Thursday, 2 October 2014

ती ............. विनीत वर्तक
कधी कधी काय आहे पहिली ओढ कळतच नाही. शाळेच्या त्या दिवसात नक्की काय वाटते अजून हि उमगत नाही. तीच ती शाळा, तोच तो वर्ग आणि तेच ते आपण सगळे. कस लक्ख डोक्यात आहे अजून सगळ. २२ वर्ष निघून गेली. खूप काही बदलल खूप काही शिकलो, विसरलो पण तू अजून आहेस तिकडेच. अजून हि दिसते मला आणि मी सुद्धा अजून हि रमतो तुझ्या त्याच आठवणीत.
किती मज्जा असते न शाळेचे ते निरागस दिवस आणि त्यात त्या खर्या भावना. खरे तर त्या कधी कळल्याच नाहीत आणि कळल्या तरी सांगायची ताकद आपल्यात कुठून. आपण साले सज्जन असल्या गोष्टी संस्कारामध्ये बसतच नाहीत त्यामुळे साला कधी त्याचा विचारच केला नाही. पण ते तुला चोरून बघणं , बोलायचं प्रयत्न करण , तुझा तो कटाक्ष आणि माझी भेदरलेली नजर कि साला काय लोचा तर होणार नाही न...
सगळच कस एकदम निरागस. एखाद्या भुंग्याने निरागसतेने फुलाकडे आकृष्ठ व्हावे तसे. खूप जणी भेटल्या पण तुझ्यासारखी तूच. आजही ते स्थान कोणाला मिळवता आल नाही. ते काय होत आजही न उलगडलेल कोड आहे. प्रेम, मैत्री काय असते त्याची परिभाषा काय असते ह्याची काडीमात्र अक्कल नसणारे आपण दोघे खरे तर मीच तुझ्या पर्यंत मी पोहचू शकलो का नाही आजही मला माहित नाही पण काहीतरी चुंबकीय होते ग तुझ्यात साला तो भुंगा अजून तेच फुल शोधत फिरतो आहे.
आशा आहे कि कधी तरी तू दिसशील आणि पुन्हा एकदा मी असाच आकृष्ठ होईन तुझ्याकडे त्याच निरागस भावनेने आणि त्याच तीव्रतेने. पण ह्या वेळी तू समजून घेशील का? कि अव्यक्त पणेच आपण व्यक्त होऊ. खूप काही आहे पण काहीच नाही अशीच अवस्था आहे माझी....

No comments:

Post a Comment