्यानेल बदलयाचा तर प्रश्नच नाही. पिक्चर बघताना ते ढिशुम ढिशुम चे आवाज अगदी प्रेक्षकातून हि यायचे हि मज्जा आजची पिढी कधीच लुटू शकणार नाही.
टीवी आणि घर ह्याच नात जितक जवळचे होते कि घरातल्या भांडण असणार्या चुलत्यांना जोडणारा तो एकमेव धागा होता. आज सगळ हरवल. डिजिटल , एल इ डी च्या काळात पिक्चर खूप चांगल झाल पण ते बघणारा आज धुरकट झाला आहे. रिमोट आणि टच स्क्रीन च्या जमान्यात आपण ते बदलवणारे हात आणि कच्चे लीम्बुच हरवून बसलो आहे. आज कोण जिंकल हरल तरी साला तोंडातून उसासे येतच नाहीत कारण आपण एकतर किती हरले आणि जिंकले बेटिंग मध्ये ह्याचा हिशोब करतो नाहीतर त्यांनी पैसे खाल्ले म्हणून गपचूप च्यानेल बदलतो.
ह्या दोन टोकांमध्ये खूप काही आहे जे आज निसटल आहे. मला पुन्हा एकदा दरवाजाच्या बाहेर जाऊन टीवी च च्यानेल बदलायच आहे. कदाचित ते करताना माझी मुलगी विचारेल बाबा तुम्ही ठीक आहात न पण साला पुन्हा एकदा आपल्याला कौटुंबिक टीवी हवा आहे.

No comments:
Post a Comment