'विरार की छोरी' लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक... विनीत वर्तक ©
एकेकाळी हिंदी चित्रपट सृष्टीतील सगळ्यात प्रसिद्ध हिरो म्हणून गोविंदाकडे बघितलं जायचं. 'विरार का छोरा' असं त्याच टोपणनाव खूप प्रसिद्ध होतं. त्याच विरार मधून खऱ्या आयुष्यात एका खऱ्या हिरोने देशसेवा करण्याचं व्रत उचललं आणि ते पुर्णत्वाला नेलं. त्याच नाव होतं मेजर प्रसाद गणेश महाडिक. मेजर प्रसाद महाडिक भारतीय सेनेच्या ७ बटालियन च्या बिहार रेजिमेंट मध्ये होता. भारतीय सेनेतील एक बहादूर आणि शिस्तप्रिय ऑफिसर म्हणून त्याला सेनेत सगळेच ओळखत असत. ३० डिसेंबर २०१७ च्या दिवशी भारताने अरुणाचल प्रदेश च्या तवंग जिल्ह्यात मेजर प्रसाद महाडिक च्या रूपाने एका सिंहाला गमावलं. हा धक्का जितका भारतासाठी मोठा होता त्यापेक्षा अधिक त्याची आयुष्याची जोडीदार गौरी महाडिक साठी मोठा होता. त्याच्या जाण्याने झालेली पोकळी कधीच भरून निघणार नव्हती.
एकदा सहज घरात गौरी महाडिक ह्यांना आपल्या मेजर असणाऱ्या नवऱ्याची भारतीय सेनेचं चिन्ह असणारी कॅप घालून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी क्लिक करणार तोच मागून प्रसाद चे शब्द होते,
"सेल्फी नको काढूस, ती भारतीय सेनेची कॅप माझी आहे. ती मी कष्टपूर्वक मिळवली आहे. तुला ती कॅप घालून फोटो काढण्याची इतकीच इच्छा आहे तर भारतीय सेनेत प्रवेश घे आणि स्वतः ती कॅप कमव. ती कॅप घालायला ती कमवावी लागते".
मेजर प्रसाद चे ते शब्द गौरी महाडिक च्या मनात कायमचे कोरले गेले. त्याच्या मृत्यूचा शोक आणि दुःख करण्यापेक्षा आपल्या जोडीदारासाठी श्रद्धांजली म्हणजे त्याची ती कॅप, त्याचा तो गणवेश आणि त्याच्या खांद्यावर असणारे ते तारे कमावणे. गौरी च्या मते मेजर प्रसाद तिच्या आयुष्यात आता जवळ नसला तरी तो नेहमीच तिच्या सोबत राहणार होता म्हणून गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू सुद्धा तिने पुसलं नव्हतं. गौरी च्या मते मंगळसूत्र हा स्री चा एक दागिना नाही तर तिचं आयुष्य असते. प्रसाद नेहमीच माझ्या सोबत आहे.
एका लग्न जमावणाऱ्या साईट वरून गौरी आणि प्रसाद ची ओळख झाली. अगदी दुसऱ्या भेटीत प्रसाद ने तिला लग्नाची मागणी घातली आणि गौरीच्या आयुष्याचा अर्थ बदलून गेला. मेजर प्रसाद महाडिक हे नावं तिच्यासोबत जोडलं गेलं ते कायमचं. चार वर्षाच्या ओळखीत प्रसाद सोबत तिने फारफार तर एक वर्ष सोबत घालवलं कारण मेजर प्रसादसाठी पहिलं कर्तव्य भारत देश होता. तो गेल्यानंतर पण त्याच्या आवाजाची साथ गौरी सोबत होती. येणारे फोन कॉल्स चे रेकॉर्ड आणि जवळपास ३६,००० पेक्षा जास्त फोटो आजही तिच्यासोबत आहेत.
भारतीय सेनेचा गणवेश आणि ती कॅप डोक्यावर घालणं सोप्प नव्हतं हे गौरी ला चांगलं माहीत होतं. कारण ती कमवावी लागते हे मेजर गौरव चे शब्द मनात घर करून होते आणि तिने ते कमवायचं ठरवलं. प्रवास सोप्पा नव्हता. भारतीय सेनेची शिस्त, नियम, ट्रेनिंग सगळचं अतिशय कठीण होतं. भारतीय सेनेच्या टॅगलाईन मध्ये एक वाक्य नेहमीच लिहलेलं असते. ते म्हणजे,
"Do you have it in you?" ह्याचा अर्थ आहे की तुमच्याकडे खालील गुण आहेत का?
CAPABILITY, PATIENCE, MATURITY,INTELLIGENCE, PRACTICE/ REGULARITY,DETERMINATION, COURAGE
हे गुण जर तुमच्यात असतील तरच तुम्ही भारतीय सेनेसाठी लायक आहात.
पेशाने कंपनी सेक्रेटरी, वकिलीची पदवीधर असणाऱ्या गौरीला एक छान असणारा जॉब सोडून भारतीय सेनेत जायचं होतं. आपल्या आई- वडिलांची तसेच सासू- सासऱ्यांची साथ तिला प्रत्येक पावलावर होती. भारतीय सेनेच्या Service Selection Board (SSSB) ची परीक्षा गौरी महाडिक प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पण खरी सुरवात आता होती. ४९ आठवड्याचं भारतीय सेनेचं ट्रेनिंग खूप खडतर होतं. Officers’ Training Academy (OTA) Chennai इकडेच ट्रेनिंग घेऊन मेजर प्रसाद महाडिक ने भारतीय सेनेत प्रवेश घेतला होता. आता गौरी महाडिक त्याच्याच पावलावर पाऊल टाकत तिकडे दाखल झाली होती. गौरी च्या मते,
"मेजर प्रसाद महाडिक चा वारसा आणि भारतीय सेनेचं नावं ह्याला धक्का लागेल असं काही करायचं नव्हतं, एक चूक आणि त्यावर लागलेला डाग कधीच पुसला जाणार जाणार नाही ह्याची पुरेपूर कल्पना मला होती".
७ मार्च २०२० ला गौरी महाडिक आता लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक म्हणून भारतीय सेनेची एक ऑफिसर म्हणून रुजू झाली. ८ मार्च ला स्री दिवस पूर्ण देशात साजरा झाला पण लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक ने आपल्या कर्तृत्वाने ह्या दिवशी आपल्या अंगावर भारतीय सेनेचा गणवेश, भारतीय सेनेची कॅप आणि खांद्यावर असणारे स्टार कमावले होते. आज भारतातल्या सगळ्याच स्रीयांपुढे तिने आपल्या कर्तृत्वाने एक आदर्श ठेवला आहे.
लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक ह्यांना माझा कडक सॅल्युट आणि तुमचा आदर्श नक्कीच अनेक स्त्रीयांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देईल. काही गोष्टी नुसत्या मिळत नाहीत तर त्या कमवाव्या लागतात. त्यासाठी अनेक संघर्षातून स्वतःला सिद्ध करावं लागते. आज तुमच्या खांद्यावर असणारे ते तारे तुम्ही कमावले आहात त्याला शब्द नाहीत. आज मेजर प्रसाद महाडिक जिकडे कुठे असतील तिकडून त्यांना तुमचा नक्कीच अभिमान असेल. तुमचा हा प्रवास बघून भारतीय सेना आणि आपल्या देशाविषयी असलेला आदर प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच वाढला असेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment