Tuesday 7 April 2020

व्हेंटिलेटर चा भारतीय जुगाड (फ्रुगल इंजिनिअरींग)... विनीत वर्तक ©



व्हेंटिलेटर चा भारतीय जुगाड (फ्रुगल इंजिनिअरींग)... विनीत वर्तक  ©
भारतीय लोकं नेहमीच जुगाड करण्यासाठी भारतात आणि विश्वात प्रसिद्ध आहेतजेवढं काही उपलब्ध आहेत्या संसाधनांचा पुरेपूर वापर करून अतिशय कमी वेळेतकमी खर्चात बचत करून एखादं काम ठरलेल्या पद्धतीपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने पूर्णत्वाला नेण्याची भारतीयांची खासियत आहेह्यालाच आपण जुगाड असं म्हणतोह्याच जुगाड ला अभियांत्रिकी भाषेत फ्रुगल इंजिनिअरींग म्हंटल जातेसध्या पूर्ण जग कोरोना च्या सावटाखाली वावरते आहेदिवसेंदिवस कोरोना ची लागण होणारा आकडा अनेक पटीत वाढतो आहेकोरोना चे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात त्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थाडॉक्टरहॉस्पिटल ह्यांच्यावर ताण वाढत आहेह्याच सोबत ह्या हॉस्पिटल ला होणारी उपकरणांची कमतरता सध्या सगळ्याच देशांपुढे मोठा प्रश्न बनून उभा आहेह्यातलं जन्म आणि मृत्यूच्या मध्ये शेवटचं ढाल असलेलं उपकरण म्हणजेच व्हेंटिलेटर.

भारतात सध्या जवळपास ४५,००० - ५०,००० च्या आसपास व्हेंटिलेटर उपलब्ध आहेतपण हा आकडा .३५ बिलियन लोकसंख्या असलेल्या देशासाठी अतिशय कमी आहेअमेरीकाइटली सारखे देश जे वैद्यकीय उपचारासाठी जगात खूप नावाजलेले आहेतत्या देशांनी कोरोना पुढे सपशेल नांगी टाकल्याचं चित्र पुढे येते आहेअमेरीका सारखा जगातील सगळ्यात प्रगत देश आज हतबल झाला आहेआज उपचारासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने अनेक जीव अमेरीका आणि इटली सारख्या देशात मृत्युमुखी पडले आहेतइन्वासिव्ह व्हेंटिलेटरच कोरोना (कोविड १९च्या उपचारात वापरले जाऊ शकतातह्या प्रत्येक व्हेंटिलेटर ची आजमितीला किंमत  लाख रुपयांच्या घरात जातेआज इतके पैसे मोजून ही हे व्हेंटिलेटर मिळवणे कठीण आहेकारण प्रत्येक देश आज आपल्यासाठी ही व्हेंटिलेटर जपून ठेवतो आहे.

भारतासारख्या देशाला ह्याची किंमत परवडणारी नाही पण भारत येत्या काळात जवळपास . लाख ते . लाखाच्या आसपास व्हेंटिलेटर बनवतो आहेतरीसुद्धा भारताला अजून किफायतशीर व्हेंटिलेटर ची गरज आहेभारतातील कोरोना च्या विरुद्ध असलेल्या लढाईत पुणे इथल्या अवघ्या दोन वर्षापूर्वी चालू झालेल्या स्टार्ट अप कंपनीने भारतीय जुगाड पुन्हा एकदा जगासमोर आणला आहेनिखील कुरळे आणि हर्षित राठोड ह्या दोन आय.आय.टीइंजिनिअर नी सुरु केलेल्या नॉक्का रोबॉटिक्स ने एका क्रांतिकारी इन्वासिव्ह व्हेंटिलेटर ची निर्मिती केली आहेनॉक्का रोबॉटिक्स आणि व्हेंटिलेटर चा तसा काही संबंध नव्हतापुण्यात ८००० स्केवर फुटावर आपलं अस्तित्व असणारी कंपनी सोलार पॅनल पाणी  वापरता साफ करण्याच्या रोबोट्स ची निर्मिती करतेह्या कंपनी मधील सगळ्यांची सरासरी वय हे २५-२६ वर्ष आहेकोरोना ने पूर्ण जगाभोवती आणि पर्यायाने भारताभोवती आपला विळखा घट्ट केल्यावर कंपनीचा सी..निखिल कुरळे ने आपल्या टीम सोबत व्हेंटिलेटर ची निर्मिती करू शकतो का ह्यावर काम करायला सुरवात केली.

मेडीकल स्टाफडॉक्टर ह्यांची मदत घेऊन त्यांनी आधी नॉन इन्वासिव्ह व्हेंटिलेटर तयार केलात्याची लॅब मध्ये चाचणी यशस्वी झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा कोरोनासाठी लागणाऱ्या इन्वासिव्ह व्हेंटिलेटर कडे वळवलाहा इन्व्हसीव व्हेंटिलेटर तयार करताना त्यांच लक्ष्य होतं ते म्हणजे त्याची किंमतनॉक्का रोबॉटिक्स ने तयार केलेल्या इन्वासिव्ह व्हेंटिलेटर च्या प्रोटोटाइप ची किंमत अवघी ५०,००० रुपये आहेजगातील व्हेंटिलेटर च्या /१० किमतीत त्यांनी ह्याची निर्मिती केली आहेत्यांच्या ह्या क्रांतिकारी शोधाला आय.आय.टीकानपुर आणि इंडियन एंजल नेटवर्क चं पाठबळ मिळालं आहेनिखिल च्या मते सर्व टप्पे  सुरळीत पडले तर नॉक्का रोबॉटिक्स युद्ध पातळीवर मे महिन्याच्या शेवटापर्यंत ३०,०००  इन्वासिव्ह व्हेंटिलेटर ची निर्मिती करू शकेलकाही अडचणी ह्यामध्ये ही आहेत कारण ह्या  इन्वासिव्ह व्हेंटिलेटरला लागणारे सेमी कंडक्टर हे भारताला आयात करावे लागणार आहेतत्यासाठी सरकारला त्यांच्या त्वरित उपलब्धीसाठी दखल द्यावी लागणार आहेनॉक्का रोबॉटिक्स च्या क्रांतिकारी शोधाची दखल अमेरीकेतील सगळ्यात प्रतिष्ठेच्या एम.आय.टी. (Massachusetts Institute of Technology) ने घेतली आहेह्यावर ट्विट करताना अमेरीकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेट सेक्रेटरी एलिस जीवेल्स ह्यांनी म्हंटल आहे,

"We are cheering on these Indian engineers as they race to build a low-cost ventilator -- a potential game-changer for #COVID19. W/ support from @MIT engineers & production advice from a US-based company, we hope this invention succeeds & can eventually be produced at scale,"

पुन्हा एकदा तरुण भारतीय इंजिनिअर नी आपल्या जुगाड (फ्रुगल इंजिनिअरींगने भारताचा तिरंगा अटकेपार रोवला आहेत्यांच्या क्रांतिकारी इन्वासिव्ह व्हेंटिलेटर येत्या काळात भारतासकट जगातील अनेक देशांच्या कोरोना विरुद्ध च्या युद्धात निर्णायक भुमिका निभावणार आहेह्या शोधाची निर्मिती करणारी नॉक्का रोबॉटिक्स चे अभियंते आणि ह्या कंपनीची सुरवात करणारे निखील कुरळे आणि हर्षित राठोड ह्यांच खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासाला शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment