जागेचा स्पर्श... विनीत वर्तक ©
रॉबर्ट डी निरो चा 'द इंटर्न' नावाचा एक चित्रपट आहे. त्यात निवृत्त झालेला रॉबर्ट आयुष्याच्या संध्याकाळी एक इंटर्न म्हणून एना ह्याथवे च्या कंपनी मध्ये काम करतो. त्या कंपनी मध्ये एका रात्री काम करत असताना त्या दोघांमध्ये संवादा दरम्यान रॉबर्ट तिला सांगतो की मी ह्याच ठिकाणी ४० वर्ष काम केलं. त्या कोपऱ्यात खिडकीजवळ माझं ऑफिस होतं. ती खिडकी माझी साथ २७ वर्ष देत होती. कंपनी मध्ये खाली काय चालू आहे ते मला तिथून सगळं दिसायचं. असं बोलून रॉबर्ट सगळीकडे नजर टाकतो जणू काही ती जागा त्याच्याशी बोलत असावी. तिच्या प्रत्येक भागाचा स्पर्श रॉबर्ट च्या मनात अनेक आठवणींच्या कप्याना खुलवत असेल. आपल्या आयुष्यात अशी काही ठिकाणं असतात जिकडे गेल्यावर तिकडे असणाऱ्या सगळ्या निर्जीव गोष्टी सजीव वाटतात आणि का कोणास ठाऊक आपल्या मनाला स्पर्श करतात. आठवणींचा पाऊस मनाला इतकं चिंब करतो की डोळ्यांच्या कड्याना मग ओलं होण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या शाळेत जायचा योग्य आला. २२ वर्षांनी शाळेच्या आवारात पाऊल टाकल्यापासून तिथली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सजीव झाली होती आणि माझ्या मनातील कित्येक आठवणींना स्पर्श करत होती. कार्यक्रम तळ मजल्यावर होता पण मला दुसरा, तिसरा आणि चौथा मजला खुणावत होते. आयुष्याची सोनेरी १५ वर्ष मी ह्याच मजल्यावर घालवली होती. गुपचूप वरच्या मजल्यावर गेलो. प्रत्येक वर्ग काहीतरी स्पर्शून जात होता. तो खिडकी जवळचा बेंच आणि त्या खिडकीतून दूरवर दिसणारा डोंगर आता टोलेजंग इमारतींच्या गर्दीत हरवला असला तरी मनाच्या डोळ्यांनी मी त्याला आजही बघू शकत होतो. हा चौथीचा वर्ग, हा आठवीचा तर तो दुसरीचा. एका क्षणात मी जवळपास १५ वर्षाच्या प्रत्येक पायरीवरून जात होतो. प्रत्येक पायरीवर आजवर लक्षात नसलेल्या आठवणी सुद्धा पिंगा घालत होत्या. इकडेच तिला पहिल्यांदा बघितलं ते ह्याच वर्गाच्या बाहेर पाय धरून ओणव उभं राहिलो होतो. ह्याच फळ्यावर पहिल्यांदा नाव लिहिलं होतं तर ह्याच वर्गाच्या भिंतीवर अमिबा काढला होता. हीच ती लिफ्ट ज्याचं बटन दाबून तिला प्रत्येक मजल्यावर थांबवायचो आणि हेच ते ग्राउंड जिकडे लंगडी घालून खेळलो होतो. शाळेपेक्षा त्या जागेचा स्पर्श मला सुखावून जातं होता.
आयुष्याची वीस वर्ष १० बाय १० च्या ज्या जागेत काढली त्याच्या भिंती सुद्धा अश्याच स्पर्शून अनेकदा जातात. मुन्नाभाई एम. बी.बी.एस. चित्रपटातील सर्किट चा संवाद माझ्या त्या घराला आजही लागू होतो, "येतो तो चालू होते ही, खतम हो गया". आज जेव्हा तिच्याजवळून जातो तेव्हा मनात विचार डोकावतो की आपण २० वर्ष कसे राहिलो. हसणं, रडणं, भांडण, खेळ, अभ्यास सगळच ह्या चार भिंतीच्या आजूबाजूला होतं. ते अंगण ते कपडे वाळवणाच्या तारा आणि ती कौल सगळीच मनाला स्पर्श करत होती. त्या कौलावर कितीवेळा काठी घेऊन कापलेला पतंग पकडण्याची केलेली कसरत ते कोपऱ्यावर असलेल्या एंटीना च सेटिंग हे सगळच आठवलं आणि चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटायला वेळ लागला नाही. ह्याच जागेमध्ये लहानाचा मोठा झालो. खूप काही मिळवलं खूप काही निसटलं पण तरी त्या जागेचा स्पर्श आजही टचकन डोळ्यांच्या कडा ओल्या करतो हे ही तितकच खरं.
लहानपणी कोणत्याही गाडीचा नंबर लक्षात ठेवण्याचा छंद होता. जेव्हा कधी लोकल ट्रेन मध्ये बसायचो तेव्हा त्या डब्याचा नंबर आणि ती जागा आपसूक मनात कोरली जायची. त्यामुळेच काही वर्षाआधी एकदा ट्रेनमध्ये चढताना डब्याचा नंबर बघून मला आठवण झाली की जवळपास १७ वर्षांपूर्वी ह्याच डब्यातून मी प्रवास केला होता. नंबर प्रमाणे कुठे बसलो होतो हे लक्षात आल्यावर आपसूक पावलं त्याच सिट कडे वळाली. पण त्या खिडकीच्या सिटवर एक प्रवासी बसलेला होता. ५-६ स्टेशन गेल्यावर गाडी बरीच रिकामी झाली पण मी मात्र तो प्रवासी कधी उठतो आणि मी त्या जागेचा स्पर्श अनुभवतो ह्या विचाराने त्याच्या समोरच ठाण मांडून उभा होतो. माझं असलं वर्तन बघून दोन- तीन वेळा तिरका कटाक्ष टाकला पण जागा सोडेन तो मुंबईकर कसला? मी त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत तिकडेच उभा राहिलो. मला शेवटच्या स्टेशनवर उतरायचं असल्याने कधी न कधी हा उठणार खात्री मला होती. अखेर एक स्टेशन आधी तो जागेवरून उठला आणि मी पटकन त्या जागेवर बसलो. त्या एक स्टेशन च्या प्रवासाचा स्पर्श मला १७ वर्ष मागे घेऊन गेला. आधी कधी डोळ्यांना न दिसणारे बदल आता पटकन डोळ्याच्या नजरे समोर दिसायला लागले आणि पटकन माझा मीच १७ वर्षापूर्वीचा माझ्या समोर उभा राहिलो.
प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या काही जागा असतात ज्याचा निर्जीव स्पर्श पण आपल्या आठवणींच्या वारुळाला जाग करतो. मग त्या आठवणींच्या पावसात आपण प्रत्येक वेळी भिजून चिंब होतो. निर्जीव जागांचा हा स्पर्श अनेकदा आपल्याला सजीव करतो नाही का?
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment